डोंबिवली गटग ९ मे २०१०

Submitted by कविन on 6 May, 2010 - 06:14

ऐकाSS हो ऐका

डोंबिवलीत रविवारी ९ मे रोजी एमायडिसी येथे (घरडा गार्डन) आडो भेट गटग ठरविण्यात आले आहे (काय रे हे घोर अज्ञान Wink आडो=ऊट डोअर्स Proud म्हणजे मेघना)

वेळः संध्याकाळी ५ ते गार्डन बंद होऊन हाकले पर्यंत Proud

डोंबिवली फास्ट च्या नियमाप्रमाणे हे गटग देखील एकदम फास्ट ठरल आणि तसच पोस्टत आहे.

ज्यांना येण्याच जमणार आहे त्यांनी त्वरित नाव नोंदवुन उपस्थिती नोंदवावी.

खायाचा मेन्यु: ठरला नाही. जे आणाल खाणेबल ते खाऊ Proud

ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी मला संपर्कातून नंबर धाडल्यास डोंबिवली आपली आभारी राहिल. Proud

कृपया ही रिक्षा जमेल तिथे म्हणजे वाट फुटेल तिथे शनिवार पर्यंत फिरणार आहे, तिला कोणी अडवु, रडवु, पाडु, मारु झोडु नये. टायर पंक्चर करु नये हि विनंती आहे टोमणा नाही Proud (कृपया रिक्षा नको वाले नी काय बिघडतय वाले दोघांनीही माझ्या फाको वरुन वाद घालुन रिक्षाचा मुळ हेतु गटग आहे तो बाजुला पाडु नये ही खरोखरीची विनंती Happy )

(मोबाईल वरुन केलेल्या तीन चार कॉलातच बीलाचे आकडे वाढु लागल्याने/हाफिसातुन फुकटचा फोनाची सोय फारसी वापरता येत नसल्याने ही रिक्षा भाड्याने घेतली आहे लोक्स :P)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राम भरत भेट = रामाची भरताबरोबर भेट

तस आडो भेट= आडोची इतर माबोकरांबरोबर ओळख भेट

ओडोमास घेऊन जा बरोबर, नाहीतर डास फाडून खातील Wink
(आडोच्या आयडीशी मिळतजुळतं असलं तरी तिच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही तेव्हा तिने मनाला लावून घेऊ नये.) Proud

Happy आडो भेट= आडोची इतर माबोकरांबरोबर ओळख भेट Happy
अस्सं आहे होय............
तू डोंबल्यात रहातेस?
नाही! kyn

कवे, सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही यायचंय का गं?>>>>अश्वे मी इमॅजिनल "आडो बिचारी गार्डनच्या गेटवर ह.कु. आणि फुलं घेऊन स्वगताला उभी आहे सकाळपासुन संध्याकाळ पर्यंत तिथे Proud वेळ अ‍ॅड केलेय वरच्या गटगच्या रिक्षा फलकात Proud

मी चालले माहेरी!!!

रागाने नव्हे, तर सहकुटुंब २ आठवडे.. त्यामुळे मी नाहीये. Sad

आडो, वेस्टर्न लायनीत नाय का भेटणार कुणाला? Uhoh

बहुवचन Happy
छोटीचं काही माहीत नाही पण मोठीला घेऊन येतेय. Wink

केक आणेन, जमला तर होममेड नाहीतर विकतचा. त्यामुळे बाकीच्यांनी रीपीट टेलिकास्ट करू नये. Happy

मंजे कोणा ठाणेकराबरोबर माझ्यासाठी पाठवून दे! मी मिसणार! काही दिवसापूर्वी ठाण्यात लेडीज गटग झालं म्हणे.. ते पण मिसलं! भ्यां... Sad

काही दिवसांपुर्वी लेडिज गटग कधी झालं? >>> अगं बातमी चुकीची फुटलेली दिसतेय Proud

बादवे, कविताच्या आवाहनात ६ दा दात काढणे, १दा डोळा मारणे आणि १ दा स्मित आहे. तर प्रतिक्रियांमधे सगळ्याच भावना समाविष्ट आहेत. हे आतापर्यंतचे टॅटिटिक smile_aagaau_1_.gif

जाजु लेडिस स्पे गटग झाल नाही अजुन. तुला फोनुन कळवते मी. ते पडद्याआडच गटग आहे म्हणुन कुठेच टाकल नाही आहे त्याविषयी Wink Proud

जल्ला नुसत्याच पोस्टी पडतायत
येणारे आत्ता पर्यंत झालेत फकस्त १० फुल २ हाफ Proud

आडो= उत्सवमुर्ती
मी, विश्वेश, सानिका
मंजुडी, नीरजा
अश्विनी
कुलदिप
अमर कुलकर्णी
निंबुडा, श्री नुंबुडा नी ज्यु.निंबुडा

Pages