टोमॅटो ची कोशिंबीर

Submitted by सुनिता on 31 March, 2010 - 23:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टोमॅटो ४ मोठे, कोथिंबीर आवडीनुसार, दही सायीचे २ मोठे चमचे, साखर १चमचा, मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

टोमॅटो धुवून स्वच्छ पुसून बारीक चौकोनी फोडी कराव्या. त्यात दही, साखर, मीठ टाकुन मिश्रण व्यवस्थित हलवावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. वाटल्यास जिरे, हिरव्यामिरचीची फोडणी घालावी किंवा फोडणी नाही घातली तरी कोशिंबीर छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेले प्रमाण ४ माणसांसाठी आहे.
माहितीचा स्रोत: 
आईकडून
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users