बीबीसी तसंच अमेरिकेन टीव्ही चॅनलवरच्या मालिका

Submitted by मृण्मयी on 31 January, 2010 - 20:48

हा धागा उघडलाय ते अमेरिकन किंवा बीबीसी टीव्हीवरच्या आपल्या आवडत्या मालिकांबद्दल गप्पा मारायला, एपिसोडबद्द्ल माहिती द्यायला.

सध्या माझी अत्यंत आवडती मालिका आहे 'Big bang theory'. शेल्डन, लेनर्ड, राज आणि हॉवर्ड (हावर्ड) ही चार नर्डी मुलं आणि त्यातल्या दोघांची रूपसुंदरी शेजारीण पेनी ह्यांच्या आयुष्यातल्या मजेदार प्रसंगांवर आधारित ही मालिका जबरजस्त धमाल आहे.

आणखी काही लाडक्या (जुन्या) मालिका म्हणजे एव्हरीबडी लव्ज्स रेमंड, स्टिल स्टँडींग, किंग ऑफ क्वीन्स, एव्हरीबडी हेट्स क्रिस, होम इंप्रुव्ह्मेंट, कॉजबी शो. फ्रेंड्स, साइनफील्ड (आणि वय झाल्याचं लक्षण म्हणून की काय पण गोल्डन गर्ल्स) ह्या देखिल अश्याच काही मस्त विनोदी मालिका.

नंबर्स ही डिटेक्टीव्ह मालिका आणि त्यातला गणिताच्या आधारे गुन्ह्यातले क्लु शोधून काढणारा सुपिक डोक्याचा गणितज्ञ पण झकास आहे. साइक, मंक ह्या पण डिटेक्टिव्ह वर्गात मोडणार्‍या मस्त मालिका.

बीबीसी वरच्या जुन्या आर यु बिईंग सर्व्ह्ड, कीपींग अप अपिअरन्सेस, येस मिनिस्टर ह्या पण ऑल टाइम फेवरिट!

तर मंडळी, ह्या आणि अश्या तुमच्या लाडक्या मालिका, त्यातले आवडते एपिसोड्स, आवडती पात्र ह्यांबद्दल पोस्टी येऊ द्या!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेटी चे पहिले एक दोन सीझन्स चांगले होते, एकदम आवडले. पण ३ आणि ४ (त्यातही ४ जास्त) फारच घुमवली होती कथा आणि विनोदीही वाटली नाही.

मात्र ती अमँडा आणि तो मार्क चारही सीझन्स जबरदस्त होते. मी चौथा सीझन पाहिला तो केवळ या दोघांमुळेच Happy

मला Helen Hunt ची Mad About You पण फार आवडायची. Title song तर एकदम सही होते.
Paul आणि Jamie ला जेव्हा कळते की त्यांच्या मुलीला अ‍ॅलर्जी असल्यामुळे कदाचित त्यांच्या कुत्र्याला सोडावे लागेल, तो एपिसोड मला फार आवडतो. एकुणातच छान मालिका होती.

सध्या 'हाउ आय मेट युअर मदर' पाहतोय. मजा येतीय, प्रत्येक कॅरॅक्टर आपल्या दररोजच्या पाहण्यातीलच आहे असे वाटते. धमाल टाइमपास आहे. Happy

"Outsourced" बघितला का?
गुप्ताची उभे रहाण्याची style आवडली.

Burn Notice परत येतोय November मधे...
Royal Pains पण लवकरच..
सध्या Big Bang Theory आहेच..
The Middle नाही आवडली..
OutSources चे २ भाग बघितले .. बरे वाटले. पण फार चालेल असे नाही वाटले...

कोणी गुडलक चार्ली फॅन्स आहेत का? मी सध्या फारच प्रेमात आहे या डंकन फॅमिलीच्या. नेट्फ्लिक्सवर सगळे सिझन्स आहेत. ज्यांना हलकीफुलकी कॉमेडी आवडते त्यांच्यासाठी धमाल आहे. Happy छोटू चार्ली पण मस्त काम करते. Happy

अरेच्या? हा धागा कधी बघितलाच नाही..

सध्या बिग बँग थिअरी इज माय फेव्हरेट.. साइन्फिल्ड बघितल्यावर असे वाटले होते की त्यात असलेल्या "कॅरेक्टर्स"पेक्षा जास्त "कॅरेक्टर्स" परत कधीच बघायला मिळणार नाहीत.. अंटिल आय सॉ..."शेल्डन " आणी कंपनी.. इन बिग बँग थिअरी.. शेल्डन इज जस्ट टु मच!:हहगलो:

माझ्या आतापर्यंतच्या आवडत्या विनोदी मालीका... चिअर्स, साइन्फिल्ड्,फ्रेंड्स व बिग बँग थिअरी.

मी जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा थ्रिज कंपनिज चे री रन लागायचे.. मस्त होती ती पण सिरीज.. तसेच तेव्हा कॉस्बी शो व फॅमिली टाइज हे पण चांगले शोज होते..मायकेल जे फॉक्स्(बॅक टु द फ्युचर फेमस!) हा फॅमिली टाइज मधुनच पुढे चित्रपटात आला.

साइन्फिल्ड वर इथे मायबोलिवर धागा आहे का? कोणी त्याचे चाहते असतील तर त्यावर लिहायला आवडेल..:)

अ‍ॅण्टूराज्/एण्टूराज कोणी पाहता का? अ‍ॅमेझॉन प्राईम वर आहे. मी टोटली हुक्ड. त्या चारही जणांची केमिस्ट्री, त्या विन्स चा एजंट आरी गोल्ड चा रोल सगळे जबरी आहे. सध्या 'स्लोन' च्या एकदम प्रेमात Happy

आरी वाल्या जेरेमी पिव्हेन चा आवाज कोठेतरी ऐकला आहे असे सतत वाटत होते. चेक केल्यावर समजले - पहिल्या 'कार्स' मधे मॅक्वीन शी फक्त फोनवर बोलणारा तो त्याचा एजंट Happy

The Practice पहिले ७ सीझन्स जबरदस्त कोर्ट ड्रामा ABC / FOX
The X Files- FOX- all seasons
Fringe - Fox - all seasons
How I met your Mom- CBS- all seasons
Black Mirror -BBC

My all time favourite

ऑल टाइम favourite
फ्रेंड्स

transporter the series पण अमेरिकन आहे ना

हाऊस ऑफ लाईज-

अ‍ॅमेझॉन प्राईम वर ही सिरीज आहे. त्याचा पहिला सीझन पाहिला. मॅनेजमेण्ट कन्सल्टण्ट्स च्या रोजच्या कामातले बारकावे उपहासाने/विनोदाने दाखवले असतील असे सुरूवातीला वाटले. पण तेवढे प्रभावी झालेले नाही. ऑथेण्टिक वाटत नाही. दुसरे म्हणजे टॉप लेव्हल मॅनेजमेण्ट कन्सल्टिंग हा टीपिकल व्हाईट मॅन जॉब आहे (ते 'ओल्ड बॉइज क्लब' वगैरे). तेथे ब्लॅक लीड कॅरेक्टर हे 'प्रातिनिधीक' वाटत नाही. डॉन चीडल मला आवडतो पण इथे तो मिसकास्ट वाटतो (जॉन हॅम किंवा व्हाईट कॉलर मधल्या निक सारख्या लोकांना परफेक्ट होईल रोल हा). त्यात एका एपिसोड मधे सगळी धमाल बसवायची म्हणून प्रत्येक मॅनेजमेण्ट असाइनमेण्ट खूप सुलभीकरण (oversimplification) केलेली वाटते. प्रत्येक क्लायंट कंपनीत मुख्य पदावरच्या बायका म्हणजे टोटल निंफो. तो सगळा मॅनेजमेण्ट, कन्सलटन्सी 'गेम' खूप ट्रिवियलाइज करून दाखवला आहे.

मॅनेजमेण्ट कन्सलटन्सी मधे चालणारे असंख्य प्रकार खूप डीटेल मधे, अगदी डिलबर्ट सारखे नाही तरी किमान नर्मविनोद, उपहास वापरून दाखवता आले असते. तसे काही आहेतही. पहिला सीझन बर्‍यापैकी बघणेबल वाटला. पण आता कंटाळा आला.

सुरूवातील आवडल्याने याचे मूळ पुस्तकही आणले आहे. ते कसे आहे ते वाचून सांगतो.

मि. सेल्फरिज
ही ब्रिटिश सिरीयल, अमेरिकेत अ‍ॅमेझॉन प्राइम वर आहे. एकाच एपिसोड मधे टोटली हुक्ड! जबरदस्त नाट्य आहे. जेरेमी पिवेन (Entourage मधला आरी गोल्ड. किंवा कार्स मधे सुरूवातीला मॅक्वीन ट्रक मधून चाललेला असताना त्याच्याशी बोलणारा हायपर एजंट - त्याचा आवाज अनेकांच्या लक्षात असेल) लीड रोल मधे आहे. बरोबर अनेक ब्रिटिश लोक. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला लंडन मधे डिपार्टमेण्टल स्टोअर चालू करतो तो (तो स्वतः अमेरिकन असतो). अतिशय चार्मिंग दिसणारे (त्यातली अ‍ॅग्नेस टाउलर कोणालाही आवडेल अशी आहे), ब्रिटिश मॅनर्स सतत दाखवत वावरणारे लोक, १९१० च्या आसपासचे लंडन हे सगळे खिळवून ठेवते. त्याचबरोबर कथेतील ड्रामाही चांगला आहे. लोक "कन्व्हेन्शनली" प्रसंगानुसार, सवयीनुसार चांगले वा वाईट दाखवले आहेत, उगाच ओढूनताणून ग्रे शेड्स वगैरे प्रकार नाही. त्यांचा वाईटपणाही स्वाभाविक्/सहज वाटतो. संवादही मस्त आहेत. एका कंपनीचा, लोकांचा लीडर म्हणून सेल्फरिज ची इमेज जबरदस्त दाखवली आहे. जेरेमी पिवेन आरी म्हणूनही आवडला होता, इथेही प्रचंड प्रभावी रोल आहे.

मिस्टर रोबोट ही नेटजगतावरची सीरिज . पहिला सीझन चांगला वाटला . दुसरा सीझन बहुधा जुलै मध्ये येणार आहे ..
बघताना थोडासा "ब्लॅक मिरर" पहात असल्याचा फील आला ..

ग्रेज अ‍ॅनोटमी चा दुसरा सीझन आजच संपवला ... ठीक आहे
शिकागो होप चा पहिला सीझन जबरदस्त. मेडिकल ड्रामा मध्ये हायलाइट ठरावा

ऊप्स, करेक्ट करतो. मि. सेल्फरिज बद्दल. पहिले तीन सीझन पाहिले. सुंदर आहे सिरीज.

द ड्यूस (The Deuce) - एचबीओ वर ही नवीन सिरीयल सुरू झाली आहे. "द वायर" वाल्या डेव्हिड सायमन चीच. तसेच डीटेलिंग, "स्ट्रीट" वातावरण वगैरे सगळे आहे. ही ७० च्या दशकाच्या सुरूवातीला न्यू यॉर्क मधल्या 42nd street चा एक पॅच (ज्याला बहुधा "ड्यूस" म्हणत/म्हणतात). तेथील वेश्याव्यवसाय व नंतर पॉर्न इण्डस्ट्री यावर आहे. द वायर मधले एक दोन कलाकार यातही आहेत - तो ड्रग्ज विकणारा डी'अँजेलो व दुसऱ्या सीझन मधला हार्बर वरचा फ्रॅन्क सोबोत्का, आणि इतरही एक दोघे आहेत.

जबरदस्त सिरीज आहे. अजून ८ एपिसोड्स च आले आहेत. जेम्स फ्रँको चे काम मस्त आहे. डबल रोल आहे, जुळे भाउ म्हणून. कोणताही सीन गंभीर किंवा वादावादीचा होत असताना दर २-३ संवादांनंतर मिश्किल पणे काहीतरी बोलून तो हसतो आणि आपल्यालाही हसवतो. मॅगी गाय्लेनहाल (उच्चार माहीत नाही) ला ही बराच मोठा रोल आहे.

Pages