बीबीसी तसंच अमेरिकेन टीव्ही चॅनलवरच्या मालिका

Submitted by मृण्मयी on 31 January, 2010 - 20:48

हा धागा उघडलाय ते अमेरिकन किंवा बीबीसी टीव्हीवरच्या आपल्या आवडत्या मालिकांबद्दल गप्पा मारायला, एपिसोडबद्द्ल माहिती द्यायला.

सध्या माझी अत्यंत आवडती मालिका आहे 'Big bang theory'. शेल्डन, लेनर्ड, राज आणि हॉवर्ड (हावर्ड) ही चार नर्डी मुलं आणि त्यातल्या दोघांची रूपसुंदरी शेजारीण पेनी ह्यांच्या आयुष्यातल्या मजेदार प्रसंगांवर आधारित ही मालिका जबरजस्त धमाल आहे.

आणखी काही लाडक्या (जुन्या) मालिका म्हणजे एव्हरीबडी लव्ज्स रेमंड, स्टिल स्टँडींग, किंग ऑफ क्वीन्स, एव्हरीबडी हेट्स क्रिस, होम इंप्रुव्ह्मेंट, कॉजबी शो. फ्रेंड्स, साइनफील्ड (आणि वय झाल्याचं लक्षण म्हणून की काय पण गोल्डन गर्ल्स) ह्या देखिल अश्याच काही मस्त विनोदी मालिका.

नंबर्स ही डिटेक्टीव्ह मालिका आणि त्यातला गणिताच्या आधारे गुन्ह्यातले क्लु शोधून काढणारा सुपिक डोक्याचा गणितज्ञ पण झकास आहे. साइक, मंक ह्या पण डिटेक्टिव्ह वर्गात मोडणार्‍या मस्त मालिका.

बीबीसी वरच्या जुन्या आर यु बिईंग सर्व्ह्ड, कीपींग अप अपिअरन्सेस, येस मिनिस्टर ह्या पण ऑल टाइम फेवरिट!

तर मंडळी, ह्या आणि अश्या तुमच्या लाडक्या मालिका, त्यातले आवडते एपिसोड्स, आवडती पात्र ह्यांबद्दल पोस्टी येऊ द्या!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दिवसांपुर्वीच येस मिनिस्टर व येस प्राईम मिनिस्टर च्या DVDs मिळाल्या, सध्या त्यांचा आस्वाद घेत आहे.
दोन्ही सिरियल्स माझ्या सगळ्यात आवडत्या आहेत.

पहिल्यांदाच मायबोलिवर प्रतिसाद देत आहे, त्यामुळे शुध्दलेखनाच्या चुका सांभाळुन घ्या.

>>>येस मिनिस्टर व येस प्राईम मिनिस्टर च्या DVDs मिळाल्या,
सध्या नेट्फ्लिक्सवर तिसर्‍यांदा लावल्यात. मी क्यूत वर आणते. (पण त्या खाली ढकलल्या जातात.)

अमेरिकेत असताना दुपारी जेवायला घरी यायचो, तेव्हा जेवता जेवता एक कॉमेडी मालिका चालू असायची, 'रिबा' नावाची. आवडायला लागली होती नंतर.

'प्रिझन ब्रेक' लॅपटॉपवरच पाहीली. चटकच लागली. सगळे भाग २ दिवसांतच बघून काढले.

लॉस्ट, डॉ. हाऊस, साईनफील्ड, रेमन्ड्स, जे लेनो, जॉन स्टुअर्ट, मेन्टलिस्ट, बिग बॅन्ग थिअरी, टू अ‍ॅन्ड अ हाफ मेन

>>>सध्या नेट्फ्लिक्सवर तिसर्‍यांदा लावल्यात. मी क्यूत वर आणते. (पण त्या खाली ढकलल्या जातात.)
पुर्वी खूप दिवस नेट्फ्लिक्सवर वाट पाहून इतरत्र शोध घेतला तेव्हा बार्न्स अँड नोबल च्या वेब साईटवर सापडल्या.
जवळ बाळ्गलेली गिफ्ट कार्डस वापरल्यावर नाममात्र किमतीत मिळाल्या.

बरे झाले हा बाफ उघडला ते, रोज पाहणार्‍या गोष्टींबद्दल लिहीता आणि वाचता येइल.

बिग बँग थिअरी आम्ही ही नुकतीच बघू लागलोय, एकदम धमाल आहे. सध्या पहिल्या सीझन च्या डीव्हीडीज पाहतोय. संवाद खतरनाक आहेत. ती पेनी तर फारच आवडली.

बाकी माझ्या दृष्टीने अमेरिकन मालिकांमधे पहिले अनेक नं "Friends". साइनफेल्ड त्याखालोखाल, Two and a half men सुद्धा नुकतीच बघू लागलो, चांगली आहे. Friends बद्दल माझे मत असे आहे की अधूनमधून बघण्यापेक्षा सलग बघितली तर अनेक विनोदांचे संदर्भ लागतात आणि जास्त मजा येते. त्यासाठी रीरन्स न पाहता, डीव्हीडी आणून बघाव्यात, त्यात जास्त सीन्स ही असतात जे नेटवर्क चॅनेल्स वर दाखवत नाहीत.

गिलमोर गर्ल्स एक मी नियमीत पहायचे. लॉ अँड ऑर्डर, फ्रेंड्स, कीपिंग अप अ‍ॅपिअरन्सेस पण मस्त असायचे.
गेले ४ वर्षे टीव्ही पहात नाही त्यामुळे अत्ताचे नाही माहिती.

Frasier कुणीच कशी काय नाही लिहिली ? एक्दम मस्त होति ती पण. शिवाय मला आवड्णार्या मधे friends , ELR, seinfield इ नेहेमीचेच यशस्वी .... आहेतच. little house on the prairie पण .

स्वाती, टू अँड अ हाफ मेन बघणार्‍या नी आवडणार्‍या आपण दोघीच दिसतोय. बाकी कुणी उल्लेखही केलेला नाही. पूर्वी प्रॅक्टिसही बघायचे. मस्त होती पण आता नाही बघत. वेरायजनला स्वीच केल्यापासून अमेरिकन चॅनल्स बघितलीच जात नाहीत फारशी.
ALR काय प्रकरण आहे?

हे हे सायो , ते ELR ( Raymond ग) पाहिजे. आता केला आहे बदल.
टू अँड अ हाफ मेन मी पण बघते कधी कधी. छान आहे. Happy

>> स्वाती, टू अँड अ हाफ मेन बघणार्‍या नी आवडणार्‍या आपण दोघीच दिसतोय. बाकी कुणी उल्लेखही केलेला नाही.

फारेन्डाने इंग्रजीत लिहिलं म्हणून तू त्याचा असा अनुल्लेख करत्येस का? Proud

स्वाती, टू अँड अ हाफ मेन बघणार्‍या नी आवडणार्‍या आपण दोघीच दिसतोय.>>मी पण मी पण. एकूणच फारच TV बघतो मी Sad

abc वर नवीन सुरू झालेले Deep End पन चांगले वाटलेय.

>>>Frasier कुणीच कशी काय नाही लिहिली ?
हे काय लिहिलंय नं मी .. (आता देवनागरीत लिहिलं म्हणून तुम्ही वाचलं नसेल! Happy )

मृण्मयी | 2 February, 2010 - 12:46
फ्रेज्यर पण अशीच एक मस्त सिरियल.

टु अँड अ हाफ मेन सुटली वाटतं ल्याहायची. हो ही पण आवडते. चार्ली शीनला अ‍ॅक्टींग करावीच लागत नसावी ह्या सिरियलमधे.

सोमवारी ही आणि बिग बँग. हाउ आय मेट योर मदर बोर झाली.

मला आवडणार्‍या -
१. एव्हरीबडी लव्हज रेमंड
२. स्टार ट्रेक - व्हॉयेजर [ सेव्हन ऑफ नाईन ]
3. फ्रेंड्स.
४. फ्रेजर.

आताशा टिव्ही बंदच असतो बहुतकरून.

बरं सायो, टु अँड अ हाफ मेन ही चांगली आहे Happy

'व्हाईट कॉलर' कोण बघत आहे का? कशी आहे?
मला आवडलेल्या इतरः
१. बॉस्टन लीगल
२. डेस्परेट हाउसवाईव्हस (खास करून पहिले २-३ सीझन्स)
३. वीड्स (पहिले १-२ सीझन)
४. अग्ली बेटी
५. मॅड मेन
६. ३० रॉक

आणखी एक प्रचंड धमाल प्रोग्रॅम म्हणजे 'डा अली जी शो', याची ब्रिटिश व्हर्जन ही आहे.

वेस्ट विंग जबरी आहे असे ऐकले आहे, बघितली नाही अजून. रेमन्ड ही नीट बघायला पाहिजे आता.

माझ्या आवडत्या - फ्रेंडस्, सेक्स अँड द सिटी, रेमंड या सगळ्या परत परत मी खुप खुप वेळा बघितल्या आहेत ..

फ्रेश प्रिंस ऑफ बेलेअर पण आवडायची मला पण अगदी थोडाच काळ बघितली ..

आणि फुड नेटवर्क तर ऑल टाईम फेव्हरेट .. आयर्न शेफ अमेरीका, चॉप्ड्, एव्हरीडे इटालियन, Giada at home (Giada माझ्या नवर्‍यालाही 'पहायला' आवडते :p), रेचल रे (पुर्वी बघायचे रेग्युलरली, आता कमी), Barefoot Contessa, Good Eats, Emeril (पुर्वी बघायचे), Throwdown with Bobby Flay हे आवडते ..

वा वा वा वा! लॉस्ट झालं का सुरू?
मी जबरा पंखा लॉस्टचा. काहीही आचरटपणा दाखवत असले अधूनमधून 'मिस्ट्री'च्या नावाखाली तरीही... Happy
झालंच तर प्रिझन ब्रेक सुद्धा... पण त्या तिसर्‍या (सॉनाच्या) सीझननंतर माझा इंटरेस्टच संपला.
फ्रेंड्स आणि साइन्फेल्ड हे खरंच नेहमीचे यशस्वी कलाकार. Happy
'हीरोज्' दिसलं नाही वरती... आणि How I Met Your Mother सुद्धा....

ईएलारही पहायचंय केव्हापासून.. अजून घडत नाहीये ते पण.

मस्त धागा उघडला आहे

मला इथले फक्त कॉमेडी शोजच आवडतात.. बाकी बहुतेक शोज मधे भयंकर व्हॉयलंस!

मी इथे ८७ मधे आलो. तेव्हा चिअर्स हा फारच मस्त शो चालु होता.. अजुनही तुम्हाला कुठे रिरन्स बघायला मिळाले तर जरुर बघा.. पण कुठल्याही सिरीजसारखे याचे पण.. यातल्या ह्युमरची समज तेव्हाच येते जेव्हा यातल्या सगळ्या कॅरॅक्टर्सची निट माहीती असली तरच.. नाहीतर अमोल म्हणतो त्याप्रमाणे विनोदाचे संदर्भ लागणार नाहीत व पंचेसही समजणार नाहीत..

चिअर्स इतकाच आवडीचा..( किंबहुना जास्तच..) शो म्हणजे साइन्फिल्ड! काय एक एक कॅरॅक्टर्स आहेत त्यात.. सही.. मला सर्वात जास्त जॉर्जचे (जेसन अ‍ॅलेक्झँडर) पात्र आवडायचे.. त्यातले एक एक विनोदि सीन काय वर्णावे? एक इथे लिहीतोच...:)कोणी हा एपिसोड पाहीला आहे का?

जेरिला एका पार्टित एक मुलगी आवडते पण सोबत एलेन असल्यामुळे ती कुठे काम करते एवढेच त्याला कळु शकते. जॉर्जला तो सांगतो की अशी अशी मुलगी मला पार्टीत आवडली पण फोन नंबर विचारता आला नाही.. मग जॉर्ज म्हणतो की ती जिथे काम करते ते माहीत आहे ना? मग तिथे तिच्या ऑफिसच्या बाहेर उभा राहा तिची वाट बघत.. जेरी म्हणतो काय वेडा बिडा आहेस काय? तिने विचारले इथे काय करत होतास तर काय सांगु? तर जॉर्जच्या सुपिक डोक्यातुन कल्पना निघते की मी पण तुझ्याबरोबर येतो व तिला सांग की मी तुझा मित्र आहे व मला तु भेटायला तिथे आला आहेस . तसे ते दोघे मग तिच्या ऑफिसच्या बिल्डिंगबाहेर जाउन उभे राहतात. तिथे गेल्यावर जेरीला वाट्त की आपण इथे येउन चुक केली.. ती मुलगी काय म्हणेल? तर जॉर्ज त्याला धिर देतो व म्हणतो की मी तिथेच तिच्याच बिल्डिंगमधे काम करतो म्हणुन सांग तिला व काय योगायोग आहे ना असे तिला म्हण.. पण मग जेरी म्हणतो की तिने जर विचारले की तु त्या बिल्डिंगमधे कसले काम करतो तर? त्यावर जॉर्ज म्हणतो की तिला सांग की मी आर्किटेक्ट आहे( तो आर्किटेक्ट असावा अशी जॉर्जची सुप्त इच्छा कित्येक एपिसोडमधे दिसुन येते!:)) तर जेरी जॉर्जकडे आपादमस्तक न्याहाळतो व म्हणतो.. आर्किटेक्ट? आणि तू? आय डोंट थिंक सो! तुझ्याकडे बघुन तु आर्किटेक्ट आहेस असे वाटत नाही! तर जॉर्ज चिडुन म्हणतो ठिक आहे मग तिला सांग माझा इंपोर्टचा बिझनेस आहे.. तर जेरी परत शंका काढतो फक्त इंपोर्ट्चा? तर परत जॉर्ज चिडुन म्हणतो.. बर बाबा.. इंपोर्ट आणी एक्स्पोर्ट.. ओ के? व तसे ते दोघे मग त्या मुलीच्या ऑफिसबाहेर जाउन उभे असतात.. तेवढ्यात लंच च्या वेळेला ती मुलगी एलिव्हेटरमधुन बाहेर येते व जेरील बघते व चकित होते.. व हसुन जेरीला विचारते.. अरे तु इथे कसा? (तर तिकडे जॉर्जलाच घाम फुटतो व त्याचे अवसान गळते.. व तो जेरीलाच कुजबुजत विचारतो.. अरे मी कोण आहे हेच मी विसरलो.. तर जेरी त्याला कुजबुजतच सांगतो अरे तुझा इथे इंपोर्ट एक्स्पोर्टचा बिझिनेस आहे.. रिमेंबर? जॉर्ज ओ के ओ के म्हणतो...).. तर मग जेरी सांगतो की जॉर्ज हा त्याचा मित्र इथेच काम करतो.. तर ती मुलगी जॉर्जला हाय म्हणत विचारते.. इथे? तुला कधी बघीतले नाही .. तु काय करतोस?. तर जॉर्ज म्हणतो की .. आय अ‍ॅम अ‍ॅन आर्किटेक्ट!... तिथे जेरी डोक्याला हात मारतो... तर ती मुलगी जॉर्जला म्हणते.. ओह रिअली? आर्किटेक्ट... मला सुद्धा आर्किटे़क्ट व्हायचे होते.. तु काय डिझाइन करतोस..... आता हा प्रश्न जॉर्जला अपेक्षित नसल्यामुळे तो एकदम काहीतरी ठोकुन देतो.. मी ना.. मी रेलरोड डिझाइन करतो.. तर ती म्हणते.. रेलरोड? मला वाटत होते की ते काम सिव्हिल इंजिनिअर्स करतात.. तर जॉर्ज खजील होतो पण चेहर्‍यावर आत्मविश्वास दाखवत म्हणतो.. यस दे कॅन.. दे कॅन.... बट आर्किटेक्ट कॅन डिझाइन देम टु!.....

हे सर्व दृष्य डोळ्यासमोर आणुन बघा.. हसुन हसुन मुरकुंडि वळेल तुमची जर तुम्ही साइनफिल्ड फॅन असाल तर..:)

अजुन जुन्या कॉमेडि शोज मधे थ्रिज कंपनी हा शो कोणि कधी रिरन मधे पाहीला आहे का? नसेल तर जॅक्(जॉन रिटर), जेनेट, ख्रिसि व फर्ली.. रोपर्स ही कॅरॅक्टर पण धमाल विनोदी होती..

कॉस्बी शो पण चांगला होता.. मला मायकेल जे फॉक्सचा फॅमिली टाइज हा कॉमेडी शो पण खुप आवडायचा.

बी बी सी सिरिजमधे आर यु बिंग सर्व्ह्ड मस्तच!आणि लहान मुलांच्या कार्यक्रमात सिसमी स्ट्रिट मस्तच.. त्यामधले एल्मो कॅरॅक्टर तर सहीच.. पुर्वि त्यातला कर्मिट द फ्रॉगही मला खुप आवडायचा...

आई सोबत राहत असल्यामुळे कधी कधी तिच्याबरोबर हिअर इज ल्युसी ही ल्युसिल बॉलची कॉमेडि सिरिजही बघीतली जाते...

मेडिकल शोज मधे इ आर आवडायचा.. हाउस एकदम व्हिम्झिकल वाटल्यामुळे कधी बघितला नाही.. आणी अ‍ॅलन अल्डा आणी कंपनि चा मॅश हा जुना शोही रिरनमधे आवडायचा..

लॉ बद्दलच्या शोजमधे एल ए लॉ म्हणुन एक शो होता.. कोर्बिन बेन्सन वगैरे.. तो खुप आवडायचा..

लेट नाइट मधे जॉनी कार्सन आवडायचा व नंतर गेली १७ वर्षे जे लेनो! लेटरमनचा ह्युमर मला अगदीच सुमार व पोरकट वाटतो..

सध्या फक्त अमेरिकन आयडल बघतो.. लालु.. त्याचा धागा सुरु केलास का? ३ वर्षापुर्विचा तो सांजाया मालाकार आठवतो का कोणाला?:)

बाकी स्पोर्ट्समधे.. रोड टु द फायनल फोर.. मार्च मॅडनेस.. सगळ्यात आवडता शो( जरी ती मालिका नसली तरी!:) )

मीही 'एव्हरीबडी लव्हज रेमंड' ची ऑल टाईम फॅन आहे. अक्षरशः रवंथ केल्यासारखा बघते त्याचा प्रत्येक भाग. रेमंडचा पहिला सिझन ज्यात रॉबर्ट सुस्त जाडा, बॉयकट मधील डेब्रा आणि सगळेच थोडं अवघडलेलं अ‍ॅक्टिंग करतात तो हल्ली जरा कंटाळवाणा होतो. नंतरच्या सिझन्समध्ये सगळेच खुलले आहेत. बिविच्ड पूर्वी पाहिली आहे आवडीने.
फूड नेटवर्क ही अर्थातच खूप आवडते. पूर्वी रेचल, जियाडा खूप आवडायच्या. हल्ली आयना गार्टन जास्त आवडते. डायनर्स, ड्राईव्ह इन्स अँड ड्राईव्हज, हेल्दी अ‍ॅपेटाईट, बेस्ट थिंग आय एव्हर एट, फूड् नेटवर्क स्टार, सिक्रेट लाईफ ऑफ..., आयर्न शेफ, डिनर इंपॉसिबल,गुड इट्स ही आवडतात. 'चॉप्ड' खूपच आवडते. अगदी नियमित बघते. एमेरिल का कुणास ठाऊक फार बोअर होतो. पॉला डीनच्या सिरियलचे नाव खरं तर 'पॉलाज बटरी कुकिंग' असे ठेवायला हवे Happy
ट्रॅव्हल चॅनलवरच्या चांगल्या सिरियल्स अधूनमधून बघते. डिस्कव्हरीवरच्या 'आय शुडन्ट बी अलाईव्ह', 'सेकंड्स फ्रॉम डिझॅस्टर' पण एकदम थरारक असतात. पण त्या सहज चॅनल बदलताना दिसल्या तर पाहिल्या जातात. मुद्दाम लक्षात ठेवून बघणे होत नाही.

>>कोणी हा एपिसोड पाहीला आहे का?
येस्..मी पाहिला आहे..
साइनफिल्डचा ऑल टाईम फॅन आहे..
>>काय एक एक कॅरॅक्टर्स आहेत त्यात.. सही.. मला सर्वात जास्त जॉर्जचे (जेसन अ‍ॅलेक्झँडर) पात्र आवडायचे
मला पण..:)

माझ्या आवडत्या ...साइनफिल्ड मग फ्रेंडस्, रेमंड, हाऊ आय मेट युअर मदर्....

मुकुंद, मला आठवतोय तो साइनफिल्ड चा एपिसोड Happy जॉर्ज (या सिरिज मधे बर्‍याच भागात )प्रत्येक वेळी नोकरी वगैरे च्या बाबतीत थाप मारायची वेळ आली की " वॅन्डले अँड वॅन्डले" हे कंपनीचे नाव सांगतो Lol ते माहित झाल्यामुळे ते नाव त्याच्या तोंडून आलं की हशा Happy
रेमन्ड चे पण बरेच डायलॉग, वन लायनर्स कधीही आठवले की हहपुवा होते Happy
रे चा डायलॉग, बहुतेक शेवटच्या भागांपैकी एक, मरी- फ्रॅन्क ला रिटायर्मेन्ट होम मधून हाकलून देतात तेव्हा, "its aaall clear now , people from your own 'world war -II world' have finally spoken !! its not us, ITS YOU !!" Lol

रे चा डायलॉग, बहुतेक शेवटच्या भागांपैकी एक, मरी- फ्रॅन्क ला रिटायर्मेन्ट होम मधून हाकलून देतात तेव्हा, "its aaall clear now , people from your own 'world war -II world' have finally spoken !! its not us, ITS YOU !!" हाहा >>> अगदी अगदी मैत्रेयी... आत्ता पण माझ्या डोळ्यासमोर रे आहे हे बोलताना. Lol

शँकी मला कपलिंग आवडते. त्याचे री रन्स मी बघीतलेले आहेत, त्यातला जेफ मला फार आवडतो.

"रिअ‍ॅलिटी शो" ह्या प्रकारापासून कालपर्यंत तरी लांबच राहिलेले!
पण काल जीम मध्ये असताना तिथे एक भयानक रिअ‍ॅलिटी शो लागलेला..
१० एक मुली होत्या.. आणि एक मुलगा (हा कुणी 'सेलिब्रिटी' असेल तर माहित नाही- टीव्ही पासून दूर रहाण्याचा परिणाम) - तर हा मुलगा, ह्याचे कुटुंबिय आणि ह्या १० मुली.. त्या मुलींना म्हणे ह्याच्याबरोबर 'डेट' हवी होती.. आणि मग हा पुढे मागे जाऊन लग्न पण करणार ह्यांच्याशी!
त्या पोरींना १० पोरं दिलेली सांभाळायला.. की पोरांना कोण चांगलं सांभाळतय.
आणि मग तो बुवा आणि त्यातली प्रत्येक बाई - मिठ्या, भयंकर प्रकारे पाप्या वगैरे प्रकार चाललेले..
इतकं डिस्गस्टिंग होतं ना ते सगळं.. चिडचिड झाली माझी भयंकर कालच्या जीम दरम्यान आणि नंतरही.

नानबा तू राखी सावंत स्वयंवर प्रकरण बघीतलेले दिसत नाही भारतातले. ते बघीतले असतेस तर तू नंतर काहीही बघीतले तरी एकदम स्थितप्रज्ञासारखी वागु शकली असती. Happy

Pages