प्रसंग -१
तो: मला काहितरी करायचंय.
मी: वा. छान. कुठल्या विषयात काय करायचंय?
तो: अमूक तमूक..
मी: मग थांबलायस कशाला?
तो: पाहतोय जरा सध्या.....
प्रसंग -२
ती: मी नेटवर्कींग सुरू करावं म्हणतेय.
मी: जरूर. मग काय केलंय त्यासाठी.
ती: अमुक तमुक ग्रूपची मेंबर झालेय.
मी: वा. छान. कुणाकुणाला भेटलीयस ग्रूपमधे? कुणाचा सल्ला विचारलास.
ती: नाही पाहतेय जरा सध्या.....
प्रसंग -३
तो: मला नवीन संकेतस्थळ चालू करायचंय. अमूक अमूक प्रकारचं.
मी: जरूर. आता संकेतस्थळ चालू करणं खूप स्वस्त आणि सोपं झालंय. आणि आता फु़कट जागा मिळते ती घेऊन सुरु करता येईल.
तो: फुकटच घ्यायचीय. पण पाहतोय मी जरा....
गेले अनेक वर्षं मी हे अनुभवतोय. व्यक्ती बदलतात. त्यांचे विषय बदलतात. कालावधी बदलतो. पण अंगात काहीतरी करावं असं वाटणारी इच्छा आणि प्रत्यक्षात काहीही न केल्याची सत्यपरिस्थिती हे मात्र सगळीकडे सारखंच. माझा एक जवळचा मित्र गेली १६ वर्षे नुसताच "पाहतोय". अजूनही "काहितरी" करायचा त्याचा उत्साह कायम आहे. यशस्वी उद्योजकांची चरित्रे आणि इतर स्फूर्तीदायक पुस्तके तो आनंदाने वाचत असतो. पण जे काही करायचं आहे त्यातलं ०.०५% ही त्याने काही केलेले नाही.
वर संकेतस्थळ चालू करणारा मित्र संगणक क्षेत्रातलाच आहे. म्हणजे तांत्रिक अडचण नाही. जागा कुठे फु़कट मिळते याचे १०-१५ पत्ते तरी त्याला ठाऊक आहे. पण प्रत्यक्ष अशा ठिकाणी जागा घेण्याचा मुहूर्त मात्र अजून लागतोय.
यातला थोडासा बदल करून अजून एक प्रकारचं उत्साही व्यक्तीमत्व असतं. यांच्याकडे भरपूर आयडीया असतात. पण प्रत्यक्षात त्यावर ते कधीच काम करत नाहीत. एकदा अशा एका मित्राने मला गोपनीयतेची शपथ घेऊन सॉफ्टवेअर मधल्या ४-५ आयडीया सांगितली. आयडीया चांगल्या होत्या. त्यावर त्याने माहितीही गोळा केली होती. हे झालं काही वर्षांपूर्वी. परत तो भेटला तेंव्हा मी चौकशी केली.
प्रसंग -४
मी: काय झालं तुझ्या कल्पनेचं.
तो: नाहीरे मायक्रोसॉफ्टने त्यांचं अगदी सेम प्रॉडक्ट आणलं.
मी : अरे छान. म्हणजे तुझ्या कल्पनेला मार्केट आहे हे सिद्ध झालं. मग तू दुसर्या छोट्या (Niche) मार्केटमधे काम का करत नाही? किंवा मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्टवर Addon काही का तयार करत नाहीस?
तो: नाही रे. मला exactly मायक्रोसॉफ्टने जे केलं तेच करायचं होतं.
मी: Bad luck. पण तुझ्या त्या दुसर्या कल्पनेचं काय झालं.
तो: त्यावर Google ने exactly सेम प्रॉडक्ट काढलं. ते जाऊदे. तुझ्याकडे वेळ असला आणि तू कुणाला सांगणार नसला तर माझ्याकडे एक नवीन आयडीया आहे....
आपल्याला जी आयडीया आली आहे ती याच क्षणाला जगात हजार लोकांना तरी सुचत असेल ही जाणीवच त्याना नसते. त्यामुळे त्यातले काही शे जण ती प्रत्यक्षात आणून त्याची चाचणी करत असतील हे लक्षात येणं तर जाऊच द्या. बरं लक्षात आलं तरी दुसर्या कुणी ती आधी अंमलात आणली तर त्यांची लगेच निराशा होते. दुसर्यांच्या अंमलबजावणीला मर्यादा असू शकतील आणि तीच कल्पना थोडा फेरफार करून आपण स्वतः दुसर्या मार्केटमधे विकू शकतो हे त्यांना पटत नाही. नुसतं घराबाहेर पडलं तरी "खाण्याचे पदार्थ करून विकणे" ही हजारो वर्षे सार्या जगभर चावून चोथा
करून जुनी झालेली आयडीया, तिची विविध रुपे, विविध ग्राहकवर्ग आपल्याला दिसतात. आणि त्या कल्पनेची बहुतेक सगळी रुपं यशस्वी उद्योग करताना दिसत आहेत यांच्याकडेही या "युनिक आयडीया" वाल्यांचं दुर्लक्ष होतं.
आयडिया महत्वाची नसते तर तिची अंमलबजावणी (execution) महत्वाची असते हे ही त्यांच्या लक्षात येत नाही.
प्रसंग -५
तो: मला काहीतरी करायचंय
मी: मग लगेच आत्ता सुरु कर. (मी नाही, रामदासस्वामींनी सांगितलंय
त्यांचं थोडं ऐक). तुला आठवत नसेल तर "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" असं म्हणून गेले आहेत ते.
तो: म्हणजे लगेच नोकरी सोडून देऊ?
मी: लगेच नोकरी सोड असं नाही.
- पण आत्ता एका कागदावर कल्पना लिहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढे काय करता येईल असं लिहून काढ.
- तुला जर काय करायचं हे माहिती नसेल तर पुढच्या ३ महिन्यात या विषयातल्या माहितगार व्यक्ती शोधून काढून त्यांना भेटून जास्त माहिती काढायची इतका निश्चय तर तुला करता येईल ना?
- आणि कुणिच माहीती नसेल तर पुढच्या १ महिन्यात तुझ्या २० मित्राना अशी माहितगार व्यक्ती कुठे मिळू शकेल असा प्रश्न विचारेन असा निश्चय करं.
- आणि हे सगळं या कागदावर लिहून सुरुवात कर. इतकं तर करता येईल ना तुला?
तो: येईल रे. पण पाहतो मी...
(सर्व प्रसंग सत्य घटनांवर आधारीत)
टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)
(No subject)
प्रयोग, मस्त पोस्ट. उत्तम
प्रयोग, मस्त पोस्ट.
उत्तम नेटवर्किंग आणि घरातून भक्कम पाठिंबा हे तर अत्यंत आवश्यक आहे. केवळ नोकरीचा कंटाळा आलाय म्हणून नोकरी नको आत्ता व्यवसाय करू अथवा उद्योजक बनणे ग्लॅमरस असते या कल्पनेतून विशेष माहिती न घेता उतरले तर धोका प्रचंड असतो.
प्रयोग, तुझी पोस्ट नेहमीच
प्रयोग,
तुझी पोस्ट नेहमीच सुरेख असते
(No subject)
अजय, सरवात आधी तुमचे आभार हा
अजय, सरवात आधी तुमचे आभार हा बाफं उघडल्या बद्दल. मला तर वाचताना हसु आवरले नाही, कारण उदाहरणं इतकी चपखल बसणारी होती (मला) की बास.
मामी आणि प्रयोग मस्तं पोस्टी! प्रयोग, मनातलं लिहीलस (या पानावरच्या पहिल्या पोस्टीतलं).
सोफ्टवेअर बद्दल स्वतः त्यात काम करणारे इथे येउन सांगतीलच पण हे माझे २ पैसे. सॉफ्टवेअर चा पसारा बराच मोठा असतो अख्खं सॉफ्टवेअर जरी छोट्या गृपनी बाहेर पडुन शक्य नसलं तरी त्या सॉफ्टवेअर मधल्या ठराविक कंपोनंट्स वर काम करु शकता. मी अशा काही लोकांना ओळखतो. अश्या उद्योगात खरच डिमांड (मागणी) आणि मार्केटींग ला खुप महत्व आहे. सहसा असे गृप्स एकदा आपण करतो त्या कामाला डिमांड आहे याची खात्री पटली की मग बाहेर पडतात. या उपर मागणी वाढण्यासाठी सतत मार्केटींग करत राहाणं अतिशय गरजेचं असतं. उत्तम सॉफ्टवेअर बनवणारे ते तितकच उत्तमपणे बाजारपेठेत ते विकु शकतील असं नसतं. यातुन मार्गही आहेच. गृप मध्ये एखादा तरी हाडाचा सेल्समन असावा. ज्याचं काम त्यानीच करावं हेच खर.
थोडं वेगळं उदाहरण. माझ्या अगदी जवळच्या २ मित्रांनी नाशकात सॉफ्टवेअर डेवेलपमेंट कंपनी सुरु केली. जवळ जवळ ७ वर्ष झाली असतील. खुप लहान सुरवात केली. दोघं रात्र रात्र जागुन ऑनलाईन लहान लहान प्रोजेक्ट बिड वर मिळवायचे. हळू हळू नाव वाढलं. आज २५-३० जणांचा स्टाफ आहे. दोघंही जग भर फिरुन आले आहेत धंद्या निमीत्त.
सरते शेवटी, जगाच्या अंता पर्यंत नुसतं विचार करुन काही फायदा नाही हे जरी खरं असलं तरी थोडा विचार करण्यात वेळ खर्ची घालण्यात पण फायदा आहे. माझ्या मते, आपल्याला काय करायला आवडेल आणि आपण कशात निपुण आहोत यातला फरक किंवा यातली तफावत समजुन घेणं फार गरजेचं आहे. कष्टाची तयारी असेल तर एकदा माणुस धंद्यात पडलं की काही ना काही करुन प्रगती करणार पण जे काही कराल त्यात निपुण असाल आणि त्याला मागणी असेल किंवा भविष्यात मागणी असेल याची खात्री असेल तर यश लवकर मिळतं.
मी एक छोटी गिफ्ट आयट्म बनविली
मी एक छोटी गिफ्ट आयट्म बनविली आहे. लव्ह बास्केट. एक परडी त्यात ५० रु. ची चॉकोलेट्स व १०० रु चे एक परफ्युम. टीनेजर्सना एकमेकांना गिफ्ट देता येइल अशी. किंवा लग्नात/ वाढ दिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून देता येइल. अतिश्रीमंतांच्यात लग्नाच्या पत्रिकेबरोबर पण काहीतरी गिफ्ट देतात. आपण ' पैसे कमविण्याची संधी शोधली पाहिजे OTMM - Opportunity to make money!
प्रयोग,अश्विनीमामी, थोडं
प्रयोग,अश्विनीमामी,
थोडं विषयांतर होतंय. त्यापेक्षा ग्रूपमधे दोन वेगळे स्वतंत्र धागे काढून तिथे पुढे त्या त्या विषयावर लिहिणे जास्त योग्य होईल.
> स्वतःच्या कल्पनेतून इनोव्हेटिव्ह सॉफ्टवेअर बनवून का नाही विकत?
@प्रयोग,
माझ्या या लेखात कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल.
मनातला विषय! सुंदर मांड्णी!
मनातला विषय! सुंदर मांड्णी! अप्रतिम पोष्टी!
अजय! तुमच्या ५ही उदाहरणातला "तो" मीच बर का!
प्रयोग अतिशय अभ्यासपुर्ण पोष्ट्स
सोफ्ट्वेअर मध्ये बर्याचशा कम्पन्या हेच करत असतात आणि ५०००० चे डोके ७०००० ला विकुन आपला धन्दा चालवतात. जसे धन्द्याचे एक सुत्र आहे more risk, more returns तसेच आहे हे. जी सोफ्ट्वेअर कम्पनी ७०००० ची बरीच डोकी भाड्याने घ्यायची रिस्क घेउ शकते त्याअर्थी त्यांचा प्रॉडक्ट खपेल ह्याची खात्री त्यांना असते किंवा ती high risk ते घेतात.
बिझिनेस म्हटले की (आमच्यासारख्या) सामान्य लोकान्च्या मनात १०० कुशन्का घर करुन रहातात आणि शेवटी हे आपल्या 'बस्'च काम नाही (बसच काय, टॅक्सी, रिक्षा, हत्ती, ऊंट, घोडे कुणाचच काम नाही
हा एक अतिबाष्क्ळ विनोद आहे. कृपया त्यास हसावे
) अशी खात्री पटते आणि अजयच्या पाचही 'उतार्यां'ची कहाणी साठा उत्तरी "पाहातोय" ने कुफळ संपूर्ण होते!
कुशंका एकः बिझिनेस म्हणजे २४ तास ओझे. कधी सुट्टी घेता येत नाही.
पण सध्या नोकरीतच असे व्ह्यायला लागल्यामुळे 'पाहातोय'
मामी कडे मस्त आयडीया असतात.
मामी कडे मस्त आयडीया असतात. मामी लिहा हो
प्रयोग तुम्ही छान लिहिल आहे
प्रयोग तुम्ही छान लिहिल आहे ...
मी फक्त काहीतरी करायचं म्हणुन २ वेळा नोकरी सोडली ,घरातल्यांनी विरोध केला ,आता परत नोकरीच करतोय,मनात नसताना ! त्यामुळे सध्या नुसता पाट्या टाकतोय ! मी म्हणतो ..एका नोकरीत आपलं सारं आयुष्य घालवायचं ? हे बुद्धीला गेल्या ९ वर्षापासुन पटत नाही ...
@प्रयोग ,वैद्यबुवा, किरण १००%
@प्रयोग ,वैद्यबुवा, किरण
१००% सहमत..........
मायबोली वर/या ग्रूप मध्ये किती जण सोफ्ट्वेअर मध्ये आहेत हे कसे कळणार्?
अजयने मांडलेल्या प्रसंग पाच
अजयने मांडलेल्या प्रसंग पाच मधले १, २, ३, ४ अतिशय महत्वाचे आहेत. सुरुवात करायची आहे, पण कधी करायची ते बघू.. मुहूर्तच सापडत नाही.. योग्य वेळ यायला हवी. आणि मग आंधळे आणि हत्ती यांची कथा- हे नेहेमीचेच. एखाद्या वळणाच्या पलीकडचा रस्ता कसा असेल, हे आपण लाखो कल्पनांतून बघत बसतो. खरी गोष्ट अशी असते, की त्या वळणावर प्रत्यक्ष एकदा का गेले, की पुढचा रस्ता लख्ख दिसतो, आणि उगीचच मागे, अलीकडेच उभे राहून पुढला रस्ता कसा असेल- याच्या लाखो कल्पना करत वेळ कसा वाया घालवला, यावर आपण स्वतःच हसत बसतो.
तर 'कॅटॅलिस्ट' म्हणून अजयच्या त्या १,२,३,४ चे महत्व वाटते. आज सायंकाळपर्यंत मला पडलेल्या प्रश्नासंबंधात कमीत कमी ५ वेबसाईट्स तरी बारकाईने बघेन. या शनिवारपर्यंत टिळक रोडला लागून असलेली, माझ्या डोक्यात असलेल्या कल्पनेच्या संबंधातली कमीत कमी ५ ठिकाणे तरी बघेन. येत्या ७२ तासांत भेटी द्यायची राहून गेलेली कमीत कमी ५ तरी मित्रांची ऑफिसेस बघेन. या महिना अखेरपर्यंत कमीत कमी १० जणांना माझ्या प्रश्नाबाबत विचारेन. आज झोपायच्या आत मला पडलेले प्रश्न एकाखालीएक तीनदा तरी कागदावर लिहून काढेन.. अशा डेड्लाईन्स स्वतःलाच घालून घ्याव्यात. ९ वेळा त्यांचा उपयोग काहीच होत नाही, समजा. पण दहाव्या वेळेला जेव्हा होईल, त्यावेळेला आपला प्रश्नासंबंधातला 'ब्लॉक' (बर्याच वेळेला हा प्रत्यक्षात नसून मनातच असतो बापडा.
) निघालेला असेल, आणि ती 'सुरुवात' असेल.
अजय, आपण उद्योजक ग्रुप मध्ये सुरु केलेले काही बीबी अप्रतिम. अत्यंत सहज, सोपे, कुणालाही अपील होतील असे. एक 'सुरुवात' म्हणून त्यांचे महत्व मोठे आहे.
वाह ! साजीरा ! धन्यवाद
वाह ! साजीरा ! धन्यवाद !
बेस्ट विषेश !
साजिरा, एकदम परफेक्ट!
साजिरा, एकदम परफेक्ट!
साजिरा, छान पोस्ट.
साजिरा, छान पोस्ट.
(No subject)
<< तेथील मुलींना महिन्याला
<< तेथील मुलींना महिन्याला ठराविक तारखेला पगार कमवून आणणारा बाबू हवा असतो, (अगदी मराठी पोरींसारखंच) >> निषेध
(No subject)
प्रयोग, लग्नाच्या काळजीने
प्रयोग, लग्नाच्या काळजीने कुणी व्यवसायात उतरत नसेल, तर नकोच उतरुदे, खरे तर ती सबब काही कामाची नाहि.

जेव्हा माझे लग्न ठरत होते, (१९८९-९० च्या सुमारास) तेव्हा मी सम्भाव्य भावी पत्नीला केवळ एका वाक्याने आश्वस्त केले होते ते असे की, मी किती पैसा कमावतो या पेक्षाही, मी जो काही थोडा वा बहुत पैसा कमावेन, तो कसा खर्च करायचा याचा अधिकार याक्षणी देखिल माझ्यापाशीच आहे, त्यात आइवडील्भाऊ लुडबुड करीत नाहीत, तशी आमच्यात पद्धत नाही. अन हे माझ्या सध्याच्या कमाईच्या शेपाचशे रुपयान्चे स्वातन्त्र्य काय असते हे जर तुला कळत असेल, तरच तू माझा विचार कर. धड नोकरी देखिल नसलेल्या मला तिने पसन्द केले, जेव्हा तिला डॉक्टर्/वकिल मुलगे मागणी घालत होते (सान्गोवान्गीच्या गप्पा नाहीत, त्या प्रत्येकाला मी ओळखत होतो)
याच काळात पुण्यातील माझे ज्ञातीतील यच्चयावत मुली, केवळ ब्यान्क वा बजाज/टेल्को/सरकार मधिल नोकरदारासच पसन्द करीत असल्याने, मी तिकडे जायचा प्रश्नच नव्हता, अन म्हणून मी देशस्थान्चा जावई झालॉ
असो, मूळ विषय हा नाही, विषयान्तराबद्दल क्षमस्व
प्रयोग, तुम्ही हे जनरलाइज्ड
प्रयोग,
तुम्ही हे जनरलाइज्ड विधान कशाच्या आधारावर केले आहे ते समजले नाही. या बाफचा हा विषय नाही त्यामुळे आपण दुसरीकडे बोलुयात.
सॉरी
स्वाती, निषेधाचा निषेध
स्वाती, निषेधाचा निषेध करावासा वाटत आहे...
त्यांनी जे लिहिले आहे ते अगदी खरे आहे.
मुलीच काय मुले सुद्धा नोकरीवाली मुलगी हवी असे म्हणतात की ...
सकाळला वाचा, वकील मुलींची लग्ने जमत नाहीयेत.
अजय, मामी, प्रयोग आणि मंडळी मला काही प्रश्न / शंका आहेत त्या अश्या :
माझ्या प्रश्नांसाठी उदाहरण म्हणून छोटेसे दुकान अथवा सेवा पुरविणारा व्यवसाय घेऊया.
१. अनेक लोक असे असतात की त्यांच्याकडे खुप चांगल्या कल्पना असतात, उत्साह असतो, पण पुरेसे भांडवल नसते. गुजराथी / मारवाडी / पंजाबी लोकांमधे जसे एकमेकांना सुरूवात करण्यासाठी मदत केली जाते, तसे मराठी माणसाच्या बाबतीत होत नाही. अशा लोकांनी काय करावे ?
२. व्यवसाय म्हणला की तो सरळपणे करता येत नाही असा एक सार्वत्रिक समज आहे. म्हणजे कामे करून घेण्यासाठी लाच, इ. गैरमार्गांचा वापर करावा लागणे. अगदी कर्ज मिळवण्यापासुन ते माल खपवण्यापर्यंत. उदा. मी एकाकडून ऐकले होते की तो काही वस्तु कंपन्यांना विकतो पण त्याला तिकडचे लोक अगदी मुळ किमतीच्या ५०% पर्यंत हिस्सा मागतात. म्हणजे याला १५०% पर्यंत किंमत मागावी लागते किंवा नफा कमी होतो.
३. सरकारी लोकांशी संबंध येणार असेल तर परिस्थितीचे वर्णन करावे तेवढे थोडेच असते. उदा. वेगवेगळी लायसन्सेस, परवाने, मिळवणे. सरकारी संस्थांना सेवा सुविधा पुरविणे.
४. बर सगळ्यातुन मात करून सुरूवात करावी, तर आजकाल स्पर्धा जबरदस्त असते. लोक भाव काहीच्या काही पाडून मागतात. म्हणजे तुम्ही जर कार भाड्याने देत असाल तर ओळखीच्या लोकांना अगदी फुकटच हवी असते गाडी. उदा. अरे तुम्ही काय घरातलेच आहात, डिझेल टाकू आणि फिरवू, किंवा अमुक तमुक तर आम्हाला ५ रू./कि.मि. ने देतो आणि तुम्ही ओळखीचे असुन ७ रू. ने कसे काय देता. इ.
५. दुकानासारखा व्यवसाय असेल तर हे दुकान म्हणजे पोलिस, हप्तेवाले, वर्गणीवाले यांच्या साठी कुरणच असते.
६. वरील एका किंवा अनेक कारणांसाठी खोटे बोलावे लागणे, की जे अनेकांना जमत नाही.
वरील अनेक कारणांमुळे अनेक चांगले लोक उद्योग करावा असे वाटत असुनही करू शकत नाहीत.
आपल्याकडे (भारतात) मी वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांबाबत परिस्थिती फार भिषण आहे.
तरी याबाबत चर्चा होऊ शकली तर अनेकांना त्याचा उपयोग होऊ शकेल.
बायकोने लग्नानंतर व्यवसायात
बायकोने लग्नानंतर व्यवसायात उडी घेण्यासाठी नोकरी सोडली तर किती नवरे आणि नवर्यांपेक्षाही त्यांच्या घरचे समजून घेतील किंवा त्यापुढे जाऊन सपोर्ट करतील याचीही आकडेवारी काढूया का?
मला वाटतं लग्नाला मुलगी मिळत नाही हे व्यवसायात न पडण्यासाठी कारण होऊ शकत नाही. तो एक बहाणा आहे केवळ.
आपल्याकडे (भारतात) मी वर
आपल्याकडे (भारतात) मी वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांबाबत परिस्थिती फार भिषण आहे.
तरी याबाबत चर्चा होऊ शकली तर अनेकांना त्याचा उपयोग होऊ शकेल.<<
मला नाही वाटत याबाबत सार्वजनिक बीबीवर खुलेआम चर्चा होऊ शकेल.
--
--
स्वाती, या बीबीचा विषय नाही,
स्वाती, या बीबीचा विषय नाही, पण, माझ्या पुढे उदाहरणे आहेत, की व्यावहारीक दृष्ट्या लौकिकार्थाने भरीव शिक्षण न झालेल्या, सरकारी/कम्पन्यात नोकरीस नसणार्या ब्राह्मण मुलास इये महाराष्ट्रदेशी मुलगी न मिळता थेट कर्नाटक गाठावे लागते!
(मला मिळाली इकडचीच, ते माझे नशिब थोर म्हणून)
(दुसरी अनुभूती अशी की, या कर्नाटकी मुली जबरदस्त मनमिळाऊ असतात)
माझे वडिलान्चे काळी, "कोकणातुन" मुली यायच्या, हल्ली कर्नाटकातून येतात येवढाच फरक पडलाय
(कोब्रान्मधे लग्न न झालेल्या ("ब्रह्मचारी") तरुणान्चे प्रमाण भयानक वाढले आहे हे दुसरे दुर्लक्षित सत्य - असेच प्रश्न, अन्य जातिधर्मान्ना आहेतच!)
स्वाती, अपवादाला नियम समजू नकोस प्लिज!
महेश, पोस्ट चान्गलीहे
या बीबीचा खरच हा विषय नाही.... त्रिवार सॉरी!
कृपया विषयाशी संबंधीत लिहा.
कृपया विषयाशी संबंधीत लिहा. इतर विषयांसाठी नवीन धागा चालू करू शकता.
सॉरी अॅडमिन ! माझी नोकरी
सॉरी अॅडमिन !

माझी नोकरी गेली काही वर्षे जरी टिकलेली असली तरी ती कोणत्याही क्षणी सुटु शकते, अन जोवर नोकरीत, तोवर धन्दा सुरू करता येत नाही अन अचानक नोकरि सुटल्यास ऐनवेळी धन्द्यात कसा उतरू? या विवन्चनेत मी बरीच "वर्षे" घालवली. शेवटी मनाशी काही एक निश्चय करुन, सुरुवात केली हे! अगदी "शेण्डी" वाढविण्याच्या प्राथमिक तयारी ते दम्यामुळे मोठ्याने बोलता येत नसल्याने पिम्परीमेड अॅम्प्लीफायर्/कॉर्डलेस माइक खरेदी पर्यन्त!
जोडीला, "खरा इतिहास" शिकवणारे प्रत्यक्षात भेटले तर काय काय भकणार याची उजळणी मायबोलीवरच करतोय
>>कृपया विषयाशी संबंधीत लिहा.
>>कृपया विषयाशी संबंधीत लिहा. इतर विषयांसाठी नवीन धागा चालू करू शकता.
हे कोणाला उद्देशुन आहे ? माझ्या पोस्टला की लिंबूच्या लग्नाबद्दलच्या पोस्टला ?
विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व
विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व
माझी प्रतिक्रिया संपादित केली आहे.
साजिरा, उत्तम पोस्ट.
Pages