डोंबिवली गटग ९ मे २०१०

Submitted by कविन on 6 May, 2010 - 06:14

ऐकाSS हो ऐका

डोंबिवलीत रविवारी ९ मे रोजी एमायडिसी येथे (घरडा गार्डन) आडो भेट गटग ठरविण्यात आले आहे (काय रे हे घोर अज्ञान Wink आडो=ऊट डोअर्स Proud म्हणजे मेघना)

वेळः संध्याकाळी ५ ते गार्डन बंद होऊन हाकले पर्यंत Proud

डोंबिवली फास्ट च्या नियमाप्रमाणे हे गटग देखील एकदम फास्ट ठरल आणि तसच पोस्टत आहे.

ज्यांना येण्याच जमणार आहे त्यांनी त्वरित नाव नोंदवुन उपस्थिती नोंदवावी.

खायाचा मेन्यु: ठरला नाही. जे आणाल खाणेबल ते खाऊ Proud

ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी मला संपर्कातून नंबर धाडल्यास डोंबिवली आपली आभारी राहिल. Proud

कृपया ही रिक्षा जमेल तिथे म्हणजे वाट फुटेल तिथे शनिवार पर्यंत फिरणार आहे, तिला कोणी अडवु, रडवु, पाडु, मारु झोडु नये. टायर पंक्चर करु नये हि विनंती आहे टोमणा नाही Proud (कृपया रिक्षा नको वाले नी काय बिघडतय वाले दोघांनीही माझ्या फाको वरुन वाद घालुन रिक्षाचा मुळ हेतु गटग आहे तो बाजुला पाडु नये ही खरोखरीची विनंती Happy )

(मोबाईल वरुन केलेल्या तीन चार कॉलातच बीलाचे आकडे वाढु लागल्याने/हाफिसातुन फुकटचा फोनाची सोय फारसी वापरता येत नसल्याने ही रिक्षा भाड्याने घेतली आहे लोक्स :P)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग व्हर्चुअली येणार ? ओह्ह माहितच नव्हतं.

अगं तू एकटी आलीस तर २ अन् दुकटी आलीस तर ३ Proud जोक्स अपार्ट किती लिहू फायनली

खादाडीची सोय - मंजूडी ह्यांच्या पाक कौशल्याचे नमुने Lol Lol

अरे डुआय, पन्ना आणि पराग कसे येणार बुवा? उडत की काय?

प्लीज जरा लिस्ट अपडेट करा न सगळ्यांनी. मी येताना तहानलाडू घेऊन येते फक्त माणसं किती येणार हे कळलं तर बरं होईल. Happy

रैना बोलो बोलो.

सगळ्यांच्या माना सतत ३८० कोनात फिरणार

>> च्यामारि इथे ऐकावे ते कचराच ! ३६० अंश असतात जगात कुठेही .जास्तीचे वीस अंश ढगातून आले का परग्रहावरून ? Angry
ही येडपट गतगची प्रथा कधी बंद होनार ?एक तासाच्या भेटीपोटी एक हजार पोस्ती सहन कराव्या लागतात आम्हाला.शिवाय त्या एक तासात हजर असलेल्यांच्या आन नसलेल्यांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात, ते निराळे. ह्यावर कायमची बंदी गहालून आन सर्वरची स्पेस वाचवून अ‍ॅडमिन त्यान्चे हे अवघड जागचे दुखणे कधी बन्द करणार ? Uhoh

मेट्रो जंक्शन लांब पडेल डोंबिवली बाहेरुन ट्रेनने येणार्‍यांसाठी. परत जाताना रिक्षा पण मुश्किलीने मिळतात अस ऐकुन आहे. सध्या तरी घरडा सर्कल गार्डन योग्य वाटतय.
कन्फर्म असलेली मंडळी

आडो - १
कविता - ३
कुलदिप - १
अश्विनी के - १
वैभवी - १
निंबुडा- ३
मंजुडी - २
शँकी - १

वेळ ५ वाजता नक्की नां? मेट्रो जंक्शन सगळ्यांनाच लांब पडेल, त्यापेक्षा हा घरडा गार्डनचा स्पॉटच बरा. तिथून परत जाताना स्टेशनला जायला बसही मिळेल.

हो आडो ५-५.३० घरडा सर्कल. मी घरातुन निघाले की कॉल करते तुला नी डुआयला. बाकिच्या कन्फर्म मंडळींना उद्या कॉलते Happy

आडो, अग मी पण आहे शेतात पण ऑफिसातुन बघायला मिळत नाही नेहमी मग विकांताला शेती ते ही लोडशेडींग वर अवलंबुन Proud

वैभव (मोदक), हे तुच पोस्टतोयस की निंबुडा तुझा आयडी वापरुन पोस्ट करतेय Wink Proud

काय रे वृ वृ करताय? Proud वृ नकोत आता, लोक्स कंटाळतात वृ वाचुन Proud जे काय आहे ते इथेच लिहा

टांगारु मंडळी

मंजुडी - लेक आजारी
अश्वी - पाहुणे येती घरा
बाकी काही मंडळी शनिवारी दुसर अती महत्वाच Wink गटग अटेंड करुन दमली होती म्हणून टांगारु Proud

हजर मंडळी

1) प्रणव कवळे : हा बिचारा ऐरोलीतुन अगदी वेळेवर पोहोचला. बाकीच्यांना मी "मी निघाले की कॉलते मगच निघा असा प्रेमळ सल्ला दिलेला होता :P" ह्याला पहिला आला म्हणुन शिक्षा केली नी आयस्क्रिमची पार्टी द्यायला लावली Proud

2) आडो : उत्सवमुर्ती आमच्यासाठी समोसे, वडे (थंड म्हणजे खाईपर्यंत थंडच झालेले) घेऊन आलेली.

3) मी, विश्वेश नी सानु : स्प्राईट घेऊन गेलेलो (ते मात्र गरम झालेल प्यायची वेळ येई पर्यंत वडे नी स्प्राईट नी काँपेन्सेट केल एक गरम तर एक थंड :P)

४) निंबुडा, श्री निंबुडा (जो ह्या गटग नंतर जबरदस्ती माबोकर झाला :P), न त्यांच पिल्लु पण आले. त्या पिल्लु मुळे सानु खुष झालेली

५) डुआय (कुलदिप) जो ग्लासेस (सॉफ्ट ड्रिंक साठी Wink ) नी बाकरवडी (चितळेफेम) घेऊन आला. येता येता फडके रोडवर फेरी मारुनच आला हा पठ्या Proud

६) वैभवी : ह्या आयडीची कमाल आहे, ही कळव्याहुन आली ते ही आम्ही निघायच्या १५ मिनिट आधी. त्यावरुन आम्ही तिला दाल मे कुछ काला है म्हणुन घेतल नी लवकरच आम्हाला नवीन पार्टी मिळणार ह्याची लक्षण दिसली Proud

थोड्या ट्रेक वरच्या गप्पा (आडो ट्रेकर असल्यामुळे), बर्‍याचश्या माबोवर गप्पा Proud झाल्या नी छोटेखानी गटग संपवुन आम्ही मार्गस्थ झालो Proud

शँकी पण टांगारू?? म्हणजे शनिवारच्या गटगला हजर होता की काय Uhoh

बाकी विश्वेश आणि कुलदिप्याने शनिवारच्या गटगला हजर राहून रविवारी पण हजेरी लावली हे विशेषच... Wink

हे विशेषच... हाहा अगं नुस्तीच हजेरी लावायची होती ना Proud

कवे, मी ते ग्लासेस घ्यायला म्हणून फडके रोडवर गेलो होतो. वाटेत चितळे दिसले Wink

मंजू, रैना, केश्विनी वगैरे नॉन डोंबिवलीकरांनी टांग मारली ना.. !! हे बाहेरचे लोक असलेच असतात.. Wink

बरं झालं डोंबिवलीत गटग झालं... बाफ वरची वर्दळ वाढवून ठाणे ग्रुप पासून स्वातंत्र्य मिळवण्याचा ठराव मांडलात की नाही ? Proud

ते ठराव वगैरे नाटक नाय पायजे डायरेक कृती काय ? Proud

नॉन डोंबिवलीकरांनी डोंबतल्या पहिल्यावहिल्या गटगला उपस्थिती लावली होती ! (ह्यावेळी नसेल जमलं)

माफ करा. जरा उशीरच झाला. पण गटग च्या वेळी त्या बालोद्यानामध्ये एक प्रकाशचित्र काढलं होतं, ते राहीलंच टाकायचं!!! Uhoh

LGIM0468.jpg

Pages