१) साखर अर्धा वाटी
२) गव्हाचे पिठ एक वाटी
३) पाणी - ४ वाट्या
४) तूप - २ चमचे
५) वेलची - एक
अन्य - धारदार सराटा, खोलगट पातेले, पळी छोटीवाली
१) साखर, पिठ आणि वेलची एकत्र बिगरपाण्यानीच आधी एकजीव करायची.
२) पिठामधे खळ करुन त्यात एक एक वाटी पाणी सोडायचे आणि पिठ फेटायचे.
३) पिठ अर्धा तास तसेच ओले ठेवायचे आणि डोस्याच्या पिठा इतपत पातळ झाले का ते न्याहाळायचे. घट्ट पिठ झाले असेल तर आणखी पाणी ओतायचे.
४) तव्याला समांतर तूप पसरवायचे फक्त आयते चिकटायला नकोत म्हणून.
५) तवा तापला की वाटी अथवा पळीने पातळ पिठ तव्यावर ओतायचे. गोलसर आकार आपोआप येतो. त्याला हात लावायचा नाही. आपोआप जसे पडेल तसेच राहू द्यायचे.
६) आच खूप जास्त नाही ना याची खात्री बाळगून घ्यायची. जेणेकरुन आयते जळणार नाहीत.
७) सराट्याची धारदार बाजू तूपात बुडवायची. आयत्याला छिंद्र पडायला लागले की आयते इकडून तिकडे उलटायचे. लगेच ३० सेकंदानी ताटामधे ठेवायचे.
साखर विरळायला हवी.
तूप जळायला नको.
पाणी फार गार नको.
भरड साखर उत्तम.
वेलची नंतर काढली तरी चालते. फक्त स्वाद उतरायला हवा.
बी, यात मी साखरेऐवजी गुळ
बी, यात मी साखरेऐवजी गुळ घालते. मस्त खमंग चव येते. ट्राय करुन बघ.
सातारा भागात याला गुलगुले
सातारा भागात याला गुलगुले म्हणतात साखरेपेक्षा गुळाचे छान लागतात
बी आप बी
बी
आप बी
मी पण गुळ घालुनच करते खुप
मी पण गुळ घालुनच करते खुप छान लागतात.
आमच्याकडे सगळ्यांना खुप आवडते.