रानभाजी १३) सुरणाचे देठ

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 July, 2010 - 01:23
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुरणाचे देठ
सुरणाचे देढ हिरव्या देढावर पांढरे कोड आल्यासारखे असते दिसायला. वरचे साल काढून घ्यायचे.

क्रमवार पाककृती: 

सुरणाचे देठ हे आमटीत, कोलंबीच्या कालवणात, वाटाणा, बिरड्यात घालतात. हे सुरणाप्रमाणे खाजणारे असते. त्यामुळे ज्या पदार्थात टाकायचे त्यात आंबट घालावे लागते. ऋषीपंचमीच्या दिवशी जी भाजी केली जाते त्या भाजीतही ह्याचा देठ वापरतात.

ह्याच सुरणाला खाली कंद लागतो. त्याचा उपयोग भाजी, उपवासाचे पदार्थ करण्यासाठी होतो.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

सुरणाच्या पाल्याचीही भाजी करतात अस ऐकलय पण मी कधी पाहीली किंवा खाल्लेली नाही.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे तुप जिर्‍याची फोडनी करुन त्यात चिंच घालुन उकडुन घेतलेल्या फोडी घालुन, दाण्याच कुट +ताक आणि खोबर घालुन करतात ही भाजी . उपासालाही चालते. Happy

सुरणाबरोबर वडीच अळुही दिसतय फोटोत Happy

आम्ही सुरणाची भाजी पहिल्यांदाच केली आणि खूप खाजली Sad
मला अळूची वडी खाल्ली की घसा खाजतो, फतफतं खाल्लं की नाही खाजत.

मनिषा, जागूने सुरणाच्या देठाविषयी लिहीलंय, ते वर फोटोत दिसतंय ते....जमिनीच्या वर असतं ते. आपण खातो ते जमिनीच्या खाली असतं... Happy

हम्म्म, सुरण खाजरं असल्यामुळे मी जरा दूरच असते ह्या भाजीपासून! पण उपासाला करतात आमच्याकडे ह्या सुरणाची भाजी!

जागू, विषारी सुरण काय प्रकार असतो माहिती आहे का कारण दुर्गा भागवतांना सुरणाचे विष लागले होते.

सुरेख - जे लिहितेस ते ते.

आरती, मी पण काल कोलंबीत टाकला होता सुरण

मनिषा, मी सुरणांच्या देठाबद्दल लिहलेय. तु त्याच्या भाजीबद्दलच लिहीलयस की कंदाबद्दल ?

हो अश्विनी, तो वडीचा अळू आहे.

दक्षीणा, अरुंधती, अग सुरणाच्या भाजीत आंबट टाकाव लागत मग नाही खाजवत. किंवा सुरणाच्या फोडी करुन त्याला चिंचेचा कोळ लावुन ठेवायचा. मग १५-२० मिनीटांनी धुवुन त्याची भाजी करायची. किंवा चिंच टाकून उकडून घ्यायचा मग फोडणी टाकायची. अळूवडीलाही चिंच लावावी लागते. त्यासोबत थोडा गुळ घेतला की चविष्ट होतात वड्या.

मंजूडी, तु बरोबर ओळखलस.

बी, मलाही नाही माहित विषारी सुरणाबद्दल. कारण आमच्याकडे आम्ही ह्या सुरणाच्या मुळ्या लावतो.
हा एक माहीत आहे की लाल सुरण खाजरा असतो आणि पांढरा सुरण कमी खाजरा असतो.