चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)

Submitted by शर्मिला फडके on 10 February, 2010 - 22:23

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.
'चित्रपट का आवडला' हे लिहिताना जरी ते तितकसं महत्वाचं नसलं तरी चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार व्हायला हवा. हे रसग्रहण कसं केलं जावं हेही शिकावं लागतं.
बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, कॉश्च्युम डिझायनरची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या दिग्दर्शकांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोत्क रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. पण समिक्षा लिहिताना कोणीच ह्याची काळजी घेत नाही. नव्हे समिक्षकांनाही ते उमगलेले असतेच असे नाही.

मंथनमधे स्मिता पाटीलच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या दाखविण्यासाठी बेनेगल आणि स्वतः स्मितानेही खूप मेहनत घेतली होती. लोकेशनवर अक्षरशः तापलेल्या मातीच्या जमिनीवर स्मिता कित्येक दिवस अनवाणी चालत होती तसा लूक येण्यासाठी.

उत्सव मधला पिवळ्या रंगाचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर, किंवा त्याकाळातले गणिकांचे दागिने आणि गृहिणींचे दागिने यातला बारकाईचा फरक (जो भन्सालींच्या देवदासमधे अजिबात केलेला नव्हता) वगैरे टिपलं गेलं की चित्रपटाच्या रसग्रहणात मोलाची भर पडते.
लगानच्या वेशभुषेबद्दल बोलताना भानू अथैयाजींनी किती बारकाईने विचार केला होता! लगान चित्रपटाचा जो काळ सुरुवातीला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकरांनी निवडला होता त्या काळाला अनुसरुन भानू अथैयाजींनी वेशभुषेचा टोन मळकट आणि गडद निवडला होता. आमिर खानला तो खटकला आणि त्याने रंग जास्त ब्राईट वापरायला सुचवले. भानूजींनी नकार दिला. त्या म्हणाल्या तुम्ही चित्रपटाचा काळ दहा वर्षांनी पुढे केलात तर तुम्हाला हवी ती शेड मला देता येईल. आमिर-आशुतोषला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले. थोड्या वर्षांच्या फरकानेही फॅब्रिकच्या पोतामधे, रंगामधे कधी कधी फरक पडू शकतो. अर्थातच हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यातले नसेलही पण तरी अत्यंत महत्वाचे आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. पण अजून थोडं विस्तृत लिही ना. वाचायला आवडेल.
कुठलाही सिनेमा पाहताना या असल्या 'फायनर पॉईंट्स'कडे मी स्वत: नेहमी लक्ष देते - अर्थात जमेल तितपत आणि एक प्रेक्षक म्हणूनच. पण मला ते करायला आवडतं.

नीधप | 9 February, 2010 - 07:03
हुड,
जर दावा नसेल तर मग प्रत्येक गाडीचा नंबर अगदी ठरवून यूपीचा करण्याची तरी काय गरज आहे?

आणि तिथे लॉ-ऑर्डरचा प्रश्न असला तरी चित्र बघून निदान थोडी मिळतीजुळती लोकेशन्स शोधण्याइतकं डोकं वापरायला काय हरकत आहे?
मलातरी ते खटकलं.

प्रतिसाद रॉबीनहूड | 9 February, 2010 - 07:13
खटकण्यासारखं आहेच ते यात दुमत नाही.तू मागे लिहिल्याप्रमाणे(एका नेपथ्य काराच्या स्टोरी प्रमाणे) हाडाच्या कलावन्ताला चुकीचे बारकावे देखील बोचणे साहजिक आहे. कारण 'नजर' तयार झालेली असते. पण काही लोकांच्या बाबतीत मेन्दूतली काही बटणे तरी ऑफ करणे आवश्यक असते नाही का? आता चित्रपटाच्या गाण्याबाबत लिप मूवमेन्ट हा प्रकारच गायब झाला आहे. पूर्वी नूतन सारख्या गायकीची जान असणार्‍या अभिनेत्रींच्या गळ्याच्या नसादेखील फुगलेल्या दिसायच्या गाण्याच्या प्रसंगात. जाऊ दे. झालं...

नीधप | 9 February, 2010 - 07:45
मुद्दा एवढाच आहे की उत्तर प्रदेशातला ग्रामीण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातला ग्रामीण भाग यात व्हिज्युअली खूप फरक आहे रंग, पोत, वनस्पती, मातीचा प्रकार, घरांची पद्धत सगळंच... तर कथा जिथली आहे तिथल्याप्रमाणेच सगळं दिसलं तर परिणामकारकता वाढते.

वाईच्या माणसाला गोरखपूरचा दाखवल्याने वाईच्या माणसाला वाईट वाटते की नाही हा मुद्दाच यायचा संबंध नाही इथे.

पण केवळ सोयीचं असल्याने ही एवढी मोठी तडजोड केली जाते. प्रेक्षक एवढा थोडंच विचार करतात? कोण एवढं बघतंय? चल जाता है! असं म्हणत प्रेक्षकाचा निर्बुद्धपणा गृहीत धरला जातो आणि गंमत म्हणजे प्रेक्षकालाही प्रॉब्लेम नसतोच.

अश्विनीमामी | 9 February, 2010 - 10:17
नी पट्लं. या द्रुष्टिकोनातून फ्लिन्ट्स्टोन्स व फ्लि. इन रॉक वेगास सिनेमे आवड्तात. अटेन्शन टू डिटेल जबरदस्त आहे. आपल्या कडे स्क्रिप्ट चा पत्ता नाही तर बाकी रिसर्च कसला डोंबल करणार हिन्दी वाले.

हल्ली कॉमन थीम असणार्‍या चित्रपटाचेही पन्जाबीकरण झाले आहे ते बहुधा पन्जाबी एन आर आय डोळ्यासमोर ठेवून बहुधा...>> अगदी अगदी. माझा नवरा करवा चौथ ला कड्बा चाउत म्हणत असे.
ते चाळणीतून नवरा बघणे, लेह म्हण्णे, हाय ओ रब्बा करणे, पैरी पौना खास त्या पब्लिक साठीच असते. लै
वैताग येतो ते बघताना.

माधव | 10 February, 2010 - 01:42

नीरजाने म्हणल्याप्रमाणे लहान लहान गोष्टींनी किती फरक पडतो. 'उत्सव' (तोच रेखाचा) मध्ये एक गाणे आहे - 'मेरे मन बाजे' त्यात सगळ्या माणसांना पिवळ्या रंगाचे कपडे दिले आहेत costume designer ने - अर्थात हे मला चंदेरी मधला लेख वाचल्यावर जाणवले होते. असे का केले? तर ते गाणे वसंत ऋतुच्या काळातले आहे (गाण्याची चाल पण त्यानुसारच बांधली आहे लक्ष्मी-प्यारेंनी) आणि त्या काळात पिवळ्या रंगाचे साम्राज्य असते निसर्गावर. त्याकरता म्हणूनच त्यांनी तो रंग निवडला. इतका विचार करणारे कलाकार असतात तेंव्हाच उत्कृष्ठ कलाकृती घडते. नाहीतर आहेतच आपले खानचाचा - सब घोडे बारा टके वाले!

प्रतिसाद नीधप | 10 February, 2010 - 02:28
उत्सव संपूर्ण व्हिज्युअल डिझाइनच्या बाबतीत मास्टरपीस आहे. हॅटस ऑफ टू जयू आणि नचिकेत पटवर्धन. म्हणून तर रेखा ही रेखा न दिसता वसंतसेना दिसते.. तिच्या कपड्यांना ग्लॅमर आहे पण ते रेखाचं/ बॉलिवूड अभिनेत्रीचं नाही तर वसंतसेनेचं...
तोच मौर्यपूर्व काळ असलेली अशोका मात्र तद्दन बाजारू आणि भुक्कड दिसते.

प्रतिसाद प्राची | 10 February, 2010 - 02:39
चल जाता है! असं म्हणत प्रेक्षकाचा निर्बुद्धपणा गृहीत धरला जातो >>> अगदी अगदी. थोडं बाफच्या विषयाशी विसंगत आहे,पण लिहिते.
'शौर्य' बर्‍याचजणांनी बघितला असेल. त्यात जावेद जाफरीचे जे घर दाखवले आहे, ते बघून आम्ही थक्क झालो. अशी घरं मिळतात मेजर्सना? आम्हांला तर नाही मिळालं कधी? अशी मोठी घरं असतात पण ती वरच्या पदावरील ऑफिसर्सना मिळतात. पण तीही एवढी well furnished नसतात.
दुसरी गोष्ट, जावेद जाफरी आपल्या प्रेयसीबरोबर त्या घरात राहताना दाखवलाय. रात्री ते एकत्र झोपताना दाखवलेत. आणि मज्जा म्हणजे कोणीच काहीही हरकत घेताना दाखवले नाहीये. आर्मीत जर असं काही घडलं तर त्या ऑफिसरचे काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
मिनिशा सरळ मनाला येईल तेव्हा आर्मी कॅम्पसमध्ये शिरते, चौकशी करते, तेही श्रीनगर कॅण्ट मध्ये? जिथे प्रत्यक्ष ऑफिसरलाही आपली पुर्ण ओळख पटवून मगच आत प्रवेश मिळतो, तिथे? हद्द आहे.

मग जे प्रत्यक्षात कधीच घडत नाही, ते चुकीचे प्रसंग का दाखवायचे?
हे एक उदाहरण झाले, पण असे बरेचदा होते. जेव्हा असे काहीतरी मुर्खासारखे दाखवले जाते, तेव्हा खूप राग येतो.

प्रतिसाद प्रविणपा | 10 February, 2010 - 13:03
परंतू शौर्य मधील के के मेनन च्या अभिनयासाठी एकवेळ हा चित्रपट पहायलाच हवा. खास करून शेवटच्या कोर्ट रूम मधील सीन साठी.

प्रतिसाद पग्या | 10 February, 2010 - 21:12
प्रेक्षकालाही प्रॉब्लेम नसतोच. >>>> मला एक कळत नाही इथे सामान्य प्रेक्षकाला दोष का दिला जातोय ? व्हिजुअल डिझाईन हा माझ्या* अभ्यासाचा विषय नाही की व्यवसायाचा भाग नाही. मी वाईला गेलेलो नाही आणि गोरखपुरला पण नाही वास्तवीक माझं खेडेगावात इतकं वास्तव्यच नाही की नुसतं चित्रपटात (ते ही पात्र, कथा, संवाद, संगीत ह्याच्या पलिकडे) पाहून मला समजेल की ते उत्तर प्रदेशातलं आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं की आणखीन कुठलं. तुम्हाला ह्या गोष्टी खटकल्या कारण तुम्ही त्या दृष्टीने चित्रपट माध्यमाकडे पाहू शकता कारण तुमचा तेव्हडा अभ्यास आहे आणि तो तुमचा व्यवसाय आहे.
प्राची, तुम्ही दिलेलं एक उदाहरण तुम्हाला खूप पटलं कारण तुमचा त्या क्षेत्राशी जवळून संबंध आलेला आहे. मला माहितच नाही की मेजरला कसं घर मिळतं तर मी त्याच्यावर आक्षेप कसा काय घेणार?

मी आयटी मधे काम करतो त्यामुळे एखादं application बघून म्हणतो ह्यात हे हे design issues आहेत.. म्हणून मला ते आवडत नाही पण तुम्हाला एक सामान्य user म्हणून ते आवडू शकतं कारण तुम्हाला त्याच्यात design issues आहेत हे कळणार नाही.. कळायचा प्रश्न नाही.. शेवटी एक अनुभव म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण होत असतील तर तुम्हाला त्यातले design issues कसे दिसत नाही असं मी म्हणू नये.

Perfection ची अपेक्षा बाळगण्यात गैर काहीच नाही. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून जर चित्रपटातल्या गोष्टी इतक्या बारकाईने बघण्याची आणि समजून घेण्याची माझी कुवत नसेल आणि मुख्य म्हणजे कथा, अभिनय, संगीत, कलाकार आणि एक संपूर्ण अनुभव ह्या पलिकडे इतक्या तपशीलात शिरण्याची मला गरज वाटत नसेल तर त्यावर तुमचा आक्षेप असणं चूकीचं आहे असं मला वाटतं. मागे एकदा क्लासेस आणि मासेस ह्यावर चर्चा झाली होती. तसा हा चित्रपट आमच्यासारख्या मासेस साठी आहे असं समज..

* - इथे "मी" हे प्रातिनिधीक आहे.

प्रतिसाद अश्विनीमामी | 10 February, 2010 - 21:35
उत्सव खरेच मास्टरपीस आहे. त्यात रेखाचे दागिने वा वा. खूप शोधून मला कट्क मध्ये ती कानामागे लावते तसे फूल असते तशी अंगठी मिळाली आहे. त्यांनी वेजिटेबल डाइज वापरले होते कपड्यांसाठी. ब्राह्मणीचे कपडे, रेखेचे कपडे सर्वच बघण्यासारखे. त्याचे संगीतही अप्रतीम आहे. आता वीकेंड्ला परत बघणार. प्रेमदिवसा निमित्त.

शौर्यबाबत अनुमोदन. तसेच लक्ष्य मध्ये पण खूप त्रुटी आहेत. अगदी साधे, सीनीअर ऑफिसरच ड्रायवर च्या शेजारी बसतो. प्रविणपा, शौर्यमध्ये सुरुवातीला राहुल बोस एका जंप बद्दल बोलत असतो व ग्रॅविटी डिफाय केली असे म्हणतो. लगेच एक आंटी ग्रॅविटी, मुझे मालूम है मैने ग्रिहशोभिका मे पढा था इससे स्किन खराब होती है इसलिये हमे पनीर क्रीम खाना चाहिये वगैरे चालू करते व राहुल चा चेहरा पड्तो. अतिशय मस्त विनोद आहे तो. केके चा अभिनय मस्त आहे. तो म्हणतो ना अपनी चाय खतम करके जाना तो पूर्ण संवाद छान आहे. शेवट्चा पण. अगदी काटा येतो. मी १५- २० वेळा पाहिला आहे. ( राहुल बोस यू नो ) मिनिशा ही स्त्री फक्त बघणे बल असून तिचे बोलणे सहन होत नाही, सापासारखे फुत्कार टाकत बोलते.

एक लास्ट नोटः दीवार मध्ये अमिताभ आइ व भाउ देवळात जातात ते परत येइपरेन्त बाहेर थांबलेला असतो मग तो कामाला जाणार असतो. त्याच्या हातात एक चपटा स्टील चा ड्बा आहे लंच चा हे फार अक्युरेट आहे. आजच्या बॅग बास्केट ट्परवेअर टिफिन्सक्राउड्ला ते समजणार नाही. पण एके काळी असेच ड्बे लोक नेत असत. परवा मला तसला ड्बा भेट्ला तर मी आनंदाने आणला व घरी शेअर करायचा प्रयत्न केला ( आइ वेडी आहे असे लूक आजकाल जास्त मिळतात मला!) मी तो कपाटात ठेवला आहे. गाण्यांच्या वही बरूबर.

प्रतिसाद फारएण्ड | 10 February, 2010 - 21:39
मामी, त्या शॉट नंतर तो व शशी कपूर वेगवेगळ्या रस्त्याने कामावर निघून जातात तो ही मस्त आहे ना?

प्रतिसाद नीधप | 10 February, 2010 - 22:05
मला एक कळत नाही इथे सामान्य प्रेक्षकाला दोष का दिला जातोय ?<<
प्रेक्षकाला दोष द्यायचा नाहीये. प्रेक्षकाची व्हिज्युअल सेन्सिबिलिटी किंवा चित्रपटासंदर्भाने चांगल्या दर्जाबद्दलचं एक्स्पोजर हे मर्यादीत ठेवण्यासाठी निर्मातेच जबाबदार आहेत. कारण ते त्यांच्यासाठी सोयीचं आहे.

>>व्हिजुअल डिझाईन हा माझ्या* अभ्यासाचा विषय नाही की व्यवसायाचा भाग नाही.
मला माहितच नाही की मेजरला कसं घर मिळतं तर मी त्याच्यावर आक्षेप कसा काय घेणार?<<
तुम्ही आक्षेप घेतला पाहीजे किंवा नाकारलं पाहीजे ही अपेक्षा नाहीचेय माझी. दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना 'चलता है!' प्रकारचं गृहीत धरणं याबद्दल आक्षेप आहे.

>>शेवटी एक अनुभव म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण होत असतील तर तुम्हाला त्यातले design issues कसे दिसत नाही असं मी म्हणू नये.<<
सॉफ्टवेअरमधले डिझाइन इश्यूज आणि इथले डिझाइन इश्यूज ह्यांची तुलना नाही होऊ शकत. चित्रपटातले डिझाइन इश्यूज हे अनुभवावर परिणाम करणारे असतात. पण अनुभवाची उच्च तीव्रता (इन्टेन्सिटी) आपण अनुभवलीच नसेल तर आपल्याला कसं कळेल की अनुभवाच्या पातळीवर अमुक एक कलाकृती कमी पडते?
मेजरला जसं घर मिळतं तसं दिसण्याने, उत्तर प्रदेशातली कथा दिसतानाही उत्तर प्रदेशातलीच दिसल्याने निश्चितच परिणामकारकता वाढते. अनुभवाची पातळी वाढते.
ती परिणामकारकता आपल्याला माहीत नसते किंवा हिंदी सिनेमा आहे तो तेवढाच असा प्रेक्षकांचा दृष्टीकोन असतो. ते मला पटत नाही. माझा पूर्ण आक्षेप निर्माते दिग्दर्शकांच्या ह्या सरकवणे वृत्तीला आहे.

>>मागे एकदा क्लासेस आणि मासेस ह्यावर चर्चा झाली होती. तसा हा चित्रपट आमच्यासारख्या मासेस साठी आहे असं समज.. <<
तेव्हाही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की हे क्लासेससाठी, मासेससाठी असं काही नसतं. चित्रपट प्रामाणिकपणे, काटेकोरपणे केलेला असतो किंवा नसतो. प्रामाणिकपणे केलेली कलाकृती मासेस ना नको असते, दर्जा नको असतो असं अजिबात नाही. आणि मासेसला आवडलेली कलाकृती ही कलाविष्कार नसतेच किंवा तिला दर्जा असूच शकत नाही असंही काही नाही.

परत एकदा माझ्या एका प्रोफेसरचं महत्वाचं वाक्य.. Audience can not read it, but they can feel it.
या फील इट साठी करणार्‍याने काम करणं गरजेचं असतं.

चांगला विषय आहे. विशेष म्हणजे उदाहरण वाचायला मिळालीत की मग ती कलाकृती डोळ्यासमोर येते आणि एका सामान्य व्यक्तीला त्या चित्रपटाचा नव्यानी विचार करता येतो. उत्सवमधील पिवळ्या रंगाबद्दल मला माहिती नव्हते.

अजून उदाहरणे घेऊन लिहा कुणीतरी. हा विषय इथे सर्वतोपरी नवीन आहे.

Audience can not read it, but they can feel it.
या फील इट साठी करणार्‍याने काम करणं गरजेचं असतं. >>> शंभर टक्के पटलं. म्हणूनच तपशील समजले नसतील तरी 'अशोका' आणि 'देवदास' मला बेगडीच वाटले. ह्याला मी प्रेक्षकामधला 'सिक्थ सेन्स' म्हणेन हवे तर. काय चुकतंय ते कळत नाही पण काहीतरी चुकलंय एवढं कळतं.
मला स्वतःला चांगले ( म्हणजे सखोल अभ्यास करुन लिहिलेले ) रसग्रहण वाचून चित्रपट बघायला खूप आवडते कारण त्यामुळे एरवी आपल्या नजरेतून सुटल्या असत्या अशा कित्येक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. त्यामुळे त्या कलाकॄतीला चांगला न्याय मिळतो.

मलाही चित्रपट बघण्यापुर्वी त्याबद्दल भरभरुन ऐका-वाचायला आवडते. पुस्तकाबद्दल मात्र याबाबतीत एकदम विरुद्ध आहे.

खरंच खूप उपयुक्त माहिती मिळेल. नवीन दृष्टी मिळेल त्याच गोष्टींकडे पाहण्याची आणि मुख्य म्हणजे जे चांगलं ; ते निसटून न जाता त्याचं योग्य ते कौतुक होईल. धन्यवाद शर्मिला!

Audience can not read it, but they can feel it.
या फील इट साठी करणार्‍याने काम करणं गरजेचं असतं. >> नी अनुमोदन!

सॉफ्टवेअरमधले डिझाइन इश्यूज आणि इथले डिझाइन इश्यूज ह्यांची तुलना नाही होऊ शकत. चित्रपटातले डिझाइन इश्यूज हे अनुभवावर परिणाम करणारे असतात. >> नी, इथं नाही सहमत. मला वाटतं पग्याला चित्रपट आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही जाणकार आणि end user / प्रेक्षक यांच्या तुलनात्मक दृष्टीकोनातून पाहायचे आहेत. त्यामुळे 'अनुभव' , 'अनुभूती' हे मूलभूत धरुनच तुलना रास्त आहे. उदा.Internet Explorer 7 चे त्यावर अ‍ॅप्लिकेशन तयार करणार्‍या डेव्हलपर्सना जितके इश्यूज दिसले तितके कदाचितच इतर यूजर्स ना दिसले असतील. ज्यांना इश्यूज येत होते त्यांच्या तक्रारींवरुन लगेचच मायक्रोसॉफ्ट्ला IE 8 लॉन्च करावा लागला. ज्यांना या त्रुटीच माहित नसतील त्यांना IE upgradation ची तितकी जरुरी वाटलीच नसेल. ते अजूनही IE 7 च वापरत असतील. असो.
मुद्दा हाच आहे की
पण अनुभवाची उच्च तीव्रता (इन्टेन्सिटी) आपण अनुभवलीच नसेल तर आपल्याला कसं कळेल की अनुभवाच्या पातळीवर अमुक एक कलाकृती कमी पडते? >>
सर्वोत्कृष्ट दर्जा कोणत्याही कामाची गरज असतेच.

नी, इथं नाही सहमत.<< शक्य आहे. कारण मला त्यातलं नीटसं कळत नाही. आणि पग्याच्या पहिल्या पोस्टवरून अनुभव या संदर्भात त्या इश्यूजनी फरक पडणार नाही असा माझा समज झाला होता. तो गैरसमज मगाशी त्याच्याशी बोलताना दूर झाला.

सर्वोत्कृष्ट दर्जा कोणत्याही कामाची गरज असतेच.<<
याबद्दल दुमत नाही आणि नव्हतंही.
गैरसमज नसावा

शर्मिला, चांगला विषय निवडलास, मला आठवतय उत्सव जेव्हा प्रदर्शित झाला होता त्या वेळेच्या किस्त्रीम मासिकात मोठा लेख आला होता , ह्याच सगळ्या बद्दल. किती गोष्टींचा बारकाइने अभ्यास केला असतो ह्या लोकांनी.

शर्मिला मस्त धागा आहे.
अशोका आणि देवदास (शारुखचा बेवडाज) साठी प्रचंड अनुमोदन. मी एक सामान्य प्रेक्षक (म्हणजे चित्रपटाच्या कुठल्याही अंगाचं सखोल ज्ञान नसलेली) आहे. तरीही 'दामिनी' च्या त्या तारीखवाल्या मोनोलॉगमधे मागे येणारा आसूड ओढल्याचा आवाज माझ्या लक्षात येतो आणि त्या दिग्दर्शकाला दाद दिली जाते.
दीवारमधलं ते जवळजवळ सगळ्या सिनेमात देव बदलुन दाखवलेलं आहे, कमल हसनची 'चाची ४२०' मधे महाराष्ट्रीन नऊवारी आणि तमिळमधे दाक्षिणात्य नऊवारी साडी आहे. गोविंदासारखा माणुस नाचत असतांना मागे १००-१५० लोकांना का नाचवत आहेत? हे मला अजीबात समजत नाही. बर्फानं आच्छादित लोकेशन्सवर असलेल्या गाण्यांमधे स्वेटर, ओव्हरकोटमधला हीरो आणि स्लीव्हलेस ब्लाऊजेस आणि साड्या नेसलेली हिरोईन हा शुद्ध मुर्खपणा आहे हे जाणवत राहतं. मग मी ज्या कोणाचा यात सहभाग आहे ते सगळे एकतर मुर्ख आहेत किंवा त्यांना हे सगळं करत असतांना डुलकी लागली होती असं म्हणुन सोडुन देते.(आवडलं काही तर त्याची जरुर नोंद घेतली जाते.)
चल जाता है! असं म्हणत प्रेक्षकाचा निर्बुद्धपणा गृहीत धरला जातो>>>>> Uhoh घ्या म्हणजे आपण त्यांना मुर्खात काढतो आणि ते आपल्याला?

चर्चा मस्त आहे. सोबत उदाहरणे आल्यास आम्हालाही कळेल की कशात काय होते ते..
उत्सवबद्दलचा लेख मीही वाचलेला. अगदीच कोरी पाटी घेऊन चित्रपट पाहण्यापेक्षा त्याबद्दलचे वाचुन मग पाहिला की पाहताना सगळीकडे लक्ष देता येते....

घ्या म्हणजे आपण त्यांना मुर्खात काढतो आणि ते आपल्याला?<<
त्यांना माहीत नसतं म्हणून ते असे घोळ घालतात असं काही वाटलं का काय तुला? Happy
सगळं कळत असतं पण इतना कौन देखता है! चल जाता है! ही वृत्ती इतकी अंगी बाणलेली असते की माहीत बिहीत असणं नसणं वेशीला टांगलं जातं.

आच्छादित लोकेशन्सवर असलेल्या गाण्यांमधे स्वेटर, ओव्हरकोटमधला हीरो आणि स्लीव्हलेस ब्लाऊजेस आणि साड्या नेसलेली हिरोईन हा शुद्ध मुर्खपणा आहे हे जाणवत राहतं. >>> हे अगदी मनातले बोललीस श्रुती!!!!!!

सगळं कळत असतं पण इतना कौन देखता है! चल जाता है! ही वृत्ती इतकी अंगी बाणलेली असते की माहीत बिहीत असणं नसणं वेशीला टांगलं जातं.>>>>>>>>>हम्म्म्म्म! 'चलता है' जर असंच चालु राहीलं तर त्या एका विनोदात होतं तसं बघायची ही तयारी ठेवायला हवी. हिरो सायकल निकालता है, दरवाजा खोल के बैठते हुए गाडी शुरु करता है और निकल जाता है टबडक टबडक टबडक टबडक... Proud

मेहबूब खानने 'प्यार किया तो डरना क्या' यातल्या शीशमहल करता लागणारे आरसे परदेशातून (बहुतेक बेल्जिअम, आता नक्की आठवत नाहिये) मागवले होते. ते इथलेच आरसे घेउन तो सेट उभा करु शकले असते पण उत्तम देण्याच्या हव्यासापायीच त्यांनी तो पर्याय स्विकारला नाही. गाण्यात आरशाच्या एकूण एक तुकड्यात नर्तिकेचे प्रतिबिंब जे कॅमेर्‍यात पकडलय ते भारतीय आरशांनी शक्य नव्हते.

आणि result तर आपल्या समोर आहेच. त्यांच्यानंतर असा प्रयोग कोणी करू धजले नाहिये.

संजय लीला भंसालीने त्याच्या सावरीया सिनेमात सगळा निळा रंग वापरला आहे. त्यातही काही खास कारणे होती का की आपले उगीच ? जाणकारानी स्पष्ट करुन सांगावे.

उत्तम धागा Happy
अजुन एक उदा. 'दिल से' मधील ऐ अजनबी गाणे. शा.खा. रेडिओस्टेशन वरुन हे गाणे प्ले करतोय. गाणे चालु असताना मनीषा च्या कॅम्प वर च्या सीन मध्ये मनीषा रेडिओ बंद करते आणि गाणे स्टॉप होते आणि थोड्या वेळाने परत चालू करते तर ते गाणे पुढे गेलेले असते. भले त्या गाण्याची कंटीन्युटी जाते पण that is how it should be ... Happy

छान विषय आणि चर्चा. वाचते आहे.
सर्वांचेच मुद्दे पटले.

रच्याकने १- एकदा रोहिणीहट्टंगडींच्या मुलाखतीत त्यांनी भानु अथय्यांना कस्तुरबांसाठी काठाची साडी घ्यायला सुचवलं असं वाचलं होतं म्हणे, कारण विधवा स्त्रियाच बिनकाठाच्या साड्या नेसत त्या काळी.
तेव्हा मला हे भानुंना कसं माहित नव्हतं असा प्रश्न पडला होता.

रच्याकने २-कालेजात काही मुलांनी मिळुन फिल्मअ‍ॅप्रिसियेशनचा एक छोटासा कोर्स केला होता, त्यात मास्तरणींबाईंना एकीने (ती मी नव्हे Happy हेच विचारलं होतं की उत्कृष्ट हेच मुळात उत्कृष्ठ आहे हे आम्हाला कसं कळणार ? आणि आपण बेक्कार हे प्रमाण धरून का अभ्यासत नाही ? (पथेर पांचाली आणि इनग्रिडबर्गमन बघून कंटाळा आला.) त्यावर एफ्टीआयआय च्या मास्तरीण बाईंनी खालील उत्तरं दिली होती.
१. त्यासाठीच आपण येवढा खटाटोप करतो आहोत. घरातल्या चक्क्याचं मसुसूत तलम धोतरात गाळलेलं वेलचीयुक्त श्रीखंड, चितळ्यांच श्रीखंड आणि वारणाच आणि अलाण्याफलाण्याच यातला फरक जिभेला कळतो ना? तसंच हे.
२. बेक्कार हे तर तुम्ही सगळीकडेच जन्मापासून पहात आलात आणि त्यावरच पोसलात ना? मग आता उत्कृष्ट अभ्यासून पहा आणि ते का उत्कृष्ट आहेत हे समजवायलाच आम्ही इथे आहोत.

माझा पूर्ण आक्षेप निर्माते दिग्दर्शकांच्या ह्या सरकवणे वृत्तीला आहे. >> हे एकदम मान्य.आणि या वृत्तीला कारण हे 'चलता है' स्वीकारणारे आपण प्रेक्षक.
गुरू मध्ये दाखवलेली मुंबई जास्त खरी वाटते कारण त्या सर्व भागात एक वेगळाच कलरटोन वापरला आहे,हरीश्चंद्राची फॅक्टरीमधे मात्र तो खरेपणा येत नाही सगळचं नवकोरं,चकाचक आणि 'सेट'वरच वाटतं.
रागोवच्या दिग्दर्शनाबद्द्ल मतभेद असू शकतील पण त्याच्या सत्या,कंपनी इ सिनेमातल्या वातावरणनिर्मितीमधले डीटेल्स परफेक्ट होते. अन्यथा 'आर्ट कॉलेज' असा ५बाय ५चा बोर्ड लिहीलेले कॉलेज आणि 'पोलिस स्टेशन' अशी स्पष्ट पाटी असलेले गाव बघायची आपल्याला सवय आहेच.

रैना,
>>रच्याकने १<<
मुलाखतीत गोष्टी स्वतःच्या बाजूने सांगण्याची नटांची सवय नवीन नाही. म्हणजे रोहीणीताई खोटंच बोलली असेल असं मी म्हणत नाही पण चर्चेदरम्यान आलेला मुद्दा आणि मी सुचवलेले यातला सूक्ष्म फरक पार करणं सोपं असतं अशी एक शक्यता. दुसरं असं की भानू मॅम असल्या तरी एखादा तपशील सुटून जाऊ शकतो.

>>रच्याकने २<<
दुसरं उत्तर उत्तम...

२. बेक्कार हे तर तुम्ही सगळीकडेच जन्मापासून पहात आलात आणि त्यावरच पोसलात ना? मग आता उत्कृष्ट अभ्यासून पहा आणि ते का उत्कृष्ट आहेत हे समजवायलाच आम्ही इथे आहोत.>>अगदी personally घेऊ नका. पण तुझा पहिला प्रश्न कि अमके उत्क्रुष्ट नि तमके नाही ह्याचे मापदंड कोणी कशावर ठरवले आहेत हा प्रश्न तुझ्या मनात आला असेल तर त्याचे उत्तर मिळाले का ?

शेकड्यातल्या ९९% वेळा समिक्षकांना आवाडलेली कलाक्रुती विशेषत: चित्रपट हे लोकांना आवडत नाही, इथे मधे कुठेतरी प्रचंड disconnect आहे असे मला नेहमी वाटते, असे का ह्यावर कधी कोणी अभ्यास केला आहे का ? नीरजा अधिक माहिती देऊ शकेल असे वाटते.

चांगली माहिती मिळते आहे. जाणकारांनी लिहावे अजून.
श्रुती, काही चित्रपट असे बनवतात की ते डोके बाजूला काढून ठेवून बघावे लागतात Happy भारतातलेच नाही, कुठलेही.

कलाकार किती कष्ट घेतात याबद्दल लिहिले आहे वर, पण आजच्या काळातसुद्धा ही गरज पडते का? की तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे काही फरक पडलाय?

जुने मराठी सिनेमे ह्या बाबतीत प्रमाणीक वाटतात . विशेषषतः भालजींचे सगळे मराठी चित्रपट. खरच जुन्या शिवाजींमहाराजांच्या काळात गेल्या सारखे वाटते हे ऐतिहासीक सिनेमे बघताना.

Pages