मंडळी, आज फार दिवसांपासून बोचत असलेल्या एका प्रश्नावर गप्पा मारूया म्हणतेय मी.
भेटवस्तू द्यायला नि घ्यायला लागल्यापासून मला तो एक नुसता त्रासच वाटत आलाय. यात इथून जाताना भारतात नेण्याच्याच वस्तू आहेत असं नाही तर एरवीही सणासमारंभांना देण्याचे आहेर नि वस्तू आल्या.
होतं काय की आपण खूप हौशीने, आवर्जून एखादी साडी... अगदी भारी द्यावी. नि आवडली का विचारल्यावर 'हं... आवडली काय नि नाही...एखादेवेळी तू दिलेली नेसायची झालं. काय फरक पडतो?' असं कमालीच्या खवचटपणाने दिलेलं उत्तर ऐकलं की अस्सा वैताग येतो न. नि या प्रकारच्या लोकांनी आपल्याला दिलीली चक्क प्लॅस्टिक जरीची साडीही आपण आनंदाने नेसावी असा आग्रह चालवला की काय म्हणावं तेच समजत नाही. त्यातून द्यायची ऐपत नसेल तर गोष्ट वेगळी, पण घरात अगदी भारी भारी साड्या नेसणार्या लोकांनी आपल्याया देतानाच जर मुद्दाम दिल्यासारखी अशी स्वस्त साडी निवडली तर वाईट वाटतंच. तीच साडी त्यांच्याकडच्या समारंभात पॅक करून परत करायचा अनिवार मोह होतो.
यावर नवर्याचं म्हणणं असं की आपण आपल्यापरीनं नेहमीच चांगलं द्यावं, लोकांनी द्यावं अशी अपेक्षा करू नये. अशी अपेक्षा मग ते लोक तरी का करतात बरं? तुम्ही म्हणाल तुला काही त्या बाईंनी मागितली होती का भारी साडी?
पण मग एकदा नेहमीच्या भारी जरीच्या नि प्युअर सिल्क च्या साडी ऐवजी जरा वेगळी साडी दिल्यावर याच लोकांनी 'केवढ्याची आहे? एवढी किंमत वाटत नाही' वगैरे तारे तोडलेले.. त्याचं काय?
कित्येकदा लोक आलेली वस्तूच सरकवतात. तेही ठीक आहे. पण त्याचं लेबल काढायचा त्रासही घेऊ नये का? या साध्या साध्या गोष्टी अगदी समजावून सांगाव्या लागाव्यात का?
समारंभांचंही असंच. माझ्या मुलांना त्यांची वाढदिवस केलेले खूप आवडतात म्हणून आम्ही करतो दरवर्षी. तर त्यावर एका मैत्रिणीचं म्हणणं की ' आम्ही आमच्या मुलांना सगळंच घेऊन देतो नं, त्यामुळी असं कोणी भेटवस्तू द्यायची त्यांना गरजच नसते. म्हणून नाही करत आम्ही वाढदिवस.'
म्हणजे????????? आम्ही काय प्रेझेंट्स मिळावे म्हणून करतो की काय वाढदिवस?
माझ्याकडची एक फनी गोष्ट,
माझ्याकडची एक फनी गोष्ट, रामच्या तिसर्या वाढदिवसाला कोणी तरी १ वर्षाच्या मुलाचे कपडे दिलेले. असं मुद्दामुन करणारे लोक असतात, त्याला काय म्हणावे?
'नाहीतर आपल्यालाच
'नाहीतर आपल्यालाच त्रास...'
हे बाकी अगदी खरंय. आपली मनःशांती अगदी पार ढळते या प्रकारानं. करतेय प्रयत्न हळूहळू. पण वाईट वाटतंच कधी कधी.
पण वाईट वाटतंच कधी कधी.>>अगदी
पण वाईट वाटतंच कधी कधी.>>अगदी खरयं.
आवड निवड माहित नसताना
आवड निवड माहित नसताना कपड्यांची - साड्यांची भेट देऊ घेऊ नये. तसच पुस्तकांबाबत. पैशापरी पैसा जातो आणि परत कोणालाच समाधान नाही.
साडीच्या बाबतीत सांगावं तुम्ही एवढ्या प्रेमाने देता आहात पण वापरली नाही जाणार. मग मलापण वाईट वाटेल. तुमच्या समारंभाच्या आठ्वणीच किंवा तुमच्या आठवणीच म्हणून मी मला आवडणार एखाद पुस्तक घेईन आणि घेतल्यावर कळवीन. देणार्याला खरच द्यायच असेल तर नंतर चौकशी करेल घेतल का पुस्तक वगैरे म्हणून. नाहितर विसरून जायच.
तसच आपण साडी देताना कोणी वाईट तोंड केलं तर विचारायच आवडली नसली तर बदलून आणू नाहितर दुसरं आवडिच काहितरी आणूया. पण त्यांनाही द्यायचा घ्यायचा आग्रह करायचा नाही.
हल्ली मी सांगते, मी गिफ्ट्स घेत नाही जसं लोकं सांगतात मी दारू घेत नाही. नॉनव्हेज खात नाही. तसच मी गीफ्ट्स घेत नाही. आणि खरच कोणाकडून घेत नाही.
>>कोणी तरी १ वर्षाच्या मुलाचे
>>कोणी तरी १ वर्षाच्या मुलाचे कपडे दिलेले
यातून त्यांना तुला काहीतरी सुचवायचे असेल.
सुमॉ, जाऊदे. सगळ्यांनी लिहिलंय त्यापेक्षा वेगळं काही सांगायला नाही. पण हा भेटीपुरता प्रश्न नसून एकंदरीत त्या लोकांच्या स्वभावाचा/वागण्याचा आहे असं वाटतं. तोंडावर बोलता येत नाही याअर्थी नाती कशीतरी टिकवायची असतील तर अजून काही गोष्टींबरोबरच असल्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करायला पाहिजे.
रैना, साडी देऊन टाकता येईल
रैना, साडी देऊन टाकता येईल ग, पण आपण नेहमी त्यांच्याशी सरळ नि गोडच वागत असताना त्यांनी आपली केलेली किंमत कशी विसरायची?
बापरे... सुमॉ.. इतकं का मनाला
बापरे... सुमॉ.. इतकं का मनाला लावून घेताय ?????
त्या वापराल्याच पाहिजेत की नाही वगैरे आपण ठरवायचं... ज्यांनी आपल्याला न आवडलेल्या गिफ्ट दिल्या त्यांना आपण रिटर्न गिफ्ट देणं बंद करायचं...म्हणजे मग थोडे दिवसांनी ते पण आपल्याला गिफ्ट देणं बंद करतात.. 
मला तर कोणी कश्याही गिफ्ट दिल्या तरी फार्फार आवडतं !!!
नावडत्या नातेवाईकांना भडक पिवळी/.हिरवी/ केशरी किंवा त्यांच्या रंगाला अजिबात न शोभणारी साडी गिफ्ट म्हणून दे असं मी आईला नेहमी सांगतो.. (पण ती ते ऐकत नाही !!!! )
रच्याकने...एक किस्सा... माझ्या नुकत्याच झालेल्या पुतण्याला बघायला दादाची एक मैत्रीण आली होती.. ती येताना तिच्या मुलाचे लहान झालेले कपडे घेऊन आली.. म्हणे हे वापरून टाका.. माझ्या मुलाला होत नाहीत आता... वहिनीने ते तिच्या समोर आमच्या भांडीवाल्या बाईंना देऊन टाकले आणि सांगितलं की हा अजून फारच लहान आहे ते कपडे वापरायला.. पण ह्या बाईंचा मुलगा अगदी त्यात वयाचा आहे त्याला होतील.. तेव्हा पासून ती मैत्रिण आमच्याकडे एकदाही आली नाही..
दुसर्या रच्याकने... प्लॅस्टीकची जर म्हणजे काय ???
लालू, तेच तर वाईट वाटतंय मला.
लालू, तेच तर वाईट वाटतंय मला. अशी नाती टिकवायची जबाबदारी फक्त आपलीच होऊन बसते ग मग अशानं. या लोकांना स्वतःच्या वागण्याची खंतही नसते.
हल्ली मी सांगते, मी गिफ्ट्स
हल्ली मी सांगते, मी गिफ्ट्स घेत नाही जसं लोकं सांगतात मी दारू घेत नाही. नॉनव्हेज खात नाही. तसच मी गीफ्ट्स घेत नाही. आणि खरच कोणाकडून घेत नाही.>>हे छान...
माझ्या दिराच्या लग्नात मस्त एम्ब्रायडरीच्या बेडशीचा सेट दिला, सासुबाईंकडे २००-३०० आहेराच्या साड्या जमा झालेल्या, एका पेक्षा एक टुकार. अशा वेळी खरचं, आहेर नको म्हणनेच ठिक आहे. मी त्यांना सजेस्ट पण केलेलं, पण लोक एकत नाहीत म्हणुन घ्यावच लागतं म्हणे.
रैना, साडी देऊन टाकता येईल ग,
रैना, साडी देऊन टाकता येईल ग, पण आपण नेहमी त्यांच्याशी सरळ नि गोडच वागत असताना त्यांनी आपली केलेली किंमत कशी विसरायची? >>>> बाप रे...प्लॅस्टिक जर आहेरात देऊ नये एवढी पोच नसलेल्या बाईला तुम्ही तुमची किंम्मत करायचा अधिकार देताय ? तेवढी योग्यता आहे का त्यांची ? उगीच काहीच्या काही विचार करुन स्वत:ला त्रास करुन घेतेस तू. खरोखर त्रास करुन घ्यावा किंवा व्हावा असे विषय काय कमी आहेत का म्हणून हे बळजबरी दुखणं ?
प्रीती, ह्याचा अर्थ
प्रीती, ह्याचा अर्थ त्यांच्याकडे त्या वयाचं मूल आहे.माझ्या मुलिच्या पहिल्या वाढदिवसाला कोणितरी ४ वर्षाच्या मुलांचे खेळणे दिले होते.त्यांची मुलगी ४ चीच होती :-))
२००-३०० आहेराच्या साड्या >>>
२००-३०० आहेराच्या साड्या >>> एक आयड्या देऊ का ? त्याची गोधडी शिवायची
'नावडत्या नातेवाईकांना भडक
'नावडत्या नातेवाईकांना भडक पिवळी/.हिरवी/ केशरी किंवा त्यांच्या रंगाला अजिबात न शोभणारी साडी गिफ्ट म्हणून दे असं मी आईला नेहमी सांगतो.. (पण ती ते ऐकत नाही !!!!
हे मला फार्फार आवडलं बाकी. ठरलं. आता साडी भारीच घेईन पण मस्त शॉकिंग पिंक, भडक पिवळी अशी देईन. तेवढंच समाधान मला
'बापरे... सुमॉ.. इतकं का मनाला लावून घेताय ?????'
उसके लिये औरत का जनम लेना पडता है भाईसाब.(स्त्री मुक्तीवाल्यांनी माझ्यावर तुटून पडू नये...:))
>>कोणी तरी १ वर्षाच्या मुलाचे
>>कोणी तरी १ वर्षाच्या मुलाचे कपडे दिलेले
माझ्या मुलाला २ महिन्याचे बघायला आलेल्यांनी प्ले डोव्ह दिला होता
आणी आता त्यांनीच मुलीला पाहायला आहे ३ महिन्याची असताना तर प्रिमी बेबी कपडे दिले आहेत .....काय म्हणायचं
मधुरिमा,कोणी आपल्याला कमी
मधुरिमा,कोणी आपल्याला कमी किंमतीची गोष्ट दिली तर आपली किंमत कशी कमी होणार? हे म्हणजे आपली किंमत इतरानी ठरवल्यासारख झालं. नाही का? त्याना आपण कमी आवडत असु किंवा आपल्याबद्दल त्याना फारस प्रेम नाही. असच घेता येईल वाटल्यास.
भेटवस्तु देण घेण हा बरेच लोक व्यवहार म्हणुन बघतात. भावनिक मुल्य शुन्य असते त्यांच्याजागी त्याचे.
आपण मात्र तसे समजत नाही. आणि म्हणुन त्रास करुन घेतो.
वरती बर्याचजणांनी "ऐकवायच त्या लोकांना" अस म्हटलय. पण प्रत्यक्ष व्यवहारात अस नाही शक्य होत.
सिंडे, तुझं म्हणणं अगदी बरोबर
सिंडे, तुझं म्हणणं अगदी बरोबर ग. पण असे प्रसंग वारंवार नि जवळच्या लोकांकडून मुद्दाम व्हायला लागले की त्रास होतोच. तरी प्रयत्न करतेय बराच. जमेल हळूहळू. नाहीतर मायबोलीवर यायचा फायदा काय?:)
सायलीमी, त्यांना मुलं आहेत
सायलीमी, त्यांना मुलं आहेत का? कधीकधी लक्षात येत नाही गं. कदाचित बाळ बघितल्यावर त्यांना लक्षात आले असेल आणि ३ महिन्याचे बाळ केवढे याचा अंदाज नसल्याने पुन्हा अशी चूक झाली असेल.
प्रीति, देऊन टाकायच्या गं.
ह्म्म.. एकदा माझ्या आईला तिनं
ह्म्म..
एकदा माझ्या आईला तिनं एका लग्नात गिफ्ट केलेली साडी त्याच लग्नात, चिठ्ठीही न काढता परत मिळालेली.. (म्हणजे त्यांना बहुतेक इकडची तिकडे फिरवली असं वाटलं.. गिफ्ट घेणारी आणि रिटर्न गिफ्ट देणारी व्यक्ती वेगवेगळी असावी!
आम्ही सगळे हसून हसून पडलो आई घरी आल्यावर
पण साडी मस्त होती त्यामुळे एकूण प्रकार फायद्यातच गेला म्हणायचा
अ. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, (जमणार असेल तर) 'ठकासी ठक, उद्धटासी उद्धट ...' असं वागावं.. आपला पिंड नसेल तर सोडून द्यावं..
ब. 'काही काही लोक कधीच मोठी होत नाहीत, कायम लहानच रहातात - त्यांच्याशी भांडून तरी काय फायदा" इती नवरा
अशा वेळेस फक्त पिवळा स्मायली टाकायचा - हा असा
क. आजी म्हणायची 'सोनारानं सोनाराचा भाव करावा आणि सोन्यानं सोन्याचा'..
खरतर काहीही करणं शक्य नसेल तर हसून सोडून देणं... (पण नको असलेल्या गोष्टी काही झालं तरी न वापरणं) हाच बेस्ट उपाय असतो..(असं मला वाटतं)
अग आहेत ५ वर्ष आणी २
अग आहेत
५ वर्ष आणी २
म्हणूनच वाईट वाटतं ग....काही दिलं नाही तरी चालेल ....
मधु! एकतर त्रास करुन घ्यायचा
मधु! एकतर त्रास करुन घ्यायचा नाही(जे सहज जमत नाही) किंवा सहन करायचे नाही,जशास तसे!
प्रीति, देऊन टाकायच्या
प्रीति, देऊन टाकायच्या गं.>>साड्याच म्हणत असशील, तर त्या अनाथ आश्रमात दिल्या गं.
काही दिलं नाही तरी चालेल ....>>मलाही तेच वाटतं, खराब काही देण्यापेक्षा काही देऊ नये पण हे आपल्या हातात नसतं ना.
प्रीति, देऊन टाकायच्या
प्रीति, देऊन टाकायच्या गं.>>साड्याच म्हणत असशील, तर त्या अनाथ आश्रमात दिल्या गं. >>
हे खरच चांगलं.
नाहितर आपल्याला न आवडलेलं दुसर्याला आहेरात देणं म्हणजे परत ज्याने दिलं त्याच्यासारखच वागणं होईल न.
आर्च, अनाथाश्रमातले काही
आर्च, अनाथाश्रमातले काही करु/बोलु शकत नाहीत म्हणून त्यांना देणे हे फार योग्य असं वाटतं का तुला ? आपण ज्यांना आहेर देतो (किंवा आपण घेतो) त्यांना पाच पैशाची ददात नसते. तरी मला कमी दिलं, असच दिलं, तसच दिलं अशा तक्रारी असतात. आणि म्हणून ते न आवडलेलं अनाथाश्रमात द्यायचं ? कामवाल्यांना देऊन बघा बरं अशी साडी, सरळ सांगतात मी नाही नेसत अशी साडी.
"खराब" असं नाही म्हणता येत.
"खराब" असं नाही म्हणता येत. अश्या समारंभात सगळ्या थरातले लोक असतात. ते त्यांच्या कुवतीनुसार, पसंतीनुसार देणार. ते आपण वापरुच असं नाही. म्हणून जे वापरु शकतील त्यांना देऊन टाकायचं (भेट म्हणून नव्हे). साध्या साड्या इथे फारश्या नेसल्या जात नाहीत. तर तश्या कोणी दिल्याच तर मी वापरु शकतील त्या घरच्या लोकांना, किंवा त्यांना कोणाला द्यायच्या असतील तर म्हणून देऊन टाकते.
सिंडे, जेथे गरज असते तेथे
सिंडे, जेथे गरज असते तेथे देणं हे केंव्हाही चांगलच. जुने कपडे घरच्या कामवालीला का द्यायचे? का ती गरीब म्हणून? तर जेथे वापरले जातील, गरज आहे, घेण्याची ऐपत नाही अशा ठिकाणी देणं कधीही चांगलच.
आणि म्हणून ते न आवडलेलं
आणि म्हणून ते न आवडलेलं अनाथाश्रमात द्यायचं ? कामवाल्यांना देऊन बघा बरं अशी साडी, सरळ सांगतात मी नाही नेसत अशी साडी.>>असेही काही लोक असतात ज्यांना, काही नसल्या पेक्षा काही तरी मिळाले तर चांगलंच वाटतं. आपण ते घालणार नाही, दुसर्याला तेच द्यायलाही नको वाटतय, तेव्हा कचर्याच्या पेटीत जाण्यापेक्षा चांगल नाही का?
नानबाने महत्वाचे लिहिले आहे.
नानबाने महत्वाचे लिहिले आहे. सुमॉ, त्याचे पालन कर.
नानबा लई भारी
नानबा लई भारी
तशीच दुसरी साडी त्यांना
तशीच दुसरी साडी त्यांना पुढच्या प्रसंगी अगदी आवर्जून द्यावी. वर त्यांनी पहिले दिलेली साडी पण त्यांना दाखवावी आणि म्हणावे, तुम्ही दिलेली साडी इतकी आवडली ना, की तशीच घेतली यावेळेला. हे सगळ्यांसमोर करावे.
जशास तसेला कधी कधी पर्याय नसतो.
मला तरी वर काही काही जणी
मला तरी वर काही काही जणी म्हणतात (प्लास्टीक जरवाली साडी) तसं तोंडावर ऐकवणं वगैरे काहि जमणार नाही.
त्यापेक्षा मी ती साडी बोहारणीला वगैरे देऊन टाकेन.
Pages