प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
माझे अकाउंट उघडतेस का?
माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ||
खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला
प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला
इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१||
अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||२||
ऑनलाईन प्रेम, मोबाईल एसएमएस प्रेम सुविधांचे काय?
या सोईसार्या मिळती इतरांना मलाही मिळतील काय?
प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||
आता स्नेहाची गुंतवणूक करतो
ओव्हरड्राफ्ट प्रितीची इंस्टॉलमेंट मिळवतो
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०८/२०१०
पाषाणभेद, 'पाषाणभेद' हा
पाषाणभेद,
'पाषाणभेद' हा एखादा नवीन काव्यप्रकार आहे का? म्हणजे दगडही भेदणार्या कविता!??
कैलास,
त्या प्रेग्नंट वूमनसाठी मात्र तो 'हाइट ऑफ क्रेझीनेस' ठरेल.
-'बेफिकीर'!
(अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व! )
(अवांतर प्रतिसादाबद्दल
(अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व! )
एथे एक तरी ' सवांतर ' प्रतिसाद आहे काय ??
( प्रतिसाद का बदललात बेफीकीर :
किरकोळ
किरकोळ ट्रान्सेक्शन्स......... ?
Pages