चॉकलेट लाव्हा केक

Submitted by साधना on 23 July, 2010 - 12:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१२५ ग्रॅम चॉकलेट स्लॅब. मी चॉकलेटं करण्यासाठी स्लॅब विकत आणलेली , त्यामुळे ती वापरली. त्याजागी प्लेन कॅडबरी डेअरीमिल्क वापरले तरी चालेल.
१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर. मी अमुल बटर वापरले
३ अंडी
पाऊण कप साखर
पाव कप मैदा

क्रमवार पाककृती: 

१. ओवन २०० डिग्री सेल्सिअसला तापायला लावा.
२. चॉक्लेट आणि बटर एकत्र विरघळवुन घ्या. गॅसवर करायचे असेल तर पाव भांडे भरुन पाणी गरम करत ठेवा आणि त्यात अर्धे आत/अर्धे बाहेर राहिल असे दुसरे एक भांडे बसवुन त्यात चॉक्लेट आणि बटर टाकुन विरघळवा. थेट गॅसवर चॉक्लेट आणि बटर ठेऊन विरघळवु नका. ही स्टेप मायक्रोवेवमध्येही करता येईल.
३. अंडी (योकसकट), साखर आणि मैदा एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या. बेकींग पावडरची गरज नाही.
४. वरील मिश्रण चांगले फेटले की त्यात चॉकलेटचे मिश्रण थोडे थोडे घाला. (थोडे मिश्रण घाला, सगळे चांगले मिक्स करा, परत थोडे घाला, मिक्स करा असे सगळे चॉकलेट संपेपर्यंत करा)
५. माझ्याकडे छोटे केक्स बेक करायची वेगळी भांडी नाहीत म्हणुन मी आपले चहाचे सिरॅमिक कप वापरले. कप्सना आतुन बटर लावुन घ्या. आणि प्रत्येकात कप ३/४ भरेल इतके मिश्रण ओता.
६. ओवनमध्ये मोजुन १० मिनिटे बेक करा.
७. बाहेर काढुन दोन मिनिटे थंड होऊ द्या. मग केकच्या बाजुने सुरी फिरवुन केक सोडवुन घ्या, कपावर छोटी ताटली ठेऊन कप उलटा करुन केक बाहेर काढा.
८. गरमगरम खायला द्या... Happy

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ६ लहान कप केक होतात
अधिक टिपा: 

१. केक मोजुन १० मिनिटे बेक करा. जास्त वेळ बेक केल्यास केक पुर्णपणे बेक होतो आणि लाव्हा रस पाहिल्याचा आनंद मुलांना मिळत नाही. तसेच केक करुन बराच वेळ झाल्यासही लाव्हा सुकतो. त्यामुळे जराजरा गरम असतानाच मुलांना द्या.
२. मावेत हा केक नीट होत नाही. मुलीने करुन पाहिला पण मावेतला केक आतुन बाहेर बेक होत आला त्यामुळे सेंटर बेक झाले आणि लाव्हा बाहेरच्या बाजुला राहिला Happy

माहितीचा स्रोत: 
पिझ्झाहट, इंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुपाली, कुकरमध्ये केला तरी चालेल वाटते. ते लाव्हा वगैरे बाहेर वाहायचा ऑप्शन ड्रॉप करुन ४५ मिनिटांऐवजी १५-२० मिनिटे बेक केलास तर केक पुर्ण बेक होईल, तोही चवीला चांगला लागतो. मस्त मऊ स्पॉन्जी होतो.

साधनाताई धन्यवाद.. Happy आता या रविवारीच ट्राय करुया म्हणतेय; नंतर श्रावण चालु होईल.. Sad
पण मग मला आच जरा मोठी ठेवावी लागेल का? आणि कप मध्येच करु का?

काल हा उद्याग केला. केक मस्तच झाला.. लेक खुष अगदी.
फोटो काढावा म्हणुन बाहेर काढला तर जास्त पातळ असल्याने नीट निघाला नाही.

माझ्या मते १० मिनीट बेकींग कमी वाटले.. १४ मिनीट केल्यावर हवा तसा झाला. Happy

साधना धन्स ग.. खुप पैसे वाचतील आता.( डॉमिनोज मधे खाल्ल्यापासुन सारखा हवा होता त्याला ) आणि आपण केल्याचे समाधान Happy

मी माबो वर जनरली रोमात असते. आज जवळ-जवळ एका वर्षाने माबो वर actively लिहित्ये.
तुमची ही रेसिपी वाचली, लगेच करून बघितली आणि शाब्बासकी सुद्धा मिळवली.. Happy
पण माबो वर येऊन, रेसिपी बघून केली आणि धन्स सुद्धा दिले नाहीत असा करायला मी कृतघ्न नाहीये.. त्यामुळे खूप खूप धन्स..तुमच्या रेसिपी मुळे मला खूप 'ब्राऊनी' points मिळाले.. Happy Happy Happy

एक शंका: साधे मग अवन किंवा मावेच्या कन्व्हेक्शन मधे बेक करताना तडा जाऊन फुटत नाहीत का?>>>> ते मग ला ओपाला चे आहेत ते मावे सेफ आहेत. त्यावर कपाच्या तळाशी खालील बाजुस मावे सेफ लिहीलेले असते. साधे कप फुटतील.
पाककृती छान आहे.

पण १० मिनिटांच्या (फार तर ११ झाली असतील) बेकिंगमधे लाव्याचा दगड झाला. मा. का. चु.?

कदाचित २०० डिग्री तापमान लाव्याला आवडले नसेल. १० मिनिटांसाठी थोडे कमी ठेवले किंवा तापमान वाढवुन वेळ कमी केला तरी लावा प्रवाही होईल असे वाटते.

माझा लाव्हासुद्धा कधी वाहलाय तर कधी गोठलाय. पण गंमत म्हणजे जे काही होते ते खुप मस्त लागते. जरी केक झाला तरी छान लागतो. फक्त कॅलरीजच भरपुर आहेत यात म्हणुन हल्ली करत नाही.

Pages