बीबीसी तसंच अमेरिकेन टीव्ही चॅनलवरच्या मालिका

Submitted by मृण्मयी on 31 January, 2010 - 20:48

हा धागा उघडलाय ते अमेरिकन किंवा बीबीसी टीव्हीवरच्या आपल्या आवडत्या मालिकांबद्दल गप्पा मारायला, एपिसोडबद्द्ल माहिती द्यायला.

सध्या माझी अत्यंत आवडती मालिका आहे 'Big bang theory'. शेल्डन, लेनर्ड, राज आणि हॉवर्ड (हावर्ड) ही चार नर्डी मुलं आणि त्यातल्या दोघांची रूपसुंदरी शेजारीण पेनी ह्यांच्या आयुष्यातल्या मजेदार प्रसंगांवर आधारित ही मालिका जबरजस्त धमाल आहे.

आणखी काही लाडक्या (जुन्या) मालिका म्हणजे एव्हरीबडी लव्ज्स रेमंड, स्टिल स्टँडींग, किंग ऑफ क्वीन्स, एव्हरीबडी हेट्स क्रिस, होम इंप्रुव्ह्मेंट, कॉजबी शो. फ्रेंड्स, साइनफील्ड (आणि वय झाल्याचं लक्षण म्हणून की काय पण गोल्डन गर्ल्स) ह्या देखिल अश्याच काही मस्त विनोदी मालिका.

नंबर्स ही डिटेक्टीव्ह मालिका आणि त्यातला गणिताच्या आधारे गुन्ह्यातले क्लु शोधून काढणारा सुपिक डोक्याचा गणितज्ञ पण झकास आहे. साइक, मंक ह्या पण डिटेक्टिव्ह वर्गात मोडणार्‍या मस्त मालिका.

बीबीसी वरच्या जुन्या आर यु बिईंग सर्व्ह्ड, कीपींग अप अपिअरन्सेस, येस मिनिस्टर ह्या पण ऑल टाइम फेवरिट!

तर मंडळी, ह्या आणि अश्या तुमच्या लाडक्या मालिका, त्यातले आवडते एपिसोड्स, आवडती पात्र ह्यांबद्दल पोस्टी येऊ द्या!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एमीच्या भावासाठी डेटनाईट अरेंज केलेली असताना डेब्रा पेगीला बोलावते आणि तिचे पीटरशी खरंच सूत जुळते. तो ही 'पेगी'चा एक धमाल एपिसोड. आणि एकदा पेगी तिच्या मुलीच्या बर्थ-डे पार्टीला तिच्या सगळ्या मैत्रिणींना महागडा ड्रेस घ्यायला भाग पाडते आणि रेमंड बंड करतो तो ही एक खूप मजेशीर एपिसोड आहे.

३० रॉक nbc.com वर पाहता येतील. पूर्ण आणि latest एपीसोड्स पाहायला मिळतात.
इथे दिसतीलः
http://www.nbc.com/30-rock/video/episodes/#apl=true

माझ्या माहिती प्रमाणे ही लिन्क फक्त US मधेच चालते.

आज आलेल्या ऑरेंज चिकन पाकृ वरून बिग बँग थिअरी मधला एक संवाद आठवला: Happy

Leonard: Why are you learning Mandarin?

Sheldon: I suspect that the people at the Szechuan Palace are passing off orange chicken as tangerine chicken, and I intend to confront them.

Leonard: If I were you, I'd be more worried about what they're passing off as chicken.

कोणी "सूझी ऑरमन" चा शो पाहाता का? ही बया दूसर्यान्चे पैसे त्यान्नी कसे वापरावे हे ओरडून ओरडून सांगत असते Uhoh

आज सुरु झालेली romantically challenged पाहिली का ? abc वर ?
बर्‍यापैकी बरा आचरटपणा आहे.. Happy पुढे पहायला पाहिजे..

>>>>>>>कोणी "सूझी ऑरमन" चा शो पाहाता का? ही बया दूसर्यान्चे पैसे त्यान्नी कसे वापरावे हे ओरडून ओरडून सांगत असते Uhoh >>>>>>

मी पहाते. मला बर्‍यापैकी आवडतो तिचा शो. ती फायनान्सिअल अ‍ॅडव्हायजर आहे. लोकानी पैसे कसे इन्वेस्ट करावेत्,कसे वापरावेत्,कसे खर्च करावेत हे सांगण हेच काम आहे तिच.
एका वेटरच्या जॉब पासुन ति इथ पर्यंत येवुन पोहोचली आहे.
तिचे सगळेच सल्ले प्रॅक्टीकल किंवा सगळ्याना आवडण्यासारखे नसतात. उदा. तिचा फायको स्कोअर मेनटेन करण्यावर खुप भर आहे. जे लोक क्रेडीट कार्ड वापरत नाहीत,कॅश वापरतात त्यांना तिचा तो सल्ला फारसा आवडत नाही.

मीही हेच लिहायला आले होते सीमा.
सुरवातीला मलाही कर्कश व विचित्र वाटली होती ती. पण तिचे पॉइंट्स सही असतात. कॉस्कोमधून एक पुस्तक आणले होते तिचे, तेही छान आहे सेव्हींग्ज वगैरे वर.

फारेंडा, बापरे, तगडा अभ्यास आहे तुझा! अगदी डायलॉग्ज पण तोंड्पाठ!!! कालचा एपिसोड (पुनःप्रसारित) बघितलास की नाही? हावर्डच्या आईचा आवाज कुणाचा ते कळेपर्यंत चैन पडणार नाही. Proud

"सूझी ऑरमन" चा शो पाहाता का? >>> मला तिच्या कार्यक्रमातला "कॅन आय अफोर्ड इट" हा भाग आवडतो. अर्थात करमणुक म्हणुन.

बाकी सगळेजण सारखेच सल्ले देतात असे मला वाटते.. Happy इमर्जन्सी फंड्स ठेवणे, टर्म लाईफ इन्शुरन्स घेणे, रॉथ आयआरए मॅक्स आऊट करणे, ४०१क मध्ये कंपनी मॅच करेल इतके पैसे टाकणे, इंडेक्स फंड्स मध्ये गुंतवणूक इत्यादी. काहीच माहिती नसेल तर मात्र चांगले शिकायला मिळते. कधीकधी मात्र ती बाई जरा आगाऊपणा करते.

मी तर सध्या netflix वर my name is earl पाहत आहे. friends सारखी coupling हि ब्रिटीश serial पण छान आहे
my name is earl
yes minister
fawlty towers
how i met your mother
king of queens
freinds
fringe
everybody loves raymond
lost
prison break
24
big bang theory
white collar
family guy
the simpsons

Stargate SG1, Atlantis and now universe
Fringe
Heros ( 1st season)
Ghost whisperer
Numbers
Modern Marvels
Glee ( 1st season)

BBC
Doctor who (2005 onwards seasons)
Torchwood

कालच "मॉडर्न फॅमिली" चा सिजन वन डिवीडी वर बघून झाला. सिजन १ मध्ये ह्या कार्यक्रमाशी ओळख होत होती म्हणुन सगळे एपिसोड्स बघता नाही आले. खरं तर कुठल्याही एपिसोड्चा आधीच्या एपिसोडशी संबंध नसतो त्यामुळे तुम्ही कधीही सुरवात करु शकता.
एकदा बघायला सुरवात केली की अक्षरशः खिळून ठेवते ही मालिका!
कुटूंब १) जेय प्रिचेट, त्याची कोलोंबियन बायको ग्लोरिया आणि मुलगा (ग्लोरियाच्या पहिल्या नवर्‍याचा) मॅनी. जेय आणि ग्लोरियाच्या वयात पुष्कळ अंतर आहे. ग्लोरिया एकदम साऊथ अमेरिकन मॉडेल आहे पण आपल्याला प्रथमदर्शनी वाटतं तस गोल्ड डिगर टाईप कॅरॅक्टर आजिबात रंगवलं नाहीये. दोघांच्या वयांमधलं अंतर आणि त्यात भिन्न सांसकृतिक पार्श्वभुमी ह्यातून इतके धमाल संवाद तयार होतात की बास. मॅनी हा ११ वर्षाचा असला तरी प्रचंड पोक्तपणे बोलतो आणि टोटल "मामाज बॉय" आहे. जेय आणि त्याची अशी खास मैत्री नाही पण जेय त्याच्याशी मैत्री करु बघत असतो. जेय ला त्याच्या पहिल्या लग्नाची २ मुलं आहेत. त्यांना मोठं करताना त्यानी बर्‍याच चुका केलेल्या आहेत (असं त्याची मुलं त्याला वारंवार निर्देशनास आणून देत असतात) आणि मॅनीला मोठं करताना परत ह्या चुका होऊ नये ह्याचा तो प्रयत्न करत असतो.
कुटूंब २) क्लेअर डन्फी (जेय ची मोठी मुलगी), फिल डन्फी (जेयचा जावई) आणि मुलं हेली, अ‍ॅलेक्स व लूक. क्लेअर ही हाऊस्वाईफ आहे आणि फिल हा रियल इस्टेट एजंट. ही जोडी जरा टिपकल अमेरिकन हाऊसोल्ड टाईप घेतलिये पण त्यांच्यातले संवाद पण खुप धमाल उडवून देतात. फिल हा अतिशय बावळट आहे, अगदी बघतानाच राग यावा इतका (अर्थातच त्यानी काम खरच छान वठवलय). तिन्ही मुलांमध्ये अ‍ॅलेक्स हुशार आहे, हेली एकदम गंडलेली टिनेजर (भरीला भर तिला बॉयफ्रेंड पण आहे) आणि लूक जरा लेमळट आणि अभ्यासात आजिबात लक्ष नसलेला मुलगा आहे.

कुटूंब ३) मिचेल प्रिचेट (जेयचा मुलगा, क्लेअर चा सख्खा भाऊ) आणि कॅमरॉन टकर. मिचेल समलिंगी आहे आणि कॅमरन हा त्याचा पार्टनर. ह्या दोघांनी "लिली" ह्या बाळाला दत्तक घेतलं आहे (यियेत्नामहून). ही जोडी सगळ्यात जास्त धमाल उडवते. मिचेल हा वकिल आहे आणि वागण्या बोलण्यात एकदम मृदु आणि एकदम घाबरट. कॅमरन हा पुर्वी फुटबॉल टीम मध्ये डिफेन्सीव लाईनमन असला तरी समलिंगी असल्यामुळे तो त्याचे "रावडी (बॅडॅस)" आणि "मृदु" मोड अक्षरशः बटण असल्या सारखे चालू, बंद करतो.

हे सगळे लोकं कधी मधी एकत्र येतात आणि मग तर अशक्य धमाल उडते! अजून खरं तर खुप काही आहे लिहीण्यासारखं पण कितीही लिहीलं तरी कमीच त्यापेक्षा एकदा बघाच तुम्ही. अचूक वातवरण निर्मीती आणि चपखल संवाद असतील तर एखाद्या साध्या विषयाची सुद्धा किती अफलातून विनोदी मांडणी होऊ शकते ह्याचे "मॉडर्न फॅमिली" हे प्रत्यक्ष उदाहरणच आहे जणू! Happy

पॅट्रिशिया हिटनची फॅमिली ह्यात नाहीये. तो वेगळा कार्यक्रम आहे. नाव आठवत नाही. ती पण पाहिली, इतकी नाही आवडली.
"द मिडल" (साभार गुगल)

अरे इथे बेकर चा कोणी उल्लेख केलेला दिसत नाहीये. मला तर friends नंतर बेकर च चांगली वाटते.
डॉ बेकर हा हार्वड मधुन शिकलेला अतिशय हुशार पण एकलकोंडा, कोणाशीही जमवुन न घेणारा ,नास्तिक, अजीबात सोशल नसणारा आणि अतिकंजुष असा असतो. २र्‍या डीव्होर्स मुळे व्यथित होउन तो हार्वड मधला रीसर्च चा जॉब सोडुन न्युयोर्क च्या अतिशय चीप एरीयात प्रॅक्टीस चालु करतो. तिथल्या त्याच्या डेली लाईफ वर सीरियल आहे. तिथे तो , त्याच्या २ नर्स - मार्गारेट आणि लिंडा , तो जात असलेल्या डायनर मधला त्याचा आंधळा मित्र जेक , आणि डायनर चालवणारी रेजी अशी मुख्य पात्रे आहेत.
प्रत्येक एपिसोड वेगळा असल्याने कोठुनही सीरियल बघता येते. अतिशय धमाल सीरियल आहे. बहुतेक सगळे एपिसोड्स यु ट्युब वर उपलब्ध आहेत. becker म्हणुन सर्च केल्यास सापडतील. आणि खालचे वैद्यबुवांचे हे वाक्य या सीरियल ला ही लागु पडते. ते तसेच फक्त सीरियलचे नाव बदलून कॉपी पेस्ट करतेय Happy
"अचूक वातवरण निर्मीती आणि चपखल संवाद असतील तर एखाद्या साध्या विषयाची सुद्धा किती अफलातून विनोदी मांडणी होऊ शकते ह्याचे "बेकर" हे प्रत्यक्ष उदाहरणच आहे जणू!"

बघायला पाहिजे एकदा बेकर. हाऊस चा फोर्म्युला असाच काहीसा आहे (बेकर तशी बरीच जुनी आहे).
बाकी आता हाऊस थोडं कंटाळवाणं झालय. क्लोजरचा पण सिजन संपला त्यामुळे आता नवीन कुठले कार्यक्रम चांगले आहेत ते बघायला पाहिजे. हवाई फाईव ओ बरा वाटतोय जाहिरातींवरुन. मेंटलिस्ट टाईमपास आहे. अमेजिंग रेस पण छान आहे, कंटाळा येत नाही बघताना.

धन्यवाद बुवा, डेलिया. बिग बँग थिअरी नंतर शोधतच होतो चांगली काँमेडी.

कॉमेडीज मधे माझा क्रम: १. फ्रेन्ड्स, २. बिग बँग थिअरी असा आहे. बाकी सगळ्या नंतर. पण आता या दोन्ही पाहतो.

How I met your mother and Ugly Betty तुमच्याकडे जुने झाले का? आम्ही बघतो. फ्रेंड्स नंतर तीच मजेशीर आहे. जास्त नॉर्मल आहे असे वाट्ते. बेटी पण मजेशीर आहे. ग्ली बघत होतात का?

मी पण बेटी बघतोय. सीझन १ नंतर सरळ सीझन ४. किती वेगवान कथानक. आनि अलीकडे प्रत्येक भागात एक थीम्..म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत एकसारखंच काहीतरी होणं.

Pages