मंडळी, आज फार दिवसांपासून बोचत असलेल्या एका प्रश्नावर गप्पा मारूया म्हणतेय मी.
भेटवस्तू द्यायला नि घ्यायला लागल्यापासून मला तो एक नुसता त्रासच वाटत आलाय. यात इथून जाताना भारतात नेण्याच्याच वस्तू आहेत असं नाही तर एरवीही सणासमारंभांना देण्याचे आहेर नि वस्तू आल्या.
होतं काय की आपण खूप हौशीने, आवर्जून एखादी साडी... अगदी भारी द्यावी. नि आवडली का विचारल्यावर 'हं... आवडली काय नि नाही...एखादेवेळी तू दिलेली नेसायची झालं. काय फरक पडतो?' असं कमालीच्या खवचटपणाने दिलेलं उत्तर ऐकलं की अस्सा वैताग येतो न. नि या प्रकारच्या लोकांनी आपल्याला दिलीली चक्क प्लॅस्टिक जरीची साडीही आपण आनंदाने नेसावी असा आग्रह चालवला की काय म्हणावं तेच समजत नाही. त्यातून द्यायची ऐपत नसेल तर गोष्ट वेगळी, पण घरात अगदी भारी भारी साड्या नेसणार्या लोकांनी आपल्याया देतानाच जर मुद्दाम दिल्यासारखी अशी स्वस्त साडी निवडली तर वाईट वाटतंच. तीच साडी त्यांच्याकडच्या समारंभात पॅक करून परत करायचा अनिवार मोह होतो.
यावर नवर्याचं म्हणणं असं की आपण आपल्यापरीनं नेहमीच चांगलं द्यावं, लोकांनी द्यावं अशी अपेक्षा करू नये. अशी अपेक्षा मग ते लोक तरी का करतात बरं? तुम्ही म्हणाल तुला काही त्या बाईंनी मागितली होती का भारी साडी?
पण मग एकदा नेहमीच्या भारी जरीच्या नि प्युअर सिल्क च्या साडी ऐवजी जरा वेगळी साडी दिल्यावर याच लोकांनी 'केवढ्याची आहे? एवढी किंमत वाटत नाही' वगैरे तारे तोडलेले.. त्याचं काय?
कित्येकदा लोक आलेली वस्तूच सरकवतात. तेही ठीक आहे. पण त्याचं लेबल काढायचा त्रासही घेऊ नये का? या साध्या साध्या गोष्टी अगदी समजावून सांगाव्या लागाव्यात का?
समारंभांचंही असंच. माझ्या मुलांना त्यांची वाढदिवस केलेले खूप आवडतात म्हणून आम्ही करतो दरवर्षी. तर त्यावर एका मैत्रिणीचं म्हणणं की ' आम्ही आमच्या मुलांना सगळंच घेऊन देतो नं, त्यामुळी असं कोणी भेटवस्तू द्यायची त्यांना गरजच नसते. म्हणून नाही करत आम्ही वाढदिवस.'
म्हणजे????????? आम्ही काय प्रेझेंट्स मिळावे म्हणून करतो की काय वाढदिवस?
नवर्याचे म्हणणे ऐक. I also
नवर्याचे म्हणणे ऐक.
I also had been through same experiences from time to time. मी अश्या लोकांशी जशास तसे वागून पाहिले, पण तरीही मला काही मनशांती मिळली नाही. कारण तो आपला पिंड नाही. माझा नवरा म्हणाला की दुसरे का ठरवणार आपण कसे वागायचे ते ......... तुला कसे वागयचे ते तु ठरव. ........ आपलि वागणुक ही दुसर्याच्या वागण्याची प्रतिक्रिया नको.
आजकाल मी माझ्या मनाला येइल तसे Gifting करते. ...नवर्याचे म्हणणे फारसे विचारात घेत नाही
प्रत्येक व्यक्ती आपापल्या
प्रत्येक व्यक्ती आपापल्या लायकीप्रमाणे वागते. त्याची लायकी तेवढीच म्हणुन सोडून द्यायचे.
परत कधी लग्न्समारंभात भेट झाली तर बोलुन दाखवायचे की लहान पणी मन लावून अभ्यास केला असतास .... "तो आज कुछ बन गये होते और ऐसे खटारा gifting करने कि नौबत नही आती.
मुकुला ला अनुमोदन.. आपण
मुकुला ला अनुमोदन.. आपण आपल्या स्टँडर्ड नी गिफ्ट्स द्याव्या.. समोरचा आपल्याला काय देतो, स्वस्त,महाग याचा विचार न करता..म्हणजे कमीतकमी आपल्या डोक्याला तरी त्रास नाही.हा त्रास दुसर्यांना घेऊ दे
ह्म्म्..सही विषय आहे मला
ह्म्म्..सही विषय आहे
मला उगाच काहीतरी द्यायचे म्हणुन द्यायला आवडत नाही (जसे नात्यातल्या लग्नातले आहेर)..मात्र मी देते तेव्हा असेच देते जे मी स्वतःही वापरू शकेन (म्हणजे द्याय्चे आहे म्हणून स्वस्त किंवा निक्रुष्ट नाही देत कारण तसे केले तर मलाच माझी लाज वाटेल)..
एक खास सांगण्यासारखा अनुभव:
माझी एक डॉक्टर आत्येबहीण-जिजाजी चांगलेच श्रीमंत आहेत (घरात होंडा सिटी वगैरे). पण देण्यात अतिशय चिक्कु. तिने आमच्या घराच्या वास्तुला( फार नाही केवळ ५ वर्षांपुर्वी) एक ७० रु. चा काचेचा बोल दिला होता (प्राइस टॅग काढायचे ही कष्ट नको). आणि आश्चर्य म्हणजे आमच्या पोळ्यांच्या बाईंना नाही-नाही म्हणून्ही त्यांनी ही तसलाच बोल आणला होता. हा प्रसंग आम्हा सगळ्यांच्या चांगलाच लक्षात राहीला. अजुनही मला कुणासाठी गिफ्ट घेताना हा प्रसंग हटकून आठवतो. सो...गिफ्ट देताना आपल्या स्टँडर्ड प्रमाणे द्यावे हे मला पटते.
मला पण हल्लि हा gift घेण्या
मला पण हल्लि हा gift घेण्या देण्याचा प्रकार आवडेनासा झालाय. म्ह्णुन आम्हि माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठि No Gifts असे सगल्याना सांगितले होते. पण सगल्यांनी gifts आणल्या, आणि मि नाहि नाहि करुनहि आम्हाला दिल्या. तेव्हा खुप कसेतरि वाटले, कारण अम्हि Return Gifts आणल्या नव्हत्या.. या गोष्टिचे मला खुप वाईट वाटत आहे.. तुम्हि अशा वेळि काय करता?
आता independent case study
आता independent case study करूया .....
१. आपण दिलेले कसे वाटले कधीही विचारू नये ......... "कर्मण्येवाधिका........................."
२. त्यापेक्शा तीला सांगायचे " आजकाल साड्या मी फार क्वचित नेसते, being in US and all (हे जरा टेचात!) त्यामुळे नेसाय्च्या त्या फक्त "पैठण्या आणि शालूच" अगदीच शेजारी जाय्चे असेल तर मग नारायणपेठ ..... पण आता तु दिलेली साडी म्हणून मी भारत्तात आईकडे पाठवली fall pico etc साठी .... नेमकी दिवाळी जवळ आलेली आणि आईने मोलकरणी ला ती साडी दिली......... तर मोलकर्णीने साडी परत केली आणि म्हणाली बाई अशी साडी देणार असाल तर मी काम सोडते....... काय माजल्यात नाही मोलकरणी आजकाल ........... पायपुसण सुद्धा करता आले नाही प्लस्तिक जरीची सादी असल्याने........... जाउ दे झाल तु काही वाईट वाटून घेउ नकोस पुढ्ल्या वेळेस मात्र पैठणीच दे म्हणजे मला नेसता येइल......
३. लेबलाबद्द्ल व्यक्तिशः फोन करून सांगाय्चे की असे असे लेबल राहिले आहे. दुसरे गिफ्त पाठवा.
४.मैत्रीणीला म्हणावे अग सध्याच्या आर्थिक मंदीच्या कालात कितिही झोकात birthday करायची इच्छा असली तरी सर्वांनाच परवडत नाही..........
आज खूपच वेळ मिळालाय नाही मला डायलओगबाजी करायला नाही........:)
@चना, अश्यावेळी जर एखादा खूप
@चना,
अश्यावेळी जर एखादा खूप जवळचा मित्र / मैत्रीण असेल तर त्याला पटकन दुकानात जाउन १०-१५ (depending on no. of kids at party) crayons or sketch pens set आणायला सांगायचा.
मला देण्याघेण्याचा जाम कंटाळा
मला देण्याघेण्याचा जाम कंटाळा आहे! उबग अगदी.. आय मिन मनापासून जेव्हा द्यावेसे वाटते ते खरंच बेस्ट ना, पण बर्याचदा ते दिलेच पाहीजे, या भावनेतून येते.. चिक्कू नसले तरी मला हे कंपल्शन आवडत नाही.. वर लहानसहान गोष्टही देववत नाही.. जे द्यायचे ते चांगलेच घ्यायचे, मग फिरा दुकानं..
माझ्या आईला इतकी कारणं सुचतात! पहिल्यांदा घरी आले लोकं, आपण पहिल्यांद कोणाकडे गेलो, जायच्या आधी २ महिने अमुकचा वाढदिवस होऊन गेला, ५ महिने आधी नोकरी लागली इत्यादी.. 
यावर नवर्याचं म्हणणं असं की
यावर नवर्याचं म्हणणं असं की आपण आपल्यापरीनं नेहमीच चांगलं द्यावं, लोकांनी द्यावं अशी अपेक्षा करू नये. >>>
ह्म्म्म्म नवरा बरोबर बोलला पण अपेक्षा असणारच
मी काहीही देत नाही घेत तर त्याहून नाही
ह्या देण्याघेण्यापेक्षा भयंकर
ह्या देण्याघेण्यापेक्षा भयंकर म्हणजे ज्यांना मनासारखा आहेर/गिफ्ट मिळाले नाही त्यांची भणभण ऐकणे
आपण आपल्याला परवडेल, आवडेल, समोरच्याला उपयोगी होइल असे गिफ्ट द्यावे आणि त्यात(च) समाधान मानावे. आपल्याला मिळालेले नाही आवडले, कमी किमतीचे असले किंवा अजून काही तर १. फेकून द्यावे २. घरी कामास असणार्यांना उपयोगी होइल असे असेल तर त्यांना द्यावे ३. गिफ्ट बरे आहे पण रंग नाही आवडला इ. तर दुसरीकडे कुठे आहेर म्हणून सरकवावे.
चना..एकदा असं ठरवलस ना तर
चना..एकदा असं ठरवलस ना तर पहिल्यांदा जरा त्रास होईल..पण आपल्या या निर्णयावर ठाम राहिलीस ना कि मग २,३ वेळानंतर लोकं ही गिफ्ट्स आणणार नाहीत.. माझा स्वतःचा हा अनुभव आहे.. रिटर्न गिफ्ट्स घाई घाई ने अरेन्ज करायला धावपळ करायचं कारण नाही..मग लोकांना म्हणायला कारण मिळेल.. ही कसली रिटर्न गिफ्ट दिली म्हणून..;)
पण आपल्याकडून आपण नेहमी भारीच
पण आपल्याकडून आपण नेहमी भारीच साडी द्यावी अशी अपेक्षा करणार्यांनी नि आपण नेहमीच भारी दिल्यावरही आपल्या घरच्या महत्वाच्या कार्यात आपल्याला प्लॅस्टिक जरीची दिली तर चिडचिड होत नाही का? नि व्यवस्थित ऐपत असतानाही?
अगं त्यांना लगेच सर्वांसमोर
अगं त्यांना लगेच सर्वांसमोर तिथल्यातिथेच परत करावी.नम्रपणे..अगं आताशी मी असल्या साड्या नेसत नाही.. तुम्हीच ठेवा तुम्हाला अजून कोणाला द्यायला उपयोगी पडेल .. असं म्हणून तिकडून सटक
यावर नवर्याचं म्हणणं असं की
यावर नवर्याचं म्हणणं असं की आपण आपल्यापरीनं नेहमीच चांगलं द्यावं, लोकांनी द्यावं अशी अपेक्षा करू नये. >>> हे बाकी पटलं , जगातले सगळे नवरे सारखाचं विचार करतात बहुतेक .
वर्षू, ऐसा हुआ तो भूचाल आ
वर्षू, ऐसा हुआ तो भूचाल आ जायेगा. कार्यबिर्य वाहून जाईल त्यात.
'अमेरिकेला गेल्यापासून माजलीय' वगैरे शेरे लग्गेच सुरू...
श्री, कारण नवर्यांना ती
श्री, कारण नवर्यांना ती प्लॅस्टिक जरीची साडी नेसावी लागत नाही ना...इच्छा नसताना..:)
सुमॉ अशा प्लॅस्टिक जर ,
सुमॉ
अशा प्लॅस्टिक जर , किंवा कामवाली बाईसुद्धा नेसणार नाही अशी साडी देणार्यांना , चार चौघात मोठ्याने ' बरंय हो तुम्ही तरी असली साधी , रोजच्या रोज वापरता येईल अशी साडी देता. माझ्या सासू बाई ( नणंद, जाऊ , वहिनी ) नेहेमी आपल्या नारायणपेठ /कांजीवरम / पैठणी देतात. जीव जड होतो त्या साड्या नेसून.ही कशी हलकी फुलकी सुटसुटीत.' असे अगदी हसर्या चेहर्याने सांगावे. हा का नी ना का
अगं त्यांना लगेच सर्वांसमोर
अगं त्यांना लगेच सर्वांसमोर तिथल्यातिथेच परत करावी.नम्रपणे..अगं आताशी मी असल्या साड्या नेसत नाही.. तुम्हीच ठेवा तुम्हाला अजून कोणाला द्यायला उपयोगी पडेल ..>>
मला नाही जमत , पण माझ्या साबा एक्ष्सपर्ट आहेत त्यात! 

हे असे बोलायला जमले पाहिजे ना.
एका बाईंनी (जवळच्या सम्बंधातल्या) मला त्यांच्या मुलाच्या लग्नात एक साडी दिली. त्याला फॉल पिको केलेला होता, एवढंच नव्हे तर त्या फॉल वर तेलकट डाग होते !! मी काही लक्ष दिले नाही, पण माझ्या सासूबाई कसल्या ऐकायला. सरळ फोन लावला त्यांना आणि विचारले ' का हो आमच्या सुनेला तुम्ही अशी कशी साडी दिली? ही वापर्लेली आहे का?" त्या बाईंचे तिकडे फोन वर त त प प झाले असणार, तरी म्हणे आम्ही द्यायच्या सगळ्या साड्या मुद्दम फॉल पिको करून घेतल्या, लगेच नेसता याव्या म्हणून! मजाच वाटली मला!
आमच्याकडे आम्ही एक उत्तम
आमच्याकडे आम्ही एक उत्तम पर्याय शोधून काढलाय..... गोल्डन मीन....
माझ्या आईच्या माहेरच्या सर्व बहिणींचा मिळून त्यांच्या आईच्या (माझ्या दिवंगत आजीच्या) स्मरणार्थ एक महिला उद्योग आहे. त्याअंतर्गत एक मावशी श्रमिक विद्यापीठाशी संलग्नित तसेच ओळखीच्या गरजू स्त्रियांकडून तर्हेतर्हेच्या भेटवस्तू बनवून घेते किंवा स्वतःही बनवते. त्यात अगदी बाळंतविडे, ओटीचे रुमाल, एप्रन्स, कापडी फॅन्सी पिशव्या, मोत्याच्या सुपार्या, पूजा थाळी व ट्रेज, कुंकवाचे डेकोरेटिव्ह, मोत्याची तोरणे, महिरपी, वधूने उंबरा ओलांडायचे माप, मोत्याचे लामणदिवे, मोत्याची फुले इ.इ.इ. अनंत प्रकार बनवले जातात. त्या मावशीच्या एका मुलीचा लोकरी कपडे विणण्याचा व्यवसाय आहे व दुसरी अप्रतिम कृत्रिम फुले [सिल्क, ऑरगंडी इ.] बनवते. एका मावशीची कन्या गूळपोळीचा व्यावसायिक स्तरावर उत्तम गूळ बनवते.
चुलत बहिणीचा विविध प्रकारच्या कॉटन साड्या, ड्रेसमटेरियल, फॅन्सी बटवे, कॉस्च्यूम ज्वेलरी, हैद्राबादी पर्ल्स ज्वेलरी वगैरे वगैरेचा जोडव्यवसाय आहे. ती स्वतः आर्किटेक्ट आहे, नोकरी करते, पण निव्वळ छंद व हौस म्हणून तिच्या सासूबाईंना ह्या व्यवसायात मदत करते.
घरातच एवढे हरहुन्नरी कलावंत व उद्योजक असताना बाहेर गिफ्ट्स साठी जायची गरजच काय? आम्ही त्यांच्याकडील वस्तू घरी मागवून ठेवतो. घरी पाहुणे आले, कोठे कार्याला जायचे असले किंवा अजून काही निमित्ताने गिफ्ट देण्याची वेळ आलीच तर शक्यतो ह्याच वस्तू देतो. त्यामुळे एकप्रकारे त्यांचे मार्केटिंगही होते, काही गरजू बायकांना रोजगार मिळतो, आम्हालाही ''घरचे''काही दिल्याचे समाधान व घेणार्यालाही तसेच अप्रूप असते. गिफ्टचे बजेट मोठे असेल तर मग आम्ही या वस्तू वेगवेगळ्या प्रकारे गिफ्ट रॅप करून त्याचेच एक गिफ्ट पॅक बनवतो! मजा येते!!
आजकाल शक्यतो लोक कार्यात आमंत्रणपत्रिकेवर आहेर्/गिफ्ट विषयी स्पष्ट उल्लेख करतात त्यामुळे ते सोपे होते. आणि जर कोणी होतकरू, गरजू दांपत्य असेल तर मग त्यांना आम्ही आवर्जून घरात उपयोगी पडेल अशा वस्तू देतो.
माझ्या भगिनीची कलाकारी : [फक्त एक झलक]
पूजा थाळी
मोत्याची महिरप, सुपारी व फुले
मोत्याची सुपारी
सुंदर ग अकु, बाकी वर
सुंदर ग अकु,
बाकी वर सांगितलेत तसे नमुने सगळीकडेच असतात. सरळ तोंडावर बोलता तर मला अजिबातच येत नाही. तिथे सरळ दुर्लक्ष केलेलचं चांगलं.
ते जर जवळचे नातेवाईक नसतील तर त्यांच्याच टाईपच गिफ्ट देणं बरं, पण नातेवाईक असतिल मात्र कठीण असत.
आम्ही पण गिफ्ट देताना नेहेमी उपयोग होइल असच गिफ्ट बघतो.
अजून एक गंमत : जेव्हा
अजून एक गंमत : जेव्हा आहेरातून अगदी स्वस्तातले शर्टपीस, पॅन्टपीस, ब्लाऊजपीस वगैरे येतात तेव्हा आम्ही ते मावशीकडे देतो. ती त्यांचा फॅन्सी प्रकार शिवण्यात सुयोग्य वापर करते!! कोणी काय दिलं, कितीचं दिलं ह्यापेक्षा त्या देण्यामागची भावना पाहायची आणि सोडून द्यायचे!!
उदा : जर तुमचे पंजाबी, मारवाडी इ. इ. स्नेही असतील तर त्यांच्याकडून येणार्या साड्या/ भेटवस्तू आपण सहसा वापरत नाही अशा प्रकारातील, कित्येकदा भडक असतात. पण ते तरी काय करणार? वो अपनी आदतसे मजबूर है | आपण त्यांची भेट गोड मानून घ्यायची व आपल्या परीने तिचा योग्य उपयोग करायचा! आणि कोणास ठाऊक, त्यांनाही आपण दिलेल्या गिफ्टबद्दल कदाचित तसेच वाटत असेल!!
अरुंधती, छान आहेत / दिसताहेत
अरुंधती,
छान आहेत / दिसताहेत गं या गोष्टी
अकु, मधुरीमा जे सांगत्ये ते
अकु, मधुरीमा जे सांगत्ये ते वेगळ आहे ग..
प्रेमाने दिलेल्या गोष्टी कळतात ग आपल्याला..
----त्यातून द्यायची ऐपत नसेल तर गोष्ट वेगळी, पण घरात अगदी भारी भारी साड्या नेसणार्या लोकांनी आपल्याया देतानाच जर मुद्दाम दिल्यासारखी अशी स्वस्त साडी निवडली तर वाईट वाटतंच. तीच साडी त्यांच्याकडच्या समारंभात पॅक करून परत करायचा अनिवार मोह होतो.------ प्रश्न असल्या लोकांचा आहे.
अलिकडे मी आर्बिट वाढदिवसाना
अलिकडे मी आर्बिट वाढदिवसाना जाणे शक्यतो टाळते. आणि मित्रमैत्रिणीना सांगते मी तुमच्यासाठी अमउक इतक्या डॉलरचे गिफ्ट आणणार होते ते पैसे मी याया संस्थेकडे पाठवतेय. आणि पाठवले की त्यांना आवर्जून फोन करते.
नातेवाईकांच्या खुप कार्यक्रमांना मी जात नाही. गेले तरी काहीही दिले घेतले तरी त्यावर खुप विचार करत नाही. ज्यांच्याबद्दल मला स्वतःला आदर, आस्था वाटते त्यांना मनापासून काहितरी देते बास. माझा प्रश्ण सुटतो.
मधुरिमा- असे अनुभव नाहीत अशी
मधुरिमा- असे अनुभव नाहीत अशी एकही स्त्री शोधुन सापडणार नाही.


डोकं उठतं पण हसायचं आणि सोडुन द्यायचं एवढा एकच उपाय मला लागु पडतो. कारण उगीच असल्या लोकांवर स्वत:च रक्त का आटवा?
आपण कर्तव्यात कमी नाही पडायच नाहीतर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय.
एकच गोष्ट मला जमत नाही ती म्हणजे यावर डायलॉग मारायचे नाहीत, विशीष्ट व्यक्तिशी भांडणात तो मुद्दा घ्यायचा नाही. ते सुमारे ७ वर्षांनी जमेल असे वाटते.
अकु/मै/मुकुला - मस्त पोस्ट.
आणि हो लोकांकडे जेवायला वगैरे जाताना फळंच किंवा झाडंच आणते, पुस्तकंच आणते , मॅडच आहे वगैरे अशी मला प्रचंड नावं ठेवली जातात. तरीही खोड मोडली नाही.
'कोणी काय दिलं, कितीचं दिलं
'कोणी काय दिलं, कितीचं दिलं ह्यापेक्षा त्या देण्यामागची भावना पाहायची.'
हे अगदी खरं. म्हणूनच मी मला एका नात्यातल्या, बेताची सांपत्तिक स्थिती असलेल्या बाईंनी दिलेली अगदी साधारण, पण प्रेमाने आणलेली साडी त्यावर ब्लाऊज शिवून मुद्दाम नेसून त्यांना दाखवली होती. त्यांना इतका आनंद झाला होता.
पण नेहमी आपल्याकडून टिच्चून घ्यायचे. नि स्वतःची सांपत्तिक स्थिती नुसती उत्तमच नव्हे तर अतिउत्तम असताना अशी बेक्कार साडी द्यायची यामागची भावना मला तरी समजत नाही.
अशा प्लॅस्टिक जर , किंवा
अशा प्लॅस्टिक जर , किंवा कामवाली बाईसुद्धा नेसणार नाही अशी साडी देणार्यांना , चार चौघात मोठ्याने ' बरंय हो तुम्ही तरी असली साधी , रोजच्या रोज वापरता येईल अशी साडी देता. माझ्या सासू बाई ( नणंद, जाऊ , वहिनी ) नेहेमी आपल्या नारायणपेठ /कांजीवरम / पैठणी देतात. जीव जड होतो त्या साड्या नेसून.ही कशी हलकी फुलकी सुटसुटीत.' असे अगदी हसर्या चेहर्याने सांगावे. हा का नी ना का >>> मेधा, असं तोडावर येतं पण बोलणं कठीण आहे (मलातरी)
तीच साडी त्यांच्याकडच्या समारंभात पॅक करून परत करायचा अनिवार मोह होतो.->> अगदी अगदी.
अशा प्लॅस्टिक जर , किंवा
अशा प्लॅस्टिक जर , किंवा कामवाली बाईसुद्धा नेसणार नाही अशी साडी देणार्यांना , चार चौघात मोठ्याने ' बरंय हो तुम्ही तरी असली साधी , रोजच्या रोज वापरता येईल अशी साडी देता. माझ्या सासू बाई ( नणंद, जाऊ , वहिनी ) नेहेमी आपल्या नारायणपेठ /कांजीवरम / पैठणी देतात. जीव जड होतो त्या साड्या नेसून.ही कशी हलकी फुलकी सुटसुटीत.' असे अगदी हसर्या चेहर्याने सांगावे. हा का नी ना का...
पण बायांनो, ही साडी आपल्या वर उल्लेखलेल्या जवळच्या नात्यांपैकी एखादीने दिली तर काय करायचं ग?(हातपाय आपटून भोकाड पसरलेली बाहुली)
देऊन टाकायची सुमॉ.
देऊन टाकायची सुमॉ.
दुर्दैवाने भारतात कशाही प्रकारच्या कपड्याची गरीब लोकांना गरज असते. खरंच देऊन टाकायची.
जे आपलं कधी नव्हतंच त्याबद्दल खंत का करायची ?
मग तिथे आई, मैत्रिण,
मग तिथे आई, मैत्रिण, मावसबहिण, नवरा यांची नावं घालायची. हसत हसत शालजोडीतले द्यायला शिकलं पाहिजे , नाहितर मग खरोखर डिटॉक्स करून सोडून द्यायला शिकलं पाहिजे. नाहीतर आपल्यालाच त्रास.
Pages