ग्रामव्यवस्था...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्‍याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ. फौजदारी स्वरूपाची कामे . या तिघानाही पगार नसे. जमिनी इनामस्वरूपात मिळत आणि ही पदे त्या घराण्यात वंश परम्परेने चालत. पुढे नवीन प्रशासकीय बदलात ही पदे शासनाचे नोकर या स्वरूपात बदलण्यात आली ते पगारी नोकर झाले आहे . जमीनीचे रेकॉर्ड आता तलाठी ठेवतात आणि त्यांच्या बदल्याही होतात त्याना पगार मिळतो. मउलकी पाटील गेले आता वसूलीचे काम तलाठीच करतात. पोलीस पाटील आहेत पण त्यांची नेमणूक जाहिरात देऊन रिक्रुटमेन्ट रुल्प्रमाने होते त्यात आरक्षणे वगरे आहेत. महिला पोलीस पाटीलही आहेत. जुन्या कुलकरण्यांचे व पाटलांचे इनाम अल्प पैसे भरून घेऊन म्हनजे २००-३०० रुपये भरून घेऊन त्यांच्या घराण्याना कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यात आल्या आहेत.

तात्पर्य जमीनींच्या कुळाचे रेकॉर्ड ठेवणारा तो कुळकरणी . पुढे इन्ग्रजीच्या व प्रादेशिक प्रभावाने त्याचे कुलकर्णी झाले एवढेच....

सीकेपी कुळकएणी पदावर असू शकतील त्या भागात...

पाटील, देशमुख, कुलकर्णी ही सगली ऑफिसेस आहेत. आडनावे नव्हेत . पण इतर सामान्य मराठे(खरे तर कुणबीच), ब्राम्हण यापासून वेगळेपणा ठसविण्यासाठी किंवा मिरविण्यासाठी म्हणा ते मुदाम नावापुढे लावण्याची पद्धत सुरू होऊन शेवटी आडनावातच रूपान्तर झाले. यांची मूळ आडनावे आणखी वेगळीच असतात. शिवाय पुढे तर ज्यांच्या घरात पाटीलकी अथवा कुळकर्ण असेल त्यांचे भाऊ विभक्त झाल्यावर सन्मानदर्शक आडनावही 'वाटपा'त घेऊन ही आडनावे लावू लागले
माझ्या कामाचा भाग म्हणून मला जातीव्यवस्थेचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यात जुन्या रेकॉर्डाचा अभ्यास करावा लागतो. मोडी शिकणे भाग आहे. दुसर्‍या कुठल्या तरी बीबी वर कुणीतरी मुस्लीमात जातीव्यवस्था नसते असे अज्ञान मूलक विधान केले आहे. त्यात ह्या आडनावांचा बर्‍याच्दा उपयोग होतो. पाटील, देशमुख्,देशपान्डे ही नावे मुसलमानांच्यात देखील आहेत. कारण एकच. ही नावे नसून ऑफिसची नावे आहेत. खानदेशात ह्या पिढीत देखील जातीवाचक आडनाव लावण्याची पद्धत आहे. ऊदा. माळी, सोनार, न्हावी,भावसार्,तेली इत्यादी.

विषय: 
प्रकार: 

तुमच्या जातीचे पारम्परिक काम काय. वगैरे. << असे तुम्हि लोकांना कसे हो विचारता??

हा हा हा, मी अगोदर कास्ट सर्टिफिकेट इस्श्युइंग ऑफिसर होतो. काही दिवस कास्ट वॅलिडिटी कमिटीचा चेअरमन. त्यावेळी चौकशी, गृहचौकशी करावी लागते. त्यामुळे सर्व जातींचे ट्रेन्ड्स , वैशिष्ट्ये, राहणी, विधी, देवदैवते इत्यादीची माहिती असावी लागते.... या निर्णयावर बर्‍याचदा उच्च न्यायालयात प्रकरणे जातात व स्वतःचा निर्णय डिफेन्ड करावा लागतो... Happy

>> त्यामुळे सर्व जातींचे ट्रेन्ड्स , वैशिष्ट्ये, राहणी, विधी, देवदैवते इत्यादीची माहिती असावी लागते

हूड, यावर सविस्तर लिहीत का नाही एकदा? जातीपातींत श्रेष्ठकनिष्ठ/तेढ असू नये यात पुन्हा स्टेट करण्यासारखं काही नाही, पण हे सांस्कृतिक वैविध्यच आपलं जगणं आकर्षक बनवत असतं ना.

किती बहरला हा बाफ.. सर्व जण एक एक माहिती सांगत आहे.

हूड, यावर सविस्तर लिहीत का नाही एकदा? जातीपातींत श्रेष्ठकनिष्ठ/तेढ असू नये यात पुन्हा स्टेट करण्यासारखं काही नाही, पण हे सांस्कृतिक वैविध्यच आपलं जगणं आकर्षक बनवत असतं ना.>> अगदी मनातले!

सोलापुर भागात औटी हे आडनाव मुसलमानांमधे आहे.

ग्रामव्यवस्थेतील गावगाड्यामध्ये मुख्यत्वे घटक म्हणजे रॉबीनहुड यांनी सांगितल्याप्रमाणे मुलकी पाटील, पोलिसपाटील, कुलकरणी याबरोबरच बारा बलुतेदारही असत. जसे की सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, तेली, गुरव, कोळी, साळी, माळी, कोष्टी, परीट, सोनार, तांबोळी इ. त्याचबरोबर चावडीवरचा कोतवाल, जागल्या, वेसकर.
महारवाडा, मांगवाडा, चांभारवस्ती...... हाडकी, हाडवळे .....
गावातील बारव हा मोठा विषय आहे. तसेच गावातील मारुती, महादेव, खंडोबा, पिर, विठ्ठल, पणपती इ. गावाबाहेर एखाद्या झाडाखाली चौथर्‍यावर शेन्दुर फासलेले वेताळ, मांगीरबाबा, म्हसोबा, मावलाया, मुंजा इ.

गावगाड्यामधे ऐन सुगीच्या दिवसात अवतरणारा 'रायरन्द' एक वल्ली असे.

रायरन्द म्हणजे बहुरुपी. बर्‍याच जणाना माहीत नसेल कारण हा शब्द ग्रामीण आहे आणि साहित्यातही क्वचित वापरला जातो....

रायरन्द म्हणजे बहुरुपी. बर्‍याच जणाना माहीत नसेल कारण हा शब्द ग्रामीण आहे आणि साहित्यातही क्वचित वापरला जातो....

>>>>>>>
हो अगदी बरोबर. त्याचा अभिनय विलक्षण परीणामकारक असायचा. सुगीच्या दिवसात, खळ्यावर कामे चालु असतानाच स्वारीच पोलिसाच्या वेषात आगमण व्हायच. गावात अगोदरच झालेल्या कुरबुरींचा किवा छोट्या-मोठ्या भांडणाचा सुगावा काढुन हा थेट त्या व्यक्तीच्या खळ्यातच झोकात अवतीर्ण होत असे. आणि एकदम कडक भाषेत बाया-बापड्यांना दरडावत असे. हे सगळ आकस्मिकरित्या झालेल पाहुन त्या ह्या अवलियाच्या विनवन्या करीत पाया पडायच्याच रहात.

अशी बराच वेळ फिरकी घेतल्यावर महाशय मुळ रुप उघड करीत. तोपर्यंत ज्या लोकांनी याला ओळखल असे तेही हसु लपवीत ही मज्जा निमुटपणे पाहात असत. आणि शेवटी हा रायरन्द जेवन्-खावन करुन शेर्-पायली धान्य घेवुन पुढच्या गावाचा मार्ग आक्रमित असे.

कुडमुडे जोशी, पिगळा जोशी (सहदेव भाडळी सांगणारे), काशीचे भाट हे वंशावळ सांगत. ह्यान्च्याकडील बाडात पिढ्यानपिढ्यांच्या काशीला गेलेल्या लोकांच्या नोंदी आहेत. गावोगाव जावुन ते ही लिस्ट अपडेट करीत.

नन्दीवाले, निळावंतीचा अभ्यास केलेले. इ.

पिंगळ्यांना मी पाहिलेय गावी. दुपारच्या वेळी येऊन घरच्या बायांना ते त्यांच्या खानदानातल्या आधीच्या बायकांबद्दल सांगत. गावी जुन्या काळी बहुतेक वेळा मुलींना नावे आजीची वगैरे ठेवत. अशा वेळी आज ते नाव धारण करणा-या बाईला तिचे नाव जिच्यावरुन आले तीची कथा ऐकवुन भरपुर रडवत आणि मग तांदूळ वगैरे घेऊन जात. बाई जितकी रडायची तितके धान्य जास्त द्यायची.. Happy

मी अगोदर कास्ट सर्टिफिकेट इस्श्युइंग ऑफिसर होतो. काही दिवस कास्ट वॅलिडिटी कमिटीचा चेअरमन.
असल्या पोस्ट्स असतात हे माहितच नव्हतं.. आता ह्या पोस्टवर काम करणा-या माणसाला सगळी माहिती असणे अत्यावश्यकच आहे. नाहीतर कोणीही सहज फसवायचे.......

आता ती माहिती इथे लिहिलीत तर आम्हालाही कळेल Happy

हुडा, विषय मस्त आहे, आणि त्यात तूझ्याजवळची माहिती पण दांडगी असेल. भरपुर लिही रे बाबा.

देसाई, देशमुख, देशपान्ड्यांबद्दल पटलं. Happy

मुळात जात की कामावरुनच आली असावी. पूर्वी मिलमध्ये काम करत असताना सगळ्या कामगारांची नावं नाव व वडिलांचे नाव एव्हढीच लिहिली जायची. आता मिल्सच संपल्या.

ह्या सगळ्या गोष्टीतून बरिच माहिती मिळत्येय

रायरन्द म्हणजे बहुरुपी>>>>>>>>
खरच हा शब्द नव्हत माहिती. Happy

आईने एकदा असच सांगितलेला हेळवी हा शब्द आठवला.
ह्या हेळव्यांकडे आपल्या पुर्वजांचा इतिहास (म्हणजे कोण कोणाचा मुलगा कधी मयत झाला ह्याची जुजबी माहिती) लिहिलेला असतो अस आईने सांगितल होत.
हे हेळवी म्हणजेच नंदीवाले बहुद्धा.
आता हे हेळवी सापडणच मुश्किल. सापडला तरी त्यात आमची नाव नसतीलच.
कधी सापडला तर आमच आडनाव पाटिल का हे तरी कळेल. त्याआधी आमच आडनाव काय होत ते ही कळेल.
माझ्या पणजोबापर्यंतची नावं मला माहिती आहेत. त्याआधीची नाव कळतील. त्यावेळची नाव ठेवण्याच लॉजिक काय असेल ते कळेल. हे नक्कीच इन्टरेस्टिंग आहे. Happy
बाय द वे आम्हाला रकमा पाटील म्हणतात गावाकडे. का ते माहित नाही.
माझ्या मावशीच आडनाव खोत पण त्याना पोलिस्तांच घर असत म्हणतात तेही माहिती नाही.
माझ्या आत्याच्या घरच्याना सावकार म्हणतात. (हे बहुद्धा आधी सावकारीवरुन आल असेल)
अशी माहिती जर हेळव्यांच्या चोपडीत बघायला मिळाली तर काय मज्जा येइल. Happy

एक भोत्याबाबा (गावाकडचा शब्द) Proud म्हणुन एक भटकी जमात असे. साहीत्यात वाचलेल्या वासुदेवासारखा त्याचा एकंदरीत अवतार असे.(डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात टाळ) त्याची एका हाताने टाळ वाजवण्याचे कौशल्य जबरदस्त असायचे.

पण तो संध्याकाळच्या वेळेस यायचा हातात दिवटी घेवुन. गळ्यात कवड्यांच्या माळा असत. त्याचा अंगरखा तेल आणि धुळीने माखल्याने काळा कुट्ट दिसे. तो बहुधा देवीचे गाणे म्हणत असे. लहान मुल त्याच्या मार्गात लोटांगण घालुन झोपायचे. आणि भोत्याबाबा एक एक करीत सर्व मुलांना ओलांडीत पुढे जात असे. त्यामुळे खरुज, नायटा, फिस्के होत नाहीत अशी अंधश्रध्दा असायची. Happy

हुड, हा नेमका कोण? भोत्याबाबा, वासुदेव की अजुन कोणी? Uhoh

बाई जितकी रडायची तितके धान्य जास्त द्यायची.. >>>> Lol

साधना हे एकदम नेमक सांगितल तुम्ही. रायरन्दान्च्या बाबतीतही असच व्हायच.

भोत्याबाबा ? भुत्ये किंवा देवीचे भोपे असायचे त्यावरुन तर आला नसेल हा शब्द ? कवड्यांच्या माळेवरुन वाटलं.

ते भोत्याबाबा गाणी म्हणत दिवटी पकडून लहान मुलांना ओलांडताना गावाकडे पाहिलंय मी. आम्ही त्यांना 'भोप्या' म्हणायचो. हे वासूदेवाच्या वेषातले मंदिरांच्या आसपास हमखास सापडतात. पण वासूदेवाची गाणी म्हणताना दिसत नाहीत. टिळा, गंध लावून पैसे, दक्षिणा मागताना दिसतात. शिवाय पोलिसाच्या वेषांतले बहुरुपी पुण्यातही कधीतरी दिसतात. ते 'बाय कास्ट' बहुरुपी असतात, की पैसे मागण्यासाठीच असतात, ते काय कळत नाही.

रऑबिनहूड चांगली माहिती देत आहात. इतर सर्वांची माहिती पण छान आहे.

सगळ्यांचे आभार !
हे सगळं वाचलं की वाटतं ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय त्या महाराष्ट्राविषयी आपल्या कितपत माहिती आहे ? ज्या इतिहासाच्या नावाने आम्ही गळे काढतो त्याच्याविषयी १ टक्कापण माहिती नाही आम्हाला.

ज्या इतिहासाच्या नावाने आम्ही गळे काढतो त्याच्याविषयी १ टक्कापण माहिती नाही आम्हाला.>> अनुमोदन..

हूडा, जरा वेळात वेळ काढ आणि एक लेख लिही या सर्व जातीवर आणि ग्राम व्यवस्थेवर!!

ज्या इतिहासाच्या नावाने आम्ही गळे काढतो त्याच्याविषयी १ टक्कापण माहिती नाही आम्हाला.
>>>>>>>>>
बरोबर. एवढ मान्य केल तर पुढचा प्रवास सुकर होतो. Happy

भुत्ये ते. तुळजापूरच्या देवीचे भक्त. खेडोपाडी धान्य गोळा करून वर्षभराची बेगमी करत असत. भुत्या जर 'सिव्हील' ड्रेसात दिसला तर ओळखू यायचा नाही.

आजच्या लोकसत्तात 'एक गाव- एक मसणवट' वर लेख आलाय गणपत भिसे यांचा.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=49490:2...

वाचुन अगदी सुन्न झाले आणि मग हा लेख आठवला..... भारतात आहेत तसे जातीभेद आणि प्रत्येकाला स्वतःच्या जातीबद्दलची उच्चत्वाची आणि दुस-या जातीबद्दल निचत्वाची भावना अजुन कुठे असेल काय?

कदाचित आफ्रिकेत असेल, तिथे जातीच्या जागी टोळ्या असतील.

साधना , का बरं माणसाला दोन माणसे एकत्र आली की आयडेन्टीटी क्रायसिस ग्रासतो. तो लगेच काहीतरी क्लासिफिकेशन तयार करतो.अगदी जातीव्यवस्था नसलेल्या समाजात देखील, पंथ भाषा काही ना काही कारणामुळे दुसर्‍याला तुच्छ लेखण्याचे फडे असतातच. प्रॉटेस्टन्ट /कॅथॉलिक, शिया /सुन्नी ई.

हुडसो. खुप छान बीबी सुरु केल्या बद्दल अभिनंदन.

कोरडवाहू शेतकरी म्हणजे - कुणबी आणि बागायती शेतकरी म्हणजे - माळी>>>>>>
गंगाधरराव मला हे पटत नाही. कारण आमचे गावात तसेच इतर बर्‍याच गावात माळी समाजाचे लोके नाहीत. परंतु बागायती शेती पुर्वापार पासुन कुणबीच करतात.
माझ्या अभ्यासा नुसार माळी लोक मुख्यत: भाजीपाला व फुलांची शेती करत. तसेच कुणबी लोक मुख्यत: धान्याची बागायती / कोरडवाहु शेती करत. आजही मोठ्या प्रमाणात ही पद्धत दिसते.

भुत्या जर 'सिव्हील' ड्रेसात दिसला तर ओळखू यायचा नाही.
>>>
अगदी अगदी.

माझ्या अभ्यासा नुसार माळी लोक मुख्यत: भाजीपाला व फुलांची शेती करत.>>> त्यान्च्यातही पुन्हा दोन पोटजाती. एक फूलमाळी आणि दुसरे जिरेंमाळी.

Pages