मंडळी, आज फार दिवसांपासून बोचत असलेल्या एका प्रश्नावर गप्पा मारूया म्हणतेय मी.
भेटवस्तू द्यायला नि घ्यायला लागल्यापासून मला तो एक नुसता त्रासच वाटत आलाय. यात इथून जाताना भारतात नेण्याच्याच वस्तू आहेत असं नाही तर एरवीही सणासमारंभांना देण्याचे आहेर नि वस्तू आल्या.
होतं काय की आपण खूप हौशीने, आवर्जून एखादी साडी... अगदी भारी द्यावी. नि आवडली का विचारल्यावर 'हं... आवडली काय नि नाही...एखादेवेळी तू दिलेली नेसायची झालं. काय फरक पडतो?' असं कमालीच्या खवचटपणाने दिलेलं उत्तर ऐकलं की अस्सा वैताग येतो न. नि या प्रकारच्या लोकांनी आपल्याला दिलीली चक्क प्लॅस्टिक जरीची साडीही आपण आनंदाने नेसावी असा आग्रह चालवला की काय म्हणावं तेच समजत नाही. त्यातून द्यायची ऐपत नसेल तर गोष्ट वेगळी, पण घरात अगदी भारी भारी साड्या नेसणार्या लोकांनी आपल्याया देतानाच जर मुद्दाम दिल्यासारखी अशी स्वस्त साडी निवडली तर वाईट वाटतंच. तीच साडी त्यांच्याकडच्या समारंभात पॅक करून परत करायचा अनिवार मोह होतो.
यावर नवर्याचं म्हणणं असं की आपण आपल्यापरीनं नेहमीच चांगलं द्यावं, लोकांनी द्यावं अशी अपेक्षा करू नये. अशी अपेक्षा मग ते लोक तरी का करतात बरं? तुम्ही म्हणाल तुला काही त्या बाईंनी मागितली होती का भारी साडी?
पण मग एकदा नेहमीच्या भारी जरीच्या नि प्युअर सिल्क च्या साडी ऐवजी जरा वेगळी साडी दिल्यावर याच लोकांनी 'केवढ्याची आहे? एवढी किंमत वाटत नाही' वगैरे तारे तोडलेले.. त्याचं काय?
कित्येकदा लोक आलेली वस्तूच सरकवतात. तेही ठीक आहे. पण त्याचं लेबल काढायचा त्रासही घेऊ नये का? या साध्या साध्या गोष्टी अगदी समजावून सांगाव्या लागाव्यात का?
समारंभांचंही असंच. माझ्या मुलांना त्यांची वाढदिवस केलेले खूप आवडतात म्हणून आम्ही करतो दरवर्षी. तर त्यावर एका मैत्रिणीचं म्हणणं की ' आम्ही आमच्या मुलांना सगळंच घेऊन देतो नं, त्यामुळी असं कोणी भेटवस्तू द्यायची त्यांना गरजच नसते. म्हणून नाही करत आम्ही वाढदिवस.'
म्हणजे????????? आम्ही काय प्रेझेंट्स मिळावे म्हणून करतो की काय वाढदिवस?
होय, हे करते हल्ली मी..
होय, हे करते हल्ली मी..
भरत, बरोबर आहे. इथे wedding
भरत, बरोबर आहे. इथे wedding registry किन्वा baby registry असते. त्यात लागणार्या वस्तूंची यादी असते. ज्याला जसं परवडतं किंवा जसे संबंध असतात तसे ते ती वस्तू त्या लिस्ट वरून उचलतात. ह्यामुळे डुप्लिकेट्चा प्रश्ण येत नाही. आधी इथे कॅश देण्याची प्रथा नव्हती पण आता तिही येत चालली आहे.
एका लग्नात मुलांनी आहेर घेतला नाही अगदी आजीआजोबांकडूनपण नाही त्यामुळे इतर कोणी हातात कोंबायचा प्रश्णच नव्हता. ह्या मुलांची फेव्हरीट चॅरिटी होती - एक लहान मुलांचा आश्रम - आईवडिलांनी वगैरे त्या लग्नाच्या निमित्ताने त्या आश्रमाला पैसे दिले. संसाराची सुरुवात खरच चांगली झाली.
मुलांच्या वाढदिवसालापण गिफ्ट आणू नका असं सांगितल आणि मुलाला त्याच्या वाढदिवसानिमित्त चॅरिटिला काही देऊ या म्हटल तर त्यांनाही लहानपनापासून द्यायची सवय लागते. एखाद्या लहान मुलाने दिलेली गिफ्ट दिलेल्या लहान मुलाला आवडली नाही तर देणार्या लहान मुलाचा पडलेला चेहरा पाहिलेला आहे. आईने दिलेली गिफ्ट मुलं देतात. मुलं खूप सेंसिटिव्ह असतात.
हल्ली काही इंडियन लग्न पत्रिकेत No box gift लिहितात. म्हणजे गिफ्ट द्या आणि तेपण पैसे द्या. अतिशय चीड आणणारी गोष्ट.
आहेर आणू नये हे खरच सर्वात चांगल. जेव्हां ते लिहिलेलं असतं तेंव्हा बोलवणार्याच्या शब्दाला मी मान देते.
हिरकणी, पण वस्तु बदलायला
हिरकणी, पण वस्तु बदलायला दुकानात गेल्यानंतर किंमत समजतेच की !
मी गिफ्टकार्ड देणे पसंत करते.
मी गिफ्टकार्ड देणे पसंत करते. अगदी गिफ्ट घ्यावीच लागली तर बदलता येण्याच्या सोयीचे गिफ्ट सर्टिफिकेट जोडून देते.
सुमॉ, मनाला लाऊन न देता सोडून द्यावे. जवळची व्यक्ती असेल तर हक्काने सांगावे, मला ही गिफ्ट आवडली नाही म्हणून.
shugol, हो, ते खरेच. पण वस्तु
shugol, हो, ते खरेच. पण वस्तु बदलायला दुकानात गेले तर समजते.
आणि तसेही किमत बघायचीच ठरवली तर लोक वस्तुची अंदाजे किंमत amazon वर घर्बसल्या सुदधा बघु शकतात. afterall , ज्याचा त्याचा choice!
नानबा छान पोस्ट. अमेरिकेत
नानबा छान पोस्ट.
अमेरिकेत असाल तर, चेक आउट करतानाgift reciept मागायची आणी गिफ्टलाच बरोबर टेप करुन द्यायची. त्यावर किंमत लिहिलेलि नसते. पण वस्तु बदलता येते. वस्तू घरी already असेल / आवडली नाही तर ते लोक बदलून घेउ शकतात.>>मी अगदी हे आठवणीने करते. खरचं चांगलं पडतं. मागे एका जवळच्या मैत्रिणीच्या बाबतीत असंच झालं, तिला दोन एकाच प्रकारची खेळणी आली, तिने ते खेळणं बदलुन आणलं आणि फोन करुन सांगितलं पण. ती वस्तु वाया जात नाही हे खुप महत्त्वाचय. नवर्याला मित्राने महागाचा शर्ट दिलं, पण रंग आवडला नाही. मग काय बदलुन आणलं, गिफ्ट रिसीट सोबत होती.
नानबा छान पोस्ट.
नानबा छान पोस्ट. अनुमोदन.
नीधप- अनुमोदन.
हा बाफ वाचुन खरंच स्तिमीत झाले.
लग्नात कोणाकोणाकडून काय काय
लग्नात कोणाकोणाकडून काय काय आले याची यादी केली जाते.(लग्नात अहेर देताना पण अशीच यादी केली जाते, की मनात असते?). मग लग्नाचे आमंत्रण आले की आपल्याला किती आले होते, ते पाहून तसे परत करायचे!
कधी कधी एक कुटूंबात १ च अपत्य असेल तर अहेर मिळणार एकदा पण ज्यांच्याकडे २-३-४ मुले आहेत त्यांना तितके वेळा मिळणार.
काही जण लग्नात सहकुटुंब सहपरिवार जेवायला येतात .तर काही अगदी एकेकटे धावत येऊन पळत जातात. याचाही हिशोब यजमानांना अहेराचे पाकिट उघडताना आठवत असतो.
या सगळ्यावर उपाय म्हणजे अहेर, गिफ्ट,पुष्पगुच्छ यावर सरसकट बंदी आणणे. प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. लग्न, वाढदिवस हे आनंद वाटण्याचे ,शुभेच्छा ,आशीर्वाद देण्याचे प्रसंग्...त्यात व्यवहार का आणावा?
पण आपण उलट लहान मुलांनाच बर्थडे गिफ्ट्स आणि रिटर्न गिफ्ट्स अशा व्यवहाराची शिकवण देतोय. जर आपण पाऊल उचलले तर पुढल्या पिढ्यांची या मनस्तापातून सुटका होईल.
ज्यांना शक्य असेल त्यांनी यनिमित्ताने एखाद्या चॅरिटीला मदत केली तर?
घेण्यापेक्षा देण्यातला आनंद नक्कीच जास्त असतो.
विंदा म्हणतात तस 'देणार्याचे हात घ्यावे'
काही लोकांची भेटवस्तू द्यायची
काही लोकांची भेटवस्तू द्यायची वेळ आली की मनोवृत्ती कोती असते. [तीच मनोवृत्ती भेटवस्तू घेताना वेगळी असते हे लक्षात घ्यावे!] नात्यात, ओळखीत अशी काही कुटुंबे हमखास भेटतात आणि कधी न कधी आपल्यालाही त्यांचा हा ''हिसका'' बसतो. वापरलेली/ स्वस्तातली किंवा त्यांना नको म्हणून पुढे केलेली भेटवस्तू द्यायला त्यांना कसलाही संकोच वाटत नाही. तेव्हा आपण मनाला समजावणे, त्यांचे असे वागणे पचवणे जरा अवघड जाते. पण त्यांचा तसाच पॅटर्न आहे हे लक्षात आल्यावर त्यातला मन दुखावणारा भाग किंवा संताप आणणारा भाग नष्ट होऊन त्याची जागा त्यांच्याबद्दल वाटणारी कीव घेते, की कधी ही माणसे सुधारणार? त्यांच्या वागण्याचे मग दु:ख न वाटता हसू येऊ लागते!! स्वतःचेच हसे करून घेतात असे लोक....आणि त्यांना त्याबद्दल सांगायला गेले तरी वेड घेऊन पेडगावला गेल्याचे सोंग आणतात. माझ्या ओळखीत, पाहण्यात असे लोक आहेत. आम्ही त्यांनी काहीही गिफ्ट दिली तरी त्याचे फारसे मनाला लावून घेत नाही, कारण त्यांच्याकडून त्यापेक्षा वेगळ्या वर्तणुकीची अपेक्षाच नसते. उलटपक्षी त्यांनी कधी चांगली गिफ्ट दिली तर मात्र घेरी येते आश्चर्याने! आपणच त्यांच्या अशा ''कोत्या'' वागण्याची शिकार नाही, इतरांनाही ते सहन करायला लागले आहे, ह्या विचारानेही मन जरा हलके व्हायला मदत होते!!
आणि मग ''सूड'' [की धडा?] म्हणून जरा जास्तच घसघशीत भेटवस्तू त्यांना देण्याकडे कल असतो.
खरं तर वर भरत यांनी म्हटल्याप्रमाणे तसे काहीच द्यायची/ घ्यायची गरज नसते, शुभेच्छा पुरेशा असतात. पण आधीच्या पिढीच्या आग्रहास्तव, हट्टाखातर आहेरासारख्या गोष्टी कधी कधी मनाविरुध्द पाळाव्या लागतात.
एकुणात वस्तूच्या किमतीवरून
एकुणात वस्तूच्या किमतीवरून किंवा आलेली वस्तू परत दुसर्याला देण्यावरून माणसांना मापायची जी काय चढाओढ या बीबीवर चाललीये ती वाचून खरंच विचित्र वाटलं.
मला(पक्षी कुणालाही.. उदाहरणार्थ मी) एखादी वस्तू कुणी गिफ्ट दिली. मला त्याचा काही उपयोग नाही पण वस्तू चांगली आहे. एखाद्याला उपयोग होईल असं वाटल्याने मी ती त्या व्यक्तीला गिफ्ट केली तर मी कोत्या मनोवृत्तीची, न सुधारलेली होत असेन तर होऊदेत. मला नाही चुकीचं वाटत त्यात. एखादी वस्तू धूळ खात पडण्यापेक्षा त्याचा कुणालातरी उपयोग झाला तर बरंच की.
तसंही गिफ्टवरून माणसं पारखण्याइतकं उथळ असलेल्या कुणाला काय वाटतं माझ्याबद्दल याची मला तरी पत्रास नाही.
हा बीबी वाचून मी धन्य झालो
हा बीबी वाचून मी धन्य झालो अगदी

पण मला उपयोग झाला म्हणायचा ! माझ्या जावयाला (लहान बहीणीच्या नवर्याला) लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं होतं , मग त्यालाच फोन करुन विचारलं , बजेट अमुक आहे , त्यात तुला काय घ्यायला आवडेल ? त्यानी सांगितली ती वस्तु घेतली, ते पण खुश अपुन भी खुश
मला लोकांना पुस्तकं द्यायला
मला लोकांना पुस्तकं द्यायला आवडते. जुन्या बाजारात, लायब्ररीत जर एखादे चांगले पुस्तक दिसले, तर हमखास घेतो, आणि ज्यांना आवडेल असे वाटते त्यांना देतो. जुने म्हणुन त्यांना आवडले नाही तर तो त्यांचा प्रश्न. अनेकदा अनेक डुप्लिकेट (चांगली) पुस्तके असतात. मग त्यांची यादी बनवुन लोकांना मेल करुन कुणाला काय हवे ते विचारतो.
लोकांकडे जातो तेंव्हा त्यांना काही देत नाही आणि त्यांनी काही द्यावे अशी अपेक्षा नसते.
लग्नात देणी-घेणी केली नव्हती. मुलाचा फक्त पहिला वाढदिवस - घरच्याघरी - केला होता. गेल्या १४ वर्षात केला नाही. (त्यालाही काही वाटत नाही). लग्नाच्या वाढदिवसाचेही तेच. calendar मध्ये स्वतःला बांधुन घ्यायची काही आवश्यकता नसते. स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी बायकोला प्रेझेंट म्हणुन कधीकधी देतो.
लग्नाच्या वाढदिवसाचेही तेच.
लग्नाच्या वाढदिवसाचेही तेच. calendar मध्ये स्वतःला बांधुन घ्यायची काही आवश्यकता नसते.>>>>>>
~~~DDD
मी आज पर्यंत वाढदिवस्,अॅनिव्हरसरी इत्यादी महत्वाच्या तारखा विसरण्याची ४६७३२९ कारण ऐकलेली. आज हे परत नविन .
अस्चिक , अगदी योग्य लिहिलय.
Hi, Mazya sasu bai cha 60th
Hi,
Mazya sasu bai cha 60th Birthday aahe 30th December la. me tyana kay gify deu please mala help kara. Dar varshi me tyana saree dete. ya varshi vegal kahi tari dyach aahe. Please mala suggest kara.
चांदीचा नंदादीप द्यावा.
चांदीचा नंदादीप द्यावा.
त्यांना आवड असलेली पण कधी
त्यांना आवड असलेली पण कधी घ्यायला जमलं नाही अशी वस्तू.
आपल्याला बोवा दोन्ही वेळच्या
आपल्याला बोवा दोन्ही वेळच्या भेटीत झक्कीन्नी गिफ्ट आणले होते
आपल्याला बोवा आवडली ती गिफ्टस 

)
पहिल्यावेळेस २००५ मधे चॉकलेटसचा मोठ्ठा डब्बा अन दुसर्या वेळेस (बहुधा २००९ की २०१०? ) (आधीच सान्गितल्याप्रमाणे) चक्क डॉलरची नोट अन बरिचशी अमेरिकन चिल्लर आठवणीने आणली होती!
अन मग मी ज्युनियर असल्याने परतफेडीची गिफ्ट म्हणून झक्कीन्ना मी काही देण्याचे कारण नाही अशी सोईस्कर समजुन करुन घेतली होती असे पुसटसे आठवते!
थोडक्यात काये? की जिथे जिथे मी ज्युनियर, तिथे तिथे गिफ्ट घ्यायचा माझा अधिकारच अस्तो
अन "सिनियर" म्हणून मी कुठे तडमडायला जातच नाही (तरी काही लोक बोम्बलतात की बघा कसा जिथेतिथे स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करत बस्तो!
पल्लवी, तुमच्या साबांची
पल्लवी,
तुमच्या साबांची साठीशांत करू शकता. भटजी (ब्राह्मण) बोलावून छोटेखानी पूजा करायची असते. जवळच्या नातेवाईकांना बोलावू शकता पूजेला.
गिफ्ट्स साठी ऑप्शन्सः
१) त्यांचे मुलं, नातवंड, जावई, सुना वगैरेंबरोबरचे फोटोज् फ्लॅशबॅक पद्धतीने (जुन्या आठवणींना उजाळा या हेतूने) अल्बम मध्ये संग्रहीत करून तो अल्बम भेट म्हणून देणे.
२) अखा यांची चांदीच्या नंदादीपाची आयडीया छान आहे. मला ही गुरु आणि वडीलधारे यांना अशा प्रकारच्या भेटवस्तु द्यायला आवडतात. हल्ली काही एथनिक शॉप्स मध्ये पारंपरीक दिवे (जसे की लामणदिवा, नंदादीप, समई, दीपमाळा, टांगते दिवे इ.) मिळतात (पितळी किंवा चांदी मध्ये). तसेही देऊ शकता.
अजून आठवेल तसे लिहेन
नीधप यांच्या सूचनेला एक जोड
नीधप यांच्या सूचनेला एक जोड :
त्यांना आवड असलेली पण कधी करायला जमलं नाही अशी गोष्ट करण्याची संधी.
नीधप आणि भरत ना १००% अनुमोदन,
नीधप आणि भरत ना १००% अनुमोदन, आणि या बाफवरच्या नीधपच्या सर्वच मतांना.
मवा...
अॅक्च्युली, पल्लवी यांनी
अॅक्च्युली, पल्लवी यांनी चुकीच्या बाफ वर माहिती विचारलीये असं वाट्टंय
बहुदा आशूडी ने "असा साजरा करु या आनंद" नावाचा बाफ उघडला होता ना. त्यात हा प्रश्न बरोबर दिसेल.
माझ्यासाठी तरी हा नसता ताप
माझ्यासाठी तरी हा नसता ताप नसुन एक निखळ आनंद आहे....
आपल्या लोकांसाठी शोधुन शोधुन मस्त हटके वस्तू आणणे आणि त्या पाहून त्यांच्या चेहर्यावरचा आनंद टिपणे यात खुप मोठी मौज आहे
खर म्हणजे समोरच्याला मनापासुन आवडेल अशी वस्तू निवडून आणणे ही एक वेगळी कला आहे!
मला माझ्या मुलाच्या
मला माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आलेला एक अनुभवः

आमच्या एका ओळखीच्यानी माझ्या मुलाला काहीतरी टॉय गिफ्ट केले. मी सहज टॅग पाहिला तर त्यावर "टु (त्यांच्या मुलाचे नाव) फ्रॉम (त्यांचे कोणीतरी ओळखीचे यांचे नाव)" असा टॅग होता. त्यानी "रीगिफ्ट" करताना "तो" टॅग काढुन नवीन टॅग लावायचीही तसदी घेतली नव्हती
इतके जीवावर येत असेल दुसर्याला काही द्यायला तर कशाला जावे उगाचच
खरच चांगला विषय आहे.. गिफ्ट
खरच चांगला विषय आहे..
गिफ्ट देणं घेण हा प्रकारच बंद व्हावा. व्यक्ती प्रेमाची, आवडीची असेल तर हौसेनं काही घेऊन देणं वेगळं आणि आता बोलावलच आहे, जेवणाचा कार्यक्रम आहे तर काय द्याव ? आताच मोठा खर्च झालाय घरात.. त्यात हे निमंत्रण येऊन पडलय.. ऐनवेळी काहीतरी करायलाच हव अशा भावनेने आलेल्या गिफ्टस वेगळ्या. महागड्या गिफ्टच्या पाठीमागे घेणा-याने जुलमाचा रामराम म्हणून घेतल असेल तर काय उपयोग अशा गिफ्टचा ? लग्नसमारांभाच्या सीझनमधे तर एकेका आठवड्यात चार चार निमंत्रण असतात. कधीकधी तर रविवार असेल तर मॉर्निंग, मॅटिनी आणि नाईट शोज असतात. रिस्पेशन वेगळच.
आधीच घरातले प्राधान्यक्रम ठरवताना तारांबळ उडते त्यात आकस्मिक आमंत्रण. सगळ्यांनाच हे परवडत असेल का ? या प्रत्येक समारंभासाठी बाजारात जा, वस्तू शोधा वगैरे आलच. वेळ गेलाच. लोक खास जेवणासाठी येतात असही नाही. काही तर थांबतही नाहीत. रिलेशन्स जपण्यासाठी असा दिखावा खरच गरजेचा आहे का ?
सर्वांनी ठरवल तर गिफ्ट नावाची निरूद्देश प्रथा बंद व्हायला वेळ लागणार नाही.
Pallavi 26, तुमच्या साबा ६०
Pallavi 26,
तुमच्या साबा ६० होणार. चांदीच्या वा घरातल्या अनेक वस्तू त्यांच्याकडे असतीलंच.
तुम्ही त्यांना एखाद्या ट्रीपचं पॅकेज देऊ शकता. त्या जर कधी पार्लर मधे गेल्या नसतील तर एखाद्या पार्लरचं किंवा स्पाचं (for manicure, pedicure, facial massage, body massage, etc) गिफ्ट देऊ शकता. साबांची जर काही 'विश लिस्ट ' असेल तर कदाचित साबुंना त्याची कल्पना असू शकेल, तेव्हा त्यांच्याकडूनही काही क्लू मिळण्याची शक्यता आहे.
रच्याकने, तुमच्या साबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जेवायला बोलावल असेल तर
जेवायला बोलावल असेल तर जेवणाचा दर्जा पाहून त्या दर्जाच्या हॉटेलचं बिल किती झाल असत याचा हिशेब करून बिल... सॉरी... पैसे बंद पाकिटात घालून द्यावेत....
हम्म्म खरच काय एक एक नमुने
हम्म्म खरच काय एक एक नमुने असतात नाही!
माझ्या लग्नात आम्ही सगळ्यांना अगदी चांगला आहेर केला. पण तिकडुन माझ्या एकुलत्या एक भावाला कापडाचे धागे निघणारा आणि कामवाले पण नाही वापरणार असले कापडः( आणि माझ्या नणंदे साठि कमित कमी ३ हजाराची असे सांगुन साडी मागुन घेतली. ( लग्ना मधे सासरचे येवुन उभे राहण्या पलिकडे काही खर्च केला नाही त्यांनी, फक्त भरपुर पाहुणे आणले. आणि जेवायला ११० रु ताट. सगळा खर्च आम्ही केला.)
अजुनही ईतक्या वर्षांनी सा बा हेच हवे तेच हवे.( हे पण मी म्हणते जावु दे आणि देते मागतील ते) पण त्यांच्या माहेरच्या लोकांना पण काही कारणाने आम्ही म्हणे ईथुन पाठवुन द्यायचे. ते पण त्या सांगणार ईतक्या किमतिचे? आणि हेच सो कॉल्ड त्यांच्या माहेरचे माझ्या लेकीसाठी ७० रु. चा एक फॉक घेवुन येतात ( ईथल्या भेटीत) आणि ते पण एका हॉटेल भेटित ७०० घालवणारे लोकं.
अजुन एक किस्सा.... सा बा पहिल्या अमेरिका वारी मधे आयुश्यात प्रथम सोन्याचे काही घेवुन आल्या माझ्या साठि ( त्यांचे पॉलिश केलेले कानातले). दुसर्या भेटित म्हणे अग कानातले आणायला विसरले मला सोन्याचे दे. मी परत तेच दिले, तर त्या घेवुन गेल्या. ( हे मला लक्षात पण नाही आले, त्यांनीच चुकुन सांगीतल्यावर कळाले) आता म्हणे ते चुकुन आले माझ्याकडे आता तुला अजुन एक घेवुन येते ( म्हणजे थोडक्यात आमचे तिकीट काढा आता परत). मग ते देणार, परत नेणार , परत येणार.... आणि मग दोन वेळा दिले म्हणायला मोकळे.
खरच लोकं कसे काय असे करु शकतात?
चांगले गिफ्ट दिले तरी लोकांना
चांगले गिफ्ट दिले तरी लोकांना राग येतो. मी माझ्या मुलाच्या मुंजीचे म्हणुन भारतातुन काही चांदीच्या वस्तु ईथल्या मेत्रीणींना द्यायला आणल्या होत्या. एक जण सोडुन एतरांना खुप आवड्ले. पण त्या एका मेत्रीणीला खूप राग आला. अश्या पण गोषटींमध्ये स्पर्धा असते याची कल्पना नव्ह्ती त्यामुळे फार त्रास झाला.
राग कशाचा पण? सोन्याची वस्तू
राग कशाचा पण? सोन्याची वस्तू हवी होती की काय?:)
Pages