Submitted by के अंजली on 17 August, 2010 - 04:45
शांत पहुडला उधाण वारा
नाचनाचुनी दमल्या धारा
होउनि नवथर ऊन कोवळे
हात तयांचा धरशिल का?
इंद्रधनूतिल रंग लेउनी
श्रावण होउन येशिल का?
आषाढाचे सारुनि मंतर
शाश्वत निळसर होइल अंबर
गर्भरेशमी, गंधबावरा
बहर फुलांचा होशिल का?
मंदसुगंधी झुळुक जसा तू
श्रावण होउन येशिल का?
ओलेता मधुमास सुखाचा
बावरलेल्या रवीकिरणांचा
मृदगंधाच्या सुखद सरींचे
ऊन रुपेरी होशील का?
पानांतुनी झिरपून जात तू
श्रावण होऊन येशील का?
ओढ लाजरी मनात भरते
तळहाताची मेंदी झुरते
सलज्ज या राधेला होऊन
कृष्ण सावळा मिळशील का?
आसक्तीच्या पल्याड जाउन
श्रावण होउन येशील का?
गुलमोहर:
शेअर करा
वाह....!!!!
वाह....!!!!
अप्रतिम कविता.. अंजली किती
अप्रतिम कविता.. अंजली किती किती ते पाऊस प्रेम... पुन्हा एकदा सुंदर काव्य लिहिलस गं....
असं बोलवलस तर नक्कीच येईल ना श्रावण... !
सेंच्युरी ऑन होम पिच!
सेंच्युरी ऑन होम पिच!
छान ... आवडली.
छान ... आवडली.
नेहमीप्रमाणेच fresh feel आला.
गेय आहे.
-----------------------------------------------
’हृदयी जागा तू अनुरागा
प्रीतीला या देशील का"
या चालीवर म्हणता येईल ?
ट्रिपल सेंचुरी
ट्रिपल सेंचुरी
खुप छान! (पण मला कळत नाही
खुप छान!
(पण मला कळत नाही तुम्ही सगळे श्रावण मोडकांच्या मागे का लागलात? अहो, सज्जन गृहस्थ आहेत ते!)
श्रावण मोडक कोण बरं?
श्रावण मोडक कोण बरं?
विशाल, सांग बाबा तूच.
विशाल, सांग बाबा तूच.
अमित,किरण्,मयुरेश्,भरत,
अमित,किरण्,मयुरेश्,भरत, उल्हासजी आणि उमेश खूप धन्यवाद!
कै च्या कै इचारतीस,,, ट्रिपल
कै च्या कै इचारतीस,,,
ट्रिपल सेंचुरी सेलिब्रेट कर की...!
अरे हो रे! -)
अरे हो रे! -)
कवी नं १
कवी नं १
मग नंबर दोनचे कवी कोण हो?
मग नंबर दोनचे कवी कोण हो?
नंबर दोन नाही, जो जिता वही
नंबर दोन नाही,
जो जिता वही सिकंदर
और जो हारा वो?
और जो हारा वो?
जो हारा वो हाराच
जो हारा वो हाराच
खुपच छान अंजली. खुप सुंदर.
खुपच छान अंजली. खुप सुंदर.
खुप छान अंजली श्रावनाचा गारवा
खुप छान अंजली श्रावनाचा गारवा आणि श्रवनातील सरी कवितेतच जाणवल्या -कमलाकर देसले (माऊली)
फार सुंदर! आवडली.
फार सुंदर! आवडली.
राजेश्वर,
राजेश्वर, अनुमधुरा,माऊली,प्रकाश खूप धन्यवाद!
श्रावण नक्की येइल
श्रावण नक्की येइल भिजायला.तयार रहा,अप्रतिम!!!!!
कवितेचा साचा (फॉर्मॅट) आवडला
कवितेचा साचा (फॉर्मॅट) आवडला .
-हरीश
खूपच सुंदर
खूपच सुंदर
सुरेख, आवडली !
सुरेख, आवडली !
पार्थ,हरिश, रेव्यु आणि विशाल
पार्थ,हरिश, रेव्यु आणि विशाल खूप धन्यवाद!
खरंच खूप छान. भरतजी, मयुरेश
खरंच खूप छान.
भरतजी, मयुरेश यांस अनुमोदन.
निसर्गकाव्य आणि त्यातही पाऊस, कुणाला ऐकायचीस मग? मस्तच.
सुंदर आहे. आज माबोवर आल्याचे
सुंदर आहे. आज माबोवर आल्याचे सार्थक झाले
अनुजा आणि हेमांशु धन्यवाद.
अनुजा आणि हेमांशु धन्यवाद. अनुजा अगं खरतर आज भरतजींना माझे खूप धन्यवाद आहेत, त्यांनीच मला या ओळीवर कविता लिहायला सुचवलं होतं!!
मला फक्त 'श्रावण होउन येशील
मला फक्त 'श्रावण होउन येशील का' एवढीच ओळ सुचली होती. मग ब्लँक. म्हणून अंजलीना ती सुचवली...आणि त्यांनी या ओळींचे सार्थक केले आहे.
अस्संय काय... तरीच 'ट्रिपल
अस्संय काय...
तरीच 'ट्रिपल सेंचुरी' म्हतलं गुरुजींनी!
अत्ता कळलं! छान!
'लिहा ओळीवर कविता' असा एक धागा सुरु करायला हरकत नाही मग!
Pages