आयसीसी टि२० विश्वचषक २०१०

Submitted by केदार on 20 April, 2010 - 10:01

यंदाचा आयसीसी टि२० विश्वचषक वेस्ट इंडिज मध्ये ३० एप्रिल ते १६ मे दरम्यान खेळला जाणार आहे.
भारतासोबत क ग्रूप मध्ये अफगाणीस्थान व साउथ अफ्रिका हे देश आहेत.

टीम मध्ये दुखापतीमुळे सेहवाग नसणार अशी बातमी वाचली. त्याऐवजी मुरली विजय खेळत आहे.

वर्ल्डकप विषयीचे मत व त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला असं का वाटतय की ऑसी व आजची मॅच फिक्स आहे? कींव्वा रविंद्र जडेजाला घेतल्यावर संघात काहितरी राजकारण आहे? ऑसी बरोबर जिंकण्यासाठी खेळत आहेत असं वाटलच नाही... आजही आपली body language तशीच आहे. Sad

:).

>आपण हारतो तेंव्हा मॅच फिक्स्ड नसते, बहुतेक जिंकतो तेंव्हा फिक्सिंग नी समोरची टिम मॅच हारते
Happy
तरिही धोनीला कारणे दाखवा नोटीसः
१. ऑसी बरोबर अत्यंत सुमार कामगिरी करणार्‍या जडेजास पुन्हा का घेतले?
२. ईतका मह्त्वपूर्ण सामना खेळताना नाणेफेक जिंकल्यावर विंडीज ला प्रथम फलंदाजी देण्याचे कारण काय? ऊलट स्वताच्या फलंदाजांन्ना कुठल्याही दडपणाखाली खेळू न देता मोठी धावसंख्या ऊभारून विंडीज वर दडपण आणायचे साधे तंत्र का नाही अवलंबीले?
३. जर मदार काम्चलाऊ फिरकी वर असेल तर ओझा अन चावला ला बरोबर नेले कशाला?
४. विंडीज चांगली फिरकी गोलंदाजी खेळू शकत नाहीत हे विंडीज ची शेंबडी पोरे देखिल सांगतील.
५. विंडीज फलंदाज बाद झाल्यावर भारतीयांचे नेहेमीचे फेमस हडल्/मिठ्या का दिसल्या नाहीत?
६. अख्ख्या संघाची बॉडी लँग्वेज ईतकी मरगळलेली का दिसत होती?
७. शेवटी सर्वात यशस्वी भारतीय कप्तान म्हणून लौकीक झाल्याने "मी करतो ते बरोबरच" असा तर्क आहे का, का निव्वळ हवा डोक्यात गेलीये? theres thin line between overconfidence and pride, have we crossed it?

आजचा सामना बघून धोनीचा अतिशय संताप आला. आस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात केलेल्या चुकांमधून धोनी काहिही शिकलेला नाही. त्याने बहुधा भारताला हरविण्याची सुपारी घेतलेली असावी. इतर कोणत्याही संघाच्या कर्णधाराने अशा अनाकलनीय चुका वारंवार केल्या नसत्या.

(१) आस्ट्रेलियाविरूद्ध नाणेफेक जिंकूनसुद्धा धोनीने प्रथम गोलंदाजी घेतली होती. आजही तीच चूक केली. वेस्ट इंडिजचा संघ पाठलाग करण्यामध्ये दुर्बल समजला जातो. हा इतिहास माहिती असताना सुद्धा त्याने तीच चूक केली. या निर्णयामागे त्याचे तर्कशास्त्र अजब आहे. सकाळच्या थंड वातावरणाचा व हवेतील दमटपणाचा गोलंदाजांना फायदा मिळावा म्हणून म्हणे त्याने हे निर्णय घेतले. सकाळच्या थंड वातावरणाचा व हवेतील दमटपणाचा फायदा फक्त जलदगती गोलंदाजांना होतो, फिरकी गोलंदाजांना नव्हे हे कोणीही सांगेल. फक्त २ जलदगती गोलंदाज संघात असताना धोनीचे गोलंदाजी घेण्याच्या निर्णयामागचे हे तर्कशास्त्र अनाकलनीय आहे.

जर सकाळच्या थंड वातावरणाचा व हवेतील दमटपणाचा गोलंदाजांना फायदा मिळावा म्हणून नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजीच घ्यायची असे धोनीने ठरविले होते तर २ च जलदगती गोलंदाज का खेळविले?

जर फिरकीवर भर द्यायचा होता तर नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजी का घेतली? फिरकी गोलंदाज वेस्ट इंडिज धावांचा पाठलाग करताना जास्त प्रभावी ठरले असते.

जर फिरकीवरच भर द्यायचा होता तर रैना व जडेजाच्या तुलनेत जास्त अनुभवी व प्रभावी असलेल्या युवराजला दोनही सामन्यात एकसुद्धा षटक का दिले नाही? जडेजाला झोडपत असताना सुद्धा युवराजला का आणले नाही?

(२) मुरली विजयची कामगिरी या मालिकेत अतिशय खराब होती. आफ्रिकेविरूद्ध १ चेंडूत 0 व ऑस्ट्रेलियाविरूद्ध ८ चेंडूत २ अशी त्याची कामगिरी होती. मुख्य म्हणजे त्याला चेंडूच्या वेगाचा अंदाजच येत नव्हता. बर्‍याचदा त्याची बॅट चेंडू बॅटखालून निघून गेल्यावर हवेत फिरत होती. अपेक्षेप्रमाणे त्याने आज १४ चेंडूत ७ धावा केल्या. त्याला या सामन्यात पुन्हा एकदा खेळविण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. तो चेन्नईचा आहे, निवडसमितीचा अध्यक्ष श्रीकांत हा सुद्धा चेन्नईचा आहे व तो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात आहे म्हणून अजून किती वेळा त्याला संधी द्यायची? त्याच्या ऐवजी दिनेश कार्तिक हा चांगला पर्याय ठरला असता.

(३) युसुफ पठाण हा असंख्य वेळा अपयशी ठरलेला आहे. आफ्रिकेविरूद्ध व ऑस्ट्रेलियाविरूद्ध तो वाईट खेळलेला आहे. तो अजून संघात कसा?

(४) जडेजाला पुन्हा एकदा खेळविण्याचा निर्णय तर अतिशय संतापजनक आहे. जडेजाची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय सामान्य आहे. तरीसुद्धा त्याला काढले नाही. मागच्या सामन्यात २ षटकात ३८ धावांची धुलाई झाल्यावर सुद्धा धोनीने आज त्याला परत गोलंदाजी दिली. त्याच्या पहिल्या षटकात १६ धावा झोडपल्यावर जेव्हा धोनीने त्याला दुसरे षटक दिले तेव्हा अतिशय संताप आला. त्याच्या दुसर्‍या षटकात जरी १ बळी मिळाला तरी त्याने ११ धावा दिल्या.

(५) आपले सख्खे जावई असल्यासारखे धोनी मुरली विजय, पठाण व जडेजा यांना संघात खेळवित आहे. आंतरराष्ट्रीय सामने म्हणजे भारतातल्या पाटा खेळपट्टीवर खेळले जाणारे IPL चे सामने नव्हे हे आता त्यांना उमगले असेल. त्यांच्याऐवजी विनयकुमार, पियुष चावला व कार्तिक हे योग्य पर्याय ठरले असते.

(६) धोनीला काहिही करून आजचा सामना हरायचाच होता. युसुफ पठाण १७ व्या षटकाच्या ३ र्‍या चेंडूवर सीमारेषेवर फटका मारून बाद झाला. फटका मारल्यावर तो व धोनी क्रॉस झाले नाहीत याचे आश्चर्य वाटले. पठाण बाद झाला तरी निदान धोनीला पुढच्या ३ चेंडूंवर स्ट्राईक मिळाला असता. ते न पळाल्यामुळे भज्जीला स्ट्राईक मिळाला व त्याने पुढचे ३ चेंडू एकही धाव न घेता वाया घालविले.

(७) स्वत: धोनी धावबाद झाल्यावर भारताला ८ चेंडूत २० धाव्या हव्या होत्या. अशा वेळी षटकार मारणार्‍या खेळाडूची गरज होती. यावेळी आश्चर्य म्हणजे धोनीने झहीरच्या ऐवजी नेहराला पुढे पाठविले. झहीर ताकदीने षटकार मारू शकतो व त्याची फलंदाजी नेहरापेक्षा चांगली आहे हे माहित असताना सुद्धा नेहराला का पुढे पाठविले?

एकंदरीत आजचा सामना हरावा अशीच धोनीची इच्छा असावी. त्यामुळेच त्याने नाणेफेक, संघनिवड, गोलंदाजी इ. बद्दल अतिशय अनाकलनीय निर्णय घेतले जेणेकरून सामना जिंकण्याची पुसटशी शक्यता सुद्धा राहू नये. त्याला काही काळ कर्णधारपदावरून हटविणे आवश्यक आहे. खरं तर या अनाकलनीय निर्णयांबद्दल (की मुद्दामहून घेतलेल्या चुकीच्या निर्णयांबद्दल) त्याच्यावर कोर्ट मार्शल करायल पाहिजे.

ता.क. - या मालिकेनंतर भारत झिम्बाब्वेमध्ये तिरंगी मालिका खेळणार आहे (तिसरा संघ - श्रीलंका). या मालिकेसाठी धोनी, युवराज, भज्जी इ. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिलेली आहे. परंतु इरफान पठाण व उथप्पाला घेतलेले नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे जडेजा, मुरली विजय व युसुफ पठाण या त्रिकूटाला कायम ठेवले आहे.

गुरुजी अनुमोदन. वरच्या पोस्ट आणखी एक गोष्ट म्हणजे

६ अ . धोणीला दोन धावा तेंव्हाच घ्यायची गरज काय होती, त्या आधी तर अनेकदा संधी असूनही त्याने दोन घावा घेतल्या नाहीत. दोन दोन खेळाडू त्या चेंडुच्या आजूबाजूस होते, शिवाय धोनी स्वतः स्ट्राईक घेणे आवश्यक होते, तेंव्हा अशी हाराकारी म्हणजे ...

एकुनच धोणी आता कुल ड्युड पेक्षा कुल मनमानी करत आहे. त्या जडेजाला अन मुख्य म्हणजे विजयला हकलायला पाहिजे होता. विजय च्या कसलेल्या खेळीमुळे गंभीर बाबचळून जात होता. कदाचित गंभीरला शेल मध्ये घालन्याचे महत्वाचे काम विजयने केले आहे. दिनेश कार्तिक निदान १०० टक्के स्ट्राईक रेट ठेवुन २० -२५ धावा तरी काढतो. त्या विजय ने केवळ एक चैन्नईची मॅच चांगली खेळली म्हणून तो टीम मध्ये आहे. त्यापेक्षा राजस्थान कडून ओपन करणारा ओझा खूप चांगली चॉईस होती. धोणीला कुणीतरी हा चेन्नेचा संघ नाही, भारताचा आहे हे समजावून सांगायला पाहिजे. इतर वेळी तो आवडतो, पण सलग दोनदा त्याच चुका करने म्हणजे झेपत नाहीये.

त्यांच्याऐवजी विनयकुमार, पियुष चावला व कार्तिक हे योग्य पर्याय ठरले असते.>> हे आपलं झाकली मूठ सव्वा लाखाची अश्यातल्या प्रकार आहे Happy

संताप मी समजु शकतो पण खुप प्रेशर असतं खेळताना, रन का काढला आणि का नाही काढला हे सर्वस्वी त्या वेळी काय वाटतं त्याच्यावर अवलंबुन आहे. अर्थात, सारखी तीच तीच चुक होत असेल तर मात्र दखल घेतली पाहिजे. ह्याच टीम नी पहिला चषक जिंकला होता हे विसरायला नको. अगली बार! Happy

" झहीर ताकदीने षटकार मारू शकतो व त्याची फलंदाजी नेहरापेक्षा चांगली आहे हे माहित असताना सुद्धा नेहराला का पुढे पाठविले?"
झहीरचे बोट रक्ताळले होते, १९व्या षटकात चेंडू अडवताना.

धोनीपेक्षा जास्त जबाबदार निवड समिती, त्यांनी जाडेजा २ महिने बाहेर बसलेला असताना निवडले - उत्थप्पाला निवडले नाही.ओझाला विंडीजला नेलेलेच नाही.अमित शर्मा चावलापेक्षा अचानक वाइट का ठरला?जर मदार फिरकीवर होती तर कामचलाऊ फिरकी पेक्षा ओझा,शर्मा बरे. पण बहुतेक फलंदाजी/गोलंदाजी दोन्ही(न) करू शकणारे पठाण, चावला,जाडेजा हवे होते.
स्वतःच्या चुका कबूल करू शकणारा कोणी कर्णधार झाला आहे का?
झहीरने ट्विटरवर लिहिले की त्याची लय जुळत नव्हती. तरी दोन्ही सामन्यात १९ वे षटक त्याने चांगले टाकले..पण तोपर्यंत उशीर झाला होता.
आता हरभजन आणि झहीरच्या जोरावर भारत कसोटीतले पहिले स्थान टिकवेल का?
इशांत, आर पी सिंग, इर्फान यांना परत केजी मधे घालायला लागेल, पण करणार कोण ?

लंका काल जिंकणार असे वाटत असताना कसे पडले?
यंदा ऑसी टी२०चा गड पण सर करणार का?

फलंदाजी हाच आपला हुकमी एक्का होता. म्हणूनच धोनीच्या सर्व चुका मान्य करूनही, अपण फलंदाजीत कां ढेपाळाव, हा प्रश्ने उरतोच. ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजविरुद्धचे सामने पाहिल्यावर १] संघातील नवोदित व कांहीसा अनुभव असलेले खेळाडू जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यास अजून असमर्थ आहेत व २] त्याना मैदानावर प्रत्यक्ष खेळाने मार्गदर्शन करत डाव उभा करण्यास प्रेरणा देणारा व मदत करणारा द्रविड, सचिन, किंवा लक्ष्मणसारखा एकही फलंदाज नसणं, हेच मलातरी आपल्या दयनीय कामगिरीचं मुख्य कारण वाटतं. त्यातच, आयपीएलने या फलंदाजांमध्ये स्वतःच्या आक्रमक खेळाबद्दल खोटाच आत्मविश्वासही निर्माण केला असावा असंही सतत वाटत; गंभीर, मुरली, युसूफ ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत !

कालच्या पराभवाने सर्वांना वाईट वाटतय, पण धोनीच्या निर्णयांमुळे भारत हरला याचा काही सचिन भक्तांना फार आनंद झालाय :-(, त्यांच्या मते सचिनच्या २०० धावांच्या दैवी खेळी दरम्यान धोनीने साहेबांचे २०० होवू नयेत म्हणून फार उशिरपर्यंत स्ट्राइकच दिली नाही.
तसेच IPL च्या अंतिम सामन्यात धोणीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने सचिनच्या मुंबईला पराभूत केले. त्या सामन्यात धोणी, रैना, मुरली यांनी फार आनंद साजरा केला होता असे त्यांचे (भक्तांचे) म्हणने आहे.

>>त्यातच, आयपीएलने या फलंदाजांमध्ये स्वतःच्या आक्रमक खेळाबद्दल खोटाच आत्मविश्वासही निर्माण केला असावा असंही सतत वाटत; गंभीर, मुरली, युसूफ ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत !<<
यात गंभीर हा पहिल्या २०-२० विष्वचषकाचा एक हिरो होता व नंतरही त्याने भारता कडून चांगल्या खेळी केल्यात. बाकी पठाण आणि मुरली विजय बद्दल सहमत. अशा खेळपट्ट्यांवर उथ्तापा पण किती यशस्वी ठरला असता याबद्दल शंका आहे.

आणि IPLची कामगिरी ग्राह्य धरायची होती तर ओझाला वगळण्याचे कारण उमगत नाही.

<<गंभीर हा पहिल्या २०-२० विष्वचषकाचा एक हिरो होता व नंतरही त्याने भारता कडून चांगल्या खेळी केल्यात.>> एकदम मान्य. पण आपल्याला अजून लय सापडत नाही हे उमजून आक्रमतेला सुरवातीला थोडी मुरड घालणं, ही फलंदाजाला परिपक्वतेकडे नेणारी त्याची पायरी चुकली, हेही खरं.

आणि आता धोनीबुवा म्हणताहेत उरलेला श्रीलंकेसोबतचा सामना जिंकू. त्याचा आता काय उपयोग? बूंदसे गयी सो हौदसे नही आती ही म्हण त्याने झारखंडात ऐकली नसणार बहुतेक.

थोड्या जरतरच्या गोष्टी घडल्या तर कदाचित आपल्याला सेमीफायनलला जाता येईल.. म्हणजे..
ऑसीजनी वेस्ट इंडीजला प्रचंड फरकानी हरवायला पाहिजे आणि आपण पण लंकेला प्रचंड फरकानी हरवायला पाहिजे... पहिली गोष्ट शक्य आहे.. दुसरी काहीही घडू शकतं...

दुसर्‍या गटात पण अशीच मजा आहे... जर न्यूझीलंडनी इंग्लंडला हरवलं आणि आफ्रिकेनी पाकिस्तानला हरवलं तर नेट रनरेट वर कोणत्यातरी दोन टीम्स सेमीला जाणार. आणि जर इंग्लंडनी न्यूझीलंडला हरवलं आणि पाकिस्ताननी आफ्रिकेला हरवलं तर इंग्लंड नक्कीच सेमीत खेळणार आणि दुसरी टीम नेट रनरेट वर ठरणार..

<< पहिली गोष्ट शक्य आहे.. दुसरी काहीही घडू शकतं...>>इथं, ऑसीजना कोणत्या संघाशी [संभाव्य]फायनल खेळायला आवडेल, यावरही बरंच कांही अवलंबून आहे !!

आता एकदाचे श्रीलंकेशी हरून झाले की सुटलो ना आपण आयसीसी मधून?
लुध्यानाला बैसाखी दा मेला आहे, उथ्थे जाना होगा, एक रापचिक भांग्डा करना है, उथ्थे सोणि कुडीयाँ मिलेगी!! फिर गायेंगे: सुनो गौरसे दुनियावालो.. बुरी नझर हमपर ना डालो...
बडा मझा आयेगा, ये क्रिकेट वगैरा छोड दो!

त्या ललित मोदीने व एकुणच आय पि एल व २०/२० क्रिकेटचे खूळ काढणार्‍यांनी निव्वळ पैशाच्या हव्यासापोटी क्रिकेट या खेळाचा खुन केला आहे हे माझे स्पष्ट मत आहे. २०/२० ला क्रिकेट म्हणणे माझ्यातरी जिवावर येते. या फॉर्मॅटमधे कोणत्याही दिवशी कोणालाही मटका(हो मटकाच!) लागु शकतो. त्यामुळे भारत या स्पर्धेच्या बाहेर गेला काय का ही स्पर्धा जिंकला काय... मला तरी काहीही फरक पडत नाही. तिन तासात हा तमाशा(हो तमाशाच!)संपतो म्हणुन बघायला सोप्पा... टेस्ट मॅचेस सारखे ५ दिवस वाया जात नाहीत.. या हेतुने बघणारा वर्ग या फॉर्मॅटला लाभल्यामुळे क्रिकेटचे फार मोठे नुकसान झाले आहे.फक्त ३ आठवडे खेळुन जर किमार रोश,वेन पार्नेल व किरॉन पॉलर्डसारख्या अतिशय सुमार दर्जाच्या खेळाडुंना जर दशलक्ष डॉलर्स मिळणार असतील तर खेळाडुंना मी या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल दोषी ठरवणार नाही पण असल्या क्रिकेटमधल्या खर्‍या स्किलचा खुन करणार्‍या या रद्दड फॉर्मॅटला उचलुन घेउन या फॉर्मॅटला यशस्वी करायचे की नाही हे मात्र सर्वस्वी आपल्या हातात आहे असे मला वाटते.२० षटकात १५-२० षटकार व १५-२० चौकार बघायला मिळाले म्हणजे क्रिकेट बघताना किती मज्जा आली.. असे मानणार्‍या दर्शकवर्गाला काय म्हणायचे तेच कळत नाही.

या फॉर्मॅटने अतिशय उद्विग्न झालेला एक क्रिकेटप्रेमी

मुकुंद

झक्की Lol

ऑसी विंडीजला हारवेल कदाचित पण आपल्याला पहिले बॅटिंग करुन २२५ रन काढून त्यांना १३० मध्ये आउट किंवा त्यांची धावसंख्या १२ -१३ ओव्हर्स मध्ये पार करणे जमेल का?

त्यापेक्षा रापचिक भांगडा बरा वाटेल धोणी अन टीमला.

मुकुंद - बरेच जणं तुमच्या मताशी सहमत आहेत, पण जेंव्हा ५०-५० सुरु झाले त्याकाळात त्याला विरोध झाला होता. क्रिकेटचा कुठलाही फॉर्मॅट असुदेत, विकेट टिकविने व नेटाने खेळ करणे ही टीमच्या हाती आहे, ऑसींना २०-२० येत नाही असे लोक म्हणत होते, आज तसे कोणी म्हणू शकत नाही.

किमार रोश बद्दल सहमत. आपले लोक सुमार लोकांनाही विकेट देण्यात कमी पडत नाहीत. एखाद्याचे करियर करने व बिघडवने आपल्या टीमच्या हाती आहे ते उगीच नाही. ( त्या मेंडीसला लोक काय घाबरायचे मागच्या वर्षी, आता बिचारा मार खातोय ! )

कसोटी सामन्यात क्रिकेटचं सर्वच खरं कसब पणाला लागतं ,हे निर्विवाद. पण त्याचबरोबर टी-२० व एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेमुळे कसोटी सामने निर्णायक होण्याचं प्रमाण वाढलं आहे व कसोटी सामने कंटाळवाणे होऊन बंद पडण्याची खरीखुरी भिती दूर झाली आहे, हेही नाकारता येणार नाही. नवीन खेळाडूना आपलं कसब दाखवण्याची [पैसे मिळवून] व राष्ट्रीय संघात येण्याची अधिक संधी या सामन्यामुळे मिळते, हेही आहेच. शिवाय,क्षेत्ररक्षणाचा उंचावलेला दर्जा, अनेक नवीन कल्पक फटके [ रिव्हर्स फ्लिक/स्ट्रोक, "अगेन्स्ट द स्पीन" फटके इ.], गोलंदाजीत आलेली विविधता हें सर्व मर्यादित षटकांच्या सामन्यानी क्रिकेटला दिलेली बहुमोल देणगीच आहेत. नाविन्य संपल्यावर कदाचित टी-२०ची
लोकप्रियता कमी होईलही पण कसोटी सामने यापुढे अधिकाधिक रोचक व निर्णायक होणं अपरिहार्य होईल, हेही नसे थोडके !

ज्याप्रमाणे भारतीय संघात पठाण, मुरली विजय व जडेजा हे धोनीचे सख्खे जावई आहेत, त्याचप्रमाणे, न्यूझीलंडच्या संघात हॉपकिन्स हा व्हिटोरीचा जावई आहे. मॅकलमसारखा चांगला यष्टीरक्षक संघात असताना या हॉपकिन्सला यष्टीरक्षण का करायला देतात ते व्हेटोरीच जाणे. फलंदाजीत त्याने कधीही २ पेक्षा जास्त धावा केलेल्या दिसल्या नाहीत. त्याच्या ऐवजी ओरामला खेळविले तर न्यूझीलंड अजून चांगली कामगिरी करतील.

महिला विश्व टि२० मध्ये भारतीय महिला सेमी फायनला पोचल्या !! जय हो !

त्या चषकात सर्वात जास्त रन्स भारताच्या राज ने काढले आहेत. युनी टीम करता येत असेल तर उद्यासाठी घ्या.

मुकुंद्शेठ,
भा.पो. तरीपण t20/ipl चे फायदे (भाऊ ची पोस्ट) अनेक आहेत यात दूमत नाही.. दुष्परिणाम हाच की आपल्या इथल्या पाट्यांवर डाणपट्टे फिरवणारे आपले खेळाडू रातोरात हिरो होतात. मग बाहेर आफ्रिका, विंडीज मध्ये झीरो होतात, ते कळेपर्यंत हातातून तेल, तूप सर्व गेलेलं असत.. धोनीच्या अनाकलनीय निर्णय आणि कप्तानीचं खापर t20 format वर फोडता येणार नाहीये. रैना हा ipl चा हिरो असला तरी प्रत्त्येक सामन्यात त्याला बर्‍यापैकी जीवदानं मिळाली आहेत हे लोकं विसरतात. आफ्रिका, विंडीज, लंकेचे खेळाडू जीव (झेल) घेतात, दान म्हणून देत नाहीत, नेमका हाच फरक आहे. ऊसळते चेंडू झोपेतही व्यवथित खेळणारा मोहिंदर अमरनाथ पुन्हा जन्म घेत नाही तोवर आपल्या खेळाडूंचा नाच बघणे याला पर्याय नाही. लंकेविरुध्ध धोनी पुन्हा नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजी घेईल (चेस करताना रनरेट चे लक्ष्य समोर असल्याचे कारण देवून), अन वरातीमागून घोडे तसे चावला/मिश्रा आले तरी फिरकी सफाईने खेळणारे लंकेचे फलंदाज त्यांन्ना धुवून काढतील. तेव्हा "निक्काल" वेगळा अपेक्षित नाही...
dj mode
लंकेने सामना फिक्स केला असला तर आपण हवे तसे हवे त्या फरकाने जिंकू.. Happy

आपण इथे भारतीय क्रिकेट संघाच्या नावाने बोटे मोडतोय, पण तिकडे 'सुल्तान अझलन शाह' हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला ४-२ ने, कोरियाला ३-२ ने व काल ऑसिजना ४-३ ने हरवत धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. तसेच चीन बरोबर १-१ अशी बरोबरी करून गुणतक्त्यात प्रथम स्थान पटकावलेय. Happy आत्त पुढचा सामना मलेशिया बरोबर १२ मे ला आहे.

http://www.azlanshahcup.com/

ऑस्ट्रेलियाच्या नवख्या संघाने आपली चांगलीच दमछाक केली.

http://www.azlanshahcup.com/index.php?option=com_content&view=article&id...

अझलन शाह मधे सगळे देश आपले बेंचवरचे खेळाडू पाठवतात असे ऐकले. त्यामुळे हे बरे आहे, पण अगदी हुरळून जाण्यासारखे नाही.

>>अझलन शाह मधे सगळे देश आपले बेंचवरचे खेळाडू पाठवतात असे ऐकले. << अर्र, हे खरं असेल तर खरच जास्त हुरळून जाता कामा नये, पण हॉकी मध्ये अशा काही विजयांमुळे तरी लोकांना आपण हॉकीही खेळतो हे आठवत राहील. Happy

बाकी आज ऑस्ट्रेलिया आपल्या काही राखीव खेळाडूंना संधी देईल असे वाटते.
माजी विजेत्यांवर काय वेळ आलीय, पाकिस्तान इंग्लंडच्या क्रुपेने उपांत्य फेरीत गेले आत्ता भारताला ऑस्ट्रेलियावर अवलंबून राहावे लागतय (जर लंकेविरुध्द मोठ्या फरकाने जिंकले तरच ऑस्ट्रेलिया-विंडिज सामन्याला मह्त्व आहे)

Pages