Submitted by सीमा on 15 May, 2010 - 22:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
३२ OZ चा कुलव्हिप चा डबा (*)
१४ oz कंडेन्स मिल्क
कंडेन्स मिल्क इतकाच आंब्याचा पल्प/रस
क्रमवार पाककृती:
तिनही एकत्र करुन बीट करुन घ्यावे.
एका काचेचा भांड्यात साधारण ५/६ तास फ्रीझर मध्येसेट करायला ठेवावे. आईसक्रीम तयार.
हे थोडेसे जास्त गोड आइसक्रीम होते. त्यामुळ वरील सर्व प्रमाण तुमच्या चवीनुसार अॅडजस्ट करुन घ्या.
* जर कुल व्हिप नसेल तर फेटलेले क्रीम घेता येईल.
वाढणी/प्रमाण:
खाल तितके
अधिक टिपा:
याच मेथड ने स्ट्रॉबेरी आईअसक्रीम पण करता येते.
माहितीचा स्रोत:
Woman's Day मॅगझिन
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मला अगदी छान जमेल असं वाटतय!
मला अगदी छान जमेल असं वाटतय!
फोटो पाहून तोंपासु! इतके
फोटो पाहून तोंपासु!
इतके खल्लास दिसतेय ना आईसक्रीम की मी करणारचे १-२ दिवसात!
कसलं मस्त दिसतय ग सीमा!!!!
कसलं मस्त दिसतय ग सीमा!!!!
लई छ्याक फोटु. रेसिपी सोप्पी
लई छ्याक फोटु.
रेसिपी सोप्पी आहे एकदम.
सीमा, मस्तच लागतं अस
सीमा, मस्तच लागतं अस आईसक्रीम, सगळ्यांना प्रचंड आवडत, आणि करायला पण खूप सोपं
मी त्यात आंब्याच्या बारीक फोडी करून घालते, जेव्हा मिळत असतील तेव्हा.
छानच आहे आणि दिसतयपण मस्त.
छानच आहे आणि दिसतयपण मस्त.
छान आहे आईसक्रिम. कूल व्हीप
छान आहे आईसक्रिम. कूल व्हीप वापरुन बर्याच फळांची आईसक्रीम्स करता येतात.
या आईसक्रीमवर पॅशन फृट पल्प किंवा पपईचे तूकडे टाकले, तर गोडवा कमी होईल, व चवीलाही छान लागेल.
सीमा, अगदी हीच रेसिपी मला एका
सीमा, अगदी हीच रेसिपी मला एका मैत्रिणीने सांगितली होती. छान होतं हे आईस-क्रीम.
तू टाकलेला फोटो जबरी आहे
वॉव.... एकदम टेम्पटिंग
वॉव.... एकदम टेम्पटिंग
आईसक्रीम सुंदर दिसतय अगदी
आईसक्रीम सुंदर दिसतय अगदी सीमा.
भारतात राहणार्या मैत्रिणींनो- इथे हे कुल व्हीप मिळतं का?
रैना, कूल व्हिप मी पुण्यात
रैना, कूल व्हिप मी पुण्यात होते तेव्हा तरी पाहिलं नव्हतं. कुठल्याही प्रकारचं मॉक क्रीम मिळत असेल तर ते चालेल. नाहीतर सरळ अमूलचं व्हिपिंग क्रीम येतं त्यात थोडी साखर घालून घट्ट होईपर्यंत फेटून ते वापरता येईल.
मस्तय गं.. या वीकेंडला करते.
मस्तय गं.. या वीकेंडला करते.
अगो- थँन्क्स गं. कुल व्हीप
अगो- थँन्क्स गं. कुल व्हीप म्हणजे काय? फेटलेली घट्ट साय का? मग घरची साय चालेल ना?
अमूलचं व्हिपिंग क्रीम येतं
अमूलचं व्हिपिंग क्रीम येतं त्यात थोडी साखर घालून घट्ट होईपर्यंत फेटून ते वापरता येईल<<<<
मला वाटतं साखर नाही घालावी लागणार .स्वीटन्ड कन्डेन्स्ड मिल्क घालणार ना? आणी भारतात तर छान हापूसचाच ताजा रस घालून करता येईल्.साखरेची गरज पडणार नाही.जोडीला थोडे आंब्याचे क्यूब्स करून घालता येतील आणी लागतील ही छान. शो मी द करी वाल्या बायांनी ह्याचाच व्हिडिओ टाकला आहे. छान होतं हे आईसक्रीम.
हे सोप्पं आहे की करायला! आणि
हे सोप्पं आहे की करायला! आणि जबरी फोटो!
तोंपासु फोटुही मस्त.
तोंपासु फोटुही मस्त.
रेसिपी आणी फोटो मस्तच. अमुल
रेसिपी आणी फोटो मस्तच. अमुल क्रीम आणी कन्डेन्स्ड मिल्क चे प्रमाण कोणी सांगा ना... पुण्यात आहे मी...
क्लास !!! मलाही अमुल क्रिम
क्लास !!! मलाही अमुल क्रिम आणि कंडेन्स्ड मिल्क चं प्रमाण समजलं तर बर होइल. अत्ताच करुन बघावस वाटतय!!
तोंपासु मलाही मुंबईत मिळणारे
तोंपासु
मलाही मुंबईत मिळणारे पर्याय (त्याच्या कप्/वाटीच्या मापात) कळले तर करुन बघता येईल (लोड शेडींगचे अडथळे पार करुन सेट झालं तर फोटो टाकणेबल होईलस वाटतय :P)
प्लीज कोणीतरी सांगा ना, वाटी
प्लीज कोणीतरी सांगा ना, वाटी च्या मापातले प्रमाण...
साधारण एक कप क्रीम (८ oz =
साधारण एक कप क्रीम (८ oz = २४० ml) पाव लिटरच्या आसपास आणी कन्डेन्स् मिल्कचा एक डबा हे प्रमाण पुरेल.
कंडेन्स मिल्क पेक्षा थोडीशी
कंडेन्स मिल्क पेक्षा थोडीशी जास्त क्रीम घेवुन पहा.कारण क्रिम फेटल्यावर साधारण ती दुप्पट झाली कि मग वापरायला हवी. क्रीम मध्ये साखर घालु नका. प्लेन च फेटायची. कारण कंडेन्स मिल्क मुळ भरपुर गोड होत हे आईसक्रीम.
मी क्रीम वापरुन अजुन करुन पाहिल नाही. त्यामुळ कस होईल माहित नाही. पण आंबा ,कंडेन्स मिल्क, क्रिम एकत्र केल्यावर जे काही होईल ते चांगलच होइल.
प्रज्ञा Thank You.
प्रज्ञा Thank You.
वॉव, कसल सही दिसतय सीमा, मस्त
वॉव, कसल सही दिसतय सीमा, मस्त रेसिपी. मी पण करुन बघेन.
काल मी केलं होतं, अमेझिंग
काल मी केलं होतं, अमेझिंग झालं होतं असं खाणारा प्रत्येकजण म्हणत होता इथे दिलेलं प्रमाण ३/४ लोकांना पुरेल. मी जवळपास सव्वादोन पट प्रमाणात केलं होतं हेवी क्रिम वापरले आणि ते ९ जणाना व्यवस्थित पुरलं. मला पुरेसा ( ५/६ तास) वेळ नव्हता, मग मी फ्रिझर चे सेटींग मॅक्स कूल वर ठेवले होते जवळपास ४ तास. मधला काही भाग पुरेसा सेट झाला नव्हता. पण तरिही त्याने काहीही बिघडले नाही.
खूप धन्यवाद !
हे बिट कश्याने करायच? नुसतच
हे बिट कश्याने करायच? नुसतच फोर्कने एकत्र करुन घ्यायच की मिक्सर मधे?
सीमा काय भारी फोटो!! करावेच
सीमा काय भारी फोटो!! करावेच लागणार