उखाणे - मायबोली इश्टाईल !

Submitted by राफा on 29 February, 2008 - 05:17

१.
अमुकरावांच्या संसारात फार रहावे लागते दक्ष
आमच्या मियांचे असते भलत्याच ‘बीबी’वर लक्ष

२.
लग्नाच्या पंगतीतच अमुकरावाना दिला चेकमेट
नाव घेताना म्हटलं, खरं घेऊ.. का डुप्लिकेट ?

३.
संसाराच्या ‘काहीच्या काही कविते’चं
तेव्हा मला कळलं गमक
बाहेर ‘मुक्तछंद’ चालू झाले ह्यांचे
जेव्हा घरी जुळेना यमक !

४.
अमुकरावाना झालीये भूतबाधा
त्यातून कधी बरे होतील काय ?
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?

५.
अमुकरावाना झालं अजीर्ण
केला जरी मी साधाच बेत
कितीही वाढलं तरी म्हणायचे
छान आहे, ‘अजून येवू देत’ !

६.
ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !

७.
दर भेटीत द्यायचे वचन लग्नाचं
एक दिवस म्हटलं: आता बास !
आपला ‘गुलमोहर’ होणार आहे
का नुसताच ‘जनरल टाईमपास’

८.
बैठकीनंतरच्या भेटीत वाटलं
ह्यांच्या एक कानाखाली देऊ का ?
म्हणाले फायनल करण्याआधी,
जरा तुझा 'प्रिव्ह्यू' घेऊ का ?

९.
साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात

१०.
’व्ही ऍंड सी’ झालाय ह्यांचा छंद
अगदी लहान गोष्टीही ताणतात
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात

११.
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले

***

गुलमोहर: 

व्वा राहुल, खुपच मजेदार .... मजा आली !!

राफा! मस्तच!!
नवीन घडामोडींवर काही

भज्जी ने मारली श्रीसंतला थोबडात
आम्ही शोधले घरात पण अमुकराव सापडले तमाशाच्या फडात!

भज्जीच्या नशिबी १० सामन्यांचे ब्यान
अन् माझ्या नशिबी अमुकरावांचे ध्यान!

ह. ह. पु. वा.
कोजागिरीची आठवण झाली :d

सगळेच अफलातून!

ह. ह. पु .वा!

ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !

सहिच आहे एकदम

>>
साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात
<<
तू माझ्या शर्टावर अभिप्राय न दिल्यामुळे 'नो अभिप्राय' Lol

खरोखर मस्त Lol

राफा म्हणजे काय याचा प्रचंड वेळ विचार करत बसले होते...
राट-फाट असेल का?
रापचिक-फाट...काही जुळेना...
शेवटी Light 1 पेटला... हे तर
राहूल फाटक Light 1

>लय भारी हां! २००८ मधलं सारं अजुन २०१० मधेही अस्संच आहे हो भाऊ
होय ना... किती दूरदर्शी लिखाण आहे पहा.. (ऊगाच नाही जुने वि. नवे वाद सारखे ऊपटतात) Happy
रा.फा. या आता (रोमातून) बाहेर या... नव्याने (नवे) साद घालत आहे पब्लिक Happy

हे उखाणे आणखी वीस पंचवीस वर्ष तरी मायबोलीवर नक्कीच चालतील. उद्या मुलं मोठी होऊन इथे येतील तेव्हा त्यांना सांगायला होईल की आम्ही तरुण होतो तेव्हापासून हे उखाणे चालतायत इथे. Wink

अगदी अगदी सायो! कालातीत उखाणे आहेत तरी वाकून वाहिलेल्या बेलासारखे किंवा मेथीच्या भाजीसारखे मिळमिळीत नाहीत! राफा द ग्रेट! Rofl

Pages