मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन येणारा Samsung Galaxy s Duos 2 GT 7582 >> मी तर हा २०१३च्या दसर्‍यापासून वापरते आहे.

योकु, सॅमसंग का नको?

मंजुडी duos 7582चा कैमरा किती जवळून फोटो काढु शकतो ? अगोदरच्या 7562 मध्ये लिखाणावर ,पेपरचे प्रीँट फोकस करता येत नाही .पण प्रसेसर कवॉलकॉम आहे . लुमिआ ५२०चा मिनीमम फोकस दहा सेंमि आणि आटोफोकस आहे .

मंजुडी ,योकु सैमसंग नको म्हणतात याचे हेच कारण आहे .
नोकिआ विँडेझ ५२० मध्ये खरी ८जीबी मेमरी अधिक मायक्रो एस डी ,आहे .फसवाफसवी नाही .

Galaxy Ace Plus सध्या वापरतोय... मुख्य वापर अर्थात फोन करणे-घेणे, समस पाठवणे(क्वचित), फोटो, विडिओ, गाणी, इंटरनेट ते ही प्रामुख्याने वॉट्सअप आणि फेबु... कधीकधी यूट्यूब..साठी वापरणे. पॅकेट डेटा आणि वाय्-फाय दोन्ही वापरून. गेमिंग साठी वापर शून्य..

नोकियाचा नवीनच लाँच होऊ घातलेला लुमिया ५२५ घ्यायचा विचार आहे... त्यापूर्वी जरा अभ्यास. गुगलून पाहिलं, थोडी माहिती मिळाली.. पण प्रत्यक्ष वापरणार्‍यांचा अनुभव जाणून घेण्यात रस आहे..

अ‍ॅन्ड्रॉईड वरुन विंडोज फोन वर जाण्याचा अनुभव कोणाला असेल तर कृपया सांगा.

सध्या असलेला विंडोज फोन चा एकच प्रॉब्लेम - अ‍ॅप मार्केट तेव्हढं ईवॉल्व्ड नाहीये. बाकी काहीही ईश्यूज नाहीत. पण हा अड्थळा फार काळ नाहीच राहाणार. अन तसही फ्रिक्वेन्ट वापरले जाणारे अ‍ॅप्स आहेतच विंडोज मार्केट्प्लेस मध्ये. Happy

सध्या विंडोज ओएस ८ मध्ये दोन गोष्टी कमी आहेत. एक म्हणजे File Manager आणि दुसरी म्हणजे अ‍ॅप आणि गेम मेमरी कार्ड वर टाकता येत नाहीत. सर्व अ‍ॅप्स आणि गेम्स फोन मेमरी वर जातात. विंडोज ओएस ८.१ मध्ये या त्रुटी दुर होणार आहेत अशी बातमी आहे. तोपर्यंत तरी मी लुमिया घ्यायचे टाळते आहे.

AMBAR, BLACK GDR १,२,३ माहित नाही. पण यातले ८.१ काहिही नक्किच नाही. ८.१ अजुन आलेले नाही आहे. मी वर दिलेल्या त्रुटी अजुनतरी दुर केल्या गेलेल्या नाही आहेत हे नक्की.

एचटीसीचा टचस्क्रिन तब्बल २५०० ला येतो.. ते ही ग्रे मार्केट मधली किंमत>>> अरे तु ५ इन्चाची स्क्रीन सांगत असशील.
मी ३.२ इन्च वाली चायनीज स्क्रीन ८०० रुपयात बसवुन घेतली.

मल्लीनाथ_के ह्या माबोकराकडे आहे नोकिया लुमिया.
तो त्याच्या फोन वर खुश आहे.

मी स्यामसन्ग ग्र्यान्ड घेतला, पण मला वापरताच्च येत नाही (पोरेच वापरतात तो जास्त वेळ)
त्या स्यामसन्ग ग्र्यान्डला माऊस आणि की बोर्ड अ‍ॅटॅच कर्ता येईल का? Happy
अ‍ॅप्स कुठून डाऊनलोड करायचे?

गेल्या काही दिवसांपासून मोबाईलच्या शोधात डोके भंजाळून गेले आहे. इतके फोन्स आणि त्याचे इतके फिचर्स...पण सर्वांगसुंदर असा अजून एकही नाही...एकात एक फिचर तर दुसर्यात दुसरे....च्यामारी काय करू आता....
माझे बजेट - जास्तीत जास्त १५ हजार..त्यापुढे शक्यतो नाही...पण जर असाच एखादा सर्वांगसुंदर मिळाला तर १-२ हजार जास्तीचे घालू शकेन...
माझा वापर - मुख्यत्वे इंटरनेट (त्यातही व्हॉट्सअँप आणि जीमेल आणि गुगल सर्च...रेफरंस साठी) यु्ट्युब जवळपास नाहीच....माबो किंवा अन्य मराठी पण नाही.
थोडे फार गेम्स - पण त्यातही ग्राफिक्सवाले जास्त नाहीतच...चेस, स्क्रॅबल, वर्डरॅप असेच इटुकले पिटुकले
म्युझिकसाठी स्वतंत्र एमपी३ आणि फोटोसाठी डीएसएलआर सतत बरोबर असतात त्यामुळे कॅमेरा आणि म्युझिकचा फार आग्रह नाही पण असलाच तर सोनेपे सुहागा...

आवश्यकता....
दणदणीत स्पीड असलेला आणि कुठेही लॅग न होणारा..त्यामुळे किमान १गेगाहर्झ प्रोसेसर आणि १जीबी रॅम...
(वरच्या उपयोगासाठी इतक्या फास्टची गरज नाही हे मान्य पण मला फोन फास्टच आवडतो..रमतगमत चालणारे फोन साफ नापसंत)
भरपूर अॅप्स डाऊनलोड करायला आवडतात त्यामुळे इंटर्नल मेमरी शक्यतो ८ जीबी असावी...४जीबीला जेमतेम १.२जीबी मिळते ती मला कमी पडते.
बॅटरी आणि स्मार्टफोनचे प्रमाण व्यस्त असले तरी त्यातल्या त्यात जास्त बॅटरी बॅकअप हवा
वापर अतिशय रफ असल्याने स्क्रॅच रेझीस्टंट किंवा नवीन फिचर आले आहे गोरीला ग्लास ते आवडेल..
आकार शक्यतो आटोपशीर...जीनच्या खिशात कोंबून बाईक चालवता येईल असा....त्यामुळे धब्बाडे फोन एकदम बाद...

सॅमसंग भरपूर वापरून झाल्याने आता नविन ट्राय करावे अशी इच्छा आहे...
माझ्या आवश्यकतेनुसार शोध घेतला असता...
सोनी एक्स्पीरीया, ल्युमिया ७२० आणि एचटीसी यु असे काही सापडले..पण प्रत्येकात काहीना काही मिसिंग आहे.
एक्पीरीया बॅटरीमध्ये मार खातो, ल्युमियाची बॅटरी जबरदस्त आहे पण ५१२एमबी मेमरी आणि काही जणांकडून ऐकल्याप्रमाणे तो हँग होतो मध्येच...एचटीसी फिचर्सच्या मानाने खूप महागडा वाटतो आणि बॅटरीमध्येपण मार खातो...

कुणी सुचवू शकेल अजून काही पर्याय...
ल्युमिया ५२५ मला त्यातल्या त्यास बेस्ट वाटला आणि जवळपास निश्चित केला पण आत्ता एका रिव्हयू नुसार त्यावर गुगल अॅप चालत नाहीत असे कळले..माझा तर सर्वाधिक वापर त्याचच असतो. त्यामुळे बाद...:( Sad

उद्या परफेक्ट एक सांगतो ...........आता वेळ नाही ... Sad

तरी पन......... तुला स्क्रिन साठी मी एचटीसीचाच ऑप्शन देईल........ त्याची ग्लास जबरदस्त स्मुथ आणि स्क्रॅचलेस आहे... मी ५ वर्ष एचटीसी वाईल्डफायर वापरला.....एक स्क्रॅच नाही त्यावर उमटला.. खिशात कॉईन्स , चावी इत्यादी असुन सुध्दा.....त्यावर स्क्रिनगार्ड लावायची देखील गरज वाटली नाही कधी

त्याच्यातले बग्ज समजून लोक बोंबाबोंब करतील, मग ते पॅच होतील, मग नं त र मी अपडेटचा विचार करणार. Wink
पण काय हो, किटकॅटचं काय करू?

अखेरीस मी एचटीसीचा डिझायर ५०१ घेतला....१५,५०० ला
१.१५ गेगाहर्ट्स ड्युअर कोअर प्रोसेसर, १जीबी रॅम आणि ८जीबी इंटर्नल मेमरी...
हे मला आवश्यक असलेले सर्व घटक मिळाले.
शिवाय ड्युअल अॅक्टीव सीम, ८मेगापी बॅक आणि २ मेगापी फ्रंट कॅमेरा, एलसीडी २ स्क्रीन...
एकदंरीत लूक्स पण खूप रिच आहेत...
छान वाटला... पण कॅमेरा अगदीच टाकावू आहे....मला असाही मोबाईल कॅमेरा वापरण्याची गरज वाटत नाही त्यामुळे मला चालण्यासारखे आहे....बाकीच्यांनी विचार करून घ्या...

एचटीसीचा कॅमेरा.. थोडा वीक आहेच... विशेषतः सोनीच्या तुलनेत...

त्यात सेटींग्स करुन बघ...... रिझल्ट चांगले येतील ......... मी बरेच से फोटो एचटीसीवरुन काढले आहे.. त्यामानाने अनुभव चांगला आहे... पण सेटींग्स करावीच लागते दरवेळेला

सेटींग करून पाहिली पण लेन्स जाम सॉफ्ट आहे....स्क्रीनवर दिसताना क्रिस्टल क्लिअर दिसणारे चित्र फोटो काढल्यावर एकदम ब्लरीश दिसते...
जाणवण्याइतपत....

हबिणंडण.

//इब्लिस क्रिबिंग मोड ऑन//

रेकमेंड केला त्यात सेम साडेपंध्रा हजारात,
१६ जीबी इंटर्नल मेमरी, vs याची ८ जीबी.
स्क्रीण 720 x 1280 pixels, 5.0 inches (~294 ppi pixel density) vs. 480 x 800 pixels, 4.3 inches ~217 ppi pixel density) इत्यादी हाये.
(कदाचित यच्टीशी इम्पोर्टेड असावा Wink
कंप्यारिझन
//क्रिबिंग मोड इस ऑल्वेज ऑन अँड ऑन अँड... Wink //

इब्लिसराव...मला शक्यतो ५ इंचवाला नकोच होता...जीन्सच्या खिशात बसत नाही नीट
मी जवळपास एक डझनभर दुकानात फिरून आलो...सर्वांनी मला हाच रेकमेंड केला..कहर म्हणजे एक्सप्रीयाच्या शोरूममधल्याने पण...मला म्हणला माझ्याकडे एल आहे...पण एचटीसीचा चांगला आहे....

इन्शूरन्स एजंट, त्याला जास्त कमिशन देईल तोच प्ल्यान तुम्हाला सांगतो, रेकमेंड करतो आणि विकतो, याची आठवण आली. Happy पुन्हा एकदा अभिनंदन!

तसेही असावे...पण आत्तापर्यंत तर सर्वजण सॅमसंगच रेकमेंड करत असत...कुठल्याही दुकानात गेले तरी...आता मग बहुदा एचटीसीने सॅमसंगचा कित्ता गिरवला असावा...

मोटो जी कधी येणार भारतात? >>

जानेवारी अखेरिस. आणि कालच मोटो जी ची गुगल प्ले एडिशन पण आली. मी ही एडिशन घेतली आहे भेट द्यायला. प्युअर अ‍ॅड्रॉईड ! (म्हणजे हार्डवेअर वाल्यांचे फर्मवेअर / सॉफ्टवेअर अजिबात नाही) किटकॅट! $१९९ अनलॉक्ड, १६ जी बी, उत्कृष्ट वगैरे वगैरे. अतिशय सुंदर बजेट फोन. भारतात किमंत किती असेल ते माहित नाही. पण साधारण १७००० + सुद्धा ठेवतील. त्यांनी जर हा फोन १२ पर्यंत देऊ केला. ( अमेरिकन किमतीत) तर भारतात सॅमसंगचे मार्केट खूप खराब होईल.

एकंदरीत ऑस्सम फोन !

भेटा अथवा लिहा. सर्व पत्रव्यवहार गुप्त ठेव्ण्यात येईल >>

रेल्वेतली बंगाली बाबाची अ‍ॅड वाटतीये ही. Happy

पण मोटोरोलाने (आता गुगलची कंपनी)
भारतातली अधिकृत सर्वीस सेंटरस मागच्या वर्षीच काढून घेतली .
पुन्हा येतील ?

मोटोजी दमल्यास बंगाली बाबाकडचे औषध घ्यावे लागेल का ?

मोटो भारतात थर्ड पार्टी पार्टनर नेमून मार्केटिंग व सर्व्हिसिंग करणार आहे.... वेटिंग फॉर द मोटो Happy

मोबाईल (स्मार्त) टीव्ही बघता येतो, त्याचे अ‍ॅप्स उतरवुन घेने, फक्त खूप एम्बी खाते दहा मिन्टात पन्धरा एम्बी Sad त्यामुळे मी बघत नाही, क्वचित गरजेपुरते सोय ठेवली असे.

किमतीच्या मानाने सुपर्ब आहे. तिथलेच युजर रिव्ह्यूज पाहिलेत का? Happy
*
लिंबूभाऊ,
डीटीव्ही इंडीया नामक अ‍ॅप आहे. चांगले वाटले. थोडे बरे डेटा कनेक्शन असेल तर सगळी च्यानल्स दिसतात. अगदी २जी वर देखिल. फार खर्चिक नाही पडत.µ

मोटो जी वापरला का कोणी? हे फ्लिपकार्टावर मिळालेले डिटेल्स. ह्या कॉम्बिनेशनचा फोन १३,९९९ ला आहे. कोणी वापरला असल्यास अनुभव सांगा.

•5 MP Primary Camera and 1.3 MP Secondary Camera
•Android v4.3 (Jelly Bean) OS
•1.2 GHz Qualcomm Snapdragon 400 Quad Core Processor and 1 GB RAM
•Dual SIM (GSM + GSM)
•HD Recording
•4.5-inch HD Display
•Wi-Fi Enabled
•16 GB Internal Memory

मी सध्या मोटो जी वापरत आहे, अमेरिकेतून मागवून घेतलाय
Affordable किंमत आहे
साडेबारा हजार ला 8जीबी किंमत आहे भारतात

Smooth and pure android kitkat experience , powerful quad core processor for day to day tasks like gmail, you tube, chatting, Skype video, racing and puzzle games, angry birds etc. No lag.

kitkat has better memory management than older android versions so 1 gb RAM is sufficient for me.

HD 4.5" डिस्प्ले उत्तम, बॅटरी दीड दिवस आरामात जाते

मोटो जी वापरला का कोणी? >> हो. माझ्याकडे गुगल प्ले एडिशन आहे मोटो जी ची मी तिकडूनच आणला. मला आवडला आहे. बॅटरी मात्र १ दिवस चालेल. घ्यायचा असेल तर १६ जी बी बरा. अ‍ॅपल सारखे आणखी ८ जी बीला १०००० लागत नाहीत. एकूण चांगला फोन.

User Reviews जास्त चांगले नाहीत....

आता घेणार आहे मी एक....iball andi चा विचार चालू आहे.

जाम टेन्शन आलंय. कुठला घ्यायचा नक्की, कसा निघेल वगैरे वगैरे...

मोबाईलमध्ये घडयाळांसारखेच होऊ लागले आहे .आतली मुवमेंट एकच फक्त केस डायल वेगऴया कंपन्यांची वेगळी .

मला वाटते मिडिआटेकचे 6572 ,6582 ,6589 प्रसेसर लावलेले आणि चायनीज स्क्रिनचे किट घेतात आणि त्यावर टोपणे लाऊन वेगवेगळ्या नावाने मोबाईल बाजारात येतात .

यांचे अनटुटु आणि कवॉडरंट
रिझल्टस एकसारखेच येणार .

लेनोवो इज एक्वली डुइंग वेल नाऊ......स्पेच्श्यली त्याची ४०००mh बॅटरी असलेलं मॉडेल ४२ तास बॅटरी टिकतेय.... माझे २ मित्र गेले ४ महिन्याच्यावर वापरतायत हॅप्पी विथ परफॉर्मन्स...... मलाही आवडला. सगळीकडे सॅमसंग बघून उबग आलाय अता.

फ्लिपकार्टवरून खरेदी केल्याचे काही चांगले वाईट अनुभव असल्यास शेअर करा..... असं ऑनलाइइन बुक करायला धीर होत नाही... वस्तू प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कशी घ्यावी या विचारात.

म्हणजे जॅबाँगवरून छोट्या वस्तू मीही मागवलेय पण अश्या एलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना बघून घ्यावं का असं वाटतं.

Pages