उखाणे - मायबोली इश्टाईल !

Submitted by राफा on 29 February, 2008 - 05:17

१.
अमुकरावांच्या संसारात फार रहावे लागते दक्ष
आमच्या मियांचे असते भलत्याच ‘बीबी’वर लक्ष

२.
लग्नाच्या पंगतीतच अमुकरावाना दिला चेकमेट
नाव घेताना म्हटलं, खरं घेऊ.. का डुप्लिकेट ?

३.
संसाराच्या ‘काहीच्या काही कविते’चं
तेव्हा मला कळलं गमक
बाहेर ‘मुक्तछंद’ चालू झाले ह्यांचे
जेव्हा घरी जुळेना यमक !

४.
अमुकरावाना झालीये भूतबाधा
त्यातून कधी बरे होतील काय ?
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?

५.
अमुकरावाना झालं अजीर्ण
केला जरी मी साधाच बेत
कितीही वाढलं तरी म्हणायचे
छान आहे, ‘अजून येवू देत’ !

६.
ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !

७.
दर भेटीत द्यायचे वचन लग्नाचं
एक दिवस म्हटलं: आता बास !
आपला ‘गुलमोहर’ होणार आहे
का नुसताच ‘जनरल टाईमपास’

८.
बैठकीनंतरच्या भेटीत वाटलं
ह्यांच्या एक कानाखाली देऊ का ?
म्हणाले फायनल करण्याआधी,
जरा तुझा 'प्रिव्ह्यू' घेऊ का ?

९.
साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात

१०.
’व्ही ऍंड सी’ झालाय ह्यांचा छंद
अगदी लहान गोष्टीही ताणतात
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात

११.
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले

***

गुलमोहर: 

सभ्य मित्र मैत्रिणींनो, तुमच्या स्नेहपूर्ण, भावपूर्ण, परिपूर्ण अशा प्रतिक्रियांनी मी संकोचपूर्ण झालो आहे. असाच लोभ असावा ही विशेष विनंती. प्रेमळ प्रतिक्रिया, धमक्या, सूचना, मागण्या व उस्फूर्त प्रतिभाविष्कार ह्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद Happy - राफा

खास जमले आहेत उखाणे.

ह. ह. पु. वा.
Happy Happy Happy Happy Happy Happy
बर्‍याच दिवसांनी आलात...
काय ईन्ट्री आहे...
Happy
सुपरहीट!
Happy

जबरदस्त comeback. मस्त जमलेत सगळेच उखाणे.

राहूल, मस्त म्हणजे मस्तच... एकसे एक. सगळेच छान. इथल्या सगळ्या प्रतिक्रियांना उकडीचे हळदीच्या पानावरले मोदक अन वर साजुक रवाळ तुपाची धार... घ्या!

राहुल, तू टू मच आहेस!! Happy

फार फार हसलो.. एकसे एक... ४ ६ ९ १० एकदम आवडले.

ह्या असल्या जबरजस्त उखाण्यांसाठीतरी (अविवाहित) मायबोलीकरांनी लग्नाचं मनावर घ्यावं ही कळकळीची विनंती! Happy
-मृण्मयी

राफा, फारच जबरी..
स्वा ची मागणी करा की पुर्ण.. :)) वाट बघतोय...

व्वा! व्वा! राहुल भारीच उखाणे लिहिले आहेत तेही सद्यस्थितीवरील मायबोलीवर. मोठंच काम आहे हे. फार विचारपुर्वक लिखाण. अभिप्राय द्यायला थोडा उशिर झाला. मस्तच

राफा मस्तच... एकदम मायबोली ईश्टाईल...

केवळ महान ! अगदी HHPV ....!

परागकण

मस्तच टाईमपास.. हसून वाट. असे उखाणे फक्त मायबोलीकरांनाच कळणार.

मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले
<<<<< Rofl.... too much...जबरी :))

सगळेच भन्नाट आहेत.. १० आणि ११ विशेष आवडले...

अजून येवू देत... :))

>>>> लग्नाच्या पंगतीतच अमुकरावाना दिला चेकमेट
>>>> नाव घेताना म्हटलं, खरं घेऊ.. का डुप्लिकेट ?
आपल्याला बोवा हा आवडला! कस्ल वास्तवाशी नाते सान्गतो ना??????? Proud Lol

पण याच्यात तुमच्या त्या "अनुल्लेखा"वर एकही आला नाही, अस का बर???

भन्नाट रे... हसून हसून पुरेवाट..

सगळीकडे पिंक टाकूनही अमुकरावान्ची गटारी संपत नाही
"चोथा ढीगभर" जमला तरी साफसफाई मंडळ दिसत नाही..

राफा जबरीच रे ! उखाणे आपल्याला बहुतेक ऐकायला मिळतिल ! एका लग्नात ! जिंकलस मित्रा Happy

मस्त Happy धमाल आली वाचुन..

अरूण एक विचरायच होत. राहूलला योण्णा का म्हणतात?

छान! राहूल तुला रफा आणि योण्णा का म्हणतात ? उत्तर पाठ्व.

छान! राहूल तुला रफा आणि योण्णा का म्हणतात ? उत्तर पाठ्व.

राहुल्........काय धम्माल आहेत रे......!!
आज वाचला हा भन्नाट प्रकार मी ..... मान गये उस्ताद Happy

lol.gif अफलातून !! फारच मार्मिक आहेत हे...

This signature was written entirely with recycled electrons.

Pages