उखाणे - मायबोली इश्टाईल !

Submitted by राफा on 29 February, 2008 - 05:17

१.
अमुकरावांच्या संसारात फार रहावे लागते दक्ष
आमच्या मियांचे असते भलत्याच ‘बीबी’वर लक्ष

२.
लग्नाच्या पंगतीतच अमुकरावाना दिला चेकमेट
नाव घेताना म्हटलं, खरं घेऊ.. का डुप्लिकेट ?

३.
संसाराच्या ‘काहीच्या काही कविते’चं
तेव्हा मला कळलं गमक
बाहेर ‘मुक्तछंद’ चालू झाले ह्यांचे
जेव्हा घरी जुळेना यमक !

४.
अमुकरावाना झालीये भूतबाधा
त्यातून कधी बरे होतील काय ?
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?

५.
अमुकरावाना झालं अजीर्ण
केला जरी मी साधाच बेत
कितीही वाढलं तरी म्हणायचे
छान आहे, ‘अजून येवू देत’ !

६.
ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !

७.
दर भेटीत द्यायचे वचन लग्नाचं
एक दिवस म्हटलं: आता बास !
आपला ‘गुलमोहर’ होणार आहे
का नुसताच ‘जनरल टाईमपास’

८.
बैठकीनंतरच्या भेटीत वाटलं
ह्यांच्या एक कानाखाली देऊ का ?
म्हणाले फायनल करण्याआधी,
जरा तुझा 'प्रिव्ह्यू' घेऊ का ?

९.
साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात

१०.
’व्ही ऍंड सी’ झालाय ह्यांचा छंद
अगदी लहान गोष्टीही ताणतात
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात

११.
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले

***

गुलमोहर: 

खत्तरनाक!
अ‍ॅबसोल्यूटली टाईमलेस.
लग्नाचा मोसम सुरू आहे. लग्नाळू माबोकर्/कर्णींनो, प्रिण्टाऊटून ठेव्वा.

किती वर्शांनी वाचले हे उखाणे...

’व्ही ऍंड सी’ झालाय ह्यांचा छंद
अगदी लहान गोष्टीही ताणतात
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात>>> याला म्हंत्यात टाईमलेस उखाणा. Happy

एकसे एक ..... Lol मज्जा आली.

ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !
>>>> अ श क्य आहे! Biggrin

राफा,

जबरी हसलो. उखाणा हा प्रकार मुळी जाम उत्तेजक आहे. नवराबायकोपेक्षा इतरांनाच जास्त हौस असते उखाणा ऐकायची. अश्या वेळी ही असली पिल्लं सोडायला येणारी धमाल डोळ्यासमोर तरळून गेली.

त्याबद्दल शतश: धन्यवाद!! आता एक फेसबुकावर पण येऊ द्यात! Happy

आ.न.,
-गा.पै.

अरे कसलं भारी आहे हे Rofl

नवीन मायबोली सुरु झाल्याझाल्या लिहिलंय का हे ? तेव्हा Lol Biggrin आणि Rofl हे स्माईली नव्हते की काय ? २००८ च्या प्रतिक्रियांत केवळ दोन हाहा हसण्याचे स्माईली आहेत Happy

आणखी भर पाडा मग त्यात २०२० पर्यंत पहील्या पानावर राहील धागा . Proud

बाकी राहुल फाटक तुम्ही लिहीलेले उखाणे एकदम Lol Biggrin Rofl

स्पेशली दुसरा Rofl

वाह!

२०१४ पर्यंत हा धागा चालू होता... सहज चक्कर मारली आणि पाहून खूप आनंद झाला...

उस्फूर्त आणि उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!

- राफा

साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात

११.
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले

>>> सही रे राफ्फा ! Lol

LOL Wink

<<अमुकरावाना झालीये भूतबाधा
त्यातून कधी बरे होतील काय ?
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?<<

अगागागा....तुफान! Rofl

मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले>>>>>>>>>>> मला नवीन धागाकुमार आठवला हे वाचून. Rofl

Pages