नाटयविषयक लेखांची मालिका : 'तुम्हा तो सुखकर हो शंकर' (नवीन लेखांसहित)

Submitted by rar on 1 July, 2010 - 20:32

दोन चार दिवसांपूर्वी योगेश२४ नावाच्या मायबोलीकराने 'गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी) या विषयावर लिहिताना बालगंधर्वांच्या संदर्भात श्रीराम रानडे यांनी लिहिलेल्या एका लेखाचा उल्लेख केला होता.

http://www.maayboli.com/node/16889?page=6

माझ्या माहितीच्या काही मंडळींनी ' हे तुझे बाबा का गं' अशी विचारणा केली आणि या मालिकेतले इतर लेख वाचायची इच्छाही व्यक्त केली.
मराठी विश्व नाट्य संमेलनाचं औचित्य साधून गेल्या ३ महिन्यात माझ्या वडिलांचे नाट्यविषयाशी निगडीत असलेल लेख लोकसत्ता मधे प्रसिद्ध होत होते/आहेत.
नवीन काही वाचलं, ऐकलं, पाहिलं की त्यानिमित्तानं आमच्या घरात त्यावर भरपूर चर्चा व्हायच्या. आई बाबांकडून बोलता बोलता खूप मजेशीर आणि कुठे न वाचलेली, ऐकलेली माहिती मिळायची. इथे अमेरिकेत आल्यानंतर मी आणि माझी बहिण आम्ही दोघी या चर्चा miss करायचो. या लेखांच्या निमित्तानं आम्हा बहिणींचा परत एकदा बाबांशी नाट्यविषयावर संवाद घडला असं गेले तीन महिने हे लेख वाचताना आम्हाला जाणवलं. खूप माहिती नव्याने सामोरी आली...
नाटकाची आवड असणा-यांना हे लेख वाचायला नक्कीच आवडतील, त्यांनाही हा संवाद झाल्याचा अनुभव येईल कदाचित...म्हणून हे सर्व लेख तुमच्यासाठी !
तुम्हा तो सुखकर हो शंकर !

१. नाट्यसंमेलनाचा श्रीगणेशा
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=72869:2...

२. नाटककार आचार्य अत्रे आणि बहुरूपी पु.ल. देशपांडे
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=76860:2...

३.मास्टर दिनानाथ मंगेशकर असामान्य कलावंत
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=64314:2...

४. नाटककार पु. भा. भावे
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=60756:2...

५. मराठी नाटकाचा 'संक्रमणकाळ'
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67612:2...

६. नाट्यसम्राट वि.वा.शिरवाडकर
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=57352:2...

७. स्मरण राम गणेशांचे
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=49774:2...

८. शिवसंभव आणि नाटककार वासुदेवशास्त्री खरे
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=48962:2...

९. फिरता रंगमंच
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=45153:2...

१०. नाट्यसृष्टीतील तुकाराम
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51520:2...

११. मराठी नाट्यसृष्टीतले गंधर्वयुग
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=803...

१२. एक अज्ञात उपेक्षित नाट्यधर्मी : रंगसारंग बलवंत भास्कर मराठे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=380...

मधल्या २-३ महिन्यात प्रसिद्ध झालेले लेख देण्यास मला जमले नाही. या काळात लिहिलेले लेख या लेखमालिकेत जमा करत आहे.
ह्या लेखांमधून मला स्वतःला नाटकाच्या विविध अंगांची आणि अनेक रंगकर्मींची माहिती नव्यानी मिळाली. त्याहून जास्त समाधानाची गोष्ट म्हणजे या वयात बाबांकडून त्यांच्या आवडत्या विषयावर लेखन होतय. दर दोन आठवड्याने लेख लिहिताना विषयाच्या निवड, त्या अनुशंगानं 'भरत'च्या वाचनालयातून पुस्तकं आणणं, काही जुने संदर्भ खात्री करून घेण्यासाठी या क्षेत्रातल्या मित्रमंडळींशी चर्चा करणं... थोडक्यात लेख मनातून कागदावर उतरेपर्यंतच्या प्रत्येक पायरीवरची धुंदी, अस्वस्थता, किक ते अनुभवत आहेत... Happy
ह्या मालिकेतले हे अजून काही लेख....

१३. 'संयुक्त मानापमान' आणि 'आंधळ्याची शाळा'
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=842...

१४. मराठी नाट्यसृष्टीतील गुरु-शिष्य परंपरा
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=879...

१५. मस्त कलंदर वसंतराव देशपांडे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=913...

१६. पुरुषोत्तम करंडक : महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतून साकारलेली नाट्यचळवळ
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=947...

१७. स्वराज्यसुंदरी आणि मराठीचा नाट्यसंसार
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=978...

१८. गणेशोत्सवातील मेळे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=101...

१९. गिरणगावातली नाटके
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=104...

२०. रसिकांचा राजा - नाटककार न.चिं.केळकर
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=107...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गॉश्श्श...... या सार्‍या लिंक्स तर या क्षेत्रातील अलिबाबाच्या गुहाच आहेत जणू..... कितीही घ्या, भरभरून !

आरतीताई, कृपया न विसरता आपल्या वडिलांना आमचे लाखलाख धन्यवाद कळवा. आताच "निवडक १०" मध्ये नोंदवून ठेवतो. प्रवासात केव्हाही लॅपटॉप उघडावा आणि एकेक लिंक वाचत बसावी.... असेच करणार.

प्रतीक

रार, सगळे लेख वाचले, पण समाधान नाही झाले. त्यांच्याकडे सांगण्यासारखे अजून खुप काहि आहे, असे वाटत राहिले.
वृत्तपत्रातील लेखनाला शब्द मर्यादा असते म्हणून असे झालेय का ? मग इथे सविस्तर लिहिता येईल.

गेले ३ महिने हे लेख वाचत असताना मला अनेकदा 'सांगायला खूप आहे' पण वृत्तपत्रलेखनातील column च्या मर्यादांमुळे सगळंच लिहिता येत नाहीये हे जाणवतं आहे. ही लेखमालिका डिसेंबर २०१० पर्यंत चालू राहील ज्यामधे अंदाजे २४ लेखांचा समावेश असेल. नुकत्याच बाबांशी झालेल्या बोलण्यावरून समजलं की अनेकांनी ही लेखमालिका आवडल्याचं सांगताना या विषयावर पुस्तक स्वरूपात लेखन केलंत तर वाचायला आवडेल असं आवर्जुन सांगीतलं आहे. पुस्तक करायचे असल्यास अर्थातच त्या दृष्टीने पुनर्लेखन, modifications करावी लागतील.. पाहूया कसं काय होतंय ते !
सध्या तरी दर १५ दिवसांनी नवीन लेख आला की मी इथे लिंक देत जाईन...
तुम्ही हे सगळे लेख आवर्जुन वाचताय आणि काहींना हे लिखाण आवडतंय हे काल फोनवर बाबांना सांगीतल्यावर त्यांनी तुम्हा सर्वांना धन्यवाद कळवायला सांगीतले आहेत Happy

गेले काही महिने लेख टाकणे शक्य झाले नाही.. आज जरा वेळ झाल्यावर पुढचे लेख या लेखमालिकेत जमा केले आहेत.
नाटकाविषयी माहिती वाचायला आवडत असेल, तर हे लेख तुम्हाला खूप काही नवीन माहिती सांगून जातील अशी आशा आहे Happy

अरे मी बघितलं नव्हतं हे. काही लेख लोकसत्तातच वाचले होते.
एका ठिकाणी सगळे म्हणजे सहीच..
पुस्तक काढणार असलीस तर बुकींग लिस्ट मधे माझे नाव टाकून ठेवणे.