प्रेमाची बँक

Submitted by पाषाणभेद on 27 August, 2010 - 02:42

प्रेमाची बँक

तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
माझे अकाउंट उघडतेस का?
माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ||

खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला
प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला
इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१||

अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||२||

ऑनलाईन प्रेम, मोबाईल एसएमएस प्रेम सुविधांचे काय?
या सोईसार्‍या मिळती इतरांना मलाही मिळतील काय?
प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||

आता स्नेहाची गुंतवणूक करतो
ओव्हरड्राफ्ट प्रितीची इंस्टॉलमेंट मिळवतो
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०८/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाषाणभेद,

'पाषाणभेद' हा एखादा नवीन काव्यप्रकार आहे का? म्हणजे दगडही भेदणार्‍या कविता!??

कैलास,

त्या प्रेग्नंट वूमनसाठी मात्र तो 'हाइट ऑफ क्रेझीनेस' ठरेल.

-'बेफिकीर'!

(अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व! )

(अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व! ) Rofl

एथे एक तरी ' सवांतर ' प्रतिसाद आहे काय ??

( प्रतिसाद का बदललात बेफीकीर : Uhoh

किरकोळ ट्रान्सेक्शन्स......... ?

Happy

Pages