सचिनचं द्विशतक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज सचिनने आंतरराष्ट्रिय एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवलं..
सचिनच्या विक्रमांच्या मांदियाळीत अजून एका विक्रमाची भर..

त्याला मानाचा मुजरा!!!

15_sachin_tendulkar_2.jpg

देवा, आमचा प्रणाम स्वीकार!!!

विषय: 
प्रकार: 

सचिनचे पराक्रम काय वर्णावे
पायीचे त्याच्या तिर्थ घ्यावे
असा सुपुत्र वंदनीय जगी
आबालवृद्धांचा रोल मॉडेल व्हावे !

ग्रेट शब्दही अपुरा वाटतोय !
त्याच्याकडे बॅटच्या जादूपेक्षाही अजून खूप काही आहे
ज्याच्यामुळे त्याला ही करामत साधत असावी !

सचिन चे व चाहत्यांचे ही अभिनंदन! आठवा त्या सगळ्या १५०+ वाल्या मॅचेस आणि आपण काय काय करत होतो ते Happy

धोनीने आत्तापर्यंत तरी अशा बाबतीत कद्रू पणा दाखवलेला नाही.

'कुणाशी तरी बोलायचय'
गेलेला आत्मविश्वास कसा परत मिळवावा?
वाईट्ट स्वप्नं पडतात. काय करु?
- दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज
Proud

सच्चिsssssssss न सच्चिन!

खूप दिवसांपासुन अशी इच्छा होती की वनडेतला २०० धावांचा विक्रम सचिनने केलेला पहायला मिळावा..
आणि आज ती इच्छा भरभरून पूर्ण झाली.. आज सचिन सुरूवातीपासुनच पूर्ण आत्मविश्वासानेच खेळत होता.. अगदी डेल स्टेनची बॉलिंगसुध्दा सोडत नव्हता... तेव्हाच जाणवलं की आज सचिन काहीतरी खास करून दाखवणार.. आणि सच्याने जे काही करून दाखवलं त्याला तोड नाही.. :).. सचिन,तू एकमेवाद्वितीय आहेस....

मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो....सचिनचे सगळे विक्रम पाहु शकलो... Happy
सचिन तु असाच खेळत रहा !!

२०० तल्या १०० धावा केवळ चौकार.... धन्य आहे.. काय माणूस आहे हा! ग्रेsssssट

सर्व क्रिकेट प्रेमींचे अभिनंदन!!!!!

लिम्बु ,

त्यात काय ? सचिनन साउथ अफ्रिका सारख्या फालतु टीम विरुध काढल्या , स्टेन , Langerveldt , पार्नेल , कॅलिस हे काय बॉलर आहेत ? Fielding करता तरी येते का त्या टीमला ? Happy

आमचा पॉन्टिन्ग बघा . इन्ग्लन्ड , पाकिस्तान , वेस्ट इन्डिज सारख्या भारी टीम विरुद्ध शतकं मारतो .

गुरूजी
>>एक दुरुस्ती. सचिनने आज सईद अन्वर व झिंबाब्वेचा चार्ल्स कॉन्वेंट्री या दोघांचाही विक्रम मोडला आहे.
सईद अन्वरच्या नावाने जेवढी आजवर वेदना दिली आहे, तेवढी त्या कॉन्वेंट्रीने नाही. अन्वरने रनर घेऊन १९४ काढले, आपल्या विरुद्ध. त्यातला आपल्या विरुद्ध हा भाग मला जास्त सलत आला आहे आजवर.

पण या उप्पर नाही !

GOD is great !

गुरूजी, पण त्यावेळची आपली बोलिंग पाहता आपण बांगलादेश वि. काढलेल्या शतकाला जेवढे महत्त्व देतो तेवढेच द्यायला पाहिजे त्याला Happy वे़कटेश प्रसाद त्याच्या त्या स्लो, शॉर्ट आणि वाईड मोड मधे होता, जयसूर्या विरूद्ध असायचा तसा. (हाच प्रसाद जेथे बॉल स्विंग होत असे तेथे पाच पाच विकेट्स काढायचा).

मला आठवते बहुतेक याच मॅच मधे सचिन ने ऑफ वरून जाणारा बॉल जोरात मारला होता पण थर्ड मॅन ला कॅच गेला होता. सेंच्युरियन ला तशाच शॉट ला सिक्स बसली होती.

द गार्डियन मधे एका लेखकाने 'काहीतरी घेउन' लेख लिहीलेला दिसतो Happy
http://www.guardian.co.uk/sport/2010/feb/24/sachin-tendulkar-india-world...

लेखाच्या शेवटी बघा "He was briefly dropped by India in 2007..."

ही एखादी क्षुल्लक चूक नाही स्कोर चुकीचा लिहीण्यासारखी. येथे लिहीणार्‍याला भारतीय क्रिकेट आणि सचिन चे त्यातील स्थान वगैरे काहीच नीट माहीत नसावे असे दिसते.

महान! सचिनचं मनापासून अभिनंदन...
सईद अन्वरचा आपल्याविरुध्द असलेला रेकॉर्ड मोडला ह्याचा फार आनंद झालेला आहे... Happy

आता सचिनला २०० कोटी रु. करमुक्त द्या. सर्व क्रिकेट खेळाडूंना कर माफी. सर्व क्रिकेट सामन्यांना, आय पी एल ला, आणि सर्व क्रिकेट मंडळांना करमाफी!!

गेल्या २० वर्षांतील यशस्वी घोडदौडीनंतर हि सचिनच्या मनांत कुठेतरी एक खंत होती.

"सरांनी मला अजुन वेल डन म्हटलं नाही".

आजच्या अविस्मरणीय खेळीने (नाबाद २००) संपूर्ण जगाचे डोळे तर दीपलेच, त्याचबरोबर सचिनच्या लाडक्या सरांच्या डोळ्यांचेही पारणे फिटले. त्यांच्याच शब्दातुन व्यक्त झालेल्या भावना "सामना" त वाचा. (मुख्य पानावर, द्वारकानाथ संझगिरींच्या लेखाच्या खाली)

http://saamana.com/

पत्रकारांशी बोलताना सचिन म्हणाला, "The ball was coming nicely on to the bat."

यालाच "मॉडेस्टी" म्हणतात नाही कां? Happy

आत्ताच हायलाईट्स पाहिले , जबरदस्त मझा आली बघायला . Happy
मला धोनीच सचिनला १९९ वर असताना लवकर स्ट्राईक न देण खटकलं . असो शेवट गोड तर सगळचं गोडं .

महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बलिंडा क्लार्कने डेन्मार्कविरुध्द्द एकदिवसीय सामन्यात नाबाद २२९ धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया वि. डेन्मार्क हा सामना First Class Cricket मध्ये गणला जातो कां? हे पाहावे लागेल. Happy

पण सचीन तो सचीनच ! खरेतर धोनीचा इतका राग यायला लागला होता, पण मग सचीनला एक - दोन वेळा कंबर चोळताना बघीतले आणि परिस्थीती काय असेल ते लक्षात आले. धोनीचे आभार....

कालचा सामना बघताना जो थरार जाणवता होता, तो यापुर्वी कधीच जाणवला नव्हता. सचीन संपला म्हणणारे आता तोंड लपवून फ़िरत असतील. Happy

अभिनंदन विक्रमादित्या ! लवकरच तुझे शतकांचे शतक पुरे होवो हिच इश्वरचरणी प्रार्थना.

"सचिन रेकॉर्डकर".................................. Happy सचिन तुझे सलाम.

काल ट्रेनमधे होतो. सगळ्यंच लक्ष तिथेच. शेवटी २०० झाले आणि डब्यात काय कल्ला झाला राव! आपली पिढी भाग्यवान की सचिन खेळताना पहायला मिळाला. Happy

'सच' अ मॅन
'सच' अ लाईफ
'सच' अ धडाका!

Happy

सोला आने सच!! जियो! जियो!! शब्दच फुटत नाहीयेत!! खूप खूप अभिमान वाटतोय!

आमच्या ग्रुप मधला एक मित्र म्हणाला ' सचिनने शतक केले तर वडापावची पार्टी ,द्विशतक केले तर फाइव स्टार होटेल मधे पार्टी !!'

त्यामुळे आज आमची मज्जा!! Happy फाइव स्टार नाही..(ग्रुप मधे १४ लोक) पण 'करी ओन द रुफ' Happy

सचिन जिन्दाबाद..

सचिनसारखा एकमेवाद्वितीय तोच वगैरे वगैरे सगळ्यांना माहितीये आता. पण आजपर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीत तो कधीच कोणत्या वादात अडकला नाही, आणि इतक्या उंचीवर पोहोचूनही पाय अजून जमिनीवर आहेत त्याचे. असा माणूस सापडणं कठीण आहे खरंतर. सिंपली ग्रेट.....

हे मेल मधून आलेलं.. सगळ्यांसोबत शेअर करावंसं वाटलं म्हणून..

To all those who idolize the genius named “SACHIN TENDULKAR”!!!

@Hashim Amla

"Nothing bad can happen to us if we're on a plane in India with Sachin
Tendulkar on it."
Hashim Amla, the South African batsman, reassures himself as he boards a
flight

@yaseer hameed

"Sometimes you get so engrossed in watching batsmen like Rahul Dravid and
Sachin Tendulkar that you lose focus on your job."

"To Sachin, the man we all want to be"
- What Andrew Symonds wrote on an aussie t-shirt he autographed specially
for Sachin

Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there
is something we don't know, something beyond scientific measure. Something
that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even
those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When
he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their
lives "
BBC on Sachin

But the finest compliment must be that bookmakers would not fix the odds -
or a game - until Tendulkar was out.
"Tuzhe pata hai tune kiska catch chhoda hai?"
"Tuzhe pata hai tune kiska catch chhoda hai?" Wasim Akram to Abdul Razzaq
when the latter dropped Sachin's catch.

@Brian Charles Lara again
Sachin is a genius. I'm a mere mortal.

Mark Taylor
"We did not lose to a team called India...we lost to a man called Sachin" -
Mark Taylor, during the test match in Chennai (1997)

@M. L. Jaisimha:
"The more I see of him the more confused I'm getting to which is his best
knock."

@McGrath
"The joy he brings to the millions of his countrymen, the grace with which
he handles all the adulation and the expectations and his innate humility -
all make for a one-in-a-billion individual,"

@Wife Anjali
"I can be hundred per cent sure that Sachin will not play for a minute
longer when he is not enjoying himself. He is still so eager to go out
there and play. He will play as long as he feels he can play,"

by HAYDEN - i feel is the best SACHIN QUOTE
he said
"I HAVE SEEN GOD, HE BATS AT NO.4 FOR INDIA"

"Even my father's name is Sachin Tendulkar."
Tendulkar's daughter, Sara, tells her class her father's name after the
teacher informs them of a restaurant of the same name in Mumbai

KUMBLE : I am fortunate that I've to bowl at him only in the nets!

@ shahrukh
quoting Shahrukh from an interview
Que: Who do you think as most important celebrity ?
Shahrukh: There was a big party where stars from bollywood and cricket were
invited. Suddenly, there was a big noise, all wanted to see approaching
Amitabh Bachhan.
Then Sachin entered the hall and Amitabh was leading the queue to get a
Grab of the GENIUS!!

@Navjot Singh Sidhu
India me aap PrimeMinister ko ek Baar Katghare me khada kar sakte hain..Par
Sachin Tendulkar par Ungli nahi utha Sakte..

@waqar younis
He can play that leg glance with a walking stick also .

A banner once said-' I WILL SEE GOD WHEN I DIE BUT TILL THEN I WILL SEE
SACHIN ' that quiet defines Sachin-The greatest.

Sachin Tendulkar has often reminded me of a veteran army colonel who has
many medals on his chest to show how he has conquered bowlers all over the
world -- Allan Donald

And i remember reading in one of Allan Donald's interview. This interview
was in Cricket Talk and 7-8 yrs ago.
I was bowling to Sachin and he hit me for two fours in a row. One from
Point and the other in between point and gully. That was the last two balls of the over and the
over after that we (SA) took a wicket and during the group meeting i told Jonty (Rhodes) to
be alert and I know a way to pin Sachin. And i delivered the first ball of my next over
and it was a fuller length delevery outside offstump. And i shouted catch. To my
astonishment the ball was hit to the cover boundary. Such was the brilliance of Sachin. His
reflex time is the best i have ever seen. Its like 1/20th of a sec. To get his wicket better not
prepare. Atleast u wont regret if he hits you for boundaries.

Peter Rebouck - aussie journalist
On a train from Shimla to Delhi, there was a halt in one of the stations.
The train stopped by for few minutes as usual.
Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway
officials, everyone on the train waited for Sachin to complete the century.
This Genius can stop time in India!!

NKP Salve, former Union Minister
This was when he was accused of ball tempering
"Sachin cannot cheat. He is to cricket what (Mahatma) Gandhiji was to
politics. It's clear discrimination."

Andy Flower:
There are 2 kind of batsmen in the world. One Sachin Tendulkar. Two all the
others.

मी अजून एक वक्तव्य उद्धृत करेन. गावस्करचे वक्तव्य आहे हे
"he has really घेतली of Ashley Giles here"
अ‍ॅशले जाईल्स आउटसाईड लेग स्टंप बॉल टाकत होता. सचिनने त्यावरही दोन चौकार मारले. कॅमेरा बॉलबरोबर बाऊंड्री पर्यंत जाऊन मग प्रेक्षकांवर फिरला. एकाने हातात फलक धरला होता 'sachin gheun taak'. त्यानंतरचे गावस्करचे वाक्य.

Pages