मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या सॅमसंग एस ड्युओस घ्यायचा विचार चालू आहे ..८५०० रु. पर्यंत मिळेल ..

OS Android v4 (Ice Cream Sandwich)
DISPLAY Type TFT
Size 4 Inches
Resolution WVGA, 480 x 800 Pixels
Color 16 M

Primary Camera Yes, 5 Megapixel
Secondary Camera Yes, 0.3 Megapixel

BATTERY
Type Li-Ion, 1500 mAh
Talk Time 12 hrs (2G), 8 hrs (3G)
Standby Time 570 hrs (2G), 470 hrs (3G)

MEMORY AND STORAGE
Internal 4 GB
Expandable Memory microSD, upto 32 GB
Memory 768 MB RAM

========================================================

मायक्रोमॅक्स चे फोन निश्चितच चांगले आहेत ..पण बॅटरी बॅकअप कमी आहे असे ऐकले आहे ..८०००-९००० चे बजेट आहे .. नंतर जेली बीन वर अपग्रेड करता येइल असे काँफिगरेशन आहे ..
रीलायबिलीटी चांगली आहे सॅमसंग ची आणि ड्युअल सीमच हवा आहे ..

हा योग्य आहे का अजून कोणते पर्याय सुचवाल?

बहुतेक रेडिएशन मुळे हृदयाला प्रोब्लेम येउ शकतात म्हणुन साईज मोठी केली

शर्टात ठेवला तर हृदयाला त्रास होईल.

हं . मग प्यांटीत ठेवणं सेफ कसं काय ठरतं? प्यांटीच्या आत नाजूक अयवव नस्तात का?

शाहीर,
>>
Talk Time 12 hrs (2G), 8 hrs (3G)
Standby Time 570 hrs (2G), 470 hrs (3G)
<<
हे असलं कायपण लिहिलेलं असेल, तरी सॅमसंग रोज चार्ज करावा लागतोच. किंबहुना कोणताही स्मार्ट फोन सुमारे २४ तास मॅक्स ब्याकप देतो. तुमचे बोलणे जास्त असेल, तर हा वेळ कमी होतो. जितका स्क्रीन मोठा, व आऊटडोअर वापर जास्त, तितका बॅटरी बॅकप कमी.

फक्त बॅटरी टाईम हा इश्यु असेल तर मायक्रोमॅक्स देखिल तितकाच चालतो असा अनुभव आहे. पण सॅमसंगच्या या फोनची इंटर्नल मेमरी ४ जीबी म्हणजे झक्कास आहे. मायक्रोमॅक्सची इंटर्नल कमी = २ जीबी आहे. सॅमसंगची रॅम कमी आहे, प्रोसेसर लहान आहे. सॅमसंग जीपीएस सिग्नल पट्कन पकडतो, मायक्रोमॅक्सला रूट करून काड्या कराव्या लागतात नाही तर अर्धा अर्धा तास लागतो. असे उन्नीस बीस दोन्हीकडून आहेत.

ऑल इन ऑल, ८॥ हजारत मिळेल तर सॅमसंग उत्तम आहे.
डोळे झाकून घेऊन टाका. किंमतही अतीशय वाजवी आहे. मात्र, 'विनापावतीचा घ्या, अजून ५०० रुपये कमी करतो' असलं आमिष कुणी दाखवत असेल तर अजिबात घेऊ नका. पक्की काँप्युटराईज्ड पावती अस्ते सॅमसंगची. तशी पावती हवी. तरच ग्यालरीत सर्विस मिळते. अन्यथा नाही..

@ इब्लिस ,
धन्यवाद !
हार्ड्वेअर बघता जेली बीन टाकता येते ..

हाच फायनल केला आहे .

Sony Xperia Z Ultra कसा आहे?
मी कधी SONY चा फोन वापरला नाही.
जाणकार लोकहो Please help

, I Phone च्या तुलनेत कसा आहे अल्ट्रा ?
कितीला मिळाला अल्ट्रा ??>>>>>> आयफोन मी कधी वापरला नाही .....त्यामुळे उगाच तुलना करण्यात अर्थ नाही

प्रोसेसर २.२ गिगाहर्झ्ट आहे.. आणि रॅम २ जीबी यावरुन स्पिड ची कल्पना येईल...

कितीला मिळाला >>> ४६०००/- ला आहे मार्केट मधे एमआरपी पण ४४५०० पर्यंत मिळु शकेल.. डिस्टब्युटर डिलर अशांकडुन घ्या......म्हणजे जरा कमी किंमतीत मिळतो...

इदादा +१०००००००००००००००००००००००००००

मला cdma कार्ड चालु शकेल असे चांगले फोन सुचवा. सध्या samsung galaxy ace duos sch- 1589 हा वापरते आहे.
बॅटरी बंडल....
फोन विशेष नाही आवडला. मेमरी एक्दम कमी....

त्यापेक्षा मुग्धानंद......... एचटीसी डिझायर व्हीसी घ्या............. सीडीएमए.......चांगला आहे...बॅटरी बॅकअप मस्त आहे..... ११००० मधे येईल.....सिंगल सिम आहे

htc इतका स्बस्त? >>>>> आता झाला आधी त्याची किंमत १८००० होती..... ३ वर्षापुर्वी.... Happy

@अस्मिता१

पिंपरी मधे काही शॉप्स आहेत .. ऑनलाइन पाहिलात तर ९७०० दिसेल पण शॉप मधे १००० स्वस्त असतो ...पण पक्का बिल घेउनच !

घेतला की दुकानाचा पता , नंबर सांगतो ..

Sony xperia M येत आहे सोनी मध्ये मराठी टाईप करता येत का आणि Whats up चालतो का कृपया मदत करा

हो........ मराठी टाईप करता येते..........हिंदी किबोर्ड असतो त्यात......
झेड मधे आहे>>>>
नवर्याला देण्यापेक्षा मलाच घ्यावा का??? जबरदस्त मोह होतोय

नवर्याला देण्यापेक्षा मलाच घ्यावा का??? जबरदस्त मोह होतोय>>> पहिली महिला बघितली....नवर्याला घेउन देण्याचा विचार करते... Happy

सोनी चा अनुभव कसा आहे >>>>>>>> आता मी झेड आणि अल्ट्रा घेतलेला आहे त्यामुळे अनुभव चांगलाच आहे...

परंतु ..सोनीचा मोबाईल युजरफ्रेंडली बिलकुल नसतात.. ..कॅमेराची क्वालिटी इतर मोबाईल पेक्षा अतिशय चांगली असते... बॅटरी काढता येत नाही.. अटॅच आहे.... लवकर उतरत नाही... अर्थात ते वापरण्यावर सुध्दा अवलंबुन आहे... सतत गेम खेळत बसल्यास साधारण ३ - ५ तास चालते.. सतत इंटरनेट वापरल्यास वायफाय ३जी नेटवर्क वर किमान ७-८ तासाचा बॅकअप देते...

LAVA Iris 458Q घेतला रु.८,३००/- फक्त
1.2 Ghz Quad Core, 4.2 Jelly Bin, 2 GB (1.8) User Memory, 512 MB RAM, 8 MP Camera सोबत नीलदंत फ्री.

काल बेसिक अ‍ॅप्स Download केल्या नंतर 512 MB RAM मधिल फक्त 48 MB RAM शिल्लक दाखवत आहे. अ‍ॅपल सारखा लुक आहे.. सध्या पळतोय जोरात. Happy

फक्त ४८ एम्बी रॅम :

मोबाईल वापरणार्‍यांत एक गमतीदार सवय दिसून येते, ती म्हणजे अ‍ॅप किलर्स वापरून सतत मेमरी फ्री करीत रहाणे.
जर माझ्याकडे २ जीबी रॅम आहे, अन १ जीबी मी कायम फ्री ठेवत असेन, तर इफेक्टिवली मी एक जीबी रॅम वाला फोन वापरतो आहे. नवा प्रोग्राम चालवायला रॅमची गरज असेल तर सध्या वापरात नसलेला कोणता तरी दुसरा प्रोग्राम अँड्रॉइड स्वतः बंद करील.
सबब,
१. अ‍ॅप किलर्स / टास्क मॅनेजर्स वापरून सारखी मेमरी वाढवत बसू नका.
२. साधारणतः अठवडयाभरात एकदा फोन रिबूट करा. याने मेमरी पुन्हा स्वच्छ होते.
३. फुकट आहे, म्हणून वाट्टेल ते अ‍ॅप डाऊनलोड करीत बसू नका. त्याच्या यूजर परमिशन्स अन मुख्य म्हणजे रिव्ह्यूज वाचा. नुसते स्टार रेटिंग पाहू नका. त्या अ‍ॅपला किती लोकांनी रिव्ह्यू दिला आहे हे देखिल पहा. विनाकारण वेकलॉक खाणारे अन रॅममधे जिवंत रहाणारे प्रोग्राम्स स्पेशली गेम्स, मेमरीची वाट लावतात.

रीबूट कसा करायचा...
तुम्ही म्हणता तशी सवय मला पण आहे...मी टास्क किलर वापरून मेमरी मोकळी करत असतो..

पण मी नवा नवा अँड्राईड युजर असल्याने सध्या तरी क्रेझ आहे...त्यातून मला गेम्स खेळायला पण फार आवडतात...

रिबूट म्हणजे बंद करून पुन्हा चालू करणे. टास्क किलरची गरज नाही. जोपर्यंत एकादे अ‍ॅप मला मेमरी नाही असे म्हणून बोंबाबोंब करीत नाही, किंवा हँग झालेले नाही तोपर्यंत विनाकारण त्याचा गळा दाबणे योग्य नाही असे अनेक अँड्रॉईड डेवलपर्सचे म्हणणे आहे. (संदर्भ : http://forum.xda-developers.com )

अच्छा असे आहे होय...पण मी असे अनुभवलयं की आधी मेमरी मोकळी करून गेम्स खेळलं की मग ते हँग होत नाहीत...विशेषत थोडे हेवी गेम्स असतील तर

आता रिबूट करून घेतलाय...तुम्ही म्हणताय तसेही करून पाहतो...
मला वाटते की तुम्ही एक वेगळा धागाच सुरु करावा..अँड्रॉईड वापरणार्यासाठी...
या धाग्यात माहीती शोधायला फार वेळ जातो....काय म्हणता...
तिथेच मग काय शंका समाधान करता येईल....

सॅमसंगच्या अँड्राऑईड फोनमध्ये गाण्यांची फोल्डर्स कशी बनवायची?
मूड नुसार, जुनी/नवी गाणी अशी फोल्डर्स करता आली तर मूडनुसार गाणी ऐकता येतात.
तशी सोय नाही का?

उदयन, प्राची.
फोल्डर बनविण्यासाठी तुमच्या फाईलमॅनेजरमधे सोय सापडेल. सोनीच्या फोन मधे डिफॉल्ट फाईल मॅनेजर दिलेला नाहिये बहुतेक.
सॅमसंगच्या डीफॉल्ट म्युझिक प्लेयरचे जेलीबीन अपडेट झाल्यानंतर तुमचे एक्झिस्टिंग म्युझिक फार इंटरेस्टिंग रित्या सॉर्ट होते. आपोआप. मूड नुसार त्या गाण्याशी रिलेटेड गाणी जिथे असतील तिथून वाजवली जातात. स्क्रीन शॉट देईन हातात टॅब आल्यावर.

इब्लिस जी....... तो जो ओप्शन आहे तो वेळ काढु आहे फार... लव्कर करण्यासाठी मी ऑप्शन सुचवला... नाहीतर उद्या माझाच गळा येउन पकडतील.... Happy

बहुतेक सगळ्याच म्युझिक प्लेअर्स मधे... वेगवेगळ्या प्रकारात गाण्यांचे सॉर्टींग होते... माझ्या दुसर्या एचटीसी मधे २.३ आहे..तरी त्यात होते सॉर्टींग

आज हफिसात दोन नवीन फोन वाले आलेत. मायक्रोमॅक्सच आहेत दोन्ही. एक कॅनवास ४ तर दुसरा कॅनवास २. कॅ४ १७के ला घेतलेला अन कॅ२ ११के. दोन्ही फोन्स मस्तच आहेत. कॅ४ ला माझं वै मत. ज ब र द स्त फोन. अजिबात लॅग नाही कशातच. कलर्स पण उजवे. ट्च रीस्पॉन्स मस्त. अगदी सॅमसंग एस ४ ला ट्क्कर फोन. फुंकर मारून अनलॉक वगैरे फिचर्स. वर १३ मेपी कॅम. स्क्रीन पण मोठी आहे. अन हे सगळे फक्त फक्त १७के!
पण मामॅ मुळे सर्वीस च्या बोंबाबोंबी ची शक्यता आहेच.

मामॅ मुळे सर्वीस च्या बोंबाबोंबी ची शक्यता आहेच.
<<
याच द्गाग्यावर ३ वेळा लिवलय. माझा मायक्रोमॅक्स कॅनव्हास२ पीस बदलून मिळाला ३ अठवड्यात. सर्विस मला तरी चांगली मिळाली.

लोक्स जरा फोन सुचवा...
चांगला कॅमेरा, चांगला टच, शक्यतो अ‍ॅन्ड्रॉईड नको. स्लिम अन हलका हवा. फार मोठी स्क्रीन तर अजिबातच नको. साधारण साईज च्या खिशात मावेल एवढाच हवा.
बजेट - १३-१५के. होता होईल तो १५ च्या आतच हवा.
मित्राला बँकिंग अ‍ॅप्स करता हवा आहे म्हणून अ‍ॅन्ड्रॉईड नकोय. आयडिवाईस चं त्याचं बजेट नाही.

लुमिया चा कोणाला काय अनुभव? ५२०/६२०/७२०?

सोनीच्या फोन मधे डिफॉल्ट फाईल मॅनेजर दिलेला नाहिये बहुतेक. >>>> आहे डिफॉल्ट फाईल मॅनेजर :नव्या सोनी एक्स्पेरिया HD वर अजून चाचपडणारी बाहुली:

योग्या, नोकिया आशा चांगला आणि स्वस्त आहे तुझ्या मित्रासाठी. बँकिंग अ‍ॅप्स चालतात. ५के मध्ये काम होईल. बाकी त्याला हवा तसाच आहे.

Pages