मंडळी, आज फार दिवसांपासून बोचत असलेल्या एका प्रश्नावर गप्पा मारूया म्हणतेय मी.
भेटवस्तू द्यायला नि घ्यायला लागल्यापासून मला तो एक नुसता त्रासच वाटत आलाय. यात इथून जाताना भारतात नेण्याच्याच वस्तू आहेत असं नाही तर एरवीही सणासमारंभांना देण्याचे आहेर नि वस्तू आल्या.
होतं काय की आपण खूप हौशीने, आवर्जून एखादी साडी... अगदी भारी द्यावी. नि आवडली का विचारल्यावर 'हं... आवडली काय नि नाही...एखादेवेळी तू दिलेली नेसायची झालं. काय फरक पडतो?' असं कमालीच्या खवचटपणाने दिलेलं उत्तर ऐकलं की अस्सा वैताग येतो न. नि या प्रकारच्या लोकांनी आपल्याला दिलीली चक्क प्लॅस्टिक जरीची साडीही आपण आनंदाने नेसावी असा आग्रह चालवला की काय म्हणावं तेच समजत नाही. त्यातून द्यायची ऐपत नसेल तर गोष्ट वेगळी, पण घरात अगदी भारी भारी साड्या नेसणार्या लोकांनी आपल्याया देतानाच जर मुद्दाम दिल्यासारखी अशी स्वस्त साडी निवडली तर वाईट वाटतंच. तीच साडी त्यांच्याकडच्या समारंभात पॅक करून परत करायचा अनिवार मोह होतो.
यावर नवर्याचं म्हणणं असं की आपण आपल्यापरीनं नेहमीच चांगलं द्यावं, लोकांनी द्यावं अशी अपेक्षा करू नये. अशी अपेक्षा मग ते लोक तरी का करतात बरं? तुम्ही म्हणाल तुला काही त्या बाईंनी मागितली होती का भारी साडी?
पण मग एकदा नेहमीच्या भारी जरीच्या नि प्युअर सिल्क च्या साडी ऐवजी जरा वेगळी साडी दिल्यावर याच लोकांनी 'केवढ्याची आहे? एवढी किंमत वाटत नाही' वगैरे तारे तोडलेले.. त्याचं काय?
कित्येकदा लोक आलेली वस्तूच सरकवतात. तेही ठीक आहे. पण त्याचं लेबल काढायचा त्रासही घेऊ नये का? या साध्या साध्या गोष्टी अगदी समजावून सांगाव्या लागाव्यात का?
समारंभांचंही असंच. माझ्या मुलांना त्यांची वाढदिवस केलेले खूप आवडतात म्हणून आम्ही करतो दरवर्षी. तर त्यावर एका मैत्रिणीचं म्हणणं की ' आम्ही आमच्या मुलांना सगळंच घेऊन देतो नं, त्यामुळी असं कोणी भेटवस्तू द्यायची त्यांना गरजच नसते. म्हणून नाही करत आम्ही वाढदिवस.'
म्हणजे????????? आम्ही काय प्रेझेंट्स मिळावे म्हणून करतो की काय वाढदिवस?
हे मला आवडले,तशीच साडी
हे मला आवडले,तशीच साडी त्यांना देण्याचे...
सायो साडी US मधल्या बोहारणीला
सायो साडी US मधल्या बोहारणीला देऊन काय घेणार
अरे.. बारात इस्त्रीवाला,
अरे.. बारात इस्त्रीवाला, भांडीवाली बाई ह्यांच्यासारखी बोहारीण पण येत असेल..
श्री, मग साल्वेशन आर्मीला
श्री, मग साल्वेशन आर्मीला देऊन टाकेन

पग्या, काही सांगता येत नाही, एडिसनला येतही असेल.
श्री, बोहारीण काय देतेय किंवा
श्री, बोहारीण काय देतेय किंवा तिच्याकडे ऑफर करण्यासारखं काय आहे त्यावर अवलंबून आहे.
सायो बोहारणीने कुपान दिलं तर
सायो बोहारणीने कुपान दिलं तर घेऊ नकोस , नाहीतर फसशील
हेहे
हेहे
तिला गिफ्ट कार्ड द्यायला
तिला गिफ्ट कार्ड द्यायला सांगेन
या तशा 'मोठ्या' भेट
या तशा 'मोठ्या' भेट वस्तूंमुळे होणारा मानसिक ताप वेगळा, पण लहान समरंभात जसे हळदीकुंकू आणि काही उत्पादनांवर मिळणारी फ्री गिफ्ट्स यामुळे होणारी अडगळ, त्याचे काय? माझ्या आई बाबांना घरात आलेली कोणती वस्तू बाहेर काढणे मंजूर नाही. मग या वेगवेगळ्या आकाराच्या निरुपयोगी लहान सहान भांड्यांनी इतकी अडगळ होते, या वस्तू पुन्हा कोणाला गिफ्ट म्हणून देण्याने आपलीच लाज जाईल.
मी अमेरिकेत होणार्या लग्नाविषयी एक लेख वाचला होता. तिथे भावी वर वधू आपल्या नव्या संसाराला लागणार्या वस्तूंची यादी करतात आणि आपल्या मित्र्-नातलग मंडळींना देतात. मग ही मंडळी सगळे मिळून त्यांना त्या गिफ्ट देतात. आमच्या ऑफिस मधल्या एका सहकार्यानेही हेच केले आणि सरळ पैसे घेतले. मित्रांमधे आपण विचारू शकतो. पण नातेवाईकात नाही.
आणखी एका अमेरिकन लग्नाची गोष्ट -इथे एक आजी आणि एक आजोबा उतारवयात पुन्हा जोडी जुळवणार होते. त्यांच्या मुला नातवंडांनी सांगितले, त्यांच्याकडे सगळ्या वस्तू २-२ आहेत, फक्त शुभेच्छा द्या.
हे हे हे!!! आईचा एक भयानक घाण
हे हे हे!!! आईचा एक भयानक घाण अनुभव इथे लिहिते. आईची एक मैत्रीण नुकतीच रत्नागिरीहून बदली होउन बाहेरगावी गेली. तिचा लहान तीन वर्षाचा मुलगा आहे. एके दिवशी दुपारी जेवायला म्हणून आईने तिला बोलावलं होतं. सोबत प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी रंगीबेरंगी मोठ्ठं सामान होतं. आईने आधी विचारलं नाही की काय आहे म्हणून?? तिला वाटलं की बाळाचं एखादं खेळणं किंवा प्लास्टैकच्या डब्याचा सेट वगैरे असेल.
ती रत्नागिरी सोडून जाणार म्हणून आईने एक टिफिनचा मोठा डबा, एक बेबी कूकर आणि साडी असे तिला गिफ्ट दिले. तिच्या बाळाला म्हणून एक फूटबॉल घेऊन दिला. आणी ती आमच्याकडे काय घेऊन आली होती.... तर पॉटीचे भांडे.. तिच्या मुलाला आता गरज नाही म्हणून.
आई असली चिडली होती पण तिला पण असं समोर ताडताड बोलता येत नाही. गुमान दोन दिवसानी आईने ते भांडं भंगारवाल्याला देऊन टाकलं.
हद्द झाली ;-D
हद्द झाली ;-D
माझ्या डोजे मध्ये आलेल्या
माझ्या डोजे मध्ये आलेल्या gifts मध्ये एक २५ रु. ना train मध्ये मिळते तसले ब्रेसलेट होते. जरा bargain केलं तर १५ रु. ना ही मिळेल अशा quality चे होते. आणि देणारीही असली बहाद्दर की त्यावर कुणाकडून आले ते कळायला नको म्हणून नावही घातले नव्हते. मला नवल वाटते, की तुम्ही जितक्या किमतीचे अन्न खाता अशा समरंभांमध्ये निदान तितक्या किमतीचे gift तरी देता येऊ नये काय. १२० क १५० रु. चे ताट होते माझ्या डोजे मध्ये !!!

निदान येऊ तरी नये ना मग. काही लाज-लज्जा-शरम!!
त्याचप्रमाणे त्याच समरंभामध्ये building मध्ये राहणार्या एका family ने १५ रु. चे उदबत्तीचे घर दिले. काय म्हणावं अशा फुकटखाऊ लोकांना...........
आपण जेवणाच्या ताटासाठी किती
आपण जेवणाच्या ताटासाठी किती पैसे मोजले..त्या संदर्भात नाही पण अश्याही काही वस्तू लोकं टिकवत असतात्..ज्याचा आपल्याला काही उपयोग नसतो.
बरं, गिफ्टच्या किमतीचा अन
बरं, गिफ्टच्या किमतीचा अन जेवण्याच्या ताटाच्या रेटचा काय संबंध ?
सोप्प आहे , त्यापेक्षा कार्यक्रमच करु ने. म्हणजे अशी वेळच येणार नाही.
काही लोक उलट अन्नदान करावं म्हणून असले कार्यक्रम करतात.
माफ करा निंबुडा पण तुम्ही
माफ करा निंबुडा पण तुम्ही लोकांना जेवायला बोलावता ते तुमचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी ना?
मग अमुक रूपये ताट आणि अमुक रूपयाचे गिफ्ट असा हिशोब कशासाठी?
त्यांनी नाव नाही लिहीलं याचा अर्थ त्यांना नावासकट देणं लाजिरवाणं वाटत असेल. म्हणजेच त्यांना त्यापेक्षा जास्त परवडत नसणार. तेव्हा त्यांची भावना समजून घ्या ना.
मला एक प्रसंग चांगला आठवतोय. लग्न झाल्यावर सुरूवातीला आमची परिस्थिती बर्यापैकी चणचणीची होती. अश्यात एका मित्राच्या मुलाच्या बारश्याला गेले होते. श्वासच्या शूटच्या दरम्यानचे दिवस असल्याने काही आणायला जमलं नव्हतं. आयत्यावेळेला पाकीटही मिळेना त्यामुळे म्हणून मुलाच्या हातावर नुसतेच १०१ रूपये ठेवले. कुंकू लावून घेताना मित्राच्या बायकोने जो काय चेहरा केला होता तो आजही मी विसरू शकत नाही. फारसं काही खाल्लं पण गेलं नाही माझ्याकडून. असो..
सुमॉ,
कोणी काय गिफ्ट दिलं यावर स्वतःला त्रास करून घेण्यात शून्य प्वाइंट आहे.
परवडत असूनही फालतू वस्तू देणार्यांना आपल्याबद्दल तेवढंच वाटतं हे समजावं आणि सोडून द्यावं. न वापरता येतील अश्या सिंथेटीक साड्यांच्यातून जमेल त्या सगळ्या वस्तूंची कव्हरं करावीत सरळ. या साड्या धुणं सोप्प अस्तं आणि चुरगाळत पण नाहीत त्यामुळे टिव्ही, कंप्युटर पासून पिलो कव्हर्स पर्यंत सगळं बनवून घ्यावं आणि आलटून पालटून वापरावं. पदराला लायनिंग लावून तो डायनिंग टेबलवर सेंटर स्प्रेड म्हणून ठेवावा. आणि नेमके देणारे लोक येतील तेव्हाच वापरावा. आपला आत्मा शांत होतो. वस्तूचा उपयोग होतो.
मला तर आजवर चुलतजावेने लग्नानंतर पहिल्यांदा गेल्यावर दिलेलं एक ड्रेस मटेरियल सोडलं तर सासरहून काही आलेलंच नाही. लग्नाला होतील ८ वर्ष. अर्थात त्यामुळे मी द्यायचा काही प्रश्नच नाही हे ही ओघानं आलंच..
बरं, गिफ्टच्या किमतीचा अन
बरं, गिफ्टच्या किमतीचा अन जेवण्याच्या ताटाच्या रेटचा काय संबंध ? सोप्प आहे , त्यापेक्षा कार्यक्रमच करु ने. म्हणजे अशी वेळच येणार नाही.
>> अगदी. जर १५ रु. उदबत्तेचे घर किंवा कुठलीही वस्तु चांगल्या हेतुने देली असेल तर घ्यायला काय हरकत आहे? प्रत्येक वेलेस समोरची व्यक्ती कद्रुच असे कशावरुन? मग तुम्ही निमंत्रण करताना सांगा की आम्हाला हे असे असे पाहिजे.ह्या किमतीचे पाहिजे .देतील लोक.
माझ्या वाढदिवसाला लहानपणी एक छोटे स्तीलचे ताट मिळाले होते. मला अर्थातच लहान असल्यामुळे out of fashion gift वातले होते, पण आईने लक्षात आणुन दिले अगदीच रोजच्या उप्योगाची वस्तु आहे ही. आणि म्हणुन्च समोरच्या व्यक्तीने देली आहे.उगीचच आयता बाफ आहे म्हणुन टीकेसाठी टीका चालली आहे.
arc, नीधप अनुमोदन. मल वाटतं
arc, नीधप अनुमोदन.
मल वाटतं आपण लोकाना बोलावतो ते आपल्या समाधानासाठी. त्यांनी काय दिलं घेतलं ह्याचं मुल्यमापन करणं गरजेचं नसतं. जे आवडलं ते ठेवून घ्यावं, जे नाही ते देउन द्यावं. पण एखादा गरीब आहे म्हणून त्याला काहीही देउ नये. तुम्हाला अश्या न आवडलेल्या वस्तुचा उपयोग न सुचल्यास ती तशीच ठेवून द्यावी. काही दिवस विचार करावा नक्कीच काहीतरी सुचेल. आपण आपल्या ऐपती प्रमाणे देतो तसच त्या देणार्याने पण त्याच्या ऐपती प्रमाणे दिलेले असू शकते. उगीच इतकं मनाला लावून घेउ नये असं मला वाटतं.
मला आठवतं आहे, माझ्या लहानपणी फक्त आम्हाला आवडतात म्हणून आमचे वाढदिवस साजरे व्हायचे घरी. त्या लहानश्या गावात असे वाढदिवस म्हणजे एक सोहळा असायचा. आणि येणारी मुले अगदी पारले जी चे पॅक्स पण आणायची गिफ्ट म्हणुन. पण लहान मुलाना तर ते पण छान वाटतं. मोठ्याना सुद्धा कधी त्याचं काहीही वाटत नसे. आजकाल मात्र हे शक्यच नाही असं वाटतं आहे इथलं वाचून.
निंबूडा, खरंच मलापण तुमचा
निंबूडा, खरंच मलापण तुमचा हिशोब पटला नाही. मुळात मला डोहाळजेवणाला गिफ्ट देतात हेच माहित नव्हते. बायका येऊन ओटी भरतात, खायला काहीतरी घेऊन येतात (फळे किंवा मिठाई) एवढंच असतं ना??? आणि, ते ब्रेसलेट कुणाचं चुकून वगैरे पण आलं असेल तुमच्या गिफ्टसमधे. कुणी स्वत:साठी म्हणून घेतलं असेल आणि पडलं वगैरे असेल!!!
आईच्या त्या मैत्रीणीला काही बोलता आलं असतं पण एकदा आई अचानक सीरीयस झाली होती तेव्हा हीच मैत्रीण रात्री अडीच वाजता तिचं बाळ लहान असूनपण दवाखान्यात ताबडतोब आली होती. रात्रभर थांबलीदेखील होती. त्यामुळे तिची "किम्मत" ठरवताना तिने आणलेली वस्तू बघायची की तिने त्या वेळेला केलेली मदत लक्षात घ्यायची ???
भले मोठे गिफ्ट दिले म्हणजे त्या माणसाच्या मनात आपल्याविषयी फार प्रेम आहे किंवा आदर आहे अशातला भाग मुळीच नसतो. उलट ती व्यक्ती आपल्याशी कसं बोलते वागते आणि अडीनडीला किती उपयोगी पडते ते जास्त महत्वाचे!!
नीधपने सांगितलेले उपाय खरंच आवडले.
बरं, एक गंमत.. मला स्वतःला आलेली गिफ्ट्स फोडायला फार आवडतं. त्यामुळे घरात समारंभ कुणाचाही असो गिफ्ट्स ओपन करण्याचा मान माझाच असतो.
मुळात मला डोहाळजेवणाला गिफ्ट
मुळात मला डोहाळजेवणाला गिफ्ट देतात हेच माहित नव्हते. बायका येऊन ओटी भरतात, खायला काहीतरी घेऊन येतात (फळे किंवा मिठाई) एवढंच असतं ना??? <<
मला पण असंच माहीत होतं.
बादवे हे असंच सगळं वरचं टिका, क्लेश टाळण्यासाठी आहेर आणू नये असं लिहीतात आणि आणू नये असं लिहील्याने येतील त्या प्रत्येकाला आवडेल का, मानापमान याचा विचार करत गिफ्टा शोधण्याची गरज पडत नाही. पुढे मग जेव्हा समोरासमोर भेट होते तेव्हा प्रेम आणि इच्छा असेल तर आपण देतोच एकमेकांना.
असं काही नाहीये नी. आहेर आणू
असं काही नाहीये नी. आहेर आणू नये हे पत्रिकेवर लिहिलेलं किंवा आमंत्रणाच्या वेळी सांगितलेलं नातेवाईकांनी तेवढं सिरियसली घ्यायला हवं ना? आमच्याकडे त्यावरुनही रुसवे फुगवे असतात. आहेर दिलेला घेतला नाही की जबरदस्तीने 'आमच्याकडून घ्यायला हवा' म्हणत गळ्यात बांधला जातो.
त्याचाही नातेवाईक इगो इशु बनवतात.
सायो, हो.. आमच्या
सायो, हो.. आमच्या लग्नपत्रिकेत मला "आहेर आणू नये" असं लिहावंसं वाटत होतं. सासरे म्हणाले की काही काही लग्नात चक्क भांडणं झालेली त्यानी पाहिलेली आहेत यावरून. नाहीतर म्हणाले भले मोठे फुलांचे ढीग येऊन पडतात. म्हणजे लोक पैसे खर्च करणारच
आणि ती फुलं नंतर काय कामाची? (त्याच्या शब्दात.. एक गुलाबाचं फुल दिलं तर डोक्यात घालता येइल.. शंभर फुलं दिली तर काय ***मधे घालायची
)त्यापेक्षा उपयोगी वस्तू दिली तर काय वाईट!!!
माझ्या आणि सतिशच्या सर्व मित्र मैत्रीणीना आणि अगदी जवळच्या नातेवाईकाना कॅशच द्या असं आम्ही सरळ सांगितलं होतं.. सतिशने कपड्याचा आहेर अजिबात नको हे तर स्पष्ट सांगितलं होतं..
आमच्याकडचे लोक लग्नात स्टीलची भांडी देतात. काहीजणानी काचेच्या वस्तू दिल्या. तर काहीनी इस्त्री, ब्लेंडर अशा स्वयंपाकोपयोगी वस्तू दिल्या. कपबशीचे सुमारे दहा डझन सेट झाले
मुळात गिफ्ट देताना तिची किमत बघण्याऐवजी जर तिची उपयोगिता हा मुद्दा देणार्याने आणि घेणार्याने लक्षात घेतला तर असले त्रास होणार नाहीत. याबाबतीत माझी आई खरंच ग्रेट आहे. तिने कुणाला काहीतरी दिलं आणि नंतर ती व्यक्ती भेटल्यावर "तुम्ही दिलेली अमुक वस्तू किती उपयोगी पडली म्हणून सांगू!!" हे सांगितल्याशिवाय लोक राहत नाहीत!!
बरोबर आहे सायो हे सगळं होतंच.
बरोबर आहे सायो हे सगळं होतंच. पण तुलनात्मक रित्या कमी प्रमाणात असं म्हण हवं तर.
आमच्याकडे आमच्या पार सांगलीच्या नातेवाईकांपासून सगळ्यांनी ऐकलं आहेर/ फुले आणू नये ही सूचना.
सावंतांचे खूप कमी नातेवाईक लग्नात होते लग्न पुण्यात झाल्यामुळे पण जेवढे होते त्यांनी ऐकलं.
दुर्दैवाने ते तेव्हाची सूचना अजूनही पाळतायत...
माझ्या आणि माझ्या बहिणिच्या
माझ्या आणि माझ्या बहिणिच्या दोघिंच्या लग्नावेळि आमच्या लग्नपत्रिकेत "आहेर आणू नये" असे लिहिले होते. कोणि आहेर आणले आणि जबरदस्तिने द्यायला लागले तर आम्हि सरळ हात मागे केले आणि सांगितले कि आम्हाला आशिर्वाद द्या आम्हि आहेर घेणार नाहि. लोक आणलेले आहेर परत घेवुन गेले. आजपर्यंत त्याबद्दल वाईट वाटले असे कोणि म्हटले नाहिये.नवर्याकडच्यांना आहेर हवे होते ते त्यांनि त्यांच्याकडे reception ठेवले तेंव्हा घेतले. लग्नात मात्र आम्हि अजिबात आहेर घेवु दिले नाहि. थोडा विचित्र प्रकार होता कारण लग्न आमच्या कडुन होते आणि reception नवर्याकडच्या लोकांसाठि होते.
ते तेव्हाची सूचना अजूनही
ते तेव्हाची सूचना अजूनही पाळतायत.>>>
ठीके. नको असलेल्या वस्तू उगाच घरात येऊन पडण्यापेक्षा ते बरं.
नीधप, तू ट्रॅक बदलत्येस.
नीधप, तू ट्रॅक बदलत्येस. 'भेटवस्तू (कधीच) न येणे' हा बाफचा विषय नाही.
माफ करा निंबुडा पण तुम्ही
माफ करा निंबुडा पण तुम्ही लोकांना जेवायला बोलावता ते तुमचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी ना?
मग अमुक रूपये ताट आणि अमुक रूपयाचे गिफ्ट असा हिशोब कशासाठी? >>> नी, अगदी परफेक्ट लिहिलयस.
हल्ली मला कुठल्याही कार्यक्रमांना जायच म्हंटल कि टेंशनच येतं. वाढदिवस तर अगदी नको वाटतात. त्यात त्या मुलाकडे काय खेळणं द्याव? त्याच्याकडे काय असेल नसेल हे कळत नाही. कपडे द्यावे तर मापं कळत नाहीत. गिफ्ट कार्ड द्याव तर कितीचं हे एक असतच.
शिवाय रिटर्न गिफ्ट हे इतक फॅड झालय हल्ली कि वाढदिवसाला येणारी मुलं येण्याआधीपासुनच रिटर्न गिफ्ट काय असेल ह्याचा विचार करत असतात.
गेल्या वर्षी भारतात होतो तेव्हा लेकीचा बड्डे केला त्यात तिला ४ स्क्रॅबलचे गेम मिळाले. ति इतकी वैतागलेली. तिला कसबसं समजावल कि वाढदिवस गिफ्ट्स साठी नाही तुला धमाल यावी म्हणुन केलेला आहे. ती आली कि नाही?? मग कुठे तिला बरं वाटल. ह्या वर्षी तिला हवा तसा चकीचिझ मधे जाउन साजरा केला. नो गिफ्टांची झंझट.
हल्ली ना सगळं काही किमतीत
हल्ली ना सगळं काही किमतीत मोजायची पद्धत आलीये त्यामुळे आपण दिलेलं गिफ्ट हे किती किमतीचं असल्यामुळे लोकांना आपल्याबद्दल कमीपणा वाटणार नाही याचा विचार करण्यात लय वेळ जातो.
कॉलेजाबिलेजात असताना मैत्रिणींना वाढदिवसाला गुलाबाचं रोप चांगल्या कागदात गुंडाळून आणि एखादं कार्ड लावून द्यायचे. वेगळं आणि माझ्या पॉकेटमनीला परवडायचं.
अगदी खरंय नी. गिफ्ट
अगदी खरंय नी. गिफ्ट देण्यापेक्षा काय द्यायचं ह्या विचारनेच डोक्याचा भुगा होतो.
माझ्या मुलाच्या मुंजीत आहेर
माझ्या मुलाच्या मुंजीत आहेर आणु नये असं लिहुन देखील काही लोकांनी आणले. आम्ही अर्थातच नम्रपणे नाकारले. दोन तीन जणांनी कमालच केली. कार्यालयातच इकडे तिकडे पाकीटं टाकुन निघुन गेले.
त्यातील एक पाकीट तर निनावी होतं. त्या तीनही पाकीटातले पैसे मी नंतर देवळात देउन टाकले. ज्या दोन पाकीटांवर नावं होती त्यांना फोन करुन त्यांच्या पैशांचा विनीयोग कसा केला ते सांगुन आमंत्रकांच्या विनंतीचा आदर करणं आवश्यक आहे वगैरे लेक्चर पण दिले.
नवरा म्हणतो या पुढे अशी लेक्चरं नकोत म्हणुन तरी लोकं सुधारतील. तरी बर ते त्याचेच नतेवाइक होते.
हल्ली मला कुठल्याही
हल्ली मला कुठल्याही कार्यक्रमांना जायच म्हंटल कि टेंशनच येतं. वाढदिवस तर अगदी नको वाटतात. त्यात त्या मुलाकडे काय खेळणं द्याव? त्याच्याकडे काय असेल नसेल हे कळत नाही. कपडे द्यावे तर मापं कळत नाहीत. गिफ्ट कार्ड द्याव तर कितीचं हे एक असतच. >>>>
अमृता ,
अमेरिकेत असाल तर, चेक आउट करतानाgift reciept मागायची आणी गिफ्टलाच बरोबर टेप करुन द्यायची. त्यावर किंमत लिहिलेलि नसते. पण वस्तु बदलता येते. वस्तू घरी already असेल / आवडली नाही तर ते लोक बदलून घेउ शकतात.
Pages