मायबोली गणेशोत्सव २०१८ - भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम - "रंगपेटी"

Submitted by संयोजक on 4 September, 2018 - 23:38

IMG-20180824-WA0008.jpg
रंगवणार मी रंगवणार
बाप्पा सुंदर रंगवणार
मुगुट छान चमकदार,
गळ्यात मोतियांचा हार
सोंड इवली वळवळणार
छोटे डोळे लुकलुकणार
मोदक तर भारी फार
मीच आधी मटकवणार
(शशांक पुरंदरे)
"नमस्कार मायबोलीकर, दरवर्षी प्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या पाल्यांसाठी सादर करत आहोत एक उत्साहपूर्ण उपक्रम "रंगपेटी!"
आपले ब्रश, पेन्सिली, स्केच पेन्स, रंगाच्या बाटल्या. आपला गणेशोत्सव रंगीबेरंगी करून टाका आणि तुम्हीही मनसोक्त रंगून जा या रंगात!!
IMG-20180824-WA0002.jpg
उपक्रमाचे नियम:
१) हा छोट्या दोस्तांसाठी हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डीनेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - १४ वर्षां खालील मुला मुलींसाठी.
५) उपक्रमाचे स्वरूप :
संयोजकांनी दिलेल्या चित्रांपैकी एक किंवा अधिक चित्रे छापून रंगवणे. एकाहून अधिक चित्रे रंगवायला हरकत नाही.
अथवा
पाल्याने स्वतःच चित्र काढून रंगवणे. चित्र गणपतीशी / गणेशोत्सवाशी संबंधित असावे, बस्स इतकाच नियम!
अथवा
इंटरनेट वरून चित्र घेऊन रंगवले तरी चालेल. मात्र इंटरनेटवरून वा इतर कुठून चित्र घेतल्यास ते प्रताधिकार मुक्त आहे याची शहानिशा करुन मगच ते वापरावे.
५-अ) यावेळी तुम्हाला आवडेल तसाच बाप्पा रंगवायचा आहे. गम्मत म्हणजे, बाप्पा काही फक्त रंगातच रंगवला पाहीजे असं नाही. बाप्पाच्या गळ्यातला हार रंगवताना रंगांच्या ऐवजी आईकडून थोडी डाळ मागून घ्या. ती ग्ल्युने चिकटवा. होईल की नाही सुरेख हार बाप्पाच्या गळ्यात. तुम्ही रोज फळे खाताना? मग त्याच्या बिया फेकूनच देता की नाही. त्या जपुन ठेवा. बाप्पाचे डोळे रंगवायच्या ऐवजी तेथे दोन चिकूच्या बिया चिकटवा. अगदी खऱ्या डोळ्यांसारखे डोळे तयार होतील बाप्पाचे. उंदिरमामा रंगवताना पेन्सील लिडचा चुरा वापरा, नाहीतर चहा करतो ना आपण ती पावडर चिकटवा. बाप्पाच्या मागे फुलांची आरास हवी की नको? मग खरी पण वाळलेली फुले चिकटवा. नाहीतर पेन्सील शार्प करता तेव्हा फुलांचे आकार येतात की नाही शार्पनरमधून? ती फुले नाजूक हाताने चिकटवा. पण हे सगळे आई बाबांना विचारुन करायचे बरं का. मग पहा तुमचा बाप्पा किती सुरेख आणि ईतरांपेक्षा वेगळा दिसतो ते.
५-ब) अ मध्ये हवे ते योग्य बदल चालतील म्हणजे डाळी ऐवजी तत्सम काही.
५-क) ज्यांना हे शक्य नाही त्यांनी नेहमीच्या पद्धतीने (पेन्सिल रंग, खडू, वॉटर कलर) रंगवला तरी चालेल.
६) चित्रे पाठवण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १३ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) 'मायबोली गणेशोत्सव २०१८' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१८ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत.)
९) प्रकाशचित्रे कसे द्यावे याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
१०) प्रवेशिका "रंगपेटी- पाल्याचे नाव" या नावाने द्यावी.
११) चित्रे गणेश चतुर्थीपासून १३ सप्टेंबर २०१८ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत २३ सप्टेंबर २०१८ (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगवणार मी रंगवणार
बाप्पा सुंदर रंगवणार

मुगुट छान चमकदार,
गळ्यात मोतियांचा हार

सोंड इवली वळवळणार
छोटे डोळे लुकलुकणार

मोदक तर भारी फार
मीच आधी मटकवणार

हे फारच भारी जमलय. मस्तच!!!

नवीन धागा काढून फोटो टाकला तर error message येतोय , म्हणून इथेच फोटो टाकला आहे .
रंगपेटी : अनुज (वय १२ वर्षे ) ( अश्विनी११ )

हा दिसतोय हो

पण
हा नाही

Submitted by अश्विनी११ on 18 September, 2018 - 12:49
नवीन धागा काढून फोटो टाकला तर error message येतोय , म्हणून इथेच फोटो टाकला आहे .
रंगपेटी : अनुज (वय १२ वर्षे ) ( अश्विनी११ )

नवीन धागा काढून फोटो टाकला आहे पियापेटी . बघून सांगा . कारण एकच दिवस फोटो दिसतोय .नंतर दिसत नाही . काय चुकते आहे कळत नाही .