डोंबिवली

Submitted by admin on 20 April, 2008 - 21:00

डोंबिवलीतले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिते, हो गं

मला वाटलं १२ दिवस जाहिरात टाकणार.. रोज एक रास..
पण हे बरच भारी आहे...

कोणी आहे कोडं सोडवायला?

१ उभं मायबोली
४ उभं वर्षा विहार
५ आडवं एक विस
६ आडवं दोन हजार सतरा

बाकीचं ओळखा आता Proud

१- मायबोली
२ - युनायटेड
३- लोणावळा
४-वर्षाविहार
५-एकविस
६-दोनहजारसतरा

ठिकाण -वनविहार?

इथे येऊदेत ऊत्तर

माहौल तो बनने दो वविका! बारिश भी पुछ रहा था आपके बारे मे

आहे एक शनिमंदिर. गेल्या पंधरा वर्षात झालं आहे.प्रति 'शनि शिंगणापूर' आहे का नाही ते भाविकच सांगतील. जवळच डी मार्ट झाले आहे. अजून गर्दी खेचत नाही.

ते शनीमंदीर मानपाडा रोडवर हायवेला जाताना आहे, आधी बाहेरुन शनीदेव, मारुती दर्शन द्यायचे, म्हणजे रस्त्यावरुन जाताना दिसायचं, आता कडेकोट बंदोबस्त.

ती सर्व देवळं एका लायनीत आहेत बरीच, सर्वच देव आहेत. मी पंचमुखी मारुती आणि कृष्णमंदीरला गेले तर त्या रस्त्यावरुन जाते. अर्थात फार क्वचित जाते त्या भागात.

गावदेवी मंदीर आहे मानपाडा रोडवरचं तिथे तेराव्या शतकातला शिलालेख ठेवलाय, काहीजण त्याला शनीमुर्तीच समजतात Sad .

१) ही माहिती टाकण्यासाठी योग्य धागा कोणता?
२) मुंबईतले कार्यक्रम धागा शोधायचा आहे.
३)मायबोलीवर फेसबुक पेजची लिंक दिलेली चालते का? खासगी पेज नाहीये.

फ्रेंडस लायब्री आणि इतर प्रायोजकांनी सुरू केलेला पुस्तक आदानप्रदान उत्सव वर्ष ४थे ९ ते १२ एप्रिल २०२० टिळक शाळेत आहे.

डोंबिवलीत अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी लोक खूप असल्याने इथे करोना रुग्ण वाढतात का? त्यांचा कामाच्या ठिकाणी इतरांशी संपर्क फार असतो.

डोंबिवलीतील फ्रेंडस लाइब्री आणि डोंबिवलीकर ग्रुपतर्फे घडणारा
पुस्तक आदान प्रदान समारंभ
दोन वर्षांच्या सुटीनंतर या आठवड्यात ( २४ उद्घाटन, २५-२६-२७ नऊ ते नऊ) सर्वेश सभागृह आवारात होत आहे.
(( २०२० सालचा रद्द झालेला.)