ऑप्शन्स ETC

Submitted by केदार on 26 February, 2010 - 11:44

F & O बद्दल माहिती.

F - Futures
O - Options

आज आपण ह्यातील ऑप्शन्स बद्दल बेसिक माहीती पाहू.

ऑप्शन म्हणजे एखादी अंडरलायिंग सेक्युरिटी (समभाग) एका भविष्यातील एका विशिष्ट किमतीला विकत घेण्याचा किंवा विकण्याचा अधिकार/ हक्क. ( right to buy or sell) पण ऑप्शन विकत घेतले पाहीजे असे काही नाही. ते स्वेअर ऑफ करता येते. ह्या सर्व शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत, पण बाजारात हिच भाषा चालते म्हणून मी ती वापरत आहे.

Nifty_Option.png

वरिल चित्रात अन्डरलायिंग सेक्युरिटी हा निफ्टी इंडेक्स आहे. त्यातील कॉलम कडे लक्ष द्या.

अन्डरलायिंग - सेक्युरिटीचे नाव, उदा, LNT, F, Apple, DJX इ इ.
एक्स्पायरी डेट - भविष्यातील निश्चित तारीख. ह्या दिवशीचा तो करार. भारतात दर महिन्याचा शेवटाचा गुरुवार ही त्या महिन्याची एक्स्पायरी डेट, तर अमेरिकेत तिसरा शुक्रवार.
स्ट्राईक प्राईज - तुम्हाला ज्या किमतीला ती सेक्युरिटी विकली जाईल ती किंमत. वरिल चित्रात विवीध स्ट्राईक प्राईज आहेत. ४०००, ४४००, ४५००, ४९०० इ इ
लॉट साईज - म्हणजे क्वांटिटी. एक लॉट हा साधारण ५० चा (निफ्टीसाठी) LNT साठी २००. भारतात लॉट साईज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एका कराराची किंमत ही ( ५० X ४९०० ) स्टाईक प्राईज एवढी होते.
ऑप्शन टाईप कॉल
.

ऑपश्नचे चार प्रकार आहेत.

लाँग कॉल (विकत घेणे)
लाँग पुट (विकत घेणे)
शॉर्ट कॉल (विक्री)
शॉर्ट पुट (विक्री)

आता हे कॉल अन पुट काय आहेत? ते समजावून घेऊ या.

कॉल म्हणजे एखादी सेक्युरिटी, एखाद्या विशिष्ट किमतीला, विशिष्ट दिवशी विकत घेण्याचा हक्क, पण ती विकत घ्यायलाच पाहीजे असे बंधन अजिबात नाही. (the right but not the obligation)

पुट म्हणजे नेमके उलट एखादी सेक्युरिटी, एखाद्या विशिष्ट किमतीला, विशिष्ट दिवशी, विकण्याचा हक्क पण बंधन नाही.

ह्या क्रियेतून वरिल चार प्रकार निर्माण होतात. आणखी काही उपयुक्त गोष्टी.

इन द मनी - वरिल चित्र नीट पाहा. त्यात स्पॉट प्राईज ४९२२ आहे तर स्ट्राईक प्राईज ह्या वेगवेगळ्या आहेत. कॉल ऑपश्न साठी इन द मनी म्हणजे स्पॉट प्राईज ही तुमच्या स्टाईक प्राईज पेक्षा जास्त आहे. उदा. निफ्टी स्पॉट ४९२२, पण तुमच्या कडे ४८०० चा भविष्यातील कॉल करार असेल तर तुमचे हे ऑप्शन इन द मनी आहे.

पुट ऑप्शन साठी मात्र हे उलट. म्हणजे स्पॉट प्राईज ही स्ट्राईक प्राइज पेक्षा कमी असते. उदा. निफ्टी स्पॉट ४९२२, पण तुमच्या कडे ५००० चा भविष्यातील पुट करार असेल तर तुमचे हे ऑप्शन इन द मनी आहे.

आउट ऑफ मनी -
कॉल ऑप्शन साठी स्पॉट प्राईज (सद्य किंमत) ही भविष्यातिल स्ट्राईक प्राईज पेक्षा कमी असते. उदा निफ्टी सद्य किंमत ४९२२ पण तुम्ही जर ५००० चा कॉल विकत घेतला तर अजूनही हे ऑपश्न आउट ऑफ मनी आहे.

पुट ऑप्शन साठी उलट म्हणजे सद्य किंमत ही भविष्यातिल स्ट्राईक प्राईज पेक्षा जास्त आहे. उदा निफ्टी स्पॉट ४९२२ पण तुमच्याकडे ४८०० किंवा ४९०० चा करार असला तर तो पुट आउट ऑफ मनी ठरेल.

पुढच्या भागात आणखी काही टेक्नीकल टर्मस जसे पाहू.

क्रमशः Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, खूपच छान माहिती देतोयस. मी एकदा वाचला लेख, आता परत एकदा शांतपणे वाचेन म्हणजे थोडं आणखी डोक्यात शिरेल.

हो. तसेच लिहीणार आहे, पण आधी फ्युचर्स /ऑप्शन्स बद्दलची भिती निघून जावी म्हणून त्याबद्दल थोडी माहीतीही लिहीणार आहे. थोडा वेळ कमी पडतोय. Happy सविस्तर लिहीनचं.

केदार,

कृपया ICICI किंवा इतर Online Trading Site वरून Profitable ऑप्शन्स ट्रेडिंग कसे करावे याबद्दल उदाहरणासहित सविस्तर लिहाल का?

ऑप्शन्स ट्रेडिंग कसे करावे याबद्दल उदाहरणासहित सविस्तर लिहीले का नाही अजून ??
वेळ काढा हो भाऊ थोडा आमच्यासाठी..
बाकी माहीती छान देत आहात, धन्यवाद..

फ्युचर्स म्हणजे काय?

नावाप्रमाने भविष्यात एका ठराविक दिवशी, ठराविक किमतीला विक्री किंवा खरेदीचा केलेला सौदा.

थोड सोपं करुन सांगतो. आज स्टीलचा रेट समजा ४५ आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की जुलै २०१० मध्ये तो ४७ होणार. तुमचा व्यवसाय आहे. जर स्टील महाग झाले तर तुम्हाला २ रु जास्त द्यावे लागतील. मग तुम्ही असा एखादा व्यक्ती शोधाल की जो जुलै मध्ये पण स्टील ४५ रु लाच विकायला तयार होईल, ते पण एप्रिल मध्ये. मग तुमच्यात असा करार झाला की
"२५ जुलै ह्या दिवशी तुम्ही १००० मे. टन स्टील ४५ रु किमतीला विकत घ्याल."
जर २५ जुलै रोजी किंमत ४५ च्यावर गेली तर तुमचा फायदा होईल, पण ती किंमत खाली असेल तर तुमचा तोटा होईल.
तुम्ही विकत घेतले म्हणून तुमची पोझिशन लाँग आहे, तर विक्रेत्याची शॉर्ट.

हेच मी शेअर्सच्या बाबतीतही करु शकतो, त्यालाच हेजिंग म्हणतात. हेज कसे करावे ह्याच्या कॉम्लेक्स स्ट्रटेजीज आहेत. तिकडे सध्या न जाता आपण सोप्या गोष्टी आधी पाहू.

ऑपश्नसला तुर्तास थोडे बाजूला ठेवून आयसीआयसीआय डिरेक्ट वरुन फ्युचर्स कसे घ्यायचे ह्याचे प्रात्यक्षिक आपण घेऊयात.
(उदाहरण जरी आयसीआयसीआय चे असले तरी हेच उदा. इतर ब्रोकरेज कंपन्यांना पण लागू होते, कारण हे सर्व सेबी रेग्युलेट करत असते.)

F&O_1.png

साइट मध्ये प्रवेश घेतल्यावर इक्विटीच्या बाजूला F&O असे बटन दिसेल. त्यावर क्लिक केल्यास F&O शी संबंधित असलेला मेन्यु येईल.

F&O_2.png

प्लेस ऑर्डर वर क्लिक केल्यास स्टॉक कोड ह्या बटनापाशी मोकळी जागा दिसेल. तिथे तुम्ही ज्या शेअर्सचे फ्युचर्स घ्यायचे आहेत, त्याचा आयसीआयसीआयशी संबंधित असणारा कोड टाकायचा. उदा. म्हणूनी मी निफ्टी दिला आहे. ( निफ्टी म्हणजे NSE).

F&O_3.png

वर निफ्टीशी संबंधित पुढील तीन महिन्यांचे कोट्स दिसतील. स्पॉट प्राईज बद्दल वर लिहीले आहे. इथे महत्वाचे म्हणजे एक्सपायरी डेटस. भारतात आधी लिहील्याप्रमाणे दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरी होते. दुसरा स्तंभ लॉट साईजचा आहे. भारतात प्रत्येक अंडरलाईंग सेक्युरिटाचा लॉट वेगळा आहे. निफ्टे ५०, लार्सन २०० इ इ. इथेच आपण विकत किंवा विकू शकतो.

F&O_4.png

गेट कोट वर क्लिक केल्यास त्यासंबंधी अजून माहिती मिळेल. जसे शेवटची किंमत,डे हाय, लो, व्हॉल्यूम, आणि किमतीमधील बदल.

F&O_5.png

आपण थोड कॉस्ट टू कॅरी वर देखील क्लिक करु.

इथे टाईम टू एक्स्पायरी म्हणजे राहिलेले दिवस, आणि कॉस्ट टू कॅरी म्हणजे आपल्याला द्यावे लागणारे व्याज. (त्या दिवशीचा व्याजदर, कॉन्ट्रॅक्टची किंमत, (स्पॉट आणि आपण देऊ पाहत असलेली. ) ह्या दरावरुन ते कॉन्ट्रॅक्ट महाग की स्वस्त आहे हे कळते.

हे पाहून तुम्ही मग ठरवू शकता की ते फ्युचर घ्यायचे की नाही? पण हे झाले घेण्याच्या प्रोसेस बद्दल. आता आपण थोडे घ्यायच्या आधीच्या प्रोसेस कडे वळूया.

फ्युचर्स व ऑपश्नस आधी लिहील्याप्रमाणे कॅश सेगमेंट आहे. इथे जो फायदा किंवा तोटा असतो तो पेपर लॉस नसतो, तर तेवढे पैसे त्या दिवशी वळते केले जातात. त्यामुळे जोखीम घेणारे लोकंच फ्युचर्स कडे वळतात. पण आपण, आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवेल्या पैशांवरच कसे फ्युचर्स घेऊ शकतो, व आपले पैसे (गुंतवलेले असताना सुद्धा) आणखी कसे वापरु शकतो ते पाहू.
सेबीने फ्युचर्स साठी पैश्यांसोबतच शेअर्सला देखील मार्जिन म्हणून वापरु शकतो हे घोषीत केले आहे. त्यामुळे सहसा मी माझ्या शेअर्सना ब्रोकर कडे तारण म्हणून ठेवतो, व त्यावर फ्युचर्स घेतो. हे तुम्ही ऑनलाईन करु शकता.

F&O_7.png

शेअर्स अ‍ॅज मार्जिन वर क्लिक केल्यावर तिथे डिपॉझिट असे बटन दिसेल, त्यावर तुम्ही लगेच जे शेअर्स विकणार नाहीत असे शेअर्स डिपॉझिट करा. प्रत्येक शेअरला एक हेअर कट नावाचा प्रकार असतो, तो वजा जाता, उरलेली रक्कम ही फ्युचर्ससाठी तुमचे पैसे म्हणून वापरली जाते. (मार्जिन मनी). त्या शेअर्सचा
भाव कमी जास्त झालाकी मार्जिन पण कमी जास्त होते. फ्युचर्सचे पैसे फुकटात वापरायला भेटत आहेत, म्हणून य फ्युचर्स घेऊ नका. फारतर एक किंवा दोन घ्या. कोणते फ्युचर्स कसे घ्यायचे ते मी परत लिहिन.
जर तुम्ही घेतलेल्या शेअर्सचा भाव कमी झाला व फ्युचर पोझीशन मध्ये लॉस होऊ लागला तर ब्रोकर लगेच ते डिपॉझिट केलेले शेअर्स तुमच्या संमतीविना विकून ते मार्जिन भरुन काढतो.

मी उदाहरण म्हणून वर माझ्या लिमिट पैकी दोन तीन शेअर्स दाखविले आहेत.

थोडक्यात काय तर माझ्या लिमीट क्रिएटेड रकमे एवढी रक्कम ही मार्जिन म्हणून मी वापरु शकतो. मार्जिन कसे काढायचे ते खाली पाहूया.

F&O_6.png

वर दाखविल्याप्रमाणे निफ्टीचे दोन लॉट विकत घ्यायला लागणारे मार्जिन साधारण ५८५०० रु आहे. हा भाव रोज खालीवर होत असतो. तेवढे पैसे तुम्ही जर जमा केले तर तुम्ही दोन लॉट विकत घेऊ शकता. ज्यांना पैसे ठेवून हे सर्व करायचे आहे, त्यांनी मॉडिफाय अलोकेशन मध्ये जाऊन बँकेतील पैसे तिथे भरावे.

हे झालं विकत घेण्याचे किंवा विकन्याचे. पण ही जी पोझिशन असते ती त्या डेटला किंवा आधी स्वेअर ऑफ म्हणजे विकावी किंवा विकत घ्यावी लागते.
F&O मधून ओपन पोझिशन्स नावाचे जे बटन आहे तिथे जा. तिथे क्लिक केल्यावर सर्व किंवा एकच पोझिशन, त्या त्या महिन्याशी संबंधित असणारी बघायला मिळेल. उदा. लार्सनची मे पोझिशन माझ्याकडे आहे, ती मला २९ मे पर्यंत कधिही विकता करता येते.

F&O_8.png

बेस प्राईज म्हणजे लार्सनच्या शेअरची (अंडरलायींग सेक्युरिटी) किंमत. म्हणूनच F&O ला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. फ्युचर्सची किंमत अंडरलायींग पेक्षा कमी असेल तर फ्युचर डिस्काउंट मध्ये आहे असे म्हणतात, तर किंमत जास्त असेल तर प्रिमियम मध्ये. जास्त किंमत ओपन इंटरेस्ट जास्त झाल्यावर पण होते. ते त्या सेक्युरिटीच्या भविष्यातील किमत काय असेल (बुल्स / बेअर्स फाईट) ह्याचे निर्देशक असते. फायदा किंवा तोटा बघन्यासाठी F&O मधील पोर्टफोलिओ डिटेल्स हे बटन वापरावे.

फ्युचर्स घेताना ओपन इंट्रेस्ट, डेल्टा, मार्केट सेंटिमेंट, इकॉनॉमी, कमोडिटी असेल तर सिझन्स, पिक कसे येईल? हे सर्व फॅक्टर्स उपयोगी पडतात, किंवा ह्यासर्वांचा फ्युचर्सच्या किमतीवर परिणाम होतो. OI व त्याचे परिणाम ह्यावर मी पुढे लिहेन.

केदारराव,

उत्तम माहितीबद्दल मनापासून धन्यवाद ! उरलेल्या माहितीची वाट पहात आहे.

एक शंका - Futures ची Settlement Compulsory असते. त्यामुळे NIFTY जर खाली गेला तर आपले नुकसान होईल. त्यामुळे NIFTY च्या Future च्या ऐवजी जर NIFTY चा Option घेतला तर फक्त Premium च जाईल. याविषयी सुद्धा ज्ञान द्याल का?

केदार खुप महत्वाची माहिती देत आहात.

थोडे थोडे वाचतेय आणि समजावुन घेतेय. मी एक्विटी मध्ये डिल केलेय पण फ्युचर वगैरे अजुन केले नाहीये. आता धीर गोळा करुन आणि तुम्ही देत असलेली माहिती वाचुन सुरवात करणार आहे.

ह्म्म.. परत एकदा वाचले.. सुरवात कराविशी तर वाटतेय. सध्या रोजच्या equities मध्येच डिलिंग चाललेय. आता याच्यात एकदा उडी घेऊन पाहते. Happy यानंतरचे दोन लेखही वाचले. अजुन काही माहिती द्यायची राहिली असेल तर कृपया द्या. Happy

"२५ जुलै ह्या दिवशी तुम्ही १००० मे. टन स्टील ४५ रु किमतीला विकत घ्याल."
जर २५ जुलै रोजी किंमत ४५ च्यावर गेली तर तुमचा फायदा होईल, पण ती किंमत खाली असेल तर तुमचा तोटा होईल.
तुम्ही विकत घेतले म्हणून तुमची पोझिशन लाँग आहे, तर विक्रेत्याची शॉर्ट.

यात फायदा कसा होईल ते सांगणार का?

म्हणजे बाजारभाव ५० असणार, पण मला ४५ ला मिळणार, मी ते लगेच ५० ला विकुन ५ रुपये कमावणार. असाच होणार ना फायदा?

म्हणजे बाजारभाव ५० असणार, पण मला ४५ ला मिळणार, मी ते लगेच ५० ला विकुन ५ रुपये कमावणार. असाच होणार ना फायदा? >> हो ४५ च्या वर जर त्या ऑप्शनला भाव येत असेल तर तुमचा फायदा अन्यथा तोटा.

विस्तृत लिहायचा विचार आहे.

विस्तृत लिहायचा विचार आहे>>>> मग कधी लिहीणार? लिहा लवकर! Happy
तुझ्यामुळे बर्‍याच गोष्टी नीट कळताहेत. आयसीआयसीआयवाले अश्या एखाद्या ट्रेनिंग सेशनचे ३/४ हजार घेतात .

केदार, ऑप्शन 'विकायला' किती मार्जिन लागते. ( म्हणजे ऑप्शनमध्ये शॉर्ट) ... समजा, इन्फो स्पॉट ३०५० आहे..... ३००० चा ऑक्टो २०१० चा कॉल आजच्या तारखेला १५० आहे. लॉट साइझ १२५.

मला मार्जिन किती लागेल? ब्रोकरेज किती लागेल?
कॉल आधी विकला की मला १५०*१२५ मिळनार...साधारण १८०००. शेवटच्या दिवशी इन्फो जर ३०५० च्या खालीच राहिला तर हा प्रिमियम मलाच रहाणार.. ( आपण पार्टी करु या.. Proud ).. किंवा २०-३० रुपये जरी कॉल राहिला, तर तेवढा घेऊन सौदा क्लिअर करावा लागेल. ( पण तरीही पार्टीसाठी पैसे शिल्लक राहतीलच Proud )

आय सी आय सी आय च्या अकाउम्टला एफ ओ मध्ये आफ्टर मार्केट ऑर्डर देण्याची सोय आहे का? म्हणजे संध्याकाळी निवाम्त बसून दुसर्‍या दिवशीसाठी ऑर्डर प्लेस करता येईल. एक्विटीला असा ऑप्शन बहुदा असतो... एफ ओ ची मला माहिती नाही...

जामोप्या आफ्टरमार्केट ऑर्डर आय सी आय सी आय मध्ये अजून नाही.

मला मार्जिन किती लागेल? ब्रोकरेज किती लागेल? >>

ऑप्शन मध्ये केवळ प्रिमियमच असते त्यामुळे मार्जिन नसते. ऑप्शनमध्ये शॉर्ट केले तर तुम्हाला प्रिमियम मिळेल. पण तोट्याची (म्हणजे परत तो खूप वाढला तर) विकून स्वेअर ऑफ करण्याची जबाबदारी तुमची.)

फ्युचर्स मध्ये प्रत्येक मार्केटचे (म्हणजे स्टॉकचे) मार्जिन वेगवेगळे असते. (कारण लॉट साईज वेगळा आहे), ऑर्डर द्यायचा आधी F&O मध्ये मार्जिन कॅलक्युलेअर आहे तिथे मार्जिन चेक करु शकतो. ब्रोकरेज हे सगळ्यांना तेवढ्याच % ने लागते.

आउट ऑफ मनी (लांबचे) ऑप्शन विकने ही पण एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. थोडाफार फायदा होतो. पण रिस्क भरपुर असते, किती रिस्क घ्यायची हे प्रत्येकाचा व्यक्तीमत्वावर अवलंबून आहे.

केदार, खालच्या इमेजेस बघ.
4.jpg19-OCT-2010 14:26 Option :- Buy NIFTY 6100 Call option at 89 Target 106. Stop loss 79

यात म्हटल्याप्रमाणे मी ऑर्डर दिलेली . ती त्यावेळच्या मार्केट प्राईसला मी दिली.
खाली त्याचा ट्रेड लॉग आहे.
1.jpg

नंतर मी ओपन पोजिशन पाहून ६२.५ ला स्क्वेअर ऑफ ऑर्डर दिली.

3.jpg

त्यानंतरची पोजिशन खालच्या चित्रात आहे.

2.jpg

सेल ऑर्डर एक्जेक्यूट झालेली नाहीये. आता ही पोजिशन तशीच पुढे जाईल की आजच्या दिवसात ती आहे त्या प्राईसला स्क्वेअर ऑफ होईल?हा सौदा नफ्यात आहे की तोट्यात ते पोर्टफोलिओ डिटेल्स वरून मला कलले नाही!

तसेच वरील सगळ्याचा अभ्यास करून यातल्या त्रुटी विशद कर!

काय करायला हवे होते वगैरे!

6.jpg5.jpg

वरील दोन चित्रांवरून मला इतके कळले की प्रिमियम म्हणून माझे २६३५ वजा झाले आहेत.

पण सेल ऑर्डर एक्जेक्यूट न झाल्याने त्याचे कॅश प्रोजेक्शन दिसत नाहीये का?

ऑप्शनच्या डिस्कशनमध्ये एक महत्वाचा मुद्दा इथे डिस्कस झालेला नाही... तो म्हणजे टाइम डिके..... जसजसे एक्स्पायरीची तारीख जवळ येईल तसतसे हातात दिवस कमी होत जातात, त्यामुळे कॉलची किंमत आपोआपच घटत जाते.. त्यामुळे शेअरची किंमत वाढली तरी कॉल त्या प्रमाणात वाढेलच असे नाही... ( कारण शेवटी, तुम्ही कॉल विकता म्हणजेच तो कुणीतरी खरेदी करत असते.. तुम्ही तुमचा कॉल ४० ला १० तारखेला घेतला.. तेंव्हा तुमच्या हातात २० दिवस होते. तुम्ही १८ तारखेला तो ६० ला विकला, तर तो कॉल ६० ला तुमच्याकडून घेणारा माणूसही उरलेल्या १२ दिवसात कॉल आणखी वाढेल का हे बघणारच . त्याच्या हातात आता १२ च दिवस असणार. त्यामुळे त्याला मार्केट फेवरेबल वाटले तरच तो विकत घेणार.. ( अर्थात एवढे त्याला समजत असेल तर.. Proud ) ) त्यामुळे दिवसेदिवस कॉलची वाढण्याची शक्ती डिके होत जाते..... हा प्रॉब्लेम फ्युचरला नसतो. तिथे शेअरची किंमत जितकी होईल तितकाच फ्युचरही वाढतो/ घटतो. त्यामुळे कॉल मधून लवकरात लवकर बाहेर पडावे... यात एक स्ट्रॅतेजी ठेवतात.. एकदम २ कॉल घ्यायचे. ७-८ दिवसात पहिल्या चांगल्या प्रॉफिटला एक विकायचा.. दुसरा थोडा रिस्क घेण्याचा चान्स देतो.... )

रिअलाइज्ड लॉस.. तुम्ही कॉल बाय केला आहे, तेंव्हा पैसे घालवलेले असतात. म्हणून खरेदी किं. ५२. ७० * ५० = २६५०. हा तुमचा रिअलाइज्ड लॉस झाला. हेच आजचे कॅश प्रोजेक्शन आहे. ( यात ब्रोकरेजचा हिशोब येत नाही. तो वेगळा असतो.)

आता कॉल विकून जी किंमत येईल तो म्हणजे तो तुमचा नफा. आता इथे प्रत्यक्षात आजच्या कोणत्याही किंमतीला तुम्ही तो विकलेला नाही. त्यामुळे मार्केट बंद होतानाची प्राइस ४५.९५ * ५० = २२९७.५० हा सध्या अनरिअल प्रॉफिट आहे.

अनरिअल आणि रिअल यातला फरक जर + असेल तर तुम्ही फायद्यात आहात, अन्यथा नाही. सध्या तुम्ही लॉस मध्ये आहात. पण अनरियल , -३५२.५०

ख आणि वि दोन्ही झाले की त्यानुसार रिअल प्रॉफिट किंवा रिअल लॉस दाखवेल. तेंव्हा अनरिअल मध्ये बहुतेक काही दिसणार नाही आणि रिअल च्या कॉलमला + किंवा - काहीतरी येईल.. ( + झाले की पार्टीला बोलवा.. Happy )

तुमची सेल ऑर्डर एक्षिक्युट झालेली नाही. ती आज एक्स्पायर होते. उद्या पुन्हा नवी ऑर्डर द्या... तुम्ही कॉल विकला नाहीत तर एक्स्पायरच्या दिवशी आपोआप सौदा होतो... तुम्ही फायद्यात असाल तर फायदा अकाउंटला... पण निफ्टी तुमच्या स्ट्राइक प्राइसच्या वर वाढला नाही की टाइम डिके होऊन कॉल शून्य होतो.. ( कॉल लॉस मध्ये विकण्याऐवजी तो असा शून्य होऊ दिला की एक फायदा होतो. विकायचे ब्रोकरेज लागत नाही.. Proud )

आणखी एक अतीमहत्वाचे, कधीही मार्केट ऑर्डर शक्यतो देऊ नये. तुम्ही कॉल खरेदी ऑर्डर देत असताना ५२.५० ला होता. पण मार्केट ऑर्डरमुळे तो त्या क्षणाच्या प्राइसला ५२.७० ला आला..... आता २० पैशाचा डिफ्रन्स ही किरकोळ बाब आहे. पण कधीकधी हा गॅप फार मोठाही असू शकतो.... अर्थात ज्यांची उलाढाल मोठ्या संख्येने होते, तिथे असे फटके किरकोळ असतात. पण जिथे शेअरची उलाढाल ( वॉल्युम) कमी असतो अशा सौद्यामध्ये कधीही आपली किंमत प्लेस करावी... मार्केटच्या त्या क्षणाच्या सध्याच्या प्राइसपेक्षा मुद्दाम १० पैसे चढ्या ऑर्डरने तुम्ही घ्या, एकवेळ ते परवडते... पण हातात वेळ भरपूर असेल, तर मार्केट ऑर्डर नको.

Pages