Submitted by के अंजली on 17 August, 2010 - 04:45
शांत पहुडला उधाण वारा
नाचनाचुनी दमल्या धारा
होउनि नवथर ऊन कोवळे
हात तयांचा धरशिल का?
इंद्रधनूतिल रंग लेउनी
श्रावण होउन येशिल का?
आषाढाचे सारुनि मंतर
शाश्वत निळसर होइल अंबर
गर्भरेशमी, गंधबावरा
बहर फुलांचा होशिल का?
मंदसुगंधी झुळुक जसा तू
श्रावण होउन येशिल का?
ओलेता मधुमास सुखाचा
बावरलेल्या रवीकिरणांचा
मृदगंधाच्या सुखद सरींचे
ऊन रुपेरी होशील का?
पानांतुनी झिरपून जात तू
श्रावण होऊन येशील का?
ओढ लाजरी मनात भरते
तळहाताची मेंदी झुरते
सलज्ज या राधेला होऊन
कृष्ण सावळा मिळशील का?
आसक्तीच्या पल्याड जाउन
श्रावण होउन येशील का?
गुलमोहर:
शेअर करा
mast aahe kavita.
mast aahe kavita.
कविता चांगली आहे... मला
कविता चांगली आहे... मला आवडली...
ऋयाम, हंसा,शशांक,
ऋयाम, हंसा,शशांक, रुणूझुणू,सतिश,अज्ञात,रेव्यु,प्रकाश,षड्जपंचम आणि उमेश
आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल खूप आभार!
माझी कविता आवडली( जी माझीही आवडती आहे) आणि त्यावर तुम्ही इतके छान प्रतिसाद दिलेत, देताय....
भरून पावले!!
छान लिहिता हो तुम्ही. ही
छान लिहिता हो तुम्ही. ही कविता मला विशेष आवडली.
अंजली, मस्त रचना... अर्थात हा
अंजली, मस्त रचना...
अर्थात हा तुझा प्रांत आहेच... अधिक शुभेच्छा!!
यात मात्र तेच तेच सांगीतले
यात मात्र तेच तेच सांगीतले गेलेले आहे.
क्षमस्व!
अप्रतिम.. डायरेक्ट निवडक
अप्रतिम.. डायरेक्ट निवडक १०त....!!!
धन्यवाद सत्यजित... तुमच्या
धन्यवाद सत्यजित... तुमच्या निवडक दहात माझ्या कवितेची निवड केल्याबद्द्ल. आज चैत्रातल्या उकाड्यात श्रावणावरची कविता वाचाविशी वाटली..!

आनंदयात्री आणि नोरा...
प्रतेक कडवं श्रवणीय.(स्वतःच
प्रतेक कडवं श्रवणीय.(स्वतःच गात होतो).
खुप खुप आवडली.
दोन्ही कविंतावर तोंडसुख घेऊन
दोन्ही कविंतावर तोंडसुख घेऊन झालय तर प्रश्नांची उत्तर (म्हणजे अनुजाच्या भाषेत खोदलेले खड्डे) बुजविण्याचं काम करायचं कधीपासून घेताय मनावर बेफिकिर???
मला वाटतं तुमच फक्त नावच बेफिकिर आहे, फिकिर तर तुम्हांला सगळ्याचीच पडलीये! कोण कसं लिहितय,ते वृत्तात आहे की नाही कोण कुठे कवितेतून काय कुठे पोहोचवतोय आणिक काय काय!!!!!!
असो.>>>
काही लोक सर्वाधिकार स्वतःच स्वतःला बहाल करून घेऊन शेखी मिरवीत असतात विद्वत्तेची,
के अंजली -त्यांचे मनावर घेऊ नका.>>>
अरेच्या?
आसक्तीच्या पल्याड जाउन श्रावण
आसक्तीच्या पल्याड जाउन
श्रावण होउन येशील का?
छानय!
या काव्या वरून "नलेश पाटील "
या काव्या वरून "नलेश पाटील " या सिद्धहस्त कवीची आठवण झाली. मला त्यांचे कविता संग्रह मिळाले नाहीत. पण मौज परिवारातला कवी असल्याने ते मातबर कवी आहेत. मौजच्या दिवाळी अंकात मी त्यांच्या काही कविता वाचल्या.
विभाग्रज, चाऊ आणि
विभाग्रज, चाऊ आणि शांतापौत्र..... धन्यवाद
आणि..............
बेफिकिर
आपले
मनापासून
पुन्हा एकवार
............आभारच
!!
खूपच तरल आणि सहज-सुंदर
खूपच तरल आणि सहज-सुंदर कविता...... खूप आवडली.
परत वाचली ,चांगल ते चांगलच
परत वाचली ,चांगल ते चांगलच असतं.
प्रियकर व प्रेयसीतला शृंगार
प्रियकर व प्रेयसीतला शृंगार संपला आहे ती व तो (शांत झालेल्या वा-या व बरसून गेलेल्या धारांप्रमाणे) तृप्त पहुडले आहेत. आता तिची अपेक्षा त्यानं आपल्या मधुर बोलीनं तिला रिझवावं, सप्तरंगी मधुबोलांनी तिचं मन जिंकावं.
आषाढाचा झंझावात संपल्यावर निळे निरभ्र आकाश उमलावे तशा मनाच्या भावना निकोप बनल्या आहेत. दूरत्वाचा पडदा सरकला आहे. प्रियकराच्या श्वासातून, येणा-या सुगंधाची चाहुल तर लागलीच आहे. ती प्रियकराकडून अपेक्षा करते ती या चाहुलीला त्यानं प्रत्यक्षात आणावं. श्रावणसरींप्रमाणं नाजुक अदाकारीनं तिचं मन लुभवावं.
बेधुंदीचा काळ संपला, जबाबदारीचा विचार करण्याचा समय संसारात येतोच्. तेव्हाही तुझ्या श्रावणपणाची कसोटीच लागणार आहे. उबदार उनाप्रमाणे तुझ्या कृतीशील सोबतीने मला आधार देउन तू या कसोटीला उतरावंस हीच इच्छा आहे.
तळहाताच्या मेंदीला दिवस लोटले आहेत. विरहाने रंग फिकटताहेत. बावरी ओढ लागली आहे. तु पुन्हा ये. वेगवेगळ्या रुपांत माझा श्रावण बनून पुन्हा पुन्हा ये.
मी ही कविता ग्रहण, एन्जोय केली ती अशी. इतर अनेक अर्थ निघतील. ती निव्वळ निसर्गकविता म्हणूनही अभिप्रेत असेल. मात्र कविता सुंदर आहे यात शंका नाही. मला तरी तोचतोचपणा जाणवला नाही. चुकभूल माफ असावी
कुठल्याही ऋतूत फक्त आनंद आणि
कुठल्याही ऋतूत फक्त आनंद आणि आनंदच देणारी कविता......, पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडणारी अप्रतिम रचना......
>>पुन्हा पुन्हा वाचायला भाग
>>पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडणारी अप्रतिम रचना
अनुमोदन
शब्दांच्या नादमाधुर्याचा
शब्दांच्या नादमाधुर्याचा सहसुंदर अविष्कार. छानच !!
खूप छान प्रद्युम्न!! सुरेख
खूप छान प्रद्युम्न!! सुरेख लिहिलत!!
माझ्याच कवितेकडे पुन्हा एकवार नव्याने पाहिले मी!
शशांक,मंदार आणि भाऊ..
धन्यवाद!
हल्ली गुलमोहरवर क्वचित येतो.
हल्ली गुलमोहरवर क्वचित येतो. त्यामुळे ही कविता याआधी माझ्या नजरेत आली नव्हती याचा खरोखर खूप खेद होतोय. केवळ अप्रतिम अशी ही कविता आहे.
काय सुंदर कविता आहे ही... मला
काय सुंदर कविता आहे ही...
मला जागेवर उभं राहून टाळ्या वाजवावाश्या वाटताहेत ..

खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर
काय सुंदर कविता आहे ही... मला
काय सुंदर कविता आहे ही...
मला जागेवर उभं राहून टाळ्या वाजवावाश्या वाटताहेत ..

खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच सुंदर
चटकन आठवलेली कविता म्हणजे
श्रावणात घननिळा बरसला
तोच दर्जा...!
श्रावणात घननिळा ऐकल्यानंतर
श्रावणात घननिळा ऐकल्यानंतर मला असं वाटलं कि कविता असावी तर अशी.. नाहीतर लिहूच नये. तुम्हाला ते जमलं... !!
खूपदा वाचली. फार फार
खूपदा वाचली. फार फार अवडली.सुन्दर निर्मितीचा आनन्द घ्या. बाकी काही पाहू नका.
हेच बोल्तो
हेच बोल्तो
खूप म्हणजे खूपच आवडली. काय
खूप म्हणजे खूपच आवडली.
काय सॉलीड लिहिता हो कविता. तुमच्या कविता रोज वाचायला मिळाल्या तर अन्नाची गरज ती काय?
पोट तर तसेही भरेलच की?
मस्त मस्त आणि फक्त मस्त.
छान कविता आहे. असच लिहा ताई.
छान कविता आहे.
असच लिहा ताई.
पुन्हा वाचली, पुन्हा आवडली
पुन्हा वाचली, पुन्हा आवडली
एखाद्या निसर्गरम्य ठिकाणच्या रिसॉर्टमधे फ्रेम करुन लावावी अशी कविता आहे!
मंदार_जोशी | 2 February, 2012
मंदार_जोशी | 2 February, 2012 >>>कवितांच खोदकाम चालु आहे वाटतं
पुन्हा वाचली, पुन्हा आवडली
एखाद्या निसर्गरम्य ठिकाणच्या रिसॉर्टमधे फ्रेम करुन लावावी अशी कविता आहे!>>>>>योग्यच!
Pages