आमचा देश न आम्ही

Submitted by अनिकेत आमटे on 18 August, 2010 - 23:47

१२ ऑगस्ट २०१०
दुपारचे ४ वाजले होते...दवाखान्याची O.P.D. सुरु होती...अचानक लोक बिरादरी प्रकल्पाच्या गेट मधून काही आदिवासी बांधव एका माणसाला खाटेवर उचलून आणतांना दवाखान्यात काम करणाऱ्या माणसाने पाहिले....आणि धावपळ सुरु झाली....लोक बिरादरी प्रकल्पा पासुन सुमारे २५ किलो मीटर अंतरावर असलेल्या हितापाडीच्या जंगलात घराला कुंपण करण्यासाठी बांबू आणावयास व कंद-मुळे गोळा करण्यास गेलेल्या एका आदिवासी बांधवावर जंगलातील मादी अस्वलाने हल्ला चढविला....शरीराच्या अनेक भागावर अस्वलाने चावून अक्षरशः लचके तोडले होते...जंगलात एकटाच गेला असल्या मुळे त्या आदिवासी बांधवाला शोधून काढण्यास इतरांना उशीर लागला....सकाळी सुमारे ८ वाजता त्याच्या वर हल्ला झाला...हे गाव जंगलात आहे....रस्ते अतिशय वाईट...गाडी जाण्याचा प्रश्नच नाही...चालत आणि उचलून असेच आणावे लागते आजही.......आणि पुढे किती वर्षे कोण जाणे.....चालत उचलून आणे पर्यंत संध्याकाळचे ४ वाजले होते..... डॉ. प्रकाश-डॉ. मंदाकिनी यांनी प्राथमिक तपासणी केली....डॉ.दिगंत आणि डॉ.अनघा व इतर सहकाऱ्यांनी त्या जखमी बांधवाच्या जखमा स्वच्छ करून आणि अनेक टाके देऊन पट्टी बांधून बंद केल्या....या सर्व प्रकाराला तब्बल २ तास लागले....एवढ्या मोठ्या जखमा होत्या सर्वांगावर....पण त्या आदिवासी बांधवाची सहन शक्ती प्रचंड होती....तो पूर्ण पणे शुद्धीत होता...त्याने स्वतः ओढवलेला प्रसंग आम्हास सांगितला....फोटो पाठविण्याचा एकच उद्देश आहे....तो म्हणजे लोकांना परिस्थितीची जाण व्हावी....

Bear Bite Patient-1 -12 August 2010.jpg

१४ ऑगस्ट २०१०
रात्रीचे ८ वाजले होते...छत्तीसगड च्या डोक्के गावातील एका आदिवासी बांधवाला अश्याच प्रकारे दवाखान्यात आणले आहे...हा माणूस तब्बल ३ दिवसांनी लोकांना सापडला...त्याच्या जखमांना प्रचंड दुर्गंधी येत होती....या माणसाचा एक डोळा अस्वलाच्या हल्ल्यात निकामी झाला होता....त्याच्यावरही वरील प्रमाणेच उपचार केल्या गेले....लोक बिरादरी प्रकल्प हा महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश च्या सीमेवर आहे....२००-२५० किलोमीटर अंतरावरून आदिवासी आणि इतरही गरीब बांधव या दवाखान्यात नेहमीच येत असतात.....राज्ये बदलली तरी परिस्थिती सारखीच आहे....छत्तीसगड मध्ये तर परिस्थिती अजून जास्त वाईट आहे.....कोण तारणार या सर्व गरीब-निरपराध बांधवांना? स्वातंत्र्य मिळाल्या पासुन किंचितही सुधारणा होत नाही...याला कोण आहे जबाबदार? या सर्व गरीब आदिवासी बांधवांसाठी गेली अनेक वर्षे करोडो रुपयांची Packages जाहीर होतात...मग परिस्थिती का बदलत नाही? संवेदना कधी होणार जाग्या? माणुसकी आणि लाज कुठे गहाण टाकली माणसाने? हा भ्रष्टाचार कधी होणार नष्ट? कोण करणार नष्ट? अनेक प्रश्न आहेत मनात पण मार्ग काय?

Bear Bite Patient-1 -14 August 2010.jpg

देशात सुधारणा प्रचंड झाली आहे....पण नेमके कुठे-कुठे?......Multiplex, Big Bazaar, मोठाल्ले MOLLS, हॉटेल्स, कोर्पोरेट सेक्टर्स, मोबाईल, इंटरनेट आणि I.T. या सर्व क्षेत्रातील प्रगती हे सगळे आजही फक्त्त शहरा पुरतेच मर्यादित आहेत.....अपवाद-काही ठीकाणी ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा पोहोचली आहे. ती पण क्रांती आहे.....पण आदिवासी बांधव आणि शहरातील झोपडपट्टीत राहणारी गरीब जनता यांच्या साठी जी काही कोट्यावधींची PACKAGES दरवर्षी जाहीर होतात त्याने नेमका विकास होतो तरी कोणाचा? खेड्यातील-पाड्यातील शाळांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे.....रेशन वेळेवर मिळाले नाही म्हणून अनेक आश्रम शाळा या वर्षी तब्बल २०-२५ दिवस उशिराने सुरु झाल्यात.....त्या शाळांचे परीक्षण करणार कोण? परीक्षण करणाराही भ्रष्टाचारी निघाला की झाले.....अशा अनेक शाळा या महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात आहेत जिथे शिक्षक फक्त्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर आणि पगाराच्या दिवशी जातात....१० वी - १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के कॉपी सर्रास चालते....खेड्या पाड्यातील ९० % शिक्षक दारूच्या आणि गुटका च्या आहारी गेले आहेत....अनेक शाळांच्या समोरच पानठेला आढळतो(हे कायद्याने गुन्हा आहे तरी पण...) .....हेच शिक्षक मुलांचे आदर्श ठरतात...आणि मग मुलं पण त्याच मार्गी लागतात...तसेच हाल खेड्या-पाड्यातील दवाखान्यांचे आहेत...कोणीही डॉक्टर तयार नसतो खेड्यात जाऊन राहायला....या भागातील एका तालुक्याचा तहसीलदार आदिवासींच्या खिशात हात घालून पैसे काढायचा, सर्रास दारू पिऊन ऑफिस मध्ये बसायचा, कित्येकदा दारू पिऊन गटारात पडलेला आम्ही स्वतः त्याला बघितले आहे......सहावा वेतन आयोग लागला म्हणून काय ही परिस्थिती सुधरणार थोडी आहे.....मग हे लक्षात घ्यायला हवे की योग्य अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, या मुलभूत सुविधा मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे तसा तो आदिवासी आणि गरीब जनतेचा पण हक्क आहे... कारण तो ही भारतीयच नागरिक आहे....मुळ मुद्दा असा की स्वातंत्र्या नंतर जी काही PACKAGES जाहीर झालीत त्यातील एक किंवा दोन PACKAGES नीट आणि पूर्णपणे गरीब जनतेसाठी वापरली गेली असती तर देशाचे व गरिबांचे सोने झाले असते.....यागरीब जनतेला काम द्या, शिक्षणात संधी द्या....निवडणुकीत मत मिळविण्यासाठी आयते काहीही देऊ नका..... त्यांना लायक बनवा.... स्वतःच्या पायावर त्यांनी उभे राहावे असे शिक्षण द्या....अशा योजना राबवा.....योग्य अधिकाऱ्याची निवड करा...चांगले निर्व्यसनी शिक्षक व डॉक्टर नेमा.....जो चांगले काम करेल त्यालाच पगार द्या....जो काम करणार नाही त्याच्यावर कारवाई करा....त्या भ्रष्टाचारी माणसाला कायमचे निलंबित करा.....देश कुठलाच वाईट नसतो....पण त्या देशाला बळकटी देण्याचे काम आपण करायला हवे....भ्रष्टाचाराच्या घाणेरड्या विळख्यातून देशाला मुक्त करायचा आपापल्या परीने प्रयत्न करायला हवा... नुसते हवेत बोलून चालणार नाही....प्रत्येकाने कृती करायला हवी....प्रत्येक माणसाच्या मर्यादा असतात....सर्वांचे काम सारखे असू शकत नाही...प्रत्येक माणसाची काम करण्याची वेगळी पध्दत असते.....स्वतःला पडताळून प्रत्येकाने आपल्या कुवती प्रमाणे देशाला बळकटी देण्याचे काम करावे....सर्व भ्रष्टाचारी लोकांना विरोध करून व त्यांना धडा शिकवून काम केले पाहिजे...समाजाप्रती संवेदना, माणुसकी, प्रेम जागृती झाल्या शिवाय हे शक्य नाही.....म्हणून सुरवात स्वतः पासुन करावी....

काही लोकांचे म्हणणे असते की दर वर्षी स्वातंत्र्यदिनी भ्रष्टाचार, सरकार आणि राजकीय नेते याच विषयी चर्चा होते...चांगले काय घडले मागील वर्षात हे कोणीही बोलत नाही....याचाच अर्थ असा की भ्रष्टाचाराने चांगल्या घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर दरवर्षी मात केली आहे.....म्हणजेच भ्रष्टाचाराचेच पारडे जड झाले...मग या माणसांवर आणि त्यांच्या देशद्रोही कारभारावर जास्त आणि नेहमीच चर्चा होणे अगदी नैसर्गिक आहे.....आपण लिहिणारे आणि वाचणारे थोडीफार शिकलेली लोक आहोत....त्यामुळे आपले कुठल्याही प्रकारे शोषण झाले की आपण त्याची चर्चा करू शकतो.....आपणही या मध्ये भरडले जातोय.....पण जो अतिशय गरीब आहे...अशिक्षित आहे अशा माणसाचे जेव्हा शोषण होते...तो जेव्हा भरडला जातो....तेव्हा त्याला काय करावे ते काहीही कळत नाही ....ज्याच्या कडे धड अंग झाकायला कपडे नाहीत, दोन वेळेसचे पोट भरण्याची मारामार असते अशा बांधवांना सुद्धा भ्रष्टाचारी लोक सोडत नाहीत...जो आधीच नागवा आहे त्याला अजून नागवे करायचे हे आपल्या देशात सर्रास चालते...कारण त्याला आवाज नाही...त्याच्या आई-बहिणीवर बलात्कार केला तरी तो आवाज काढू शकत नाही....त्याच्या कडे पैसा नाही....कोणीही त्याची हाक ऐकत नाही....आदिवासी-गरीब लोकांनाही मन असत, भावना असतात आणि जीव पण असतो...हे सगळे जाणीव पूर्वक विसरले जाते...आणि त्यांच्यावर अत्याचार केला जातो..... हेच चित्र कायम ठेवायचे आहे या भ्रष्टाचारी लोकांना.....असेच दिसते....म्हणजेच गरीब-आदिवासींच्या नावे दरवर्षी कोट्यावधींची PACKAGES जाहीर करता येतील.....आरोग्य खात्याचे वेगळे, शिक्षण खात्याचे वेगळे, कृषी खात्याचे वेगळे.....राज्य सरकारचे वेगळे.....केंद्र सरकारचे वेगळे.....असे कितीतरी PACKAGES ....पण त्यातील जास्तीत जास्त मदत ही मधल्या मधेच लंपास होते....देशात अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या धरणान मुळे लाखो लोकांना आपले घर सोडावे लागले....विस्थापित व्हावे लागले...त्यांना कधीच योग्य मोबदला मिळाला नाही....आणि त्यांचे पुनर्वसन पण नीट झाले नाही....ही गरीब अशिक्षित जनता भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या भूल-थापांना नेहमीच बळी पडत असते.....आणि आपले सर्वस्व गमावून बसते.....काय हाल होत असतील या लोकांचे याची आपण कल्पना पण करू शकत नाही....अशा अनेक प्रगतीशील योजना सरकार आखत असते (अर्थात यात जास्त फायदा सरकारी लोकांचा असतो)....पण त्या मध्ये जे लोक भरडले जातात त्यांचे नीट पुनर्वसन केल्यावरच या योजना राबविल्या गेल्या पाहिजेत....पुनर्वसित लोकांना घर, जमीन, आरोग्य सुविधा आणि मुलांना चांगले शिक्षण हे सर्व नीट पुरवल्या गेले पाहिजे....किती वर्षे लोक हे सहन करणार....या अत्याचारातून नक्कीच पुढे मोठा उठाव होईल....करायला काम नाही, खायला अन्न नाही म्हणून ही जनता नाईलाजेस्तव भुरट्या चोऱ्या, लुट मार किवा भिक मागतील....मग परत आपला त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल....सहानुभूती दूर होऊन त्यांच्या बद्दल चीड निर्माण होईल....पण या मागची कारणे आपण कधी तपासून पाहणार.....जन जागृती ही केलीच पाहिजे....गावा-गावात जाऊन, झोपडपट्टी मध्ये जाऊन, आदिवासी पाड्यात जाऊन...लोकांना शिक्षण घ्यायला भाग पडावे लागेल....म्हणजेच तो आयुष्यात चांगला मार्ग स्वीकारेल...अन्यायाला वाचा फोडू शकेल....हे सर्व आपल्या सारख्या सामान्य माणसाने एकत्र येऊन करण्याचे काम आहे.....ही कामे निस्वार्थ पणे व्हायला हवीत...आपापल्या परीने प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने तुम्ही राहता तेथील आसपासच्या खरच गरजू लोकांना मदत करावी....बदल नक्की होईल....वेळ लागेल पण नक्की होईल.....आपल्या पुढच्या पिढ्या आनंदाने जगू शकतील.....
.....म्हणूनच या विषयावर चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे....मग ही चर्चा फक्त्त घरापुरतीच मर्यादित नको....चांगल्या शाळांमध्ये जाऊन, कॉलेज मध्ये जाऊन भ्रष्टाचार विरोधी शिक्षण देण्याचे काम करायला हवे...पुढील पिढी मधील सरकार तरी कमी भ्रष्टाचारी होईल....कारण पुढील राजकारण्यांची पिढीही याच अशाच शाळांन मधून शिकून बाहेर पडणार आहे....(अर्थात राजकारण्यांना शिक्षण सक्तीचे केले तर बदल शक्य आहे)....शाळेतच चांगले संस्कार मुलांवर झालेत तर नक्कीच त्याचा फायदा पुढील पिढीला होईल......माणसाने नेहमीच आशावादी असावे....

अनिकेत प्रकाश आमटे
संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
मो. ९४२३२०८८०२
www.lbphemalkasa.org.in
www.lokbiradariprakalp.org

गुलमोहर: 

माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. काय मदत करू सांगा. औषधे पाठवू का? तुम्हाला काँटॅक्ट करते. आदिवासी सबलीकरणासाठी काय करता येइल. विचार करून तुम्हाला पत्र टाकते. फोटो बघून मन विषण्ण झाले.

अनिकेत.......विशाल कुलकर्णी, अश्विनीमामी , सुर्यकिरण यांना माझा संपुर्ण पाठिंबा असेल. बघा काही उपक्रम राबवता आला तर, आमची तुम्हाला नक्कीच मदत मिळेल आणि आम्हालाही निस्वार्थ समाज सेवेची संधी मिळेल

सर्व मायबोलीकरांना धन्यवाद....आता या दोन्ही रुग्णांची तब्येत हळूहळू सुधारते आहे.
मदत करायची असेल तर सर्व सविस्तर माहिती देत आहे. कोर बँकिंग ने आपण आर्थिक मदत करू शकता.
Details of Domestic Funds Transfer to Lok Biradari Prakalp
(A project of Maharogi Sewa Samiti, Warora)

1. Online Money transfer [Core Banking] for Lok Biradari Prakalp
(Recurring Funds Account):

Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
(Bank of Maharashtra, Bhamragad Branch)
Account Number: 20244238823
IFSC: MAHB0001108

All donations have exemption under section 80 G of the Indian Income Tax Act. (This account is for the donations below Rs. 5,000/-)
For the receipt - Name of the donor and Address is necessary.

**************************************************************

2. Online Money transfer [Core Banking] for Lok Biradari Prakalp
(Corpus Fund Account):

Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
(Bank of Maharashtra, Bhamragad Branch)
Account Number: 20244209993
IFSC: MAHB0001108

This account is to generate CORPUS FUND for the project. All donations have 100% exemption under section 35 AC of the Indian Income Tax Act.
(This account is for the donations Rs. 5,000/- and above)
For the receipt - Name of the donor, Address and PAN number is necessary.
**************************************************************
Details of Overseas Funds Transfer to Maharogi Sewa Samiti, Warora, through SWIFT

Beneficiary Name: Maharogi Sewa Samiti, Warora

Beneficiary Address: At & Post: Anandwan, Tah.: Warora,
District: Chandrapur, Pin code: 442914
Maharashtra State, India.
Phone: +91-7176-282034, 282425
Fax: +91-7176-282034
E-mail: lbp@sancharnet.in
aniketamte@gmail.com

Beneficiary Bank Account Number: 048010100301343

Beneficiary Bank Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora

Beneficiary Bank Address: AXIS BANK, M. G. House,
Rabindranath Tagore Road,
Besides Board Office, Civil Lines,
Nagpur - 440 001
Maharashtra State, India
Phone No.: +91-712-2555647 / 2601699

Beneficiary Bank SWIFT code: AXISINBB048

MAHAROGI SEWA SAMITI,
WARORA has FCRA clearance
(Foreign Contribution Regulation Act): Registration No. 083810006

Please specify that this donation is towards Lok Biradari Prakalp, At: Hemalkasa,
Post: Bhamragad, District: Gadchiroli-442710, Maharashtra State, India.
Ph. +91-7134-220001, M - 9423208802.
Email: aniketamte@gmail.com & hemalkasa1973@gmail.com
Website: www.lokbiradariprakalp.org & www.lbphemalkasa.org.in
**************************************************************

१ प्रस्ताव आहे. जर आपण सर्वानि रोज १ रु. प्रमाने किन्वा जास्तं मदत केलि तर...? माबो मिळुन १-१ पुल बान्धुन देउ शकते. कमित कमि लोकाना दलन-वलन तरि सोपे जाइल. सरकारकदुन रस्ते नाहि खड्डे मिल्तात. त्यापेक्श आदिवासि श्रम्दानातुन रस्ते बान्धले तर ते टिकतिल.

अनिकेत पॅसे कसे पाठ्वायाचे ते तुम्हि सान्गा . मि तयार आहे ... सर्व माबो चे मिलुन जरा बरि रक्कम नक्कि जमेल.

कारण पुढील राजकारण्यांची पिढीही याच अशाच शाळांन मधून शिकून बाहेर पडणार आहे....(अर्थात राजकारण्यांना शिक्षण सक्तीचे केले तर बदल शक्य आहे)....शाळेतच चांगले संस्कार मुलांवर झालेत तर नक्कीच त्याचा फायदा पुढील पिढीला होईल......माणसाने नेहमीच आशावादी असावे....
अनिकेत,
खरचं तुमचं हे लिखाण लोकांना विचार करायला लावणारं आहे ..!
शक्य असेल त्यावेळी माझा या कामात नक्कीच सहभाग असेल !

अनिकेतजी
काय बोलणार यावर ? बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीच. आम्ही फक्त चर्चा करतो तीही एकांगी. कोषात जाऊन ! अशा परिस्थितीत नेहमीच तुमच्या कार्याने दिपून जायला होतं. खरच डोळे उघडणारा लेख आहे हा.

एक नाही अनेक भारत आहेत या देशात. ते फोटो नकाच काढू. आम्हाला बघवत नसतील तर आमचं करंटेपण आहे ते. रस्त्याने जाताना कचरा दिसला तर नाक दाबून नजर फिरवून जाणारी माणसं आम्ही. आणि सवय झाली कि तिथे काही कचरा नाहीच असे बोलणारे आम्ही ! आमचं धाडस नाही होत हातात झाडू घेऊन साफसफाई करायचं. आम्ही फक्त इतरांना दूषणं देतो.

विदारक परिस्थिती मांडलीये. या पार्श्वभूमीवर आमटे कुटूंबाचम कार्य नतमस्तक करणारं आहे !!

अनूदादा, नुक् ताच मायबोलीवर आलो आणि तुमचा लेख वाचनात आला. मी तिकडे एक दोनदा युनिव्हर्सिटित असताना हेमलकशाला येउन गेलो आहे. आपली ओळख झाली नाही पण मी आपल्याला चांगलाच ओळ्खतो.

मला माहित नाही का पण गेली अनेक वर्षे काही प्रश्न भेड्सावत आहेत. ते विचारण्याचि मी इथे हिम्मत करतो.

१. तुम्ही लिहिलेले सर्व खरच भीषण वास्तव आहे. पण जंगलात अस्वलाने फोडलेले रूग्ण सर्वत्रिक आहेत. पण मला खटकल्या त्या तुमच्याकडील रूग्णांना असणार्‍या अत्यंत अपुर्‍या सुविधा: उघड्या जखमा, माश्या, घाण ! तुम्ही लोक त्यांचा बाजार माण्डून ठेवता असे वाटते. त्यांच्यासाठी साध्या छोट्या झोपड्या का नाही बांधत? तुम्ही मागे एका प्रदर्शनात बोलला होता की त्यांना उघड्यावरच राहणे आवडते. मग इतर संस्थांमधिल आदिवासी किंवा भमरागड्च्या दवाखान्यातिल लोक आत वार्ड मधे कसे राहतत? आदिवासी जमात तर तिच आहे ! तुम्ही जर इतका साधा बद्ल त्यांच्या आयुष्यात घडवून आणू शकला नाहीत तर इतक्या सर्वांना शिव्या घालत बोलण्याचा काय उपयोग? पैसे नाहीत असे उत्तर क्रुपया देऊ नका. मनात असेल तर शक्य होते. आम्ही आमच्या आरोग्यासाठी, सर्च आणि आनंद्वन सर्वत्र पैशाचा प्रोब्लेम आहे पण कुणीही रूग्णांना असे रस्त्यावर ठेवत नाही.

२.तुम्हाला सरकारबद्दल इतका राग आहे तर मायबोलीवर तो काढून काय फायदा? तुम्ही सरकारला बदलायला मदत करा की !

३. तुम्ही इथे इतके फिलोसोफिकल बोलताय. पण प्रत्यक्षात नुसते कुणाला न कुणाला वाईट बोलत असता. तुमचे इतर परिवार गण तसे नाहीत. ते सगळयांशी किती चांगले वागतात ! तुम्ही आमटे परिवाराशी विसंगत दिसता.तुमच्या या दोन्ही प्रतिमांतील खरी प्रतिमा कुठली ते कळत नाही.

असो.मला वाटले ते लिहीले. तुम्हाला कदाचित माझा राग येइल. पण इतर कुठेही मला या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत म्हणून इथे लिहितो आहे.तुम्ही उत्तर दिलेच पहीजे हे अपेक्शित नाही.

अनिकेतजी

इथे संपर्कासाठी दिलेल्या पत्त्यांबद्दल धन्यवाद. आपली परवानगी असेल तर हा लेख आणि त्यातले प्रचि आमच्या कार्यालयातील संगणकीकृत बुलेटिनबोर्डवर चिकटवता येतील.

अनिकेत,

आखो देखि आणि अनुभवसंपन्नतेचा स्पर्श झाल्याने लेखणी अशी थेट मनाला भिडते. तुम्ही मांडलेले सर्व/अनेक मुद्दे अगदी पार नक्षलवादापर्यंत असे मी म्हणेन या प्रत्येकाच्या मूळाशी भ्रष्टाचार आहे हे "वास्तव" अजूनही ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी चांगलाच डोळे ऊघडणारा लेख आहे.
(अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा मिळतोय तो याच करता).

मी "प्रकाशवाटा" ह्या पुस्तकात हल्लीच मी हे प्रकरण वाचले होते. अंगावर शहारे आले अगदी ! बापरे तुम्ही सर्वजण हे जे कार्य करताय त्याबद्द्लच्या भावना आम्ही शब्दात नाहे व्यक्त करू शकत.

भयानक फोटो. प्रकाशवाटा मध्येही असेच फोटो बघायला मिळाले होते.
एक सूचना: >>> ..Multiplex, Big Bazaar, मोठाल्ले MOLLS, हॉटेल्स, कोर्पोरेट सेक्टर्स, मोबाईल>>> ह्यात मॉल्सचं स्पेलिंग सुधारुन malls करणार का?

Pages