कॉफी कप केक्स विथ मोका आयसिंग

Submitted by लाजो on 13 May, 2010 - 21:32
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कप केक्स (मफिन्स):

१/२ कप कनोला/सनफ्लावर तेल
३/४ कप बारीक साखर
२ अंडी
१ कप दुध
२ + १/२ कप सेल्फ रेसिंग फ्लार
१ टी स्पून इंस्टंट कॉफी ग्रॅन्युल्स (नेसकॅफे/ब्रु वगैरे)

मोका क्रिम:

१/२ कप क्रिम चीज (सॉफ्ट)
२ टे. स्पून सॉफ्ट बटर
२ टी स्पून दुध
१ टी स्पून कोको ( किंवा १+१/२ टी स्पून ड्रिंकिंग चॉकलेट)
१/२ टी स्पून इंस्टंट कॉफी ग्रॅन्युल्स (नेसकॅफे/ब्रु वगैरे)
१ टे स्पून पिठी साखर

सजावटीसाठी: जेम्स, m & m किंवा डार्क चॉक बट्टन्स

क्रमवार पाककृती: 

पूर्वतयारी:

१. ओवन १८० से. तापमानाला तापत ठेववा.
२. मफिन पॅन्स मधे पेपर कप्स घालुन तयार ठेवावे. पेपर कप्स नसतिल तर मफिन पॅन नीट ग्रीस करुन मैदा भुरभुरवुन तयार ठेवावेत.

कप केक्स:

१. सर्वप्रथम सेल्फ रेसिंग फ्लार, साखर एकत्र बारीक चाळणीतुन एका मिक्सिंग बोल मधे चाळावे.
२. सर्व ओले जिन्नस = २ अंडी + १/२ कप तेल + १ कप दूध (यातले २ चमचे दूध काढुन ठेवावे) एकत्र करुन लाकडी चमच्याने मिक्स करावे.
३. काढुन ठेवलेल्या २ चमचे दुधात कॉफी ग्रून्युल्स नीट मिक्स करावेत आणि हे मिश्रण ओल्या मिश्रणत हलकेच मिक्स करावे.
४. आता कोरड्या मिश्रणात मधे खड्डा करुन हे ओले मिश्रण हळुहळु ओतावे. लाकडी चमच्याने नीट मिक्स करावे. मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले घोटावे.
५. हे मिश्रण तयार मफिन पॅन्स मधे घालावे व बेक करायला ठेवावे.
६. कप केक्स तयार झाले की बाहेर काढुन थंड होऊ द्यावे.

मोका क्रिम:

१. क्रिम चीज (सॉफ्ट असावे. फ्रिज मधुन एक तासभर तरी बाहेर काढुन ठेवावे) + सॉफ्ट बटर + साखर हँड मिक्सर ने एकत्र फेटावे.
२. २ टी स्पून दुधात कोको पावडर आणि कॉफी ग्रून्युल्स नीट मिक्स करुन घ्यावेत. हे मिश्रण वरच्या क्रिम मधे मिक्स करावे व परत एकदा हँड मिक्सर ने एकत्र फेटावे.
३. मिश्रण पायपिंग बॅग मधे भरावे.

डेकोरेशन:

१. पायपिंग बॅग चे नोझल कप केक्स च्या मधे खुपसुन थोडे क्रिम आत घालावे. आणि मग केकवर पसरावे.
२. आयसिंग सेट व्हायच्या आधी वरती जेम्स/m & m/ चॉक बटन्स लावावित.
३. सर्व करायच्या आधी आयसिंग पूर्ण सेट होऊ द्यावे.

हे तय्यार कप केक्स Happy

IMG_1462.JPG

वाढणी/प्रमाण: 
या मिश्रणात साधारण ८ मोठे मफिन्स होतात.
अधिक टिपा: 

१. सेल्फ रेसिंग फ्लार ऐवजी = अडिच कप प्लेन फ्लार + ३ टी स्पून बेकिंग पावडर चालेल.
२. कप केक्स्/मफिन्स हे शक्यतो थोडे डेन्स असतात त्यामुळे मिश्रण एलेक्ट्रिक मिक्सर ने मिक्स करु नये, हातानेच नीट फेटावे. मिक्सर वापरलाच तर अगदी लोएस्ट सेटिंगवर जिन्नस मिक्स होण्या इतपतच वापरावा.
३. क्रिम्/आयसिंग करायच्या आधी केक पुर्णपणे थंड होऊ द्यावेत. अन्यथा आयसिंग मेल्ट होईल.
४. वर दिलेले कप केक्स चे मिश्रण हे बेसिक मिश्रण आहे. त्यात आपल्या आवडी प्रमाणे फ्लेवर्स घालु शकता. उदा - स्ट्रॉबेरी चे तुकडे आणि इसेन्स, बेदाणे आणि मध वगैरे वगैरे.
५. आयसिंग्/क्रिम मधे सुद्धा कोको आणि कॉफी ऐवजी कुठलाही दुसरा इसेन्स वापरु शकता.

माहितीचा स्रोत: 
माझे आणि मैत्रिणीचे प्रयोग.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, मस्त यम्मी दिसताहेत केक्स! आजच्या आज करणार हे नक्की! लागणार्‍या सगळ्याच वस्तु घरात आहेत अनायासे! धन्यवाद इतकी सोपी कृती दिल्याबद्दल!

अमी

लाजो, डन!!

कसला सही झालाय केक
हुर्रेss
मस्त स्पॉंजी झाला आणि फुगला पण सॉलिड.

मला करावे लागलेले बदलः
1. सेरेफ्ला ऐवजी अडिच कप मैदा, एक टिस्पून बेकिंग पावडर आणि एक टिस्पून बेकिंग सोडा
2. दूध जवळ जवळ पावणेदोन कप घालावं लागलं.
3. ब्रू कॉफी होती त्यामुळे स्ट्रॉंग मोका फ्लेवर येण्यासाठी दोन टिस्पून

पुढच्या वेळी करताना करायला आवडतील असे बदलः
1. मैदा दोनच कप पुरेल माझ्या मते; मग दूध सव्वा ते दिड कप पुरेल.
2. पिठीसाखर एक कप भरून.
3. तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर. मला तो तेलाचा स्वाद नाही आवडला.
4. Nescafe चं छोटं वन टाईम यूज पाकिट वापरायचं. ब्रू पेक्षा तो फ्लेवर जास्त छान लागेल.
5.कॉफी इसेन्स कुठला मिळाला तर चालेल
6. अक्रोडाचे तुकडे घातले तर मस्तपैकी कॉफी वॉलनट केक होईल यम्मी

coffee cake.JPG

केकला वरून भेगा का पडल्या हे जरा सांगा कोणीतरी..

माझा पण झाला करून.. मस्त झालाय आणि चव तर अप्रतिम..मन्जूडी तुमचंच प्रमाण वापरलं बहुतेक.
आणि २ बदल केलेत. कॉफी सोबतच थोडी कोको पावडर घातली. आणि तेल थोडं कमी टाकलं. माझा केक फुगुन बसणार असं वाटतं आहे पण तरीही चव छान झालीय त्यामुळे त्यावर थोडं व्हिप्ड क्रीम/ रेडीमेड आयसिंग असं काहीतरी वापरून सुधारावा लागेल. बहुतेक बे. पा. कमी झाली माझी. कुणाला अश्या केकला सुधरवण्याचा अनुभव असेल तर नक्की लिहा.

मंजूडी, तू मफिनपात्रात केले नाहीस का? मायक्रोवेव्हमधे ठेवायचे मफिनपात्र आहे, पण त्याचे सेटिंग सांगा कुणीतरी.

रैना, मी पण इथे माबोवर वाचूनच प्रयोग करतेय. एगलेस केक इथेच (बहुतेक प्रीतिची रेसिपी) वाचून केला होता. छान झाला होता.

लाजो, केकचे वर्कशॉप घेऊनच टाक आता.
बेकिंगचे बेसिक टिप्स वगैरे असतील तर ते पण दे.

मंजुडी, केक छान झालाय की गं. आणि धन्यवाद आवर्जुन ट्राय करुन कळवल्याबद्दल Happy
भेगा पडण्याचे एक कारण ओव्हनचे जास्त टेंप्रेचर असु शकते.

नविना, तुझे पण खुप आभार. लग्गेच ट्राय करुन बघितलेस आनि सांगितलेस Happy

Pages