ऐकाSS हो ऐका
डोंबिवलीत रविवारी ९ मे रोजी एमायडिसी येथे (घरडा गार्डन) आडो भेट गटग ठरविण्यात आले आहे (काय रे हे घोर अज्ञान आडो=आऊट डोअर्स
म्हणजे मेघना)
वेळः संध्याकाळी ५ ते गार्डन बंद होऊन हाकले पर्यंत
डोंबिवली फास्ट च्या नियमाप्रमाणे हे गटग देखील एकदम फास्ट ठरल आणि तसच पोस्टत आहे.
ज्यांना येण्याच जमणार आहे त्यांनी त्वरित नाव नोंदवुन उपस्थिती नोंदवावी.
खायाचा मेन्यु: ठरला नाही. जे आणाल खाणेबल ते खाऊ
ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी मला संपर्कातून नंबर धाडल्यास डोंबिवली आपली आभारी राहिल.
कृपया ही रिक्षा जमेल तिथे म्हणजे वाट फुटेल तिथे शनिवार पर्यंत फिरणार आहे, तिला कोणी अडवु, रडवु, पाडु, मारु झोडु नये. टायर पंक्चर करु नये हि विनंती आहे टोमणा नाही (कृपया रिक्षा नको वाले नी काय बिघडतय वाले दोघांनीही माझ्या फाको वरुन वाद घालुन रिक्षाचा मुळ हेतु गटग आहे तो बाजुला पाडु नये ही खरोखरीची विनंती
)
(मोबाईल वरुन केलेल्या तीन चार कॉलातच बीलाचे आकडे वाढु लागल्याने/हाफिसातुन फुकटचा फोनाची सोय फारसी वापरता येत नसल्याने ही रिक्षा भाड्याने घेतली आहे लोक्स :P)
पुढचं ग ट ग कधी?
पुढचं ग ट ग कधी?
Pages