आधी अंडे की आधी कोंबडी ?

Submitted by अभय आर्वीकर on 12 January, 2010 - 04:28

चर्चेदरम्यान एक प्रश्न आला आहे.
आधी अंडे की आधी कोंबडी ?
याला पण उत्तर आहे काय? असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न राहुनच गेला. काय आले असेल आधी.... आधी अंडे की आधी कोंबडी ?
माझ्याजवळ पण याविषयी एक तर्क आहे.
जाणकारांनी याबाबत उत्तरे किंवा तर्क द्यावेत.
(या संदर्भात शेवटचे प्रतिसाद वाचावेत.)
...................................................................................

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवेनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत वाढतच जाते.वैताग येतो.आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणुन विषय सोडुन देतो.
.............
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दुर होते आणि लक्षात येते की महाकठीन वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
.........................
आज हा विषय चघळण्याचे कारण ?
२६ जानेवारी - गणराज्य-प्रजासत्ताक दिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
'काय मिळवले काय गमविले'
'देश जगात महाशक्ती म्हणुन उदयास येणार की नाही'.
'देशाला प्रगतीपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिल्रे'.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा ? नेते मंडळी की जनता जनार्दन ?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा...... उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारिख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरु.
हे असे रहाटगाडगे...........पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती.....!!
याला म्हणायचे प्रजासत्ताक.....!!
जोरसे बोलो....
प्रजासत्ताक दिन चिरायु होवो....!!!!!!!!!!!!!!!
..
गंगाधर मुटे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users


याशिवाय राजकारणाशी प्रत्येकाचे हितसंबधही गुंतले असु शकतात.

मुटे जी, तुमच्या वरिल वाक्यावरुन असं म्हणणं योग्य आहे का ? की सगळ्या आत्महत्या करणारे शेतकरी हे आळशी,कामचोर आणि व्यसनी होते..सगळ्याना एकाच तराजुत तोलु नका ..ही विनंती !

घरची शिळी भाकरी तोडुन, कुणाचा चहा ही न पिता,(दर वर्षी सरकारकडुन फुकट्च्या सवलती,पॅकेज घेण्याची सवय नसलेली) वर पदरमोड करुन,बळीराज्याच्या भल्यासाठी प्रामाणिक पणे लढणारया साठी (मग तो कुणीही असो) झट्णारी स्वाभीमानी तरुण माणसं,दिवस उजाडण्या पुर्वी आपल्या रानात दिसणारे शेतकरी पाहायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी सांगली-कोल्हापुरलाच यावं लागेल ..!

<याशिवाय राजकारणाशी प्रत्येकाचे हितसंबधही गुंतले असु शकतात.>
हे वाक्य वाचक,लेखक आणि बुद्धिप्रामाण्यवाद्यांशी निगडीत आहे.
पण तरीही ७० टक्के शेतकरी, मतदान करतांना जातीपाती,धर्मपंथ,पक्ष याच्या आधारेच मतदान करतो, हे वाक्य फार चुकीचे होणार नाही.
<की सगळ्या आत्महत्या करणारे शेतकरी हे आळशी,कामचोर आणि व्यसनी होते..>
असे मी म्हणुच शकत नाही. हे खोटे ठरविण्यासाठी एवढा लेख प्रपंच आहे.
हे कृपया पुन्हा एकदा वाचा.
.
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे

पण तरीही ७० टक्के शेतकरी, मतदान करतांना जातीपाती,धर्मपंथ,पक्ष याच्या आधारेच मतदान करतो, हे वाक्य फार चुकीचे होणार नाही.

हे खरंच आहे ,या मुळेच तर आतापर्यंत शेतकर्यांचा दबावगट तयार होऊ शकला नाही ...

मतदान करतांना जातीपाती,धर्मपंथ,पक्ष याच्या आधारे मतदान न करता, अन्य विषयाचे आधारावर मतदान करावे,याविषयी आपण सदैव जनजागृती करीत राहाने आवश्यक आहे.
कालांतराने मिळेल पण नक्की यश मिळेल.

'The chicken came first, not the egg', scientists prove
But now they believe they have cracked the conundrum of what came first: the chicken or the egg.
British researchers say the chicken must have come first as the formation of eggs is only possible thanks to a protein found in the chicken’s ovaries.
‘It had long been suspected that the egg came first but now we have the scientific proof that shows that in fact the chicken came first,’ said Dr Colin Freeman, from Sheffield University, who worked with counterparts at Warwick University.
...............................................................................

कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाच्या उत्तरात मला मात्र आधी अंडी हेच जास्त संयुक्तिक वाटते.
*
बदक आणि शहामृग किंवा तत्सम पक्षाच्या अनैसर्गिक संकरातून जे अंडे आले त्यातूनच कोंबडीचा जन्म झाला असावा.

शेतात काम करणार्‍या स्त्रियांबद्दल काय? आज महिला दिन आहे ना?
चंपक ,
आहो कुणाला (राज्यकर्त्यांना,नेत्यांना) वेळ आहे, या अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला ...
मुटेजी,
कोंबडी आधी की अंडे ?
या शोधामागे काही हेतु नक्कीच असणार ?

बदक आणि शहामृग किंवा तत्सम पक्षाच्या अनैसर्गिक संकरातून जे अंडे आले त्यातूनच कोंबडीचा जन्म झाला असावा.>>>>>>>>

खरं तर बदक आणि शहामृग किंवा तत्सम पक्षाच्या अनैसर्गिक संकरातून जे अंडे आले त्यातुन जरी कोंबडी निघाली तरी ते अंडे कोंबडीचे असे म्हणता येनार नाही.. त्या कोंबडीला जेव्हा अंडे झाले तेव्हाच त्या अंड्याला कोंबडीचे अंडे म्हटले जाईल.. त्यामुळे तर्कशास्त्र सुद्धा हेच सांगते की कोंबडी आधी...
हा माझा तर्क नसुन मागे कधितरी वर्तमानपत्रात आले होते.. असा पेपरही scientific journal मधे आला आहे.. पण मला त्याचे डिटेल्स आठवत नाहियेत..

आणि बदक आणि शहामृग किंवा तत्सम पक्षाच्या अनैसर्गिक संकरातून कोंबडी निर्माण झाली का हा देखील एक प्रश्नच आहे.. मला तरी तस वाटत नाहिये.. हे तिनही पक्षी एकाच वेळेस evolve झाली असन्याची शक्यता मला जास्त वाटते.. याबद्दल कोनाला माहिती असल्यास सांगा...

त्या कोंबडीला जेव्हा अंडे झाले तेव्हाच त्या अंड्याला कोंबडीचे अंडे म्हटले जाईल.. त्यामुळे तर्कशास्त्र सुद्धा हेच सांगते की कोंबडी आधी.

कोंबडी आधी की कोंबडीचे अंडे आधी? असा प्रश्न असता तर वरील तर्क बरोबर असता पण.

कोंबडी आधी की अंडे आधी? असा प्रश्न असतो. याचा अर्थ पहिल्यांदा जन्म कुणाचा, अंडी देणार्‍या कोंबडीचा की कोंबडी जन्माला घालण्यार्‍या अंडीचा, असा मी अर्थ घेतोय.

निसर्गतः उत्क्रांती झालेल्या सजिवांमध्ये स्वबळावर स्वसंक्षण करण्याचे सामर्थ्य आलेले असते.
ते कोंबडीत आढळत नाहीत.

म्हणुनच हा प्रश्न नेमका कोंबडीबद्दलच विचारला जातो. अन्य पशूबद्दल नाही. Happy

यावर विस्तृत चर्चा व्हायला हवी.

कोंबडी आधी की कोंबडीचे अंडे आधी? कोंबडी आधी की अंडे आधी?>>>>>> हे कधी लक्षातच आले नव्हते, की प्रश्न कोंबडी आधी की कोंबडीचे अंडे आधी असा नाहिये म्हणुन.. तस असेल तर तुमचा तर्क सध्यातरी मला बरोबर वाटतो आहे.. यावर अजुन विचार करावा लागेल मला Happy

मित्रांनो माझ्यामते कोंबडा आणि कोंबडी आधीच्....कारण अंड्याची जनुकिय रचना या दोघांच्या सहवासानेच निर्माण होणार असते...आणि

अंडे ऊबवण्यासाठीचं लागणारं वातावरण कोंबडीच निर्माण करु शकत होती पूर्वि.
Hatchrys मशिनी तर अत्ता आल्या .

जसं पाण्यातील पहीला सजिव बेडुक (डायरेक्ट लाईफ) नाहीतर अंड्यातिल पहीला सजिव म्हणावं लागलं असतं.....तसंच कोंबडी आधी मग अंडे.

खलास....खलास्....खलिवली......दुसरा प्रश्न घ्या आता चला.

माझ्या मते आधी कोंबडीच .... मग तिच्या उरलेल्या रश्श्यात उकडलेले अंडे घालून रात्रीच्या जेवणाची वेळ भागवता येते.

उरलेल्या रश्श्यात उकडलेले अंडे घालून रात्रीच्या जेवणाची वेळ भागवता येते>>
अंडाकरी........व्वा नविन आईडीया Light 1

नुकतेच कुठेतरी न्युज मधे ऐकल्यासारखे आठवतेय 'आधी अंडे की आधी कोंबडी' या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना मिळाले आहे. आणि ते 'आधी कोंबडी' असे आहे.

कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाच्या उत्तरात मला मात्र आधी अंडी हेच जास्त संयुक्तिक वाटते.
*
बदक आणि शहामृग किंवा तत्सम पक्षाच्या अनैसर्गिक संकरातून जे अंडे आले त्यातूनच कोंबडीचा जन्म झाला असावा.

मुटे साहेब तुम्हि पुन्हा तेच गिरवताय्.....बदक आणि शहामृग आधि? कि त्यांचे अंडे आधि????? हा आता परत तोच प्रश्न आहे. कोंबडी आधी की अंडे?

तुमचाच २२/०७/२०१० चा प्रतिसाद पहा.

तुम्हाला बहुतेक प्रश्न समजला नाही......:अरेरे:

ऑर्कूटवर या आधी या विषयावर इतक्या चर्चा झाल्या, बीपी वाढवून घेतलं, रक्त आटवलं.. रात्र रात्रा मॉनिटरची लाईट जाळली आणि नेटचं बिल वाढवून घेतलं, डोळ्यांच्या खाचा केल्या तरी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. काही बदललं नाही..

मग मीच बदललो.. आणि वावाह बाह्य संबंध सुरू केले..
म्हणजे असे विषय हाताळायला सुरूवात केली. बीपी नॉर्मल राहतं ...

पहिल्यांदा बदकाच्या अंड्यापासून कोंबडी निर्माण झाली असे व्ही.ए.आर. आर. आय. मधील सी. आर. गी (क्रिएटिव्ह रिसर्च ग्रूप) मध्ये कार्यरत असलेल्या तेवीस संशोधकांपैकी अठरा जणांचे म्हणणे आहे व त्याचा पेपर ऑलरेडी सबमिट झालेला असून तो जवळपास अ‍ॅक्सेप्ट होणार आहे असे समजते.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

व्ही.ए.आर. आर. आय. मधील सी. आर. गी (क्रिएटिव्ह रिसर्च ग्रूप) मध्ये कार्यरत असलेल्या तेवीस संशोधकांपैकी अठरा जणांचे म्हणणे आहे

अठरा जण बदकाच्या अंड्याजवळ बसून असावेत आणि पाच जण त्यांना हवं नको ते बघत असावेत

किती चाटणार भारतपुत्रा? :
आधी अंडे की आधी कोंबडी ?
शेतकर्या ची पाणी लावून हजामत.
पुरस्काराचा भुलभुलैया
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन सोहळा
आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका
तृप्ततेची चमक आणि फटाकडी
भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२
गंधवार्ता
अट्टल चोरटा मी........!!
प्राक्तन फ़िदाच झाले
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत
घायाळ पाखरांस ....
हिशेबाची माय मेली?
शेती आणि शेतकरी

Pages