दिवाळी अंक २०१० स्वयंसेवक घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 2 August, 2010 - 20:32

मायबोली दिवाळी अंक २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. ज्या सदस्यांना मंडळात सहभागी करणे शक्य होणार नाही त्यांची नावे संपादकांकडे असतील आणि जसे सहाय्य लागेल तसे त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

*****

दिवाळी अंक २०१० संपादक मंडळ खालील प्रमाणे असेल.
मुख्य संपादक - ललिता-प्रीति
संपादक मंडळ - शर्मिला फडके, जाईजुई, हिम्सकूल, रैना, स्वरुप, मधुरिमा, पराग, anudon, श्रद्धा.

संपादक मंडळ ठरवतांना खालील गोष्टी विचारात घेतल्या गेल्या
१. कुठलाही सदस्य एकाच उपक्रमात ३ पेक्षा जास्त वर्षे काम करू शकत नाही.
२. नुकतेच मायबोलीकर झालेल्या सदस्यांचा मंडळासाठी यावर्षी विचार केला नाही.

ज्या सदस्यांनी दिवाळी अंक रेखाटन, दिवाळी अंक सजावट, दिवाळी अंक साचा (template), मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे) यासाठी नावे दिलेली आहेत त्यांची नावे संपादक मंडळाकडे नोंदवली आहेत, गरज लागेल त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करण्यात येईल.

नुकतेच मायबोलीकर झालेल्या सभासदांनी किंवा इतर जुन्या मायबोलीकरांनीही आधी मायबोलीच्या इतर उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, मग त्यांना संपादक मंडळात घेता येईल. पुढच्या वर्षी मंडळात भाग घेण्यास उत्सुक असलेल्या सदस्यांनी हे जरूर लक्षात ठेवावे.

संपादक मंडळाचे अभिनंदन व अंकासाठी शुभेच्छा!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठचही काम सांगा.. संपादन त्यातल्या त्यात आवडीचं .. म्हणजे सगळे लोकांच्या आधी वाचता येईल.. हा सुप्त आनंद! (गडगडाटी हसणारी बाहुली) Wink

२. दिवाळी अंक रेखाटन या विभागात काम करायला आवडेल.
फ़क्त दिवाळी अंक साचा (template) या विभागत नक्की काय येणार आहे हे स्पष्ट समजले तर त्या विभागातसुद्धा काम करायला आवडेल. Happy

दिवाळी अंक २०१० संपादक मंडळ खालील प्रमाणे असेल.
मुख्य संपादक - ललिता-प्रीति
संपादक मंडळ - शर्मिला फडके, जाईजुई, हिम्सकूल, रैना, स्वरुप, मधुरिमा, पराग, anudon, श्रद्धा.

संपादक मंडळ ठरवतांना खालील गोष्टी विचारात घेतल्या गेल्या
१. कुठलाही सदस्य एकाच उपक्रमात ३ पेक्षा जास्त वर्षे काम करू शकत नाही.
२. नुकतेच मायबोलीकर झालेल्या सदस्यांचा मंडळासाठी यावर्षी विचार केला नाही.

ज्या सदस्यांनी दिवाळी अंक रेखाटन, दिवाळी अंक सजावट, दिवाळी अंक साचा (template), मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे) यासाठी नावे दिलेली आहेत त्यांची नावे संपादक मंडळाकडे नोंदवली आहेत, गरज लागेल त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करण्यात येईल.

नुकतेच मायबोलीकर झालेल्या सभासदांनी किंवा इतर जुन्या मायबोलीकरांनीही आधी मायबोलीच्या इतर उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, मग त्यांना संपादक मंडळात घेता येईल. पुढच्या वर्षी मंडळात भाग घेण्यास उत्सुक असलेल्या सदस्यांनी हे जरूर लक्षात ठेवावे.

संपादक मंडळाचे अभिनंदन व अंकासाठी शुभेच्छा!!

धन्यवाद अ‍ॅडमिन आणि रुनी. Happy

शर्मिला, जाईजुई, हिमांशू, रैना, स्वरुप, मधुरिमा, पराग, anudon, श्रद्धा - आपण सर्वजण मिळून मायबोलीच्या या अकराव्या दिवाळी अंकाची निर्मितीप्रक्रिया आणि एकूणच संपूर्ण अंक संस्मरणीय करू या. Let's rock !!

मायबोली दिवाळी अंक 2010 संपादक मंडळाचे मनःपुर्वक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा!! Happy

अरे वा! संपादक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

दोन वर्ष संपादक मंडळात आणि एक वर्ष सल्लागार म्हणून मी काम केले आहे. कधीही काहीही मदत लागली, तर नि:शंक विचारा.

मुख्य संपादक भारतातली आहे हे पाहून विशेष आनंद झाला Happy
व्यर्थ न हो बलिदान! Wink

ललिता-प्रीति, अभिनंदन आणि शुभेच्छा. Happy
मंडळातल्या सर्व सदस्यांनाही हार्दिक शुभेच्छा. सुंदर अंक मिळू देत. Happy

Pages