मला काहितरी करायचंय..

Submitted by अजय on 15 February, 2010 - 00:50

प्रसंग -१
तो: मला काहितरी करायचंय.
मी: वा. छान. कुठल्या विषयात काय करायचंय?
तो: अमूक तमूक..
मी: मग थांबलायस कशाला?
तो: पाहतोय जरा सध्या.....

प्रसंग -२
ती: मी नेटवर्कींग सुरू करावं म्हणतेय.
मी: जरूर. मग काय केलंय त्यासाठी.
ती: अमुक तमुक ग्रूपची मेंबर झालेय.
मी: वा. छान. कुणाकुणाला भेटलीयस ग्रूपमधे? कुणाचा सल्ला विचारलास.
ती: नाही पाहतेय जरा सध्या.....

प्रसंग -३
तो: मला नवीन संकेतस्थळ चालू करायचंय. अमूक अमूक प्रकारचं.
मी: जरूर. आता संकेतस्थळ चालू करणं खूप स्वस्त आणि सोपं झालंय. आणि आता फु़कट जागा मिळते ती घेऊन सुरु करता येईल.
तो: फुकटच घ्यायचीय. पण पाहतोय मी जरा....

गेले अनेक वर्षं मी हे अनुभवतोय. व्यक्ती बदलतात. त्यांचे विषय बदलतात. कालावधी बदलतो. पण अंगात काहीतरी करावं असं वाटणारी इच्छा आणि प्रत्यक्षात काहीही न केल्याची सत्यपरिस्थिती हे मात्र सगळीकडे सारखंच. माझा एक जवळचा मित्र गेली १६ वर्षे नुसताच "पाहतोय". अजूनही "काहितरी" करायचा त्याचा उत्साह कायम आहे. यशस्वी उद्योजकांची चरित्रे आणि इतर स्फूर्तीदायक पुस्तके तो आनंदाने वाचत असतो. पण जे काही करायचं आहे त्यातलं ०.०५% ही त्याने काही केलेले नाही.

वर संकेतस्थळ चालू करणारा मित्र संगणक क्षेत्रातलाच आहे. म्हणजे तांत्रिक अडचण नाही. जागा कुठे फु़कट मिळते याचे १०-१५ पत्ते तरी त्याला ठाऊक आहे. पण प्रत्यक्ष अशा ठिकाणी जागा घेण्याचा मुहूर्त मात्र अजून लागतोय.

यातला थोडासा बदल करून अजून एक प्रकारचं उत्साही व्यक्तीमत्व असतं. यांच्याकडे भरपूर आयडीया असतात. पण प्रत्यक्षात त्यावर ते कधीच काम करत नाहीत. एकदा अशा एका मित्राने मला गोपनीयतेची शपथ घेऊन सॉफ्टवेअर मधल्या ४-५ आयडीया सांगितली. आयडीया चांगल्या होत्या. त्यावर त्याने माहितीही गोळा केली होती. हे झालं काही वर्षांपूर्वी. परत तो भेटला तेंव्हा मी चौकशी केली.

प्रसंग -४
मी: काय झालं तुझ्या कल्पनेचं.
तो: नाहीरे मायक्रोसॉफ्टने त्यांचं अगदी सेम प्रॉडक्ट आणलं.
मी : अरे छान. म्हणजे तुझ्या कल्पनेला मार्केट आहे हे सिद्ध झालं. मग तू दुसर्‍या छोट्या (Niche) मार्केटमधे काम का करत नाही? किंवा मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्टवर Addon काही का तयार करत नाहीस?
तो: नाही रे. मला exactly मायक्रोसॉफ्टने जे केलं तेच करायचं होतं.
मी: Bad luck. पण तुझ्या त्या दुसर्‍या कल्पनेचं काय झालं.
तो: त्यावर Google ने exactly सेम प्रॉडक्ट काढलं. ते जाऊदे. तुझ्याकडे वेळ असला आणि तू कुणाला सांगणार नसला तर माझ्याकडे एक नवीन आयडीया आहे....

आपल्याला जी आयडीया आली आहे ती याच क्षणाला जगात हजार लोकांना तरी सुचत असेल ही जाणीवच त्याना नसते. त्यामुळे त्यातले काही शे जण ती प्रत्यक्षात आणून त्याची चाचणी करत असतील हे लक्षात येणं तर जाऊच द्या. बरं लक्षात आलं तरी दुसर्‍या कुणी ती आधी अंमलात आणली तर त्यांची लगेच निराशा होते. दुसर्‍यांच्या अंमलबजावणीला मर्यादा असू शकतील आणि तीच कल्पना थोडा फेरफार करून आपण स्वतः दुसर्‍या मार्केटमधे विकू शकतो हे त्यांना पटत नाही. नुसतं घराबाहेर पडलं तरी "खाण्याचे पदार्थ करून विकणे" ही हजारो वर्षे सार्‍या जगभर चावून चोथा Happy करून जुनी झालेली आयडीया, तिची विविध रुपे, विविध ग्राहकवर्ग आपल्याला दिसतात. आणि त्या कल्पनेची बहुतेक सगळी रुपं यशस्वी उद्योग करताना दिसत आहेत यांच्याकडेही या "युनिक आयडीया" वाल्यांचं दुर्लक्ष होतं.
आयडिया महत्वाची नसते तर तिची अंमलबजावणी (execution) महत्वाची असते हे ही त्यांच्या लक्षात येत नाही.

प्रसंग -५
तो: मला काहीतरी करायचंय
मी: मग लगेच आत्ता सुरु कर. (मी नाही, रामदासस्वामींनी सांगितलंय Happy त्यांचं थोडं ऐक). तुला आठवत नसेल तर "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" असं म्हणून गेले आहेत ते.
तो: म्हणजे लगेच नोकरी सोडून देऊ?
मी: लगेच नोकरी सोड असं नाही.

  1. पण आत्ता एका कागदावर कल्पना लिहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढे काय करता येईल असं लिहून काढ.
  2. तुला जर काय करायचं हे माहिती नसेल तर पुढच्या ३ महिन्यात या विषयातल्या माहितगार व्यक्ती शोधून काढून त्यांना भेटून जास्त माहिती काढायची इतका निश्चय तर तुला करता येईल ना?
  3. आणि कुणिच माहीती नसेल तर पुढच्या १ महिन्यात तुझ्या २० मित्राना अशी माहितगार व्यक्ती कुठे मिळू शकेल असा प्रश्न विचारेन असा निश्चय करं.
  4. आणि हे सगळं या कागदावर लिहून सुरुवात कर. इतकं तर करता येईल ना तुला?

तो: येईल रे. पण पाहतो मी...

(सर्व प्रसंग सत्य घटनांवर आधारीत)

टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवांत
मायबोलीकर चंपक दूध विक्रीशी संबंधित आहेत, ते इतर दूग्धजन्य पदार्थ विकतात का याची कल्पना नाही, त्यांच्याशी संपर्क साधलात तर अधिक माहीती मिळेल.

मला भारतात परतल्यानंतर उद्योग सुरु करायचा (विचार) आहे. माझ्या पातळीवरचा अभ्यास करते आहेच. पण मला त्या उद्योगाला कसा प्रतिसाद मिळेल हे चाचपडुन पहायचे असेल तर काय करता येईल.

जर सर्व्हे करायचा असेल तर तो कसा करता येतो?
कुणाला सर्व्हे करणार्‍या कंपन्याची लिस्ट देता येईल का?
सर्व्हेचे रिझल्टस कितपत विश्वसनीय असतात?

आणि एन आर आय लोकांना उदोग सुरु करतांना लोन मिळायला वेगळे नियम असतात का?

इंद्रधनु नक्की कोणत्या क्षेत्रात तुम्हाला सहकारी तत्वावर उद्योग करायचाय यावर अवलंबुन आहे. तुम्हाला हव असल्यास येका चांगल्या कंसल्टंटचे डिटेल्स देऊ शकतो. पैसे घेतात पण काम चोख करतात.
प्रिंसेस अभिनंदन. परतोनिच्या धाग्यावर सगळेच परदेशातुन परत आल्यावर इथल्या नोकरीचा विचार करताना दिसले. माझ्या माहीतीतल्यामधे चंपक आणि निपा फक्त उद्योजगतेच्या मानसिकतेतले दिसले.
एन आर आय लोकांना उदोग सुरु करतांना लोन मिळायला वेगळे नियम असतात का? हो पण फार किचकट नसतात. माबोवरच्याच मोहन की मीरा आहेत त्या नक्की सांगु शकतील.

सुशांत... मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'ग्लोबल कोकण' महोत्सवात कोकणातील काजू उद्योगाबद्दल बरिच उपयुक्त माहिती मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानांच्या धर्तीवर आंबा, काजू साठी कोकणात सहकारी उद्योग उभारता येऊ शकतो का ते तपासायचे आहे. सरकार कडून सहकारी कंपनीला किती सबसडी मिळू शकते आणि ती मिळवण्याची पद्धत व वेळ या बद्दल माहिती हवी आहे.

धन्यवाद सुशांत.

अजुन चाचपडते आहे. मराठी माणुस ना ! खूप अभ्यास करेल, धडपड करेल, पैसा जमवण्याची खटपट करेल आणि मग वरच्या उदाहरणातल्या सारखे कुणीतरी माझ्या आधीच ते सुरु केल्यवर त्यांचे कौतुक करेन Happy नंतर सुखाने नोकरी करेन Wink . तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासुन धन्यवाद.
सर्व्हे बद्दल काही कल्पना आहे का?

प्रिंसेस, तुला कुठल्या क्षेत्राचा सर्वे करुन घ्यायचा आहे?
उदा. रिअल इस्टेट. त्यामध्ये सर्वे करुन देणार्‍या स्पेशलाइज्ड ऑर्गनायजेशन असतात. असेच बाकीच्या क्षेत्रांबद्दल.
तुझे क्षेत्र समजले तर कदाचीत काही सुचवता येइल.

त्यात सर्व्हे करणारे माहिती आहे का कुणी?>> सॉरी. नाही माहिती. मागे टोकूरीका या आयडीने लहान मुलांचे प्ले स्कूल उघडण्यासाठी एक बीबी काढला होता. तीने बरीच माहिती गोळा केली होती. कदाचीत तीला माहित असेल.

इंद्रधनु तुम्हाला संपर्कातुन ईमेल पाठवला आहे.
प्रिंसेस मला शिक्षण क्षेत्रातल्या सर्व्हे करुन देणार्या कंपन्यांची सध्या तरी माहीती नाहि. साजिरा बहुतेक मदत करु शकेल.(हा फक्त अंदाज आहे). प्रिंसेस तुमच स्वतःच नक्की चालु करा. आपल्याला शुभेच्छा.

सरकार कडून सहकारी कंपनीला किती सबसडी मिळू शकते आणि ती मिळवण्याची पद्धत व वेळ या बद्दल माहिती हवी आहे.>>> मित्राचा २.५ कोटीचा प्रोजेच्ट मंजुर होउन आता बांधकाम झाले आहे. काँटॅक्ट करुन देउ शकतो. अगोदर चंदगडला मंजुर झाला होता त्याने आता सांगलीजवळ मंजुर करुन घेतला आहे.

अरे वा. चंपक, मनापासुन अभिनंदन.

रच्याकने, तुमच्या जाहीरातीमधे त्या कव्हरच्या खाली वेबसाईटचा पत्ता बहुतेक चुकलाय का?
www.kadakwadi.org झालेय ते www.karadakwadi.org हवेय का? कि तसेच आहे?

मायबोलीकर (ती उद्योजक ग्रूपमध्ये नाहीये) मैत्रिणीबरोबर पेंटीग्ज, हँडक्राफ्टेड /पेंटेड वेगवेगळ्या वस्तू इ. चा एक स्टॉल एका प्रदर्शनत ठेवणार होतो आम्ही दिवाळीच्या आधी डिफरंट स्ट्रोक्स नावानी. काही कारणास्तव ते प्रदर्शन होवू शकलं नाही. पण आता त्याच नावानी आम्ही दोघी (मी आणि गुडगावस्थित माबो मैत्रिण प्राजक्ता पाटवे) ऑनलाइन आलोत. आज फेसबुक पेज पब्लिश केलं.

इथे त्या पेजची लिंक दिली तर चालेल का?

नमस्कार, आम्ही आमच्या छोट्या दोस्तांसाठी बॅनर बनविण्याची कामे घेतो ...
अगदी नामकरण विधी पासून ते पहिल्या वाढदिवसापर्यंत . उदाहरणा दाखल आधी केलेल्या कामांची चित्रे इथे पाहता येतील जर आपल्यालाही असे काही बनवून हवे असेल तर संपर्क करा

Pages