विठ्ठल उभा राहीला

Submitted by पाषाणभेद on 26 August, 2010 - 21:47

विठ्ठल उभा राहीला

(धृपदात थोडी आलापी घेतली आहे त्यामुळे धृपद जरा लाबंल्यासारखे वाटेल. प्रत्यक्षात
विठ्ठल उभा राहीला |
मी तो डोळा पाहीला ||
एवढेच धृपद आहे. )

विठ्ठल उभा राहीला
विटेवरी उभा राहीला
राहीला राहीला उभा राहीला
विटेवरी विठ्ठल उभा राहीला
मी तो डोळा पाहीला
पाहीला पाहीला डोळा पाहीला
डोळा पाहीला
मी तो डोळा पाहीला ||धृ||

वाळवंटी काठी किती नाचू गावू
विठ्ठल चरणी किती लिन होवू
आनंदाचा पुर येई
आनंदाचा पुर येई
दिनांचा देव वंदिला ||१||

पापपुण्याचा हिशेब मी कसा ठेवू
माउलीविणा लेकरू मी कसा राहू
भोळा भाव माझा
भोळा भाव माझा
विठ्ठलाचरणी वाहीला ||२||

चंद्रभागेकाठी एकटा नाचलो
मुखाने अभंग तालात गायलो
साथीला येवून माझ्या
साथीला येवून माझ्या
प्रत्यक्ष विठ्ठल नाचला ||३||

कुडीमध्ये प्राण जपला जपला
विठ्ठलाविण दुजा देव नाही केला
शेवट आला आता
शेवट आला आता
कुडीमध्ये विठ्ठल बसला ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२५/०८/२०१०

गुलमोहर: 

@ बेफिकीर : चंद्रभागा हे वाहत्या जिवनाचे प्रतिक आहे. नदीचे पाणीही वाहतेच असते. पाण्याला जीवनही म्हणतात. कवी कल्पना करतो की जिवन जगतांना एकटा जगलो. आता नाचणे म्हणजे जगणे आहे. लक्षात घ्या. एकटा असतांनादेखील त्याला विठ्ठलाची साथ होती, असे कवीला म्हणायचे आहे.
मी हे कडवे तुम्हाला समजावून दिले आहे. आता घरी जावून पुर्ण कविता पुन्हा अभ्यासा. उद्या शाळेत येतांना कविता पुर्ण पाठ करून आले पाहिजे अन तिचे रसग्रहणही लिहून आणा. गाईडचा उतारा मारू नका. तुमच्याबद्दल बर्‍याच तक्रारी आल्या आहेत. मुख्याध्यापकांनादेखील माहीत आहे सगळे.
उद्या पुन्हा तुम्हाला अभ्यास देईल. सहामाहीत निकाल खचलाय तुमचा.
(खॅ खॅ खॅ... खिक खिक....)

(थोडक्यात बेफिकीर तुम्ही कविता फार बारकाईने वाचलीत. तुमची शंकादेखील विचारली. आनंद वाटला. आजकाल असे तुमच्यासारखे विद्यार्थी मिळत नाही हो. अभ्यास करा मोठे व्हा. धन्यवाद.)

बाकीच्या प्रतिक्रियाधारकांना- हरिश, प्रकाश, गंगाधर विशल्याभौ, हबा व वाचकांना देखील धन्यवाद.