बीबीसी तसंच अमेरिकेन टीव्ही चॅनलवरच्या मालिका

Submitted by मृण्मयी on 31 January, 2010 - 20:48

हा धागा उघडलाय ते अमेरिकन किंवा बीबीसी टीव्हीवरच्या आपल्या आवडत्या मालिकांबद्दल गप्पा मारायला, एपिसोडबद्द्ल माहिती द्यायला.

सध्या माझी अत्यंत आवडती मालिका आहे 'Big bang theory'. शेल्डन, लेनर्ड, राज आणि हॉवर्ड (हावर्ड) ही चार नर्डी मुलं आणि त्यातल्या दोघांची रूपसुंदरी शेजारीण पेनी ह्यांच्या आयुष्यातल्या मजेदार प्रसंगांवर आधारित ही मालिका जबरजस्त धमाल आहे.

आणखी काही लाडक्या (जुन्या) मालिका म्हणजे एव्हरीबडी लव्ज्स रेमंड, स्टिल स्टँडींग, किंग ऑफ क्वीन्स, एव्हरीबडी हेट्स क्रिस, होम इंप्रुव्ह्मेंट, कॉजबी शो. फ्रेंड्स, साइनफील्ड (आणि वय झाल्याचं लक्षण म्हणून की काय पण गोल्डन गर्ल्स) ह्या देखिल अश्याच काही मस्त विनोदी मालिका.

नंबर्स ही डिटेक्टीव्ह मालिका आणि त्यातला गणिताच्या आधारे गुन्ह्यातले क्लु शोधून काढणारा सुपिक डोक्याचा गणितज्ञ पण झकास आहे. साइक, मंक ह्या पण डिटेक्टिव्ह वर्गात मोडणार्‍या मस्त मालिका.

बीबीसी वरच्या जुन्या आर यु बिईंग सर्व्ह्ड, कीपींग अप अपिअरन्सेस, येस मिनिस्टर ह्या पण ऑल टाइम फेवरिट!

तर मंडळी, ह्या आणि अश्या तुमच्या लाडक्या मालिका, त्यातले आवडते एपिसोड्स, आवडती पात्र ह्यांबद्दल पोस्टी येऊ द्या!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुनी, आता 'राहुल (महाजन) दुल्हनिया ले जायेगा' असा नवीन सुरु होतोय. Happy

सीमा, आयडॉल चा बाफ काढूया. ऑडिशन्स संपत येऊदेत.

अजून काही - डॉ, हाऊस, ऑफिस, ब्रदर्स अ‍ॅन्ड सिस्टर्स

राहुल (महाजन) दुल्हनिया ले जायेगा >>> अरेरे. मला वाटले होते राखी सावंत प्रकरण हा निच्चांक असेल. पण निच्चांक अभी बाकी है मेरे दोस्त. Happy
ऑफीस टाइम पास आहे. पण मी दर वेळी नाही बघू शकत, कधी कधी बघते. त्याचे टायटल म्युझिक मस्त आहे. त्याचे तसच कपलिंगचे पण संगीत मला आवडत.

चीअर्स मालिकेचं शूटिंग बॉस्टनच्या कुठल्या बार मधे झालं होतं? मालिका फारच आवडल्यामुळे तो बार पण बघायचा होता. Proud

टिना फे असेपर्यंत SNL आवडायचं.

ब्लूज क्लूज पासून सुरुवात होऊन आता आम्ही पण चिरंजीवांबरोबर साइकपर्यंत ग्रॅज्युएट झालोय.

स्पंजबॉब, थॉर्नबेरीज, रगरॅट्स, हे अरनॉल्ड हे कार्यक्रम ७-८ वर्षांपूर्वीपर्यंत बघावेच लागायचे, आवडायचे. त्यात आजकाल पेंग्युइन्स ऑफ मादागास्करची भर पडलीय.

(मॅनहॅटनमधे) टॅक्सीत बसून आपलं ठिकाण येईपर्यंत ड्रायव्हरच्या प्रश्नांची उत्तर देत पैसे मिळवायचा कॅशकॅब कार्यक्रम पण आवडायचा.

रुनी, मी घाबरलीये की राहुल महाजन नंतर कोणाचे स्व. करतील... ?????

आता मला वाईट वाटतय जरासे, कारण माझ्याकडे केबल नाहीये. पुर्वी होती तेव्हा friedns व Golden girls नी मला जास्त समाधान दिले (म्हणजे हसु आले).
अजुन एक मालिका होती, Becker . ह्यात तो बेकर एक अत्यंत उर्मट्ट डॉक्टर असतो. त्याचा उर्मट्पण, तर्हेवाईकपणा, व त्याच्या दवाखान्यातील मंडळी ह्यांची ती मालिका. सॉलीड मजा यायची.
बाकी साईन्फील्ड आहेच पण कधीकधी त्यातले विनोद कळत नव्हते. त्या माणसाचे ह्युमर का काय ते जरा वेगळेच आहे. फार लक्ष देउन ऐकावे लागते. पण एलेन मला सर्वात जास्त आवडायची.
तसेच friends मधे रॉस सर्वात आवडायचा. माफ करा, पण तिनही मुली (त्यातल्या त्यात फीबी) मला जाम बोर करायच्या काहीकाही एपिसोड्स सोडले तर.
Golden girls मधे ब्लांच बेस्ट होती.

रॉस सर्वात आवडायचा>>> सुनिधी तू अधूनमधून-रेचेल नंतर पहिलीच दिसतेस. बहुतेकांना जोई नाहीतर चॅन्डलर आवडतो Happy

फाए. - 'अधुन मधुन रेचेल' Lol ..
आधी मला बाकी दोघेच बदलत आवडायचे पण नंतर कळु लागले की रॉस चेहर्‍यावर / आवाजात फार बदल न करता पण जबरदस्त हसवतोय, मग त्याच्याकडेच जास्त लक्ष जाऊ लागले. Happy .. बाकी दोघे पण आवडते राहिलेच.

एक "हसल" (Hustle) नावाची ब्रिटीश सिरीयल काही वर्षापूर्वी इथे अमेरिकेमधे दाखवली जायची.
लंडनमधे ५ जण मिळुन पब्लीकला टोप्या घालायचे. हा विषय होता. (साधारण ओशन्स इलेव्हन सारखा.) छान होती.
BBC वरच्या फॉल्टी टॉवर्स, माईन्ड युवर लॅन्ग्वेज, आर यु बिईंग सर्व्हड ... सगळ्याच कलेक्शन आहे घरी. तसच अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स (जेरेमी ब्रेट नी होम्सच काम केलय ती) ही सुद्धा खूप आवडीची.

फॉल्टी टॉवर्सचे १३ नंतर पुढे आणखी भाग का नसतील बनवले? मस्त सिरियल होती! आर यु बिईंग सर्व्हड ... सिरियल जितकी धमाल तितकाच सिनेमा रद्दड होता. अगदी ओढून्ताणून केलेला!

मला चँडलर नी रेचल आवडायची. फिबी मलाही जरा बोअर मारायची. पण तिचा सेन्स ऑफ ह्युमर अशक्य दाखवला होता. मुलांमध्ये रॉस बोअर करायचा फार. (माझ्या मते)

>>> फॉल्टी टॉवर्सचे १३ नंतर पुढे आणखी भाग का नसतील बनवले?
माझ्या एका ब्रिटीश मित्राच्या म्हणण्यानुसार जॉन क्लिसचे आणि प्रोड्युसरचे भांडण झाले आणि प्रॉडक्शन थांबले. पुढचे एपिसोड्स तो स्वतः प्रोड्युस करणार होता. पण ते जमल नाही. तेव्हाच त्याचे आणि त्याच्या बायकोचे (कॉनी बूथ, सिरियल मधे पॉलीच काम केलेली) सुद्धा वाजले आणि ते वेगळे झाले.
आणि ती सिरियल पार बोंबलली.

>>>त्याचे आणि त्याच्या बायकोचे (कॉनी बूथ, सिरियल मधे पॉलीच काम केलेली) सुद्धा वाजले आणि ते वेगळे झाले.
फक्त एवढाच भाग माहिती होता. Proud बाकीचं आत्ताच कळलं तुझ्याकडून.

नॅनी बघतं का कुणी? Proud फ्रॅन ड्रेशरचा आवाज सहन करण्याची ताकद आली आणि ही टुकार सिरियल पण आवडायला लागली. Proud

मला चँडलर नी रेचल आवडायची. >> चँडलर Rocks. त्याचा Dry humor अफलातून दाखवलाय. त्याचे one liners आठवले कि अजूनही हसायला येते.

Family guy नि Parenthood चा पण फार बोलबाला होतोय खरा ....

Lost चे कालचे दोन episode बघून गाडी रुळावर आली असे वाटले तोवर तिसर्‍यामधे "ये रे माझ्या मागल्या" सुरू झाले. किती पिळतात लेकाचे, "हिरो" परवडले अशी परिस्थिती Happy

चॅन्डलरच्या अप्रतिम विनोदाचे एक उदाहरणः हे सगळे (बहुधा) स्की ट्रिप ला निघालेले असताना पेट्रोल संपल्याने फीबीची गाडी बंद पडते आणि सगळे अडकून पडतात. तेव्हा हेलिकॉप्टर मधून कोणी बघितले तर कळावे म्हणून जोई HELP च्या ऐवजी PLEH अशी अक्षरे मातीत काढतो. त्यानंतर रॉस ला फोन लागून तो गाडी घेउन येतो. तर ती गाडी त्या अक्षरांवरून जाते तेव्हा जोई त्याला ओरडतो की ती अक्षरे पुसली जातील. तेव्हा Chandler म्हणतो "oh no! now it's (the word Joey wrote) not going to make any sense!" ही कॉमेन्ट दोन्ही अर्थाने उपरोधिक आहे हे मला पहिल्यांदा बघताना जाणवले नव्हते Happy

>> Lost चे कालचे दोन episode बघून गाडी रुळावर आली असे वाटले तोवर तिसर्‍यामधे "ये रे माझ्या मागल्या" सुरू झाले.

Lol अगदी अगदी. किती ती डोक्याची मंडई!

तरी इथे लोकं त्यावर त्यांच्या थिअरीज लिहितात ते वाचून आणखीन करमणूक होते. तसंच हा माणूसही फार खपून, संदर्भ वगैरे जमवून लिहायचा प्रत्येक एपिसोडबद्दल. मधे बंद होतं त्याचं लिखाण, आता पुन्हा सुरू करणार आहे.

(कळलं नाही तरी मी लॉस्ट बघायचं सोडणार नाही!) Proud

मैत्रेयी.. LOL.. अग जॉर्ज जेव्हा जेव्हा तो काय करतो याची थाप मारायला जसा तो आर्किटेक्ट आहे अशी थाप मारायचा तसाच कुठल्या कंपनीत तो काम करतो किंवा त्याच्या नावाबद्दल थाप मारायची असेल तर ...आर्ट व्हँडले किंवा व्हँडले इंडस्ट्री़ज... किंवा व्हँडले अँड व्हँडले कंपनी... हे त्याचे फेव्हरेट नाव तो वापरायचा... LOL

त्या व्हँडले नावावरुन अजुन एक बेमिसाल एपिसोड आठवला..

नेहमीप्रमाणे कुठलातरी ऑड जॉब थोडे दिवस करुन तिथुन फायर झाल्यावर जॉर्ज बेकार झालेला असतो व बरेच दिवस जॉबसाठी काहीही प्रयत्न न करता तो बेकारी भत्ता वसुल करत असतो. पण त्या अनेंप्लोयमेंट ऑफिसमधल्या बाइलाही काही दिवसांनी कळते की हा आळशी महाभाग जॉबसाठी काहीच प्रयत्न करत नाही आहे व मग एक दिवस जेव्हा हा तिकडे बेकारी भत्त्यासाठी जातो तेव्हा ती बाइ त्याला स्पष्ट सांगते की पुढच्या आठवड्यापासुन तुझा बेकारी भत्ता थांबवला जाणार आहे कारण तु जॉब्साठी काहीच प्रयत्न करत नाहीस.तसे ऐकल्यावर जॉर्ज लगेच म्हणतो की नाही नाही .. मी २ दिवसांपुर्वीच एका कंपनित जॉबसठी अ‍ॅप्लिकेशन केला आहे. तर ती त्याला विचारते.. ओह या? मग नाव काय त्या कंपनीच? तर जॉर्ज नेहमीप्रमाणे ठोकुन देतो नाव... व्हँडले इंडस्ट्रिज.. त्या बाइलाही एव्हाना जॉर्ज कळुन चुकला असतो की हा एक नंबरचा थापाड्या आहे.. म्हणुन ती त्याला त्या कंपनीचा फोन नंबर विचारते.. तर जॉर्ज तिला जेरीचा नंबर देतो. ती बाई म्हणते की लंचनंतर अर्ध्या तासात ती त्या नंबरवर फोन करुन खात्री करुन घेणार आहे म्हणुन.. ते ऐकल्यावर जॉर्ज त्या ऑफिसमधुन ताबडतोब पोबारा करतो व अर्ध्या तासात.. धावत पळत.. धापा टाकत्..केस विस्कटलेल्या अवस्थेत... जेरीच्या अपार्ट्मेंटमधे येतो... तर जेरी त्याला विचारतो.. काय रे काय झाल? तर तो त्याला सांगतो की आत्ताच तो अनेंप्लॉयमेंट ऑफिसमधुन आला आहे व तिकडे त्या बाइला त्याने थाप मारली आहे की त्याने व्हँडले इंड्स्ट्रीज म्हणुन एका कंपनीत जॉबसाठी अ‍ॅप्लिकेशन केलेला आहे व त्या कंपनीचा नंबर म्हणुन त्याने जेरीचा नंबर दिला आहे.. व आतापासुन प्रत्येक वेळेला जर कोणाचा फोन आला तर जेरीने फोन उचलुन म्हणायचे की व्हँडले इंड्स्ट्रीज...! तर जेरी म्हणतो... व्हँडले इंड्स्ट्री़ज? अ हं! आणि व्हँडले इंड्स्ट्रीज हे काय प्रकरण आहे? तर जॉर्ज त्याला सांगतो की व्हँडले इंड्स्ट्रिज ही एक लेटेक्स बनवायची कंपनी आहे व त्या कंपनीचा सेल्समन म्हणुन जॉर्जचा विचार करण्यात येत आहे असे त्याने त्या बाइला सांगायचे... तर जेरी म्हणतो.. तु? आणि सेल्समन? आय डोंट थिंक सो... तर जॉर्ज वैतागुन म्हणतो की अरे नुसत सांगायला तुझ काय जाइल? असे म्हणत मग जॉर्ज जेरीच्या अपार्ट्मेंटच्या बाथरुममधे २ मिनिटासाठी जातो व जेरी खाली लॉन्ड्री रुममधे त्याची लाँड्री घेउन जातो..

तेवढ्यात मग क्रेमर.... LOL.... त्याच्या नेहमीच्या स्टाइलने जेरीच्या अपार्ट्मेंटचे दार उघडुन धाडकन आत एंट्री मारतो.. अपार्ट्मेंटच्या लिव्हिंग रुममधे कोणीच नसते व हा सोफ्यावर जाउन बसतो.. तो सोफ्यावर जाउन बसतो न बसतो तेवढ्यात जेरीचा फोन वाजतो व क्रेमर पटकन फोन उचलतो.. तर तो नेमका त्या बाइचा असतो व ती विचारते की हा व्हँडले इंडस्ट्रिजचा फोन नंबर आहे का? आता क्रेमरला या जॉर्जच्या अनेंप्लॉयमेंटच्या महाभारताची व व्हॅन्डले इंडस्ट्रिज या प्रकरणाची काहीच कल्पना नसते.. त्यामुळे त्या बाइचा तसा प्रश्न ऐकल्यावर म्हणतो.. व्हँडले इंडस्ट्रिज? व्हॉट व्हँडले इंडस्ट्रिज? असे तो म्हणत असतानाच.. जॉर्जला बाथरुममधे.. फोनच्या रिंगरचा आवाज ऐकु आल्यामुळे... तो धावत पळत.. बाथरुमचे दार उघडुन.. पँट अर्धि गुढग्यापर्यंत.. व हातात न्युजपेपर घेउन.. अडखळत पडत लिव्हींगरुममधे.. क्रेमरला सांगायला येतो.. की अरे बाबा.. फोनवर व्हँडले इंड्स्ट्री़ज असे म्हण.. व्हँडले इंडस्ट्रिज असे म्हण... पण त्या गडबडीत क्रेमर त्या बाइला फोनवर सांगतो की हा नंबर व्हँडले इंडस्ट्रिजचा नाही व तिला राँग नंबर लागला आहे असे म्हणुन फोन ठेवुन देतो... तिकडे जॉर्ज असे धावत येण्याच्या गडबडीत व पँट गुढग्यापर्यंत असल्यामुळे.. अडखळुन.. अपार्ट्मेंटच्या दरवाजातच... डोक्यावर हात ठेवुन पोटावर उपडा पडतो.. त्याची पँट गुढग्यापर्यंत.. अश्या अवस्थेत.. व तेवड्यात जेरी लॉन्ड्री रुममधुन खाली जाउन परत येतो व अपार्ट्मेंटचा दरवाजा उघडतो तर त्याला आत दारातच जॉर्ज तश्या अवस्थेत उपडा पडलेला दिसतो ... हातात लॉन्ड्री बास्केट घेतलेला जेरी.. जॉर्जला तश्या अवस्थेत उपडा पडलेला पाहुन .. मान शेक करत व मिश्किलपणे हसत म्हणतो.. अँड यु वाँटॅड टु बि माय लेटेक्स सेल्समन!...... LOL

Rofl आठवला हा पण एपि.
जॉर्ज चा अजून एक , एक बाई त्याला रिजेक्ट करते तेव्हा फ्रस्ट होउन त्याच्या त्या स्टाइल मधे " yes Jerry, a bald woman rejected me, saying I am not her type " Lol

आत्ता आठवलं म्हणून लिहितेय. काल की परवा रेमन्ड चा 'गुड गर्ल्स' वाला एपि लागला होता.
मरी फक्त एमीला तिच्या किचन मधे कुकिंग् चे प्रिविलिज देते. कारण ती "गुड गर्ल" ( Wink )आहे म्हणून Happy
रेमण्ड ची कमेन्ट " wow , so Emmy's not let anybody cook in her kitchen either " Lol

मी परवा तो एपिसोड बघितला ज्यात चॅरिटी सेलसाठी स्पॉटवरुन एक बाई रेमंडला बदडत असते आणि डेब येऊन त्याला वाचवते Biggrin

मै, खरंच भारी एपिसोड आहे तो.

सिंडे, ती 'पेगी' असते. अ‍ॅलीच्या मैत्रिणीची आई. त्यावरून आणखी एक एपिसोड आहे 'स्लीप ओव्हर'चा. तो पण मस्तच.

Pages