मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लावा आयरिस ५०५ कसा आहे? वाचलेल्या रिव्ह्यूस वरुन चांगला वाटतोय. इथे कुणी वापरतंय का?

http://en.oppo.com/products/n1/

हा एक मोबाईल फक्त बघा.......त्याचे फिचर्स बघा... मोबाईल मधे अजुन काय काय सुविधा येउ शकतात याची एक छोटीसी झलक आहे

हं...
फक्त कॅमेरा अँगल बदलतोय.. तो ही फार कौतुकाचा विषय वाटला नाही. अधिक चांगले क्यामेरे अ‍ॅवेलेबल आहेत.
सायनोजेन मॉड ही क्रॅक केलेली अ‍ॅंड्रॉईड रॉम आहे.
बाकी सायलेंट फोन शिटी वाजवून शोधणे इतकेच इनोव्हेशन दिसले Happy अशी अ‍ॅप्स आहेत ऑलरेडी.

ता.क. ते रिअर टच पॅनल देखिल चामग्ले इनोव्हेशन आहे. मिसल्याबद्दल स्वारी.

बाकी अजून अनेक सुविधा येऊ शकतात याबद्दल सहमत.

स्क्रीन आऊट. म्हणजे एच्डीएमाय वा यूएस्बी केबल वापरून फोन च्या स्क्रीनवरून डायरेक्ट एलसीडी प्रोजेक्टरवर प्रेझेंटेशन देता येईल अशी सोय मला आवडेल.

आयार पोर्ट बसवून सगळ्या फोन्स ना टीव्हीचा व तत्सम डिवाइसेसचा युनिव्हर्सल रिमोट बनवता आला तर मजा येईल.

अजून काय काय मॉड्स करता येतील फोनमधे असे तुम्हाला वाटते?

एनेफ्सी नाही दिसलं त्यात...
वेब्साईटवरून फोन ट्रॅक, लॉक, ईरेज करता आला तर? (आयक्लाऊड सारखं)
मे बी फिंगरप्रिंट लॉक?
आय आर पोर्ट नी एकावेळी एकच डिवाईस कंट्रोल करता येईल. त्यापेक्षा एग्झिस्टिंग वायफाय वापरून मल्टिपल डिवाईसेस एकावेळेला कंट्रोल करता येऊ शकतील.
हे अ‍ॅन्ड्रॉईड असल्याने क्रोम टिवी ला सपोर्ट असेल तर उत्तम!

रिमोट लोकेशन ट्रॅकिंग, अ‍ॅबिलिटी टू लॉक, अशा सोयी असलेली अ‍ॅप्स आहेत. उदा एव्हीजी अँटीव्हायरस

स्क्रीन आऊट. म्हणजे एच्डीएमाय वा यूएस्बी केबल वापरून फोन च्या स्क्रीनवरून डायरेक्ट एलसीडी प्रोजेक्टरवर प्रेझेंटेशन देता येईल अशी सोय मला आवडेल. >>>>>>

ही सोय आहे ना.. टिव्हीला वायफाय कनेक्टर जोडुन तुम्ही मोबाईल ची स्क्रिन डायरेक्ट टिव्हीवर पाहु शकतात..

यात एक रिमोट आहे ते छान आहे.. मोबाईल पासुन लांब राहुन तुम्ही मोबाईल ला ऑपरेट करु शकतात.. फोटो क्लिक करु शकतात.. मोबाईल ला लॉक लावु शकतात.. बरेच काही करु शकतात ...

दोन दोन कॅमेरे असण्यापेक्षा हा रोटेट होणारा कॅमेरा छान ...

>>बाकी सायलेंट फोन शिटी वाजवून शोधणे इतकेच इनोव्हेशन दिसले अशी अ‍ॅप्स आहेत ऑलरेडी ??

कोणती आहेत ? मला हवी आहेत .. दुवे देउ शकाल का ?

स्क्रीन आऊट. म्हणजे एच्डीएमाय वा यूएस्बी केबल वापरून फोन च्या स्क्रीनवरून डायरेक्ट एलसीडी प्रोजेक्टरवर प्रेझेंटेशन देता येईल अशी सोय मला आवडेल. >>

अहो हे दोन तीन वर्षांपूवीची डिमांड असायला हवी. तशा सोयी आहेत की. Digital A/V Adapter घ्या आणि एक पोर्ट फोन तर दुसरा HDMI मध्ये जाईल. मग कुठेही प्रोजेक्ट करता येते.

अ‍ॅपल टीव्ही नावाचा प्रकार गेले काही वर्ष हे करत आहे. वाय फाय वर.

आता बहुतांश टिव्ही वर वाय फाय असते. फोन मध्ये लागलेला व्हिडिओ टिव्हीत पाहता येते. किंवा लॅपटॉप वरचे चित्र वायफाय वरून टिव्हीवर पाहता येते.

मी माझा सोनी झेड वायफाय वरुन डायरेक्ट टिव्हीला जोडु शकतो त्यासाठी टिव्हीला वायफाय कनेक्टर लावावे लागते

आय थिंक एनएफसी इज ऑन डेथ बेड...

माझी विश लिस्ट = लाँगर लास्टींग बॅटरी + अ‍ॅबिलिटी टु ऑटो-रिचार्ज व्हेन इट गेट्स ड्रेन्ड आउट; समथिंग सिमिलर टु व्हॉट माय रुंबा डज... Happy

केदार +१
बहुतेक सगळ्याच अ‍ॅपल्स ला हे रिमोट दिलेलं आहे. फ्री अ‍ॅप फ्रॉम अ‍ॅपल.एकदा ईन्स्टाल केलं की फोनवरून आयट्यून्स, अ‍ॅपल टिवी अ‍ॅक्सेस करता येतो.

योकु,
मी अ‍ॅपल टिव्हीबद्दल बोलत नाहिये. इथे भारतातल्या घराघरातल्या ओनिडा, व्हिडिओकॉन इत्यादींबद्दल बोलत आहे.

मला ८ ते १० हजार मधे फोन घ्यायचा आहे. विंडोज आणि अँड्रॉईड मधे चांगले कुठले? मी गॅलक्सी कोर वापरतो. मला विंडोज फोन विषयी जास्त माहिती नाही.
नोकिया लुमिना५२०/७२० आणि सॅमसंग गॅलेक्सी एस ड्युओज मधे कोणता घ्यावा ?

<मला ८ ते १० हजार मधे फोन घ्यायचा आहे. विंडोज आणि अँड्रॉईड मधे चांगले कुठले? मी गॅलक्सी कोर वापरतो. मला विंडोज फोन विषयी जास्त माहिती नाही.
नोकिया लुमिना५२०/७२० आणि सॅमसंग गॅलेक्सी एस ड्युओज मधे कोणता घ्यावा <>
सांगा रे प्लिज. मलाही मदत होईल.

मोबाईल फोन विषयी विचारताना........तुम्हाला त्यावर काय काय वापरायचे त्याची सुध्दा जरा कल्पना द्यावी

मला फोन बायकोला द्यायचा आहे (मुलगा पण वापरेलच). त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप, गेम्स, फोटोज, व्हिडिओ, फन अ‍ॅप्लिकेशन्स, लर्निंग अ‍ॅप्लिकेशन्स (लहान मुलांची) ईतकाच वापर असेल.

मग अँड्रोईड ४.१ वर्जन असलेला घ्या..........कारण आता व्हॉट्सअप आनि बाकीचे जास्त करुन गेम्स हे ४.० च्या वरच्या वर्जन मधेच चालत आहेत...

विंडोज वर पण आजकाल बरेच अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. फक्त ते शोधणे जरा कठीण जाते. परत मोबाईलमध्ये विंडोज ८ ही प्रणाली असते ती जुन्या प्रणालीपेक्षा बरीच वेगळी आहे. ती शिकताना थोडा वेळ लागतो आणि तो पर्यंत तो फोन वापरणे थोडे त्रासदायक वाटू शकते.

तुमची थोडी explore करायची तयारी असेल तर नोकिआ ल्युमिआ घ्या. हँडसेट म्हणून तो जास्त चांगला वाटला मला.

पण तुम्ही जास्त अ‍ॅप-सॅवी असाल तर सॅमसंग बरा - आजच्या घडीला.

सोनी एचटीसी मधले बघा.......

सॅमसंग मधे देखील गॅलक्सी प्रकारात चांगले आहेत

नोकिया ल्युमिआ ७२० वापरतेय गेले सहा महिने.

काही छान वाटलेल्या गोष्टी:
- २जी आणि नेहमीचा फोन म्हणून वापर करून सुद्धा बॅटरी २ दिवस चालते.
-मेट्रो लु़क - मला व्यक्तिशः फार आवडला.

-टच आणि एकूण बिल्ड क्वालिटी - अतिशय उत्तम

-कॅमेरा सुद्धा अतिशय छान आहे.

-पुर्वी एफ.एम रेडिओ सुद्धा नव्हता, पण आता अँबर अप्डेटनंतर रेडिओ आहे.

-अ‍ॅप्स सुद्धा मला हवी असलेली जवळ जवळ सर्व मिळाली. (व्हॉट्सॅप, फेस्बूक, डिक्शनरी, बॅटरी,
स्पीड डायल, स्काइप, एक्स्पेन्स मॅनेजर, फिटनेस संबंधी, एडोबे रिडर,कंपास आणि अशी बरीच
छोटी छोटी उपयोगी पडणारी, ऑनलाईन बँकिंग या घडिला तरी फक्त HDFC आहे)

-५१२ रॅम असून सुद्धा टेम्पल रन उत्तम चालते

-किड्स कॉर्नर आहे - ज्यामुळे मुलांसाठीचे फक्त एक वेगळे दालन करता येते. मुलांच्या हातात फोन देताना
तो मोड चालू केला की त्यांनी चुकून कोणाला फोन लावणे, महत्वाच्या गोष्टी डिलिट होणे वगैरे चिंता राहात नाही.

मला फारशा वापराव्या लागत नाही त्यामुळे.त्रास नाही पण बाकी काही लोकांना त्रास दायम ठरतील असे काही मुद्दे:
१. फाईल एक्स्प्लोरर नाही
२. पीसी ला कनेक्ट केल्यावर सुद्धा तो स्वःतःची अक्कल लाऊन एक वेगळे अ‍ॅप देतो फाईल एक्स्प्लोर्/मॅनेज करायला, ज्याचा या घडीला तरी दर्जा "झ" आहे. मी एक रजिस्ट्री हॅक वापरून त्याला मेमरी डिव्हाइस म्हणून उघडायचा मार्ग शोधला आहे पण तरी हे राजरोस पणे करायचा मार्ग त्यांनी द्यायलाच हवा.
युजर ला बुद्दू समजणारे आणि गोष्टी करायला अडवणारे मला आवडत नाहीत.

३. इ मेल पाठवताना सध्या तरी इमेज सोडता दुसर्‍या कोणत्याही प्रकारच्या फाइल सध्या तरी अ‍ॅटॅच करता येत नाहीत ( मला परवाच हा शोध लागला - सहा महिन्यांनी)

४. म्युझिक प्लेयर मध्ये हवी ती गाणी काढून सुरू करणे त्रासाचे आहे (पटकन एखाद्या फोल्डर मधून - क्र. १ शीच संबंधित)

माझा निष्कर्ष -

ऑफिस साठी वापरणार असाल - विशेषतः ऑफिस जर आउट्लूक वापरत असेल तर - अवश्य घ्या - कॅलेंडर आणि बाकी गोष्टी अतिशय मस्त सिंक होतात. हे मला अँड्रॉइड मध्ये तितकेसे छान वाटले नाही

कॉन्टक्ट्स सुद्धा आउट्लूक ला ठेवता येतात जे मला बेहद्द आवडले.

मजा/ करमणूक साठी वापरणार असाल -

फाईल एक्स्प्लोरर जोवर येत नाही तोवर वाटेला जाऊ नका. चिडचिड होईल.

samsung galaxy core ची ओरिजिनल body ठाण्यात कुठे मिळू शकेल??

@मंजू

मी गेल्याच आठवड्यात लेनोवो A 390 घेतला. ६४०० रुपयांना. हा माझा पहिला अ‍ॅन्ड्रॉईड फोन आहे. फोन दिसायला किमतीपेक्षा प्रीमियम वाटतो. बिल्ड क्वालिटी चांगली आहे. बहुतेक सर्व apps priinstalled आहेत. (norton antivirus सह) डिस्प्ले अगदी शार्प आहे. चार इंची टचस्क्रीन सफाईदार आहे. पाच मेगापिक्सल असूनही कॅमेरा मात्र अगदी बकवास फोटो काढतो. हा अवगुण सोडला तर फोन छान आहे. (पूर्वीचा नोकिया 2 mp असूनही चांगले फोटो काढायचा). या फोन कडे पाहून त्याच्या किमतीचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही हे मात्र मी अनुभवले आहे.

http://www.naaptol.com/mobile-handsets/ambrane-a-55/p/12210233.html

हा मी घेतला.....५०००च्या किमतीत तसा खूप चांगला आहे.

___________________________________________________________

http://www.naaptol.com/mobile-handsets/karbonn-a30/p/12176649.html

हा कार्बन A २७+ वापरला आहे का कुणी??? कसा आहे??

Micromax Canvas 2 Plus A111Q घेतला.......
पंधरा दिवस झालेत.....मला अतिशय आवडला आहे.
११ के किमती मधे अतिशय चांगला फोन, असे माझे व्यक्तीशः मत

मी कॅन्वास HD A116i मागवलाय, परवा पर्यंत मिळेल. एकून १२.५ हजार किंमत आहे आणि ४.२ जेलीबीन सहीत येतोय. बघू काय होतय ते!!

मी म्हणेन सॅम्संगाकडे नका जाऊ! अ‍ॅन्ड्रॉईडात ईतरही बरेच चॉईस आहेत की?
विंडोज च मार्केटही वर येतंय आता...

धन्यवाद योगेश .
लावा आइरिस ४५५ ,जोलो क्यू ७०० ,मायक्रोमैक्स ए ९०एस बरे वाटताहेत .

नोकिआने अॅनडराईड काढला असता तर सगळे आडवे झाले असते असा विचार करत होतो आणि कालचीच बातमी आहे येतोय . Happy

sony xperia ZR and ZL कसे आहेत? काही feedback? कारण battery removable नाही. बाकी ठीक वाटत आहे. budget २५ k आहे आणि sony xperia च घ्यायचा आहे.

झेड एल मस्त आहे..... १९२०* १२०० असल्याने एलईडी टिव्ही सारखी जबरदस्त क्लिआरिटी मिळते..
क्वाड कोर प्रोसेसर आणि २जीबी रॅम आहे.. तसेच १६जीबी इंटरनल मेमरी असल्याने मेमरीकार्ड नाही टाकले तरी चालते ..
बॅटरी सेवर मोबाईल मधे आहे तो ऑन करायचे नाहीतर दिवसभर बॅटरी चालत नाही.. बॅटरी जास्त खर्ची होते.. Sad

भावाने Lenovo A706 घेतलाय. १०३५० ला. १ जीबी रॅम, आणि पॉवरफुल प्रोसेसर आहे. ४.५" स्क्रीन. चांगला दणकट वाटतोय.

? माझ्या मोबाईलचा टच स्क्रीन क्र्याक झालाय.>> किती इन्चाचा आहे??

खिशाला / पर्सला फोडणी बसेल.
मला साडेतीन इन्च स्क्रीन्साठी ८०० रु लागले होते.
ते ही चायजीन / डु स्क्रीन्साठी.

झकास राव ........एचटीसीचा टचस्क्रिन तब्बल २५०० ला येतो.. ते ही ग्रे मार्केट मधली किंमत... ओरिजनल देव जाने

Pages