सचिनचं द्विशतक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आज सचिनने आंतरराष्ट्रिय एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवलं..
सचिनच्या विक्रमांच्या मांदियाळीत अजून एका विक्रमाची भर..

त्याला मानाचा मुजरा!!!

15_sachin_tendulkar_2.jpg

देवा, आमचा प्रणाम स्वीकार!!!

विषय: 
प्रकार: 

माझा पण मानाचा मुजरा! Happy
आजचं द्विशतक खरं एकमेवाद्वितीय म्हणता येईल असं. एक दिवसीय सामन्यांत सचिनच नाही, तर कुणीच केले नव्हते. (चु.भु.दे.घे. आणि जाणकारांनी बैजवार लिहावे, ही विनंती.)

जियो, सचिन. Happy

साहेब, तुम्ही फोडलत, झोडलत!
तुमची किर्ती आचंद्रसूर्य राहो ही ईशचरणी प्रार्थना! Happy

आपला पण मुजरा!!
भारता विरुद्ध सईद अनवर नी १९४ केले तेव्हा इतका वैताग आला होता. म्हंटलं कधी भारताचे दिवस यायचे. आज तो दिवस आला!
सचिन सारख्या खेळाडू कडुनच हा विक्रम होणं साजेसं होतं!

सच्चिन... सच्चिन....

ग्राऊंडमधे जाऊन जोरात ओरडावंसं वाटत होतं...

ग्रेट.. सचिन इतका पुढे गेलाय विक्रमांच्या बाबतीत की त्याला गाठणे कोणालाच शक्य नाही आता...
जिओ मेरे लाल.....

ग्रेट! Happy
(अन तरी साले आमच्याकडचे काही नतद्रष्ट लोक फुसकुली सोडणार की सचिन स्वतःच्या विक्रमाकरता खेळतो, तो जेव्हा शतक करतो तेव्हा भारत हरतो वगैरे! अस्ल्या लोकान्ना धरुन बदकल पाहिजे)

राजे मुजरा स्विकारावा!!

आज सक्काळी सक्काळी उठून जेंव्हा तुम्ही काही शॉटस पाहीले, तेंव्हाच कळले की आज अफ्रिकेचे काही खरे नाही, तसे आम्ही इथे मांडलेही. आपण आमच्यासारख्या क्रिकेट वेड्यांच्या मनातली गोष्ट वाचलीत अन ती साकारलीत, हे आमचे भाग्य म्हणावे की तुमची आमचे मन वाचन्याची शक्ती!

मध्ये सलग दोन ओव्हरला शेवटच्या बॉलला धोणी एक धाव घेत होता, तेंव्हा भारताचे रन जास्त होत आहेत ह्याचा बिलकुल आनंद होत नव्हता, तर तुमची एक धाव अजूनही बाकी आहे, अन तो धोणी तुम्हाला स्ट्राईक देत नाही ह्याचाच जास्त राग येत होता. पण राजे, धोणी देखील तुमचा चाहता आहे हे आम्ही विसरलो, तो तुम्हाला आराम मिळावा म्हणून न पळायला लावणार्‍या शॉट्स मारत होता. ४८ व्या ओव्हरला तुम्ही कलीसचे एक दोन बॉल फारच डिफेन्ड केले, तेंव्हा एकदम हार्ट रेट १८० वर गेला होता महाराजा!! कधी नव्हे ते देव आहे ह्यावर विश्वास बसायला सुरु झाला, अन देवा प्लिज, प्लिज फक्त एक धाव काढू दे, तो थकला आहे, वाटल्यास मी त्या वाटचे आजचे त्याचे वर्काउट करुन स्वतःला ऑट करुन घेईल पंण प्लिज एकच रे, एकच धाव. ती झाली. बास. आज काहीही नको.
देव आहे बहुदा. त्याने माझेही ऐकले अन सच्याचेही. बास्त आता तो रेकॉर्ड वाटल्यास पाँटिंगला मोडूदेत, आय डोन्ट केअर, कारण सच्या म्हणजे रेकॉर्ड करणारी मशीन नाही, तर तो स्वतःच एक रेकॉर्ड आहे.

(भावना फार उचंबळून येत आहेत, पुढचे नंतर Happy )

Sacha_200.jpg

माझ्याकडूनही सचिनला सॅल्यूट. आजच्या या ऐतिहासिक खेळाची मी कोरियात बसून साक्षीदार झाले ह्याचा खूप आनंद होतो आहे.

साजिरा तुम्ही बरोबर लिहीलयंत. सचिनने आज सईद अन्वरचा रेकॉर्ड मोडला आहे.

गो सचिन !!!!
नंदिनी.. आमचा कॉल चालू होता तेव्हा आणि लोकं (मी धरून) कॉलवरच जोरात ओरडली.. कारण सगळ्यांचं लक्ष स्कोर बोर्ड कडे होतच !!!!

खूप अभिनंदन सचिनचे..

ज ब र द स्त !! सचिन म्हणजे सचिन म्हणजे सचिनच आहे फक्त!! Happy
मला नाही बघायला मिळाली ही(पण्)इनिंग Sad

मी शेवटी शेवटी बघितली. दुसर्‍या बाजूला धोनी पण बत्ती लावल्यागत गोलंदाजांना उचलून फेकत होता. भारी इनिंग दोघांची.

भारत चारशे. सचिन दोनशे.

तो तुम्हाला आराम मिळावा म्हणून न पळायला लावणार्‍या शॉट्स मारत होता.
>>
आयला, खरेच की रे केदारा. मला पण तेव्हा राग आला होता बघताना. सचिनला क्रॅम्प आलेला वाटते. १९० नंतर २-३ वेळा कंबर दाबताना बघितले. म्हणून धोनी असे शॉट्स मारत होता.

बाकी तू लिहिलेली मनःस्थिती लाखोंचीच झाली असणार त्या वेळेला.

२४ फेब्रुवारी २०१०. भारतीयांच्या मनात ही तारिख कायम लक्षात रहाणार.
सचिन, सचिन आणि फक्त सचिनच!!.... बाकी मी नि:शब्द..

सचिन आणि विनोद कांबळीने ६६४ रन्सच्या भागीदारीचा विक्रम २४ फेब्रुवारीलाच केला होता. १९८८..
साहेबाना आपला सलाम..

.

हा माझा पण ढोल सचिन च्या नावे
धधडं ध धन , ध धं धन! धधडं ध धन , ध धं धन! डडांग डडांग डडांग डडांग!
धधंण डढंग, धंडड ततडं!धधंण डढंग, धंडड ततडं!धधंण डढंग, धंडड ततडं!धधंण डढंग, धंडड ततडं!धधंण डढंग, धंडड ततडं!धधंण डढंग, धंडड ततडं!धधंण डढंग, धंडड ततडं!धधंण डढंग, धंडड ततडं!

>>> साजिरा तुम्ही बरोबर लिहीलयंत. सचिनने आज सईद अन्वरचा रेकॉर्ड मोडला आहे.

एक दुरुस्ती. सचिनने आज सईद अन्वर व झिंबाब्वेचा चार्ल्स कॉन्वेंट्री या दोघांचाही विक्रम मोडला आहे.

१६ ऑगस्ट २००९ रोजी बांगलादेशविरुद्ध झिंबाब्वेच्या चार्ल्स कॉन्वेंट्रीने तर २१ मे १९९७ रोजी भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सईद अन्वरने १९४ धावा केल्या होत्या.

एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावा करणारे पहिले दहा मानकरी असे...

सचिन तेंडुलकर ... (२००)
चार्लस कॉन्वेंट्री ...(१९४)
सईद अन्वर ...(१९४)
विविअन रिचर्ड्स ... (१८९)
सनथ जयसूर्या ...(१८९)
गॅरी कर्स्टन ...(१८८)
सचिन तेंडुलकर ...(१८६)
एम. एस. ढोणी ...(१८३)
सौरव गांगुली ...(१८३)
मॅथ्यू हेडन ... (१८१)

absolutely chanceless inning against one of the best attacks !!! डोळे भरभरून पाहिले.

MT tvnsports वर legal live streaming आहे बघ.

आपण सगळ्यांनी देवाचे आभार मानले पाहिजेत की त्याने आपल्याला सचिन युगात जन्माला घातले.... Happy

सचिनSSSSSSSSSSS सचिनSSSSSSSSSSS सचिनSSSSSSSSSSSS

Pages