Submitted by के अंजली on 17 August, 2010 - 04:45
शांत पहुडला उधाण वारा
नाचनाचुनी दमल्या धारा
होउनि नवथर ऊन कोवळे
हात तयांचा धरशिल का?
इंद्रधनूतिल रंग लेउनी
श्रावण होउन येशिल का?
आषाढाचे सारुनि मंतर
शाश्वत निळसर होइल अंबर
गर्भरेशमी, गंधबावरा
बहर फुलांचा होशिल का?
मंदसुगंधी झुळुक जसा तू
श्रावण होउन येशिल का?
ओलेता मधुमास सुखाचा
बावरलेल्या रवीकिरणांचा
मृदगंधाच्या सुखद सरींचे
ऊन रुपेरी होशील का?
पानांतुनी झिरपून जात तू
श्रावण होऊन येशील का?
ओढ लाजरी मनात भरते
तळहाताची मेंदी झुरते
सलज्ज या राधेला होऊन
कृष्ण सावळा मिळशील का?
आसक्तीच्या पल्याड जाउन
श्रावण होउन येशील का?
गुलमोहर:
शेअर करा
अशा कविता वाचतच पाऊस
अशा कविता वाचतच पाऊस अनुभवायचा किंवा पावसाचाच अनुभव देणारी अशी ही कविता वाचायची ........
चिंब भिजवणारी रचना....
अतिसुंदर,अंजली,शशांकजींनी हा
अतिसुंदर,अंजली,शशांकजींनी हा धागा पाठवला.बोरकरांसारखा,पण अर्थात तुझा स्वतःचाच प्रसन्न फील दिलास..
सुंदर !
सुंदर !
क्या बात !....प्रसन्न वाटल
क्या बात !....प्रसन्न वाटल कविता वाचून.
खूपच सुंदर . आवडली.
खूपच सुंदर . आवडली.
सुंदर आहे ही कविता
सुंदर आहे ही कविता
आहा.. वेलकम डिअर श्रावण
आहा.. वेलकम डिअर श्रावण
(No subject)
(No subject)
माझी सर्वात आवडती कविता आहे
माझी सर्वात आवडती कविता आहे ही मायबोलीवरची !
१०१
१०१
वॉव! शब्द नाहीत माझ्याकडे
वॉव! शब्द नाहीत माझ्याकडे इतकी देखणी कविता आहे! जियो!
सुंदर!!
सुंदर!!
आहाहा !! काय सुंदर कविता
आहाहा !! काय सुंदर कविता .....
ऑल टाईम ग्रेट .......
ऑल टाईम ग्रेट .......
व्वाह!! अप्रतिम! खूप दिवसांत
व्वाह!! अप्रतिम!
खूप दिवसांत माबोवर येणं झालं नाही. गुलमोहर तर आधीच मागे पडला.. आज प्रथमच इथे आलो आणि ही कविता वाचनात आली. वैभव जोशींच्या वैभवाच्या काळात इथे रंगलो होतो आम्ही, त्याची आठवण झाली.
ओढ लाजरी मनात भरते
तळहाताची मेंदी झुरते
सलज्ज या राधेला होऊन
कृष्ण सावळा मिळशील का?
आसक्तीच्या पल्याड जाउन
श्रावण होउन येशील का?
क्या बात है!! अतिशय सुंदर..
'आसक्तीच्या पल्याड' हा शब्द फार फार गरजेचा आहे त्याप्रमाणेच तो आलाय.. ते कवितेचं एक सौंदर्यस्थळ आहे.
पण तरी कविता गुणगुणताना, माहित नाही का पण त्या शब्दाला अडखळतोय.
त्या ओळीचा अर्थ अबाधित ठेवून 'आसक्तीपल्याड जाऊनी' असा बदल करता येईल का?
बाकी अफाट!! पु.ले.शु.
पुन्हा आठवली की काय शशांकजी
पुन्हा आठवली की काय शशांकजी कविता!!
धन्यवाद सगळ्यांचे पुन्हा एकदा!
किरू आपण खूप छान सांगितलंत! पण ती ओळ मला तशीच सुचली आणि मिटरमध्ये आसक्तिच्या पल्याड जाऊन असेच बसले म्हणून तसेच ठेवले मी ते. पुन्हा एकदा धन्यवाद!
अप्रतिम!
अप्रतिम!
(No subject)
सुंदर!!!
सुंदर!!!
आला पुन्हा
आला पुन्हा
निशब्द , निवडक दहात ...
निशब्द , निवडक दहात ...
श्रावणात या कवितेची हटकून
श्रावणात या कवितेची हटकून आठवण येतेच...
(No subject)
पुन्हा एकदा रुसता राधा
पुन्हा एकदा रुसता राधा
कान्हा शोधित जाईल का
अहाहा! काय सुंदर कविता आहे!!
अहाहा! काय सुंदर कविता आहे!! वरती काढल्याबद्दल आभार शशांकराव.
___/\___
___/\___
Pages