माझ्या मते - स्पर्धा- मायबोली गणेशोत्सव २०१८

Submitted by संयोजक on 4 September, 2018 - 23:43

j4.jpg
आपल्या लोकांचे आवडते काम म्हणजे कोणतीही गोष्ट कोणी, कधी आणि कशी करायला हवी होती हे सांगत राहणे. गांगूलीने त्या वर्ल्डकप फायनलला पहिली बॉलिंग घ्यायला नको होती, अमिताभ ने लाल बादशाह, अजूबा, अकेला सारखे चित्रपट करायला नको होते, टाटाने जॅग्वार, रेंज रोव्हर कंपन्या विकत घेऊन चूक केली, सचिनने निवृत्ती लवकर घोषित करायला हवी होती, नेहरुंनी त्यावेळेस संयुक्त राष्ट्रसंघाकडे जायला नको होते..... असे एक ना अनेक विषय.

मायबोलीवर अनेक अभ्यासू, विविध क्षेत्रातील माहितीगार, चौफेर वाचन करणारे सभासद आहेत. यापूर्वी अनेकदा विविध विषयांवर अत्यंत सुंदर मतप्रदर्शन/चर्चा मायबोलीवर झालेल्या आहेत. या गणेशोत्सवात आम्ही समस्त मायबोलीकरांना असेच स्वतःचे मत/विचार मांडायला निमंत्रण देत आहोत. त्यामुळे सर्व वाचकांना विविध विषयांवरील अभ्यासू लेख वाचता येतील, एखाद्या घटनेची दुसरी बाजू समजावून घेता येईल.

स्पर्धेच्या नियम व अटी
१. मत हे लेख राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय घटना/ व्यक्तीच्या कलाटणी ठरलेल्या निर्णयावर असावे.
२. संपूर्ण लेख हे अभ्यासपूर्ण विवेचन या प्रकरात येणारे असावे. जर एखादा निर्णय आपल्याला चुकीचा वाटला असेल तर तो नक्की का चुकीचा होता, उपलब्ध पर्याय काय होते, त्यांचे फायदे/ तोटे काय असू शकले असते वगैरे मुद्दे मांडलेले असावेत.
३. कोणत्याही विषयाचे बंधन नाही.
४. एका प्रवेशिकेत एकाच घटना/व्यक्ती वर असावे.
५. चिखलफेक करणे, दोषारोप करणे हा लेखाचा उद्देश नसावा.
६. लेखाला शब्दमर्यादा नाही.
७. प्रवेशिका देण्यासाठी गणेशोत्सव - २०१८ ह्या ग्रुपचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा. धाग्याचे शीर्षक <<<स्पर्धेचे नाव>>> - <<< आयडी >>>> ह्या प्रमाणे द्यावे.
८. एका आयडीने कितीही प्रवेशिका देता येतील.
१०. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून १३ सप्टेंबर २०१८ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत २३ सप्टेबर २०१८ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
११. स्पर्धेचा निकाल मतदान पद्धतीने काढला जाईल

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे स्पर्धा!
पण लेखात चिखलफेक नाही झाली तरी प्रतिसादांत करायचे प्रतिसाद दात्यांचे अधिकार अबाधित का? Wink
कारण ते नक्की होणार.

कल्पना चांगली आहे पण 'माझ्या मते' अर्धीकच्ची सांगितल्या गेली आहे. वर दिलेली ऊदाहरणेही फारच तकलादू आहेत

गांगूलीने त्या वर्ल्डकप फायनलला पहिली बॉलिंग घ्यायला नको होती. >> 'माझ्या मते' सामन्याचे तो झाल्यानंतर जर/तर अ‍ॅनालिसिस करता येत नाही.. करून अर्थ नसतो. बॉलिंग घेणे हा प्लॅनचा भाग होता... ती हवी तशी पडली नाही हे पराभवाचे कारण आहे जे दुसर्‍या डावात बॉलिंंग घेऊनही झालेच असते.
अमिताभ ने लाल बादशाह, अजूबा, अकेला सारखे चित्रपट करायला नको होते, >> बरं मग? काय फरक पडला? कशाला कलाटणी मिळाली?
टाटाने जॅग्वार, रेंज रोव्हर कंपन्या विकत घेऊन चूक केली, >> कंपनीचे ताळेबंद देऊन अ‍ॅनालिसिस करायचे का?
सचिनने निवृत्ती लवकर घोषित करायला हवी होती, >> ह्याने नेमकी कशाला कलाटणी मिळाली?

माझ्या मते ही कल्पना तुम्ही आपसात चर्चा करून अजून थोडी धारदार करायला हवी.
ऊदाहरण देतो...
'अ‍ॅलन ट्युरिंग' (संदर्भ द ईमिटेशन गेम)च्या कामाने दुसर्‍या महायुद्धाला आणि एकंदर काँप्युटर जगताला दिलेली कलाटणी.
'मेरी जॅकसन' (संदर्भ हिडन फिगर्स) ने कृष्णवर्णीयांना ईंजिनियरिंग कॉलेजात प्रवेशासाठी दिलेला कायदेशीर लढा
'कॉलिंग सेहमत' (संदर्भ राझी) जिच्यावर बेतलेला आहे तश्या कोणी आय एन एस विक्रांतला वाचवून पाक युद्धाला/सबंधांना दिलेली कलाटणी.

थोडक्यात जर-तर न करता.. घडलेला प्रसंग (चांगला वा वाईट) आहे तसा स्वीकारून तो तसा घडण्यास हातभार लावणार्‍या व्यक्तीची, त्याच्या कामाची माहिती, आणि 'माझ्या मते' जर ही व्यक्ती/काम नसते तर ? असे काहीसे

नेहरुंनी त्यावेळेस संयुक्त राष्ट्रसंघाकडे जायला नको होते. >> ह्या ऐवजी भारत पाक सबंधाना कलाटणी देणार्‍या त्यांच्या या निर्णयामागे त्यांचा किंवा आणखी कोणाचा नेमका आणि काय विचार/हातभार होता? ते वाचणे जास्त ईंट्रेस्टींग असेल.
नेहरू संयुक्त राष्ट्रसंघाकडे जायला नको होते ते नसते गेले तर... ह्यापुढे लिहिलेले सगळे थोडक्यात 'दुसरी बाजू' स्वप्नरंजन होईल जो स्पर्धेचा हेतू नाही असे वाटते आहे.
नोटबंदी झाली नसती तर यंव त्यंव पेक्षाही नोटबंदी आणि बोकील वाचणे जास्त ईंट्रेस्टींग असेल.

कल्पना तुमचीच आहे आणि ती खूप आवडली म्हणून हा लेखनप्रपंच.(भोचकपणाबद्दल क्षमस्व).. वरच्या माहितीपर वर्णनामुळे आणि त्यातल्या ऊदाहरणांमुळे ती ईंपॅक्टफुल वाटत नाहीये म्हणून अजूनही वेळ आहे तर विचार व्हावा असे वाटते...
स्वप्नरंजन किंवा 'हायपोथेटिकली स्पीकिंग' असाच स्पर्धेचा हेतू असेल तर.. माझ्या पोस्टकडे दूर्ल्क्ष करा..कदाचित माझ्या समजण्यात चूक झाली असेल. अर्थात शेवटी निर्णय तुमचा आहे तुमच्या निर्णयाचा आदर आहेच.

हायझेनबर्ग,

तुमच्या मतांचे स्वागतच आहे.

जी गोष्ट झाली त्याची संपुर्ण माहिती, त्याचे परिणाम, फायदे-तोटे, विश्लेषण शक्यतो सगळीकडे वाचण्यास मिळते.

"माझ्या मते" या स्पर्धेत एखादा महत्वाचा कलाटणी ठरणारा घेतलेला निर्णय घ्यायच्या ऐवजी तेव्हा उपलब्ध असलेला दुसरा पर्याय निवडला असता तर तेव्हाच्या संधी, धोके, शक्यता, त्यांचे संभाव्य परिणाम याविषयी लिखाण अपेक्षित आहे. Happy

सर्वांना स्पर्धेची पटकन कल्पना यावी म्हणून नेहमीचे माहित असलेले सामान्य विषय उदाहरण म्हणून लिहिले आहेत. पण स्पर्धेच्या नियमांमधे लिहिल्याप्रमाणे स्पर्धेसाठी प्रवेशिकांसाठी कोणत्याही स्थळकाळाचे, विषयाचे बंधन ठेवण्यात आलेले नाही.

"माझ्या मते" या स्पर्धेत एखादा महत्वाचा कलाटणी ठरणारा घेतलेला निर्णय घ्यायच्या ऐवजी तेव्हा उपलब्ध असलेला दुसरा पर्याय निवडला असता तर तेव्हाच्या संधी, धोके, शक्यता, त्यांचे संभाव्य परिणाम याविषयी लिखाण अपेक्षित आहे. Happy >>
बच्चनला अजुबा/अकेला करतांना दुसरे काय पर्याय ऊपलब्ध होते ?
टाटांना जॅग्वार्/लॅडरोवर घेतांना दुसरे काय पर्याय ऊपलब्ध होते??
सचिनने २०११ ऐवजी २००७ मध्ये निवृत्ती घेतली असती तर???

असे लिहायचे आहे का?

जरा खुलासा करता का?
अजूनच कन्फ्युजन वाढले.

माझ्या मते "माझ्या मते" हा उपक्रम जर तरच वरच आधारीत आहे. म्हणजे
जर हिटलरने अमेरीकेला युध्दात ओढले नसते तर....
जर हिटलरने स्टालीनग्राडच्या युध्दात योग्य निर्णय घेतले असते तर...
जर जर्मनीच्या हाती कॉकेशसचे ऑइल लागले असते तर...
जर हिटलरने 'नॉट वन स्टेप बॅक' सारख्या पॉलीसी वेड्या हट्टाने अंगिकारल्या नसत्या तर...
जर रशियाबरोबरील युध्द हिटलरने ठरवलेल्या तारखेलाच सुरु केले असते तर....
या जरतर मुळे आज जगाचा नकाशा बदलला असता. तो कसा असता यावर लिहावे.
उगाच संयोजकांनी दिलेल्या उदाहरणांचा किस काढत बसण्यात काय गम्मत आहे?

मला वाटतं हा मुद्दा पुरेसा स्पष्ट आहे :
२. संपूर्ण लेख हे अभ्यासू विवेचन या प्रकरात येणारे असावे. जर एखादा निर्णय आपल्याला चूकीचा वाटला असेल तर तो नक्की का चूकीचा होता, उपलब्ध पर्याय काय होते, त्यांचे फायदे/ तोटे काय असू शकले असते वगैरे मुद्दे मांडलेले असावे.

किंवा मला तो पुरेसा स्पष्ट झाला आहे.

हायझेनबर्ग,

आम्ही दिलेल्या उदाहरणांमुळे संभ्रम निर्माण होत आहे का?

उदाहरणे गाळून जर धागा आणि आमची वरील प्रतिक्रिया वाचली तर संकल्पना स्पष्ट होत आहे का?

माझ्या मते "माझ्या मते" हा उपक्रम जर तरच वरच आधारीत आहे. म्हणजे
जर हिटलरने अमेरीकेला युध्दात ओढले नसते तर....
जर हिटलरने स्टालीनग्राडच्या युध्दात योग्य निर्णय घेतले असते तर...
जर जर्मनीच्या हाती कॉकेशसचे ऑइल लागले असते तर...
जर हिटलरने 'नॉट वन स्टेप बॅक' सारख्या पॉलीसी वेड्या हट्टाने अंगिकारल्या नसत्या तर...
जर रशियाबरोबरील युध्द हिटलरने ठरवलेल्या तारखेलाच सुरु केले असते तर....
या जरतर मुळे आज जगाचा नकाशा बदलला असता. तो कसा असता यावर लिहावे.>> अय्या कोदंड्पाणि मी अगदी हेच्च लिहायला आलेले. काल बाफ वाचला मग ह्यावरच लिहा यचे तर विचार करत होते हिटलरच्या स्ट्रॅटेजिक चुका. तुम्ही असे करायला नको होतेत आणि लोकांच्या हक्काचे लोकशाहीचे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्क्स्टदाबीचे काय? वगैरे अनेक बाजू मनात होत्या. पण विषयाचा आवाका प्रचंड आहे. व मी पीएच डी टाइप विचार करू शकत नाही. मग हा मोठा विषय ऑप्शन ला टाकला आहे. अब्यास करताना अनेकदा कपाल बडवती क्षण आलेले. अरे तुम्हाला इतके समजत नाही का? टाइप. शिवाय मला एक अजून डिमेन्शन कळली आहे की पूर्ण युद्धात एक ही महिला लीडर नाही सर्व एक्सेसिव माचो थिम्किंग वाले पब्लिक लीड रशिप पोझिशन मध्ये. . व बायका पूर्ण वेळ सफरिग मोड मध्ये कोपिंग मोड मध्ये आहेत. महिला लीडर असत्या तर जीवित वित्त हानी कमी झाली असती( बहुतेक ) असे वाट्ते. खूप गहन विष य माझी अ‍ॅबिलिटी कमी पडते आहे.

आम्ही दिलेल्या उदाहरणांमुळे संभ्रम निर्माण होत आहे का? >> हो.
उदाहरणे गाळून जर धागा आणि आमची वरील प्रतिक्रिया वाचली तर संकल्पना स्पष्ट होत आहे का? <<<< घेतलेला निर्णय घ्यायच्या ऐवजी तेव्हा उपलब्ध असलेला दुसरा पर्याय निवडला असता तर >>
'जे घडलेच नाही ते कसे घडले असते' ह्या प्रकारच्या लिखाणाला माझ्या मते स्वप्नरंजन म्हणतात आणि तुम्हाला हेच अभिप्रेत आहे असे दिसते. ठीक आहे कळाले. अंंदाजापेक्षा संकल्प्नना वेगळी निघाली. व्यक्तीशः मला 'भूतकाळाचे अभ्यासू स्वप्नरंजन' असे नॉनफिक्शन आणि फिक्शनचे कॉकटेल आवडत नाही कारण नॉन-फिक्शनच्या सिरियसनेसवर फिक्शनमध्ये ऊभारलेले विचारांचे ईमले विनोदी वाटत राहतात..पण असो.. तोच ह्या स्पर्धेचा हेतू असावा.
तसदीबद्दल क्षमस्व आणि स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद... तुम्हाला आणि लिहिणार्‍यांना शुभेच्छा!

जेव्हा आमचे विद्वान मित्र श्री कोदंडपाणी त्यांच्या अकलेचे तारे तोडतील आणि त्याने जो ऊजेड पडेल त्या ऊजेडातच ह्या लेखनप्रकारात आधी न सापडलेले काही तरी चांगले सापडेल अशी आशा करतो... तोवर वाचनमात्र राहतो.

. महिला लीडर असत्या तर ...

ह्यावर एक जोक आहे .... "जर सर्व देश महिलांच्या ताब्यात असते तर जगात एकही युद्ध झाले नस्ते. केवळ एकमेकांशी न बोलणारे काही देश अशीच जगाची ओळख राहिली असती"

ही स्पर्धा विनोदी रुपात वाचायला खूप मजा आली असती.
येनीवेज, छान कल्पना आहे.
मला ती उदाहरणे सुद्धा आवडली. हलकीफुलकी. जेणेकरून जास्त लोक सहभाग नोंदवतील. अन्यथा मोजक्या अभ्यासू मंडळींचे छोटेसे संमेलन भरले असते.

'संयोजकांच्या मते' असा एक अभ्यासपूर्ण विवेचनपर लेख येऊ द्या आता. Proud

विषयः- मूळ कल्पनेत काय बदल केले असते तर ह्या स्पर्धेत किमान एक तरी प्रवेशिका येऊन ह्या स्पर्धेचे ऊदघाटन झाले असते.

ह्या स्पर्धेच्या कल्पनेबद्दलचा जर तुमचा निर्णय तुम्हाला चूकीचा वाटला असेल तर तो नक्की का चूकीचा होता, उपलब्ध पर्याय काय होते, त्यांचे फायदे/ तोटे काय असू शकले असते वगैरे मुद्दे मांडलेले असावे.