मराठी मोजमापे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

धान्य मोजण्याची मापं :

दोन नेळवी = एक कोळवे
दोन कोळवी = एक चिपटे
दोन चिपटी = एक मापटे
दोन मापटी = एक शेर
दोन शेर = एक अडशिरी
दोन अडशिर्‍या = एक पायली
सोळा पायल्या = एक मण
वीस मण = एक खंडी

सोने-चांदी-औषध मोजण्याची मापं :

गुंज तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर इथे पहा : गुंज
आठ गुंजा = एक मासा
बारा मासे = एक तोळा

अंक :

१ - एक
१० - दहा
१०० - शंभर
१००० - हजार
१०००० - दहा हजार
१००००० - लक्ष
१०००००० - दशलक्ष
१००००००० - कोटी
१०००००००० - दशकोटी
१००००००००० - अब्ज
१०००००००००० - खर्व
१००००००००००० - निखर्व
१०००००००००००० - महापद्म
१००००००००००००० - शंकू
१०००००००००००००० - जलधी
१००००००००००००००० - अन्त्य
१०००००००००००००००० - मध्य
१००००००००००००००००० - परार्ध

चलन :

तीन पै = एक पैसा
दोन पैसे = एक ढब्बू पैसा
दोन ढब्बू पैसे = एक आणा
दोन आणे = एक चवली
दोन चवल्या = एक पावली
दोन पावल्या = एक अधेली
दोन अधेल्या = एक रुपया

अंतर :

तीन फूट = एक यार्ड
१७६० यार्ड = एक मैल
दोन मैल = एक कोस

प्रकार: 
शब्दखुणा: 

मंदार, त्या इमेलमधल्या पुस्तकात 'अब्ज' नाहीये कदाचित अर्व म्हणजेच अब्ज असेल आणि गजानन तुम्ही दिलेल्या संख्येत दशअब्ज नाहीये.

हिंदीतही अब्ज ला अरब म्हणतात त्यावरुन ही दोन्ही रुपे अर्व पासून निर्माण झालेली असू शकतात.

मंदार, किरण धन्यवाद, चांगली माहिती.
इकडे तुम्ही लिहिलंय त्याकडे लक्षच गेलं नाही.
हो माझ्याकडच्या माहितीत दश अब्ज नाही. Sad घोळ आहे काहीतरी.

कोणी तुझ्याकडे किती पैसे आहेत असं विचारलं की "घंटा" असं उत्तर द्यायचो. आता कळलं लोक त्यावेळी विश्वास का नाही ठेवायचे ते.. घंटा म्हणजे लई रुपये.<<< Lol

मुटेसाहेब, माणसातील माणुसकी मोजण्याचं माप सापडलं का? Proud

ईंग्रजांच्या राजवटीत (चु.भू. घे. दे.) दशमान पद्धत आल्यावर रुपया १०० पैशांचा झाला

नाही हो. १९५६ साली ही दशमान पद्धत भारत सरकारनेच सुरु केली.
१ आणा = ६ पैसे. २ आणे = १३ पैसे. म्हणजे असे की दुकानदार २ आणे म्हणायच्या ऐवजी १३ पैसे द्या म्हणायचा, पण चिल्लर परत करताना मात्र, हे घ्या सहा पैसे, एक आणा. आणि हे आणखी सहा पैसे म्हणजे झाले ना दोन आणे.
लै हुष्षार ना!! किती भांडणे व्हावीत त्या पायी! जवळ जवळ दोन वर्षे ही भांडणे (निदान पुण्यात तरी) चालू होती.

हीरा हा कॅरटमध्ये मोजला जातो. १ कॅरट म्हणजे नक्की काय? कॅरट हे वजनाचे माप आहे का हिर्‍याची तेजस्वीता मोजण्याचे प्रमाण की आणखी काही?

उदा. २०० कॅरटचा हीरा म्हणजे नक्की काय? तसेच हिर्‍याला पैलू पाडतात म्हणजे नक्की काय करतात?

मास्तुरे, कॅरेट विषयी विकीवर वाचा:
The carat is a unit of mass equal to 200 mg (0.2 g; 0.007055 oz) and is used for measuring gemstones and pearls.

The current definition, sometimes known as the metric carat, was adopted in 1907 at the Fourth General Conference on Weights and Measures[citation needed], and soon afterward in many countries around the world.[1] The carat is divisible into one hundred points of two milligrams each. Other subdivisions, and slightly different mass values, have been used in the past in different locations.

गजाननजी,
लहानपणी घरी हे पाहिलयं,पण एकुण छान माहिती मिळाली !

दोन आठाणी = सोळा आणे = एक रुपया
मुटेंनी दिल्याप्रमाणे गावाकडे हे जास्त ऐकल्यासारख वाटतं..
Happy

लहानपणी आजोबांनी सांगीतलेल्या गमतींपैकी एक (सध्या वाटणारी) गंमत ..
त्यांनी एका वर्षी घरातले ३५ पोती शाळु (ज्वारी) विकुन, तेल्याच्या दुकानातली फक्त तालमीचा खुराकाची (खारीक,बदाम) एकुण ४० रुपयाची उधारी भागवली (चुकती केली) होती.

कॅरट बद्दल आणखी ... सोन्याचे मिश्रणाचे प्रमाण कॅरटमध्ये दर्शवतात. शुद्ध सोने हे मऊ असल्याने ते लवकर झिजते म्हणून त्यात कठीणपणा आणण्यासाठी ताम्ब्यासारखे धातू मिसळतात (मिसळावे लागतात.)
शुद्ध म्हणजे १०० टक्के शुद्ध सोने म्हनजे २४ कॅरट मानतात. मग २२ कॅरटमध्ये २२ भाग सोने आणि दोन भाग इतर कठीण धातू, १८ कॅरट म्हनजे १८ भाग सोने आणि ६ भाग इतर धातू. १४ कॅरट पर्यन्त सोने ऐकलेले आहे. अर्थात ह्या सोन्याचे भावही कमी असतात. जास्त घर्षण होणारे दागिने सोन्याला कठीणपणा देऊनच करावे लागतात. त्यामुळे सोन्यात भेसळ आवश्यक...

हिर्‍याला पैलू पाडतात म्हणजे नक्की काय करतात <<< हिरा खरा तर ओबडधोबड खडा असतो.. त्याला आकारात कापून, त्याला जास्तीत जास्त (संख्येने) सपाट बाजू केल्या की प्रकाश परावर्तीत होतो म्हणजेच हिरा लखलखू लागतो.. यालाच पैलू पाडणे म्हणतात...
(लिहायला गेल्यावर लक्षात आले, जे म्हणायचे आहे त्याचे शब्दच सापडत नाहीयेत Sad (

Pages