ऑप्शन्स ETC

Submitted by केदार on 26 February, 2010 - 11:44

F & O बद्दल माहिती.

F - Futures
O - Options

आज आपण ह्यातील ऑप्शन्स बद्दल बेसिक माहीती पाहू.

ऑप्शन म्हणजे एखादी अंडरलायिंग सेक्युरिटी (समभाग) एका भविष्यातील एका विशिष्ट किमतीला विकत घेण्याचा किंवा विकण्याचा अधिकार/ हक्क. ( right to buy or sell) पण ऑप्शन विकत घेतले पाहीजे असे काही नाही. ते स्वेअर ऑफ करता येते. ह्या सर्व शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत, पण बाजारात हिच भाषा चालते म्हणून मी ती वापरत आहे.

Nifty_Option.png

वरिल चित्रात अन्डरलायिंग सेक्युरिटी हा निफ्टी इंडेक्स आहे. त्यातील कॉलम कडे लक्ष द्या.

अन्डरलायिंग - सेक्युरिटीचे नाव, उदा, LNT, F, Apple, DJX इ इ.
एक्स्पायरी डेट - भविष्यातील निश्चित तारीख. ह्या दिवशीचा तो करार. भारतात दर महिन्याचा शेवटाचा गुरुवार ही त्या महिन्याची एक्स्पायरी डेट, तर अमेरिकेत तिसरा शुक्रवार.
स्ट्राईक प्राईज - तुम्हाला ज्या किमतीला ती सेक्युरिटी विकली जाईल ती किंमत. वरिल चित्रात विवीध स्ट्राईक प्राईज आहेत. ४०००, ४४००, ४५००, ४९०० इ इ
लॉट साईज - म्हणजे क्वांटिटी. एक लॉट हा साधारण ५० चा (निफ्टीसाठी) LNT साठी २००. भारतात लॉट साईज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एका कराराची किंमत ही ( ५० X ४९०० ) स्टाईक प्राईज एवढी होते.
ऑप्शन टाईप कॉल
.

ऑपश्नचे चार प्रकार आहेत.

लाँग कॉल (विकत घेणे)
लाँग पुट (विकत घेणे)
शॉर्ट कॉल (विक्री)
शॉर्ट पुट (विक्री)

आता हे कॉल अन पुट काय आहेत? ते समजावून घेऊ या.

कॉल म्हणजे एखादी सेक्युरिटी, एखाद्या विशिष्ट किमतीला, विशिष्ट दिवशी विकत घेण्याचा हक्क, पण ती विकत घ्यायलाच पाहीजे असे बंधन अजिबात नाही. (the right but not the obligation)

पुट म्हणजे नेमके उलट एखादी सेक्युरिटी, एखाद्या विशिष्ट किमतीला, विशिष्ट दिवशी, विकण्याचा हक्क पण बंधन नाही.

ह्या क्रियेतून वरिल चार प्रकार निर्माण होतात. आणखी काही उपयुक्त गोष्टी.

इन द मनी - वरिल चित्र नीट पाहा. त्यात स्पॉट प्राईज ४९२२ आहे तर स्ट्राईक प्राईज ह्या वेगवेगळ्या आहेत. कॉल ऑपश्न साठी इन द मनी म्हणजे स्पॉट प्राईज ही तुमच्या स्टाईक प्राईज पेक्षा जास्त आहे. उदा. निफ्टी स्पॉट ४९२२, पण तुमच्या कडे ४८०० चा भविष्यातील कॉल करार असेल तर तुमचे हे ऑप्शन इन द मनी आहे.

पुट ऑप्शन साठी मात्र हे उलट. म्हणजे स्पॉट प्राईज ही स्ट्राईक प्राइज पेक्षा कमी असते. उदा. निफ्टी स्पॉट ४९२२, पण तुमच्या कडे ५००० चा भविष्यातील पुट करार असेल तर तुमचे हे ऑप्शन इन द मनी आहे.

आउट ऑफ मनी -
कॉल ऑप्शन साठी स्पॉट प्राईज (सद्य किंमत) ही भविष्यातिल स्ट्राईक प्राईज पेक्षा कमी असते. उदा निफ्टी सद्य किंमत ४९२२ पण तुम्ही जर ५००० चा कॉल विकत घेतला तर अजूनही हे ऑपश्न आउट ऑफ मनी आहे.

पुट ऑप्शन साठी उलट म्हणजे सद्य किंमत ही भविष्यातिल स्ट्राईक प्राईज पेक्षा जास्त आहे. उदा निफ्टी स्पॉट ४९२२ पण तुमच्याकडे ४८०० किंवा ४९०० चा करार असला तर तो पुट आउट ऑफ मनी ठरेल.

पुढच्या भागात आणखी काही टेक्नीकल टर्मस जसे पाहू.

क्रमशः Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक राजा होता.

एकदा त्याच्याकडे दोन विणकर आले आणि म्हणाले आम्ही तुम्हाला एक सुंदर वस्त्र विणून देऊ, जे फक्त पुण्यवान लोकानाच दिसेल.

झाले, राजा खुष, दिली त्याने परवानगी त्याना.

ते बसले वस्त्र विणत. काही लोकाना रोज किती धागे खाली वर झाले, याची चिंता, ते रोजच यायला लागले. काही आठवड्याची हालचाल बघायला यायला लागले. काही म्हणाले, आम्ही सारखे सारखे न्हाय बघत. एकदाच बघू, फुल अँड फायनल. कोण म्हणतोय लाल धागे खाली चालले, कोण म्हणतोय हिरवे धागे वर चालले.

पण गंमत ही की कुणाला कापड दिसतच नव्हतं. पण सांगायची सोय नाही. सगळे रोज गोडवे गात होते, वा काय छान वस्त्र आहे.

आणि अखेर राजाची त्या वस्त्रात मिरवणूक निघाली. प्रतेकजण म्हणतोय.. वा काय छान वस्त्र आहे !

पण गर्दीतला एक लहान मुलगा वराडला.. आरं, राजा तर नागडाच हाये !

आणि मग लोक वस्तुस्थितीची जाणीव होऊन खजील झाले.

त्या लहान मुलाने नंतर अमेरिकेत जन्म घेतला. आणि नंतर आयुष्यात एकदा असेच तो उद्गारला:

Derivatives are financial weapons of mass distruction !

( ते विणकार आजकाल शेअर मार्केट मध्ये ब्रोकर आणि मार्केट एक्सपर्ट म्हणून कामं करतात, असं कानावर आलय .)

आणि त्या लहान मुलाचं नाव काय???

मलाच इचारताय व्हय? दिसतय न्हवं माझ्या प्रोफाइलवर तेचं नाव आणि फोटो ??
http://www.myloansconsolidated.com/2010/08/25/derivatives-are-financial-...

‘M’ ग्रुपचे शेअर्स जर घ्यायचे असतील तर ते बल्क मध्येच घ्यावे लागतात का? या ग्रुपबद्दल माहिती असेल तर लिहा जरा..

Pages