किलबिल : गणपती बाप्पा मोरया!- नचिकेत

Submitted by पूनम on 14 September, 2010 - 10:24

नाव- नचिकेत
वय- सात वर्ष

नचिकेताने काढलेले हे बाप्पाचे चित्र, एक चित्र होतं, ते पाहून काढलंय. तीन रफ चित्र काढून शेवटी, 'आई हे फायनल आहे' असं ठरलं Happy

माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे Proud

ganapati.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच बाप्पा Happy

टोपीवाले उंदीरमामा पण आवडले Happy

शाबासकी नचिकेत बरोबर आईलाही ( आईला शाबासकी दिली की अजुन भुन्भुन करेल आणि आम्हाला खुप छान छान चित्र पहायला मिळतील Proud )

लले तुझ निरीक्षण भारिच. Proud

मस्त बाप्पा ... नचिकेत मस्त, छान..
उंदराची स्माईल मस्त ..
माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे>> Lol

नचि, मस्त की रे! उंदीरमामा तुरुतुरु पळतायत..
लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे >>पूनम, अशी कलात्मक भुणभुण करत जा हो! Lol
मूळ चित्र नकोय आम्हाला, हेच पहायचंय. आणि नचिच्या स्वरचित गोष्टी (तलवार घेऊन राजकन्येच्या नाकातून बाहेर येणार्‍या अजगराची खांडोळी करणारा राजपुत्र वगैरे) इथे टायपायची भुणभुण मी सुरु केलीये असं समज. Proud

शाब्बास नचि.. मस्त काढलं आहेस चित्र Happy

<माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे फिदीफिदी> हे साफ चूक आहे. चि. नचिकेत छत्रे हा अतिशय शहाणा मुलगा आहे. Happy

Pages