प्रेमाची बँक

Submitted by पाषाणभेद on 27 August, 2010 - 02:42

प्रेमाची बँक

तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
माझे अकाउंट उघडतेस का?
माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ||

खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला
प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला
इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१||

अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||२||

ऑनलाईन प्रेम, मोबाईल एसएमएस प्रेम सुविधांचे काय?
या सोईसार्‍या मिळती इतरांना मलाही मिळतील काय?
प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||

आता स्नेहाची गुंतवणूक करतो
ओव्हरड्राफ्ट प्रितीची इंस्टॉलमेंट मिळवतो
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०८/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक ब्यँकर या नात्याने :

माझ्या कार्यक्षेत्रावर शिंतोडे उडवल्या बद्दल त्रिवार निषेध ....

Angry

बेडूक कमी झालेत आजकाल. चिमण्या देखील

निसर्गाचा र्‍हास मानवाने स्वतःच ओढवून घेतला आहे

हो .

आमच्या कडे "असली" प्रेमाची अकाउंट काढण्याची कामे सेक्युरीटी करते ...वॉचमन कदाचित कविला 'मदत' करु शकेल

<<<चिमण्या देखील<<<
मोबाईल टॉवरमुळे झालं ते!
पण आमच्याकडे चिमण्या बाराही मास अस्तात्....अगदी उच्छाद मांडतात!

चिमण्यांच्या बाबतीत रुडच हाय ते! म्हणुन बिचा-या उपनगरे शोधतात!
आणि सांगवीकर त्यांना फार प्रिय!
मंद्या तु का लाजतोयेस? तुझा रुद्र रुद्रावतार धारण करेल असं काही कळल्यावर!

प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३||

यातून कवीला काय नेमकं अभिप्रेत आहे???????? Happy

हा दगडफोड्या इकडं काय करतोय???.......:स्वतः चे डोके फोडणारा बाहूला:

या बँकेच्या "शाखा" कुठे कुठे आहेत???? Happy

>कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!!

खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं

>>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१

चला यमकं जमवुया

तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?

>>> च्यायला हे मी कसं पाहिलं नाही ...:हहगलो:

बादवे असला प्रपोज केल्यावर वारांगना देखील जोड्याने मारेल ....

@ प्रसाद गोडबोले : बँकेच्या कार्यक्षेत्रावर कसे काय शिंतोडे उडवले बॉ?
@भुंगा : हा जि.गा.कोण हो? नाही नविनच आहे मी. इतिहास माहित नाही.
@मंदार_जोशी : नाही हो मी नाही बँकेत.
@ प्रसाद गोडबोले : >>> आमच्या कडे "असली" प्रेमाची अकाउंट काढण्याची कामे सेक्युरीटी करते ...वॉचमन कदाचित कविला 'मदत' करु शकेल
कोणती आहे बँक तुमची? अलरेडी "असली" प्रेमाची अकाउंट उघडण्याची सोय पण केली तुमच्या बँकेने? मग किती कस्टमर, ठेवी आहेत? बघा म्हणजे मीच कविता उशीरा केली. तुमच्याकडे असल्या सोई अलरेडी आहेत की! लगेच पत्या पाठवा.
@प्रसाद गोडबोले : >>> चिमणयांचं मास कुणी खालंय का कधी ??
ई..ई.. अरे बाबा श्रावण चालू आहे ना. नंतर बोलू असले काही.
@प्रसाद गोडबोले >> खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं

मग हि घ्या कविता त्यावरची:
http://www.maayboli.com/node/19157

@अमीत, प्रसाद, डॉ. कैलास : >>> तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
यात न समजण्यासारखे काही नाही. अन प्रसाद वारांगना का मारेल बाबा? तिला जर उघडउघड मागणी करतोय कोणी (मी नाही बरं का!) अन मुल होवू देशील का असे विचारतो तर कोणती बाई मारेल? हं तिला त्या नरकातून बाहेर यायचे नसेल तरच असे होवू शकेल बाबा.

पाभे....... प्रेमाचं अकाउंट अजून उघडलं नाही आणि तान्हुल्याच्या रुपात पोस्ट डेटेड चेक?
अकाउंट उघडल्यावर..... काही ट्रान्सेक्शन्स झाल्यावर तान्हुला रुपी चेक येईल की नाही..... ?

आता तुम्हाला अकाऊंट उघड ण्या आधीच तान्हुला हवा असेल तर...... तर मी काय म्हणावे...? Happy

मला एक जोक आठवला....

हाईट ऑफ लेझीनेस... = मॅरीइंग ए प्रेग्नंट वुमन

Lol Lol Lol

Pages