किलबिल : गणपती बाप्पा मोरया!- नचिकेत

Submitted by पूनम on 14 September, 2010 - 10:24

नाव- नचिकेत
वय- सात वर्ष

नचिकेताने काढलेले हे बाप्पाचे चित्र, एक चित्र होतं, ते पाहून काढलंय. तीन रफ चित्र काढून शेवटी, 'आई हे फायनल आहे' असं ठरलं Happy

माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे Proud

ganapati.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर... आडो पहिल्याक्षणी माझ्याही मनात लंबोदरचं आलं. Happy
आईच्या भुणभुणीला न कंटाळता चित्र काढल्याबद्दल नचिकेतला शाबासकी Happy Proud
(माझी भुणभुण बरीच कमी पडत्ये. आज परत नव्या जोमाने सुरु होते Proud )

सुंदरच काढलंय गं चित्र ! एकदम गोड Happy
सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून दाखव बरं का त्याला ( हे वाक्य सोडून ) म्हणजे पुढच्या वेळी जरा कमी लग्गा लावावा लागेल Proud

शाब्बास नचिकेता ! बघ बघू , आईने मागे लागून चित्र काढून घेतल्यामुळे कित्ती लोकांना तुझी चित्रकला बघता आली आणि तुला शाब्बासकी देता आली . ( पूनम , हे त्याला वाचून दाखव Happy ) ३ दा रफ चित्र काढून ४थ्यांदा एव्हढं छान चित्र फार कमी जण काढू शकतात हं . Wink

बाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा.>>> Lol खरंच की.
मस्त काढलंय नचिकेतने. पूनम, अजून तो ड्रॉईंगच्या क्लासला जातो का?

तीन वेळा रफ काढून मग इतकं सुरेख फायनल.....क्या बात है.....!!
देखणा आलाय हं बाप्पा !!

सुंदर काढलेत नचिकेत गणपतीबाप्पा. चित्रातले रंग सुंदर. रेषा अगदी ठळक. भरपूर जेवलेत आणि आईने केलेले नैवेद्यातले सगळे मोदक गट्ट करून बसलेत असं दिस्तंय. Happy

तीन वेळा रफ चित्र काढलं म्हणजे (आईच्या भुणभुणीने वाढीस लागलेला) पेशन्स आहे Wink छान काढलय चित्र Happy

छान!

धन्यवाद Happy
चित्राचं प्रपोर्शन, विशेषतः चेहरा मनासारखा जमायला वेळ लागला बराच.. हाही चेहरा जरा उग्र आलाय, मूळ चित्रात चेहरा सौम्य, प्रेमळ आहे Happy मूळ चित्राचाही फोटो टाकेन संध्याकाळी..

ललिता, पाऊल! Lol बरोब्बर लक्ष गेलं तुझं..
सायो, हो जातो क्लासला.. मूळ चित्र क्लासच्या ताईनेच काढून दिलं होतं, ज्यावरून हे चित्र काढलंय..

प्रतिक्रिया वाचायला देते त्याला संध्याकाळी.. पण तुमचं प्रोत्साहन पाहून त्याला नक्कीच आनंद होणारे Happy

Pages