उखाणे - मायबोली इश्टाईल !

Submitted by राफा on 29 February, 2008 - 05:17

१.
अमुकरावांच्या संसारात फार रहावे लागते दक्ष
आमच्या मियांचे असते भलत्याच ‘बीबी’वर लक्ष

२.
लग्नाच्या पंगतीतच अमुकरावाना दिला चेकमेट
नाव घेताना म्हटलं, खरं घेऊ.. का डुप्लिकेट ?

३.
संसाराच्या ‘काहीच्या काही कविते’चं
तेव्हा मला कळलं गमक
बाहेर ‘मुक्तछंद’ चालू झाले ह्यांचे
जेव्हा घरी जुळेना यमक !

४.
अमुकरावाना झालीये भूतबाधा
त्यातून कधी बरे होतील काय ?
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?

५.
अमुकरावाना झालं अजीर्ण
केला जरी मी साधाच बेत
कितीही वाढलं तरी म्हणायचे
छान आहे, ‘अजून येवू देत’ !

६.
ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !

७.
दर भेटीत द्यायचे वचन लग्नाचं
एक दिवस म्हटलं: आता बास !
आपला ‘गुलमोहर’ होणार आहे
का नुसताच ‘जनरल टाईमपास’

८.
बैठकीनंतरच्या भेटीत वाटलं
ह्यांच्या एक कानाखाली देऊ का ?
म्हणाले फायनल करण्याआधी,
जरा तुझा 'प्रिव्ह्यू' घेऊ का ?

९.
साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात

१०.
’व्ही ऍंड सी’ झालाय ह्यांचा छंद
अगदी लहान गोष्टीही ताणतात
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात

११.
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले

***

गुलमोहर: 

जोरदार आहेत.. उखाणे..:)
प्रत्येक उखाणा एकसे बढकर एक
त्यामुळे... अजून येउ देत..:)

राफा, :)))))))))))))))))))))))))))

थँक गॉड...आज जरा मायबोलीवर येऊन बरं वाटतय... अजुन येऊ द्या :))))))))

-प्रिन्सेस...

योण्णा,

बरेच दिवस मायबोलीवरून गायब होतास. आज बर्‍याच दिवसांनी उगवलास. आणि आल्या आल्याच सिक्सर ठोकलीस.

मस्तच जमले आहेत उखाणे. अजून येऊ देत .............. Happy
--
अरूण

राफा........ एकदम जोरदार जमलेत बरं!!

नि थोडेफार 'त्याने' घेण्यासाठि पण बनवा!! Happy

चढत्या क्रमाने रंगत गेलेत बर्का उखाणे.
आणि किती दिवसांनी राफा इष्टाईल लाफा (लाफचे अनेकवचन हां तसल्या लाफा नाहीत) Happy
इतकी गॅप अज्जिबात चोलबे नाय. अजून तर येऊ द्याच पण जरा लौकर लौकर येऊ द्या पुढचे (वाढप Happy ).

एकसे बढकर एक! 'मायबोली स्पिरिट' प्रत्येक उखाण्यात उतरलंय अगदी! मस्त! :))))))))

अरेच्या, नविन गुलमोहर शोधता शोधता राफांनी एकदम यशस्वी एंट्री घेतली की गुलमोहरात........ एक से एक आहेत उखाणे.

राफा, स्वातीची मागणी पूर्ण करा हो. :))

भन्नाट आहेत उखाणे... Happy

जियो योण्णा जियो...

हसुन हसुन झाली आमची
भन्नाट अशी दशा हाय
आभार मानायला योण्णा तुमचे
नविन बीबी काढु काय?:):):)

एकदम सहीच हो राफा.. जोरदार आहेत सगळेच...

अमुकरावांचे सोडा इथे
सारेच दुसर्याशी भांडतात
दिवे घ्या म्हणत म्हणत
शालजोडीतले हाणतात Happy

'दिवे घ्या' वर एकही नव्हता म्हणून हा बळंच... Happy

येऊ देत अजून थांबवू नका
उखाण्यांच्या गाडीला
शर्टाला तुम्ही दिला नाहीत तरी
दिलाय बरका अभिप्राय साडीला Happy

visit http://milindchhatre.blogspot.com

राहुल एकदम जबरेश्वर प्रसन्न की!!!!!!!!!
एक से बढ कर एक!!

राफा, तुम्ही म्हणजे टू मच् आहात हा..
काय उखाणे आहेत.. एक सो एक जबरी. Happy

भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?

हा मला सर्वात जास्त आवडलेला. Happy

राहूल... खल्लास..... एकसे एक धमाल आहेत उखाणे!

प्रसाद...
साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं!
www.sadha-sopa.com

उखाणे जोरदार आहेत. Happy
पण मागच्या वर्षी प्रत्येक महिन्यात एक अशी गुलमोहर साधना केली होतीत.
ह्यावेळी बस एवढुसच?????????????????????

काहितरी कोटीबाज लेखन निदान डाकोरनाथाच्या कृपेने एखादा भीमा भोइर चा भाउ तरी यवुदेतच Happy

सहिच. फारच विनोदी आहे. मस्तच!!!

अरे राहुल.. भरपूर हसलो... येत जा की मधुन मधुन...

'परदेसाई' विनय देसाई

मस्तच लिहिलेय!! LOL!!

भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात

मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले

भन्नाट लिहीलय.

राफा एकदम धमाल लिहिल आहे Happy

जबरी आहेत हे उखाणे! सगळेच आवडले.

मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?

राहुला, ह.ह.पु.वा! सगळेच उखाणे फक्कड जमलेत.
मिल्या Happy

Pages